वापरलेली पुस्तके विकत \ borrow करण्याची सोय

Submitted by वाट्टेल ते on 28 April, 2016 - 09:14

मुंबईत सर्व प्रकारच्या परीक्षांच्या ( उदा. स्टेट बँक क्लार्क, रेल्वे बोर्ड इ.) तयारीसाठी वापरलेली पुस्तके ( paperback) विकत घेता येईल अशी दुकाने किंवा borrow करता येईल अशी library माहितीत आहे का?

माझे आई वडील १९९८ पासून पालघर जवळच्या केळवे रोड येथील आदिवासी पाड्यात काम करतात. सध्या तेथील तरूण मुलांकडून अशा परीक्षांची तयारी करून घेत आहेत. इंटरनेट वगैरे वापरणे शक्य नाही कारण computer नाही व गावात वीजेचा अजिबात भरवसा नाही त्यामुळे paper back च हवी आहेत. कोणी पुस्तके donate करू इच्छित असेल तरी कृपया विपु करा. आईवडील बोरिवलीत असतात पण मी मुंबईत राहत नाही त्यामुळे काही flipcart, amazon वरून विकत घेऊन पुस्तके पाठवण्यापलीकडे भरीव काही करू शकत नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक सुचवु क?
WhatsApp वरील ग्रूप वर हा मेसेज ईमेल आय्डी/फोन नं. सहित पोस्ट करून बघा. भराभर फॉर्वर्ड होईल आणि कदाचित फायदा होईल.

मुंबईत रानडे रोडवर जगदीश स्टोर्स आणि तिथेच अशी 2-3 दुकाने आहेत. तिथे नविन-जूनी अभ्यासाची पुस्तके विकत मिळतात आणि परतही घेतली जातात.

www.bx-zone.com

या वेबसाईटला पण एकदा भेट द्या, आहेत काही पर्याय उपलब्ध.

मुंबईतले विशेष काहे माहिती नाही पण पुण्यात आप्पा बळवंत चौकातील बहुतेक दुकानांकडे अशी सोय होती.. अजूनही असेल.. नवीन पुस्तके घ्यायची आणि सेमिस्टर संपली की ती ६०-७०% रक्कम परत घेऊन परत करायची. अशीच सोय जुन्या पुस्तकांवर पण होती..

मुंबईतही अशी सोय असणार..

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. whatsapp, facebook वर टाकले आहेच, तसेच इथेही टाकले कारण हमखास काही माहिती मिळेल अशी खात्री होती. जगदीश स्टोर मध्ये पण check करायला सांगते. आणि bx-zone बद्दलही कळले. पुन्हा एकदा धन्यवाद.