हि कथा आहे स्वप्ना आणि स्वप्नीलची (नावं काल्पनिक आहेत पण कथा खरी आहे.)
दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. तेव्हा फक्त तोंड ओळख होती. हाय हेल्लो पुरतेच बोलायचे. यथावकाश कॉलेज संपले आणि ते वेगवेगळ्या मार्गाला गेले.
अचानक १-२ वर्षांनी त्यांची गाठ पडते. पुन्हा तेच हाय हेलो. मग असाच एक दोनदा भेट झाल्यावर फोन नंबर एक्स्चेंज होतात. मग ते फोन वर बोलन…. एकमेकांची आवड निवड जाणन. हे सगळ सुरु होत. मग डेटिंग सुरु होत. तिला तो मनापासून आवडतो. मनोमनीच ठरवते कि लग्न करेन तर याच्याशिच.
पण तो… तो फक्त टाईमपास करत असतो. ती बिचारी सगळ खर समजून त्याला भरभरून प्रेम देते.
आणि अचानक एक दिवस तो तिला काहीही न सांगता सोडून जातो. ती बिचारी रडरड रडते. सगळीकडे चौकशी करते. तेव्हा तिला कळत कि त्याच तिच्यावर कधी प्रेमच नव्हत. खूप वाईट वाटत तिला. कारण तिच्या आयुष्यातलं ते पहिलच प्रेम असत आणि तेही असं फसवं निघत. दिवस जातात, महीने जातात. हळूहळू तिची गाडी रुळावर यायला सुरुवात होते. मग सगळ विसरायचा प्रयत्न करते. पण ते तिच्यासाठी अशक्य असत कारण तो कसाही वागला तरीही तीच प्रेम खरच असतं.
पुन्हा एकदा तिचं आयुष्य एक वेगळ वळण घेत. २ वर्षांनतर तो तिच्या समोर उभा राहतो. अगदी परिस्थितीने गंजून गेलेला असा. हात जोडून तिची माफी मागतो मला एकदा माफ कर म्हणतो. स्वत: पासून वेगळ करू नकोस म्हणतो. हि तर प्रेमच करत असते त्याच्यावर. चूक समजून घेऊन माफ करते त्याला. तो तिला सगळ समजाउन सांगतो. ती पुन्हा त्याला तिच्या आयुष्यात स्थान देते. आता हा हि तिच्यावर मनापसून प्रेम करू लागतो. तिला कुठे ठेऊ अन कुठे नको अस होऊ लागत. जगातली सगळी सुख द्यायचा प्रयत्न करतो. सगळ सुखासुखी सुरु असतं.
आता ती त्याला लग्नाची गळ घालते. आपण लग्न करूया म्हणते. तो हि 'हो' म्हणतो. पण इतक्यात नको, थोड सेटल होऊ दे म्हणतो. ती हि मग जास्त आढेवेढे न घेता समजून घेते. आता ते एकमेकांच्या 'जास्तच' जवळ येतात. तीही त्याच्यावर 'विश्वास' ठेवते. त्याच्या प्रेमात आकंठ बुडते.
एक दिवस तो तिला म्हणतो 'मी गावी जात आहे कामासाठी पूर्ण कुटुंबाबरोबर' असं सांगतो. ती हि जास्त काही विचारत नाही. तो गाडीत बसतो तोच त्याचा शेवटचा 'कॉल' असतो. त्यानंतर त्याचा एकही कॉल येत नाही आणि हि कॉल करते तर फोन बंद येतो. हिच्या मनात नको नको ते विचार यायला लागतात. काय झाल असेल? तो ठीक तर असेल न? त्याच्या वडिलांना बर नव्हत, ते तर ठीक असतील न? एक न दोन हज्जार शंकांनी तीच मन ढवळून निघत. दिवस पुढे जात असतात.
बरोबर १५ दिवसांनी तो तिला न सांगता न कळवता तिच्यासमोर येउन उभा राहतो. (तसंही त्याला तिला सर्प्राईजेस द्यायला आवडायचं) तिला काय करू अन काय नको अस होऊन जात. तश्याही परिस्थितीत भर रस्त्यात ती त्याला मिठी मारते. मग स्वतः ला सावरून घेते. मग तो तिला घरी सोडतो. पूर्ण वेळ ती त्याच्या बाईक वर मागे बसून रडत असते. तो मात्र शांत असतो. घर जवळ येत तास तो तिला शांत करतो आणि 'सगळ ठीक होईल' अस म्हणतो.
'सगळ ठीक होईल' हे एकाच वाक्य तिच्या मनात गुंजी घालत असतं. तसाही आल्यापासून त्याच्यात पडलेला बदल तिला जाणवत होता. खूप शांत शांत वाटत होता तिला तो. तिला समुद्रकिनारे फार आवडतात हे त्याला माहित असत. एक दिवस तो तिला अचानक फिरायला घेऊन जातो. समोर तो शांत समुद्र आणि त्याच्या समोर बसलेले हे दोघे जण. ती नेहमीच्या मस्करीच्या मूड मध्ये असते आणि हा मात्र शांतच. आणि मग तो बोलू लागतो, 'स्वप्ना मला तुला काहीतरी सांगायचं……. मी तुझ्यापासून काहीच लपऊ शकत नाही. माझा साखरपुडा झाला' ……… मी गावी गेलो होतो ते त्याचसाठी. माझ्या आई वडिलांनी परस्पर सगळ ठरवलं. मला काहीही न सांगता हे सगळ झाल. वडिलांनी आत्महत्येची धमकी दिली मला आणि त्यामुळे मला त्यांच्या मनाप्रमाणे करावच लागल… स्वप्ना मला माफ कर……. मला दूर नको लोटू तुझ्यापासून'…. तो रडत होता. माफी मागत होता.
पण ती ……… 'माझा साखरपुडा झाला' …… हे एवढेच शब्द ऐकले तिने आणि ती कोसळली. ते शब्द जणू कानात कोणीतरी गरम शिसे ओतावे तसे भासले तिला… पुढच काही ऐकूच आल नाही. तिचं त्याच्याबरोबर एकत्र राहाण्याच स्वप्न पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळलं. धरणीमाय पोटात घेईल तर बर अस वाटत होत तिला. डोळ्यापुढे फक्त आणि फक्त अंधार येत होता. सावरण्याच्या मनस्थितीतच नव्हती ती. कशी बशी घरी गेली.
तिच्या डोळ्यासमोर सगळा भूतकाळ तरळू लागला. खूप खचली ती. तो तिला परोपरीने समजावत होता पण आता तिच्या अंगात चंडी संचारली होती. खऱ्या प्रेमाचा असा दगा व्हावा हेच तिला पटलं नाही. तिने त्याला सांगून टाकल कि ती जे काही त्या दोघांमध्ये झालं ते त्याच्या आई वडिलांना सांगून टाकेल. तो तिच्या हाती - पाई पडू लागला. आई वडील काहीतरी करून घेतील असं सांगू लागला. पण ती त्याच काहीच ऐकून घेत नव्हती. शेवटी ती शांत झाली. शांत डोक्याने विचार करू लागली. आई वडिलांना शिक्षा का द्यायची? म्हणून ती शांत बसली.
आता तिचा प्रेमावरून विश्वास उडाला होता. एकीकडे तिच्यासाठी स्थळे बघायला सुरुवात झाली होती. लग्न करण्यात तिला काडीचाही इंटरेस्ट नव्हता पण केवळ जन्मादात्यांकडे बघून ती सगळ्याला तयार झाली. इथेही तिच्या नशिबात सुख नव्हतच. पुन्हा त्याने फोन करून त्रास द्यायला सुरुवात केली होती. तू काहीही झाल तरी माझ्याबरोबर राहा… अस त्याच म्हणन होत तर ती आत्ता ह्या जबरदस्तीच्या नात्याला तयार नव्हती. ती तर लग्नाला तयार होती त्याच्याबरोबर. पण त्याला तिच्याबरोबर लग्न न करता राहायचं होत. ती कॉलला उत्तर देत नाही म्हणून तो तिला मेसेजेस करू लागला. 'तू कधी हि सुखी राहणार नाही, तुला नवरा मिळेल पण फक्त नावापुरता, तू स्वार्थी आहेस, तुला फक्त लग्न हवाय मी नको' … अस आणि आजून बराच काही.
हीच कामात लक्ष नाही लागत आहे. सततच्या ह्या टोर्चरमुळे ती वैतागली आहे. काय करावं? कुणाशी बोलावं काळात नाही आहे.
तर हि तिची व्यथा आहे. तुम्हाला काय वाटत यात चूक कोणाची? आणि तिने आत्ता आयुष्याच्या अश्या वळणावर काय निर्णय घायला हवा?
सैराट पार्ट - २ वगैरे
सैराट पार्ट - २ वगैरे सुचतै...
यात काय करायला पाहिजे हे सर्वाना माहीत आहे.
सो पास
यात चुक कोणाची? याचा आत्ता
यात चुक कोणाची? याचा आत्ता विचार करुन काय उपयोग जी घटना घडुन गेली ती गेली.
आता काय करायला हवे ते खंबिरपणे ठरवायला हवे.
त्या मुलाच्या कुठल्याही बोलण्यावर विश्वास न ठेवता स्वता:चे निर्णय घ्यावेत
त्याच्या कुठल्याही धमक्यांना भिक घालु नये
घरच्यांना विश्वासात घ्यावे त्यांच्या मदतिने मार्ग काढता येईल
लग्न जरुर करावे मागचे सगळे मागे टाकुन नविन जिवन सुरु करावे.
पोरगा पक्का चाप्टर आहे हे उघड
पोरगा पक्का चाप्टर आहे हे उघड आहे, मग भावनिक धाग्यात गुंतून राहण्याचा प्रश्न येत नाही, मग ती त्याला वठणीवर का नाही आणत. ती त्याच्या घरी त्याच्या आईवडीलांना फोन करून सांगत का नाही हे.
तो जसा आता वागतोय त्यावरून त्याला आईवडील जिवाचे काही बरेवाईट करतील याची काडीचीही चिंता नाहीये.
असो, याच अश्याच सेम केस मधील माझ्या मित्राची एक आदर्श केस नंतर सांगतो..
यात चुक कोणाची आहे ते जाऊदे
यात चुक कोणाची आहे ते जाऊदे कारण चुक दोघांकडुनही झालेय पण आता तिने त्या स्वप्निलला सांगावे की ठिक आहे मी तुझ्यासोबत राहेन पण त्याआधी तु मला तुझ्या आईवडिलांना आणि होणार्या बायकोला भेटवुन त्यांच्यासमोर हे सगळं सांग की मी लग्नानंतरही स्वप्नासोबत संबंध ठेवणार आहे. अर्थात तो याला नक्कीच तयार होणार नाही त्यानंतर तिने त्याला स्पष्ट सांगावे की जर त्याने पुन्हा तिच्या आयुष्यात ढवळाढवळ केली तर ती पोलिस कंप्लेंट करेन.
या नंतर शक्य असेल तर तिने तिचा मोबाईल नंबर बदलावा. असे करणे म्हंजे त्याला घाबरणे वैगरे नाही तर पुढे होणार्या रोजच्या टॉर्चर्पासुन तिची सुटका होईल.
सेम घटना माझ्याआधीच्या ऑफिसमधल्या मुलाची. आधी एकीसोबत प्रेम, नंतर आईवडिलांच्या जबरदस्तीमुळे दुसरीसोबत लग्न, पुन्हा पहिलीसोबत सर्व संबंध सुरुच. पहिलीला सांगायचा बायकोशी कोणतेही संबंध नाही फक्त तुझ्यावरच प्रेम करतो.
असे त्याच्या लग्नानंतर त्याचे २ वर्ष प्रकरण सुरुच होते नंतर पहिलीली समजले त्याला एक वर्षाचा मुलगा आहे तेव्हा कुठे ती शहाणी झाली आणि त्याला सोडुन गेली तरीही याची नाटकं सुरुच होती फोन करुन त्रास देणे, रात्री दारु पिऊन तिच्या बिल्डींगखाली उभे राहणे वै. शेवटी तिने मोबाईल नंबर बदलला व सुट्टीत गावी जाऊन डायरेक्ट लग्नच केले आता ती पुण्यात कुठेतरी स्थायिक झाली आहे.
तीने त्याला आता लांब ठेवावे
तीने त्याला आता लांब ठेवावे ,परत संपर्क केलास तर पोलिसात देईन यची धमकी देऊन त्याला कायमचा लांब ठेवावा.आई वडील बघतील अश्या सुस्वरुप मुलाशी लग्न करावे(जर लग्न करायचेच असेल तर)
नसेल लग्न करायचे तर स्वतःच्या पायावर उभे राहून करीयर करावे.
पण हे दोन्ही पर्याय सायकोलॉजिकली स्विकारणे अवघड आहे,पोरगी भोळी वाटते .मला वाटते तीने नातेवाईक ,मित्रमैत्रीणी यांच्या मदतीने करीयरचा पर्याय निवडवा,पण त्यातही अनिश्चीतता आहेच ,सो कोणता सल्ला द्यावा याच संभ्रमात मी पडलोय, बायदवे मुलगी कमावती आहे का? असेल तर कोणताच प्रश्न येणार नाही.
केशव तुलसी | <<<<<<< बायदवे
केशव तुलसी | <<<<<<<
बायदवे मुलगी कमावती आहे का? <<<<<<<<<<<होय.
त्या मुलाच्या घरी जाऊन राडा
त्या मुलाच्या घरी जाऊन राडा करीन अशी त्याला धमकी द्यावी जर तो अजून संबंध ठेव, लग्न करू नकुस म्हटल तर. खूप चालू दिसतो मुलगा अन मुलगी भोळी किंवा मुरख.. दोन वेळा फसली म्हणून..
बायदवे मुलगी कमावती आहे का?
बायदवे मुलगी कमावती आहे का? <<<<<<<<<<<होय.
>>>>>>>>>> गुड, आता तीने त्याच्या पार्श्वभागावर कायमचीच लाथ द्यावी,त्याला तिच्याशी विवाहबाह्य संबंध ठेवायचे आहेत व बायको बरोबर तोंड देखलं प्रामाणिक ही राहयचे आहे ,पक्का चालू आहे मा*****.तुमच्या मैत्रिणिला हा धागा जरुर दाखवा.पाचामुखी परमेश्वर या न्यायाने जवळच्या नात्यातल्या ओळखीतल्या काही अनुभवी व्यक्तींना विचारुन आयुष्याची योग्य दिशा ठरवून घ्यावी.तुमच्या मैत्रिणीला शुभेच्छा.
स्वराची ही स्वप्ना जितकी भोळी
स्वराची ही स्वप्ना जितकी भोळी तितकीच स्वप्नाळू आहे हे तर उघडच आहे. आजच्या इतक्या वेगवान युगात अशा मुलीने (तेही कमावत्या...) प्रसंगी कठोर होणे नितांत गरजेचे आहे...
मीनाकुमारी माला सिन्हाचे दिवस नाहीत हे मुलींसाठी तर असल्या वाघोंबासाठी तिने अनुष्का शर्मा आलिया भट यांच्या स्वभावासारखे वर्तन करायला हवे..."आलास तर माझ्या अटीवर...नाहीतर गेलास उडत..." ~ इतके व्यावहारीक आणि प्रखर व्हायलाच हवे मुलींनी....उगाच अश्रू ढाळत सूर्यास्ताकडे टक लावून बसण्यात काही अर्थ नसतो.
केशव तुलसी,अशोक मस्त पोस्ट'स
केशव तुलसी,अशोक मस्त पोस्ट'स +१
केशव तुलसी आणि अशोक मामा खरंच
केशव तुलसी आणि अशोक मामा खरंच पट्लं तुमचं मत.
थॅन्क्स सकुरा आणि
थॅन्क्स सकुरा आणि स्वरा....मलाही केशव तुलसी यानी लिहिलेले "...आता तीने त्याच्या पार्श्वभागावर कायमचीच लाथ द्यावी..." हे वाक्य फारच पटले. इतका शहाणपणा (आणि धाडस...) त्या स्वप्नाच्या अंगी यावे...(यायलाच हवे).
कसला फालतु मुलगा आहे.. त्या
कसला फालतु मुलगा आहे.. त्या मुलीला पण ___/\___. किती वेळा एकाच माणसाकडून शेंडी लावुन घ्यायची?
१. तो तिला फोन करतो तेव्हा तिने त्याला सरळ विचारावं.. तुला दोन्हीकडे मजा मारायची आहे का? एकतर तुझ्या आयुष्यात ती राहील नाहीतर मी.
२. तो मुलगा म्हणाला कि तू स्वार्थी आहेस..तर म्हणायचे आहेच..पण तुझ्यासारखी ** तर नाहीये.
३. त्याला जर तिच्याबरोबर लग्न न करता राहायचे आहे तर त्याची लग्नाची बायको कोणाबरोबर राहाणार आहे?
४. आणि त्याच्या आईवडीलांना हे कळल्याने त्यांना शिक्षा होणार असे समजणे म्हणजे मुर्खपणा आहे. त्याचा अजुन एकजरी फोन्/मेसेज आला तर सरळ त्याच्या आईवडीलांना गाठुन कल्पना देणे. (तरीही त्यांची कोणत्याही प्रकारची मदत होईल हि अपेक्षा ठेवु नये.)
५. मुख्य म्हणजे सर्व फोन कॉल्स रेकॉर्ड करणे तसेच सर्व मेसेजेस/ मेल्स नीट सेव्ह करून ठेवणे. वेळप्रसंगी पोलिसांची मदत घेणे. पोलिससुद्धा रिक्वेस्ट केल्यावर अश्या गोष्टिंबाबत पुरेशी गुप्तता बाळगतात.
तुम्हाला काय वाटत यात चूक कोणाची?
>> खरं तर इतके वेळा त्याच्यावर विश्वास ठेवणे हि चुक मुलीकडून झाली आहे. पण ते त्याच्या चुकीच्या वागण्याचे समर्थन होऊ शकत नाही.
सो मुलीने त्याला त्याच्याच आई वडीलांची आणि पोलिसांची धमकी द्यावी आणि मुव्ह ऑन करावे.
६. होणार्या नवर्याला आधीच्या या प्रेमप्रकरणाची संपुर्ण कल्पना देऊनच लग्न करावे जेणेकरून मनात अपराधीभाव राहाणार नाही. आणि तो मुलगा पुढेही मुलीला ब्लॅकमेल करू शकणार नाही.
पियू, पर्फेक्ट उपाय सुचवलेत.
पियू, पर्फेक्ट उपाय सुचवलेत.
.पण तुझ्यासारखी ** तर
.पण तुझ्यासारखी ** तर नाहीये.>> ह्यात ** म्हणजे काय नक्की? सिरीयसली विचारतेय.
प्रेमातून बाहेर पडणे तितके
प्रेमातून बाहेर पडणे तितके सोपे नाहीये, पण थोड्याशा प्रयत्नाने ते शक्य होईल , मला वाटत की मुलीने हे विसरायला हवे, थोडा वेळ आणि मनावर ताबा असल्यास सगळे काही शक्य आहे
रहाता राहिला फोन चा
रहाता राहिला फोन चा प्रॉब्लेम, कुनाकडुन तरी त्याला दम द्यावा ,म्हणजे कोणीतरी मोठे भाऊ वैगेरे .
ह्यात ** म्हणजे काय नक्की?
ह्यात ** म्हणजे काय नक्की? सिरीयसली विचारतेय.
>> कोणतीतरी असांसदीय शिवी
पियू +१ पियू ने आता
पियू +१
पियू ने आता लिहिन्या सारखे काही शिल्ल्क ठेवलेच नाही त्या मुलिने आता धडक कृती करवी व त्याचा रिपोर्ट इथे लिहावा.
स्वतःच्या भावना तपासून बघणे
स्वतःच्या भावना तपासून बघणे गरजेचे. खचणे, लग्नाला तयार होणे हे सगळं तात्कालिक झालं. पण जर अजूनही तिचे प्रेमच असेल त्याच्यावर तर त्याचे हजार ड्रामेसकट त्याची ओढ राहणार. अशावेळी उगीच "लग्न" ह्या समाज मान्य चौकटीत अडकण्याचा अट्टाहास करण्यापेक्षा रहावे लिव्ह-इन/ आउट रिलेशन्शिप मध्ये. कोणी काही म्हणाले तरी तिची भावनिक गरज - त्याचा सहवास - तर मिळतो. दुसर्याशी लग्न करून अजून इतराची लाईफ खराब करण्यापेक्षा हे बरं.
पण उपरती झाली असेल की "आय डिसर्व बेटर ट्रीटमेंट/मोनॉगॅमस रिलेशनशिप" तर "स्थळ" बघण्यापेक्षा एखाद्या विवाह समुपदेशनावर भर असणार्या विवाह मंडळात नाव घालावे. आपल्या आवडी-निवडी तपासून, स्ट्रेस फ्री वातावरणात मुलांना भेटून योग्य जोडीदार निवडण्यास आवश्यक वर्ष-दोन वर्ष वेळ द्यावा लागेल ह्याची जाणीव ठेवावी. "इथेही नशीबात सुख नाही" म्हणून फायदा नाही. इट्स अ प्रोसेस, जस्ट गो थ्रू इट.
कसला फालतु मुलगा आहे.. त्या
कसला फालतु मुलगा आहे.. त्या मुलीला पण ___/\___. किती वेळा एकाच माणसाकडून शेंडी लावुन घ्यायची? >> पियू तुझ्यासारखीच माझी गत -/\- झाली. पण ते "प्यार मे थी वो, प्यार मे सही गलत कुच्छ नई होता" असं 'जब वी' मधल्या करीना कपूर सारखं म्हणायची वेळ आली. प्रेमात असणार्या लोकांना काही सांगून फायदा नसतो.
देवाचे आभार मान किंवा भाग्य
देवाचे आभार मान किंवा भाग्य समज म्हणाव अशा माणसापासून वाचली.
यात चुक कोणाची? >> तिला तो
यात चुक कोणाची?
>> तिला तो मनापासून आवडतो. मनोमनीच ठरवते कि लग्न करेन तर याच्याशिच.
इथे तिची चूक झाली.
आता काय करायला हवे?
त्याचे तिच्यावर खरे प्रेम नाही हे उघड आहे. ज्यांचे असते ते "मम्मी असे म्हणाली, पप्पानी तसे केले" असली फालतू कारणे पुढे करत नाहीत. पण इथे लग्न न करता त्याला ती हवी आहे यातच सगळे आले. अर्थात तिच्या प्रेमाचा त्याला पुरेपूर गैरफायदा घ्यायचा आहे. एकीबरोबर लग्न आणि दुसरी नुसती मजा करायला हवी असेल असे दिसून येते. अशा परिस्थितीत तिने पुन्हा जर त्याच्यावर विश्वास ठेवला किंवा त्याच्या "इमोशनल ब्लॅकमेलिंग" ला बळी पडली तर ती आता आयुष्यातून उठेल हे निर्विवाद. कारण अशी मुले अत्यंत धोकादायक असतात. प्रत्युषा बॅनर्जी प्रकरण विसरू नये.
तिने मन घट्ट करून त्याच्याशी इथून पुढे कोणत्याही प्रकारे संबंध न ठेवणे हाच एक उत्तम उपाय आहे. पूर्वीच हे करायला हवे होते पण अजूनही वेळ गेलेली नाही. जे होते ते चांगल्या साठीच होत असते यावर तिने विश्वास ठेवावा. आयुष्य आपल्याला "पुढे चल" म्हणत असते. गरज असते ती फक्त आपण आयुष्याला साथ देऊन पुढे जात राहण्याची. कोणत्याही निमित्ताने आता जर ती मागे वळून त्याच्याकडे गेली तर आयुष्यातून उठली हे निर्विवाद.
यात चुक कोणाची? कुठल्याही
यात चुक कोणाची?
कुठल्याही व्यवहारात / सौद्यात / प्रसंगात ज्या पक्षाचे नुकसान होते त्याच पक्षाची चूक असते. हेच सूत्र इथेही लागू होते. चूक स्वप्नाची होते.
आता काय करायला हवे?
झालेले नुकसान भरून येत नाही. भावी नुकसान टाळावे. सत्य काय आहे ते संबंधित व्यक्तिंना (आई, वडील, भाऊ, बहीण, होणारा नवरा) सांगून त्याच्या फोनचा आपल्या इतर नात्यांवर परिणाम होणार नाही अशी व्यवस्था करावी. त्याने भलत्या अवस्थेतले फोटो / व्हिडीओ काढलेले असल्यास आणि त्या जोरावर तो ब्लॅकमेल करीत असल्यास त्याच्याविरोधात तक्रार करावी आणि प्रकरण निपटून काढावे. ह्या सर्व प्रक्रियेत वेळ, पैसा आणि मनशांती खर्च होईल पण हे शरीरात घुसलेली बंदु़कीची गोळी ऑपरेशनने काढून टाकण्यासारखे असेल. आता होणारा थोडा त्रास हा आयुष्यभराच्या सुखसमाधानाकरिता केलेली तरतूद असेल.
मुळात वरच्या लेखात जे लिहिलेय
मुळात वरच्या लेखात जे लिहिलेय ते खर असेल तर हा प्रसंग ज्या मुलीच्या वाट्याला आलाय, आणि ज्यांनी हा लेख लिहून 'अश्या वळणावर काय निर्णय घायला हवा?' हा प्रश्न आंतरजालवर विचारलाय त्या दोघीनाही या प्रसंगाचे गांभिर्य अजून ओळखता आले नाही, असे खेदाने म्हणावेसे वाटतेय.
लेखात लिहिलेल्या इतक्या गंभीर प्रसंगानंतर ह्या पिडीत मुलीने पोलिस सोडा पण आपल्या घरातील नातेवाईकांना देखिल विश्वासात घेऊन काही माहीती दिलेय का ह्याबाबत साशंकता वाटते.
असे प्रश्न इंटेरनेटवर सल्ले घेऊन कधीच सुटत नसतात. ताबडतोप घरच्याना विश्वासात घेऊन पहिली त्या मुलाविरुध्द पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवा.
असल्या बावळट मुलींच्या नशीबात
असल्या बावळट मुलींच्या नशीबात दुसरे काय येणार?
{कुठल्याही व्यवहारात /
{कुठल्याही व्यवहारात / सौद्यात / प्रसंगात ज्या पक्षाचे नुकसान होते त्याच पक्षाची चूक असते.}
शाब्बास.
जशी बलात्कार होऊन नंतर जीव घेतल्या गेलेल्या मुलीची चूक असते, एकतर्फी प्रेमातून चेहऱ्यावर ऍसिड फेकले गेलेल्या मुलीची चूक असते, दलित असून स्वतःच्या लग्नात घोड्यावर बसण्याचा उद्दामपणा करणाऱ्याची चूक असते, आंबेडकरांच्या गाण्याची रिंगटोन ठेवणाऱ्याची चूक असते अगदी तसंच.
चालूद्या
चूक करणारा स्वतःचं नुकसान
चूक करणारा स्वतःचं नुकसान करून बसतो कळत किंवा नकळत आणि गुन्हा करणारा दुसर्याचं नुकसान करतो कळून सवरून. चूक आणि गुन्हा यातला फरक न कळणार्या टग्यांना तो कळण्याकरिता शुभेछा आणि अनेकाशिर्वाद.
या उदाहरणात स्वप्निल कळून
या उदाहरणात स्वप्निल कळून सवरून स्वप्नाचं नुकसान (ढळढळीत फसवणूक) करतोय असं नाही वाटत का तुम्हाला? तरीही चूक फक्त स्वप्नाचीच?
आणि हे अशी विचारसरणी असलेले महोदय मला आशीर्वाद देताहेत? हे तुमचे उपकार कसे फेडावेत हेच कळत नाही.
कुठल्याही व्यवहारात / सौद्यात
कुठल्याही व्यवहारात / सौद्यात / प्रसंगात ज्या पक्षाचे नुकसान होते त्याच पक्षाची चूक असते.}>>>>>>>>असहमत.
अजिबातच नाही पटले.
Fool me once, shame on you;
Fool me once, shame on you; fool me twice, shame on me
टग्या, अग्निपंख आणि
टग्या,
अग्निपंख आणि अहमदनगरकरांचा प्रतिसाद वाचा.
पुन्हा एकदा - चूक स्वप्नीलची नाहीच तर स्वप्नाचीच आहे. स्वप्नीलने केलेला आहे तो दंडनीय अपराध आहे. चूकीला दंड करायची गरज नसते कारण एकतर ती जाणूनबुजून केलेली नसते आणि ती घडते तेव्हाच ज्याच्या हातून घडते त्याचे बरेच नुकसान करते. या नुकसानीलाच लोक धडा म्हंणतात आणि चूकीला अनुभव वर अनुभव प्रचंड किंमत घेऊन ज्ञान देतो असे तत्वज्ञानही लिहून ठेवतात. असो. स्वप्नालीच्या चूकीला शिक्षेची नाही तर सहानुभूतीची गरज आहे, हे मान्य पण तरीही तिचे झालेले नुकसान भरून कसे येणार?
{{{महोदय मला आशीर्वाद देताहेत? हे तुमचे उपकार कसे फेडावेत हेच कळत नाही.}}}
अरेच्या उपकार कसले? उलट तुम्हीच मला शाब्बास आणि चालुद्या म्हणत जे उपकार केलेत ते फेडायचा मी यथाशक्ती प्रयत्न केलाय.
प्रेमात तर्कबुद्धि चालत
प्रेमात तर्कबुद्धि चालत नसते...संत करिनाबाईंनी सांगितल्याप्रमाणे प्यार में सही गलत कुछ नही होता है...म्हणून तर जात ,पैसा ,वय etc हे सगळ विचारात न घेताही लोक आयुष्यभर सोबत रहायला तयार होतात...त्यामुळे मुलगीला दोष देऊन काही साध्य होणार नाही...
सर्वप्रथम सगळ्यांचे मनापासुन
सर्वप्रथम सगळ्यांचे मनापासुन आभार. (आपापल्यापरीने उत्तरं दिल्याबद्दल).
मी हा धागा स्वप्नाच्या परवानगीनेच काढला होता. जशी मी ईथली उत्तरे वाचली तशीच तिनेही वाचली आहेत. त्यातली उत्तरं काही अंशी पट्ली तर काही अंशी नाही. (त्याचे कारण तिलाच माहीत आणी तसंही तिने असे मिश्र प्रतिसाद मिळतील यासाठी मनाची तयारीहि केली होती.)
तर महत्वाची गोष्ट ही की स्वप्निल आता तिला कधिच त्रास देनार नाही. कारण कालचं ती त्याला कोणतीही पुर्वसुचना न देता अचानक त्याच्या घरी गेली होती. सकाळी ऑफीसला न जाता थेट ती त्याच्या घरी उभी राहीली. ती कधी अचानक अशी थड्केल याची त्याला जराही कल्पना नव्हती. सगळच अनपेक्षित होत त्याला. जवळ्जवळ एक तास फक्त तिच बोलत होति आणी तो तसेच त्याचे आई वडील सगळ खालमानेने ऐकत होते.
जे झालं ते सगळ तिने त्याच्या आईवडीलांना सांगितल. त्याचबरोबर सोबत असलेले सगळे पुरावे (फोटोज आणि मॅसेजेस) दाखवले. त्यामुळे त्याच्याकडे ते स्विकारण्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता. सगळ कबुल केलं त्याने तसेच हे ही सांगितल की त्याच्यामुळे आता तिला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. (तसंही तिने पोलिस केसचं पिल्लू सोडलं आहे.)
आणि तिने हि सगळी घटना अगदी स्टर्ट टू एन्ड मोबाइल मध्ये रेकॉर्ड केली आहे. तिने जेव्हा मला हे सगळ सांगितलं तेव्हा खरंच माझा विश्वास बसला नाही पण जेव्हा ते रेकॉर्डींग ऐकलं तेव्हा मला खरं वाट्ल.
आज ती खरच खुप खुश दिसत होती. अगदी मनावरचं मण भर ओझ कमी झाल्यासारखी. (यालाच म्हणतात 'देर आये, दुरुस्त आये'.
मस्तच...चांगले झाले ...पुढील
मस्तच...चांगले झाले ...पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा
मस्तच...चांगले झाले ...पुढील
मस्तच...चांगले झाले ...पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा ,,+१
एकदम फास्टात निर्णय घेतला
एकदम फास्टात निर्णय घेतला की..
खूप सुरेख,स्वरा@१.अतिशय योग्य
खूप सुरेख,स्वरा@१.अतिशय योग्य पाऊल टाकले तुमच्या मैत्रिणीने.शुभेच्छा
चला....ज्याचा शेवट गोड ते
चला....ज्याचा शेवट गोड ते सारेच गोड मानू या.... इथल्या सदस्यांची रोखठोक मते स्वप्नानेसुद्धा वाचल्याचे मला समाधान झाले आणि आशा आहे की तिने या संदर्भातील जो निर्णय घेतला त्यामागे इथल्या प्रतिक्रियांचीही तिला किंचित का होईना पण मदत झाली असेल.
असो...तिच्या भावी आणि प्रसन्न जीवनासाठी एक ज्येष्ठ नागरीक तसेच मामा या नात्याने मी तिला हार्दिक शुभेच्छा देत आहे... सर्वांच्याचवतीने अर्थात.
awesome great job both of
awesome great job both of you. She just needs to stay strong even later. Such things dont go away so easily, so remember to stay strong.
आणि तिने हि सगळी घटना अगदी
आणि तिने हि सगळी घटना अगदी स्टर्ट टू एन्ड मोबाइल मध्ये रेकॉर्ड केली आहे. >>>>>>
1.ही क्लिप तिने एखाद्या सीडी वर घेउन एखाद्या सेफ जागी ठेवावी (As Insurance against that moron).
2.तिचा जो कोणी होणारा नवरा असेल त्याला या पुर्ण प्रकरणाबद्दल आधीच सांगावे म्हणजे पुढे त्रास होणार नाही.
मुलीला आशिर्वाद आणि शुभेच्छा..
स्वरा, स्वप्नाच्या पाठीवर
स्वरा, स्वप्नाच्या पाठीवर शाबासकीची थाप द्या माझ्याकडुन.
स्वरा, स्वप्नाच्या पाठीवर
स्वरा, स्वप्नाच्या पाठीवर शाबासकीची थाप द्या माझ्याकडुन.+१
सगळ्यांना खुप खुप
सगळ्यांना खुप खुप धन्यवाद.....
हा लेख आनि त्या वरचे प्रतिसाद
हा लेख आनि त्या वरचे प्रतिसाद वाचुन छान वाटल, स्वप्नाला खुप खुप शुभेछा........,
मस्त धागा! शुभेच्छा !!
मस्त धागा!
शुभेच्छा !!
स्वरा, स्वप्नाच्या पाठीवर
स्वरा, स्वप्नाच्या पाठीवर शाबासकीची थाप द्या माझ्याकडुन.+१