अमेरिकेतील वेस्ट कोस्ट सहलीचा बेत कसा असावा किंवा नसावा?

Submitted by गरम मसाला on 24 May, 2016 - 10:46

येत्या महिन्याभरात अमेरिकेतील वेस्ट कोस्ट भागातील ठिकाणांना भेट द्यायचा विचार आहे. ( सहलीचा कालावधी सा. ८-१० दिवस) सद्ध्या तरी अशी रूपरेषा मांडली आहे. तरी यात काहि बदल सुचविल्यास अथवा सुचना केल्यास मदत होईल. {मी, माझी सौ, व आई-वडील (वय ६०-७० अनु.) असे चौघे जण असणार आहोत.}

दिवस. १ (शुक्रवार) - अटलांटा- लास वेगास (आगमन रात्रौ.)
दिवस. २ (शनिवार) - लास वेगास (मोजके कसिनो)
रेंटल कार ने पुढिल प्रवास
दिवस. ३ (रविवार) - लास वेगास-हुवर डॅम-योसेमीती नॅशनल पार्क (आगमन रात्रौ.) प्र.वेळ सा. ९ तास
दिवस. ४ (सोमवार)- योसेमीती नॅशनल पार्क
दिवस. ५ (मंगळवार)- योसेमीती नॅशनल पार्क - लेक टाहो (आगमन संध्याकाळी.) प्र.वेळ सा. ५ तास
दिवस. ६ (बुधवार)- लेक टाहो
दिवस. ७ (गुरुवार)- लेक टाहो -सॅन फ्रांसिस्को (आगमन सकाळी.) प्र.वेळ सा. ४.३० तास
दिवस. ८ (शुक्रवार)- सॅन फ्रांसिस्को (भोवताल्ची काही ठिकाणे???)
दिवस. ९ (शनिवार)- सॅन फ्रांसिस्को-लास वेगास (आगमन रात्रौ.)
रेंटल कार परत करणे.
दिवस. १० (रविवार) - लास वेगास-अटलांटा (आगमन दुपारी.)

यात नमुद केलेल्या ठिकाणांसाठी ठरवलेला वेळ बरोबर आहे का? काही कमी जास्ती करावे का? याव्यतीरिक्त काहि ठिकाणे 'मस्ट सी' आहेत का? (स.किनारे, वगैरे)? रहाण्याची ठिकाणे कोणती निवडावीत इ.?

आपल्या सुचनांच्या प्र्तिक्षेत.....:)

गम

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हूवर डॅम ते युसेमिटी, युसेमिटी ते लेक ताहो ह्यामधला ड्रायव्हिंग साठी धरलेला वेळ अ‍ॅम्बिशियस वाटतो लेक ताहो सॅन फ्रान्सिस्को ह्यामधला वेळ बघता.

तुमच्या प्लान मध्ये माँटेरे, बिग सर किंवा नॉर्थ ऑफ सॅन फ्रान्सिस्को अशी पॅसिफिक कोस्ट ला लागून काही ठिकाणं नसली तर नक्की विचार करा. खूप छान जागा आहेत सॅन फ्रान्सिस्को च्या आसपास पॅसिफिक कोस्ट वर.

<हूवर डॅम ते युसेमिटी, युसेमिटी ते लेक ताहो ह्यामधला ड्रायव्हिंग साठी धरलेला वेळ अ‍ॅम्बिशियस वाटतो लेक ताहो सॅन फ्रान्सिस्को ह्यामधला वेळ बघता.>

सशल, वेळ संपादित केली. पुन्हा एकदा तपासुन पाहीले. धन्यवाद.
आपण सुचवलेल्या ठिकाणांबद्द्ल नक्की विचार करेन.
अनेक आभार.

हूवर डॅम पासून ग्रॅंड कॅन्यन तिथून मॉन्युंमेंट व्हॅली मार्गे आर्चेस नॅशनल पार्क . तिथून झायॉन / ब्राइस करुन व्हेगास ला परत .

किंवा व्हेगास पासून सॅन डिएगो, एल ए, डेथ व्हॅली अशी टूर करु शकता

वेगास, ग्रँड कॅन्यन, हूवर डॅम यासोबत लॉस एन्जेलिस, हवे तर सॅन डिअ‍ॅगो आणि/ किंवा सिकोया असा एक प्लॅन करता येईल. सॅन्फ्रॅन्सिस्को, मॉन्टेरी, योसेमिटी, नापा, लेक टाहो ही वेगळी ट्रिप करा पुन्हा कधीतरी Happy तुम्ही लिहिलेलं सगळं इतक्या कमी दिवसात प्रॅक्टिकल नाही वाटत. नुस्ते टूरिस्ट स्पॉट च्या भोज्जाला शिवणे आणि प्रवास खूपच जास्त असे होईल .

मै +१

<हूवर डॅम पासून ग्रॅंड कॅन्यन तिथून मॉन्युंमेंट व्हॅली मार्गे आर्चेस नॅशनल पार्क . तिथून झायॉन / ब्राइस करुन व्हेगास ला परत किंवा व्हेगास पासून सॅन डिएगो, एल ए, डेथ व्हॅली अशी टूर करु शकता. >

मेधा, ग्रॅंड कॅन्यन जवळपासचा भाग बघून झाला आहे. शक्यतो योसेमिटी आणि लेक टाहो बघायचा विचार आहे या वेळी..पण धन्यवाद, आपण सुचविलयाबद्द्ल...

<तुम्ही लिहिलेलं सगळं इतक्या कमी दिवसात प्रॅक्टिकल नाही वाटत. नुस्ते टूरिस्ट स्पॉट च्या भोज्जाला शिवणे आणि प्रवास खूपच जास्त असे होईल>

Maitreyee: योसेमिटी, लेक टाहो येथे १.५ दिवस (प्र्वासाखेरीज) पूरणार नाहि असे आहे का? तसे अस्ल्यास मी लास-वेगास ड्रॉप करायचा विचार करेन व सॅन फ्रांसिस्कोहून सुरुवात करेन सहलीची म्हणजे अजुन जास्ती वेळ मिळेल.

योसेमिटी, लेक ताहो येथे काय कारयाचं आहे त्यावर तीन दिवस प्रवास धरून पुरतील की नाही हे अवलंबून आहे.

आलेल्या पाहुण्यांकडे कमी वेळ असतो त्यामुळे त्यांनां घेऊन दोन वेळा दोन दिवसांत युसेमिटी, लेक ताहो हे आम्ही केलं आहे आतापर्यंत बे एरियातून. पण ह्या खरोखर भोज्जा ट्रिप्स. युसेमिटी मध्ये व्हॅलीत फिरणं ( युसेमिटी फॉल्स, ब्रायडल व्हेल फॉल , आणि रस्त्याने जाताना वाटेत जे विस्टा पॉइण्ट्स असतात तिथे थांबून नजारे बघणं हे युसेमिटीत आणि साऊथ लेक ताहो ला गॉन्डोला घेऊन वर जाणं (ऑब्जर्व्हेशन डेक) आणि एमरल्ड बे किंवा बीच इथे जाऊन भोज्जा करणे हे या दोन दिवसांत केलं.

टायोगा पास रोड तसाही बंदच असेल अजून आणि ग्लेशियर पॉइण्ट कधी ओपन होणार ते चेक करा. गॉन्डोला स्की सीजन संपल्यानंतर कधीतरी एकदा बंद असतो मेन्टेनन्स करता (एका पाहुण्यांच्या बाबतीत झालं होतं). तर ते ही चेक करा गॉन्डोला मध्ये इंटरेस्ट असल्यास.

शक्यतो योसेमिटी आणि लेक टाहो बघायचा विचार आहे या वेळी.> तसं असेल तर सॅन फ्रॅन पासून सुरु करा ट्रिप , तिथे १-२ दिवस ,एक दिवस नापा व्हॅली , मग योसेमिटी, व इतर भाग असा प्लॅन करता येईल

टाहो मधे बर्फ नसेल तर योसेमिटी आणि टाहो दोन्ही साधारण सारखीच टेरेन आहे. मी दोन्हीकडे एक दोन दाच गेलो आहे. बे एरियात या भागांचा फार डीटेल्ड अ‍ॅनेलिसीस केलेले लोक आहेत त्यामुळे Dude, you are out of your mind अशी प्रतिक्रिया यावर येथे येउ शकते Happy

आपल्या सगळ्यांचे अनुभव वाचून व घरी चर्चा करुन लास वेगास रद्द करण्याचे ठरवले आहे. आता सॅन्फ्रॅन्सिस्कोपासून सुरुवात केली तर प्रत्येक ठिकाणी २-२ दिवस तरी मिळतील असे वाटते.

<टायोगा पास रोड तसाही बंदच असेल अजून आणि ग्लेशियर पॉइण्ट कधी ओपन होणार ते चेक करा>
सशल, सध्याची स्थिती अशी आहे..

Capture.JPG

आता नवीन बेत आखावा लागणार..!

गरम मसाला, तुमचा प्लॅन , मामी चे प्रवास वर्णन आणि दोनी धाग्यावरील कॉमेट वाचुन आम्ही खालील गोष्टी केल्या.

दिवस. १ (शुक्रवार) - विमानाने- लास वेगास (आगमन रात्रौ.), कार रेंट केली.
दिवस. २ & ३ (शनिवार,रविवार ) - लास वेगास ( कॅसिनो, खरेदी, Red Rock Canyon )
दिवस. ४ (सोमवार) - लास वेगास-हुवर डॅम-grand canyon south rim प्र.वेळ ५ तास + ३ तास डॅम , संध्याकाळी ४ तास south rim वर फिरुन तिकडच्या लॉजवर मुक्कम,
दिवस. ५ (मंगळवार)- सकाळी ५ ला सुर्योदय बघुन मग १२ वाजेपर्यन्त फिरुन LA ला : प्रवास वेळ ८ तास. hollywood ave मध्ये फिरुन जवळच हॉटेल मध्ये मुक्काम.
दिवस. ६ (बुधवार)- सकाळी ग्रिफिट पार्क मध्ये ट्रेक करुन फ्रेस्नो मध्ये गेलो प्रवास वेळ ४ तास. फ्रेस्नो मध्ये http://www.undergroundgardens.com/ बघुन रात्री फ्रेस्नोचे कॉस्टको बघितले . मुलाना west coast चे कॉस्टको कसे असते ते बघायचे होते.
दिवस. ७ ( गुरवार ) सकाळी लवकर उठुन योसेमीती नॅशनल पार्क: प्रवास वेळ २ तास , पुर्ण दिवस ग्लेशियर पार्क , tunnel view, योसेमीती फॉल्स बघुन रात्री योसेमीती लॉज वर मुक्कम
दिवस. ८ (शुक्रवार) सकाळी Mount Vernon ट्रेक , valley. रात्री सॅन फ्रांसिस्को ला, प्रवास वेळ : ४ तास.
दिवस. ९,१० (शनिवार-रविवार )- मोनट्री बे (तिकडेच मुक्काम केला) , कॅरेमल बे, पेबल बिच हायवे १ वर दोन तास ड्राईव्ह, रविवारी संध्याकाळी अ‍ॅपल , गुगल आणि मिलपिटास मध्ये देवदर्शन. ह्या दोन दिवसात ८ तास प्रवासात गेले. बे एरिया मधुन साउथ ला जाताना शनिवार - रविवारी भरपुर ट्र्फिक असते आणि त्यात त्या भागातिल जंगलात आग लागलेली असल्याने बराच वेळ गाडीत काढावा लागला.
दिवस.११ -१२ (सोमवार - मंगळवार ) : सॅन फ्रांसिस्को सिटी, मंगळवार रात्री रेंटल कार परत करुन विमान पकडुन बुधवारी सकाळी घरी.

प्लॅन तसा हेक्टीक होता. १९०० माईल ड्राईव्ह झाले पण असे वाटले नाही की कुठे कमी वेळ दिला. LA मध्ये आम्ही फक्त १२ तास होतो . मुलाना डिसनी किंवा युनिवर्सल ला जायचे न्हवते . LA मधिल ट्रॅफिक मुळे आम्ही पण LA बघायच्याचा एवजी फ्रेस्नो मध्ये अर्धा दिवस घालवला.