घराच्या भिंतीवर वारली चित्रकला कशी साकारावी?

Submitted by शिवाली on 13 June, 2016 - 05:41

नमस्कार मायबोलीकर,
माझ्या डायनिंगच्या खिडकीशेजारी भिंतीचा छोटासा पॅच आहे. साधारण १'x२'चा. सध्या त्याला नेहमीचा अाॅफ व्हाइट रंग आहे. त्यावर वारली पेंटिंग करण्याची खुमखुमी आली आहे. तर मंडळी ते कसे करावे याबाबत कृपया मदत करा.
गुगलुन नीट काहिच माहिती मिळाली नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद रश्मी.
मला A toZ सगळीच माहिती हवी आहे. जसे कि, सुरुवात करताना बेस कोट, प्रायमर काय वापरायचे? लाल, मातकट रंगासाठी गेरु कि भिंतीला जो रंग लावतो त्यातलाच काही प्रकार? चित्र टिकाऊ होण्यासाठी काय करावे? वाॅर्निश वापरायचे कि आणखी काही? इ.इ.
आता आपल्या लक्षात येईल. माहिती मिळाल्यावर प्रकरण आवाक्यातले वाटले तरच वाटेला जाईन. पण करुन बघायची खुप इच्छा आहे.