होळी / रंगपंचमी - पोल

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 March, 2016 - 12:43

खालील धागा -
यंदा रंगपंचमी / धूलीवंदनला पाण्याची नासाडी करावी का?
http://www.maayboli.com/node/58107
इथे आज बरीच चर्चा झाली. काही जणांची मते स्पष्ट झाली. काहींची नाही झाली. काही जणांनी उपरोधिक मते दिली. काही जणांनी धाग्यावरचा गदारोळ पाहून स्पष्ट मत मांडायचे टाळले.
अश्यावेळी पोल उपयुक्त ठरतो हा आजवरचा अनुभव.
नक्की मत नोंदवा.
आपले मत मांडा.
मात्र दुसर्‍याचे मत खोडायला वा चर्चा करायला तो वरचा चर्चेचा धागाच वापरा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्रिकेटच्याच मागे लागायचे काही विशेष कारण >>>
तू एकीकडे पाण्याची नासाडी होतेय म्हणून उमाळा दाखवतो आहेस पण क्रिकेटला वापरल्या जाणार्‍या पाण्याच्या वापराकडे काणाडोळा करतो आहेस हे लक्षात आल्यामुळे Happy

मुळात ३६५ दिवसापैकी एक दिवस होळी खेळली जाते.. मोजुन पहा किती लोकं होळी खेळतात? माणशी किती पाणी वाया जाते? तसेच अश्या दुष्काळी उन्हाळ्यात पाण्याचा अपव्यय टाळावा. पण हे करीत असता जे नियमीत पाणी प्रचंड प्रमाणात वाया घालवितात त्या कंपन्या(विशेषतः मद्यार्के व शित पेये बनविणार्‍या... ) ह्यांच्या रिफिल बाटल्या धुण्याकरीता एकेक कंपनी रोज हजारो क्युबिक मिटर पाणी वाया घालविते ( फॉर्मुलेशन साठी डी एम वॉटर वेगळे).. त्याचे काय?

क्रिकेट मैदानावर लाखो लिटर पाणी रोज..... तेही ह्या दुष्काळाच्या ऐन उन्हाळ्यात......

होळी तसा मी देखिल खेळत नाही . पण आपण नेहमी पहातो असे बॅन्का जश्या मोठे कर्जदार चुना लावून जातात आणि लहान कर्जदारांवर जप्ती आणतात तसा हा प्रकार वाटतो मला!

कृष्णा, अगदी अगदी, अन म्हणुनच दुसर्या त्या धाग्यावर म्हणले होते मी की हे असले उपदेशाचे डोस म्हणजे, मोरीच्या तोंडाला बोळा, अन दरवाजा सताड उघडा या धर्तीचे आहेत.
दुसर्या शब्दात सांगायचे तर "जागतिक कार्बनडायऑक्साईडचे प्रदुषण कमी करण्यासाठी, तुम्ही (म्हणजे इंडियन हो... हिंदू... आधीच संख्या जास्त तुमची अन तुमच्या गुराढोरांची Wink ) श्वास रोखुन धरा, उच्छ्वास कमी सोडा वा सोडूच नका" असे सांगण्यासारखे आहे... Proud
हे उदाहरणही पटत नाही तितकेसे?
तर मग सहवेदना दाखवायला, त्या तिकडे हिमालयात वा ट्रून्ड्रा प्रदेशात लोक उणे थंडीने काकडुन तडफडतात ... मग त्यांना सहवेदना दाखवायला इकडे मराठवाड्यातील ४० डिग्रीच्या उन्हाळ्यात तुम्ही "कानटोपी/मफलर/स्वेटर" घालुनच बसले पाहिजे..." Lol किंवा व्हाईसवर्सा, इकडे उन्हाळ्यात लोक तहानेने उष्णतेने तडफडत उघडिनागडी बसतात, तर तुम्ही तिकडे हिमालयात/ट्रुन्ड्रा प्रदेशातही तस्सेच उघडेनागडे बसले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करण्यासारखे आहे हे.... ! Lol
अन ते ही कसे? तर हलवायाच्या घरावर तुळशिपत्र ठेवल्यासारखे यांचे सल्ले.... Angry

एक मूलभूत फरक आपल्याला जाणवतोय का. हा धागा निघण्याआधी आपण क्रिकेटच्या पाण्याबद्दल स्वताहून कुठे आवाज उठवला नाहीत. याला प्रतिवाद म्हणून मग ते आठवलेय.
तसेच मला क्रिकेटचा उमाळा येणार हा अंदाज आपण कसा बांधलात हे देखील मला समजले नाही. मुळात आपण त्या प्रश्नावर माहीती वा आकडे घेऊन आलात तर योग्य ती चर्चाही करता येईल. त्याचा निषेधही करता येईल. पण तिथे हेतू पाणी बचतीचाच असावा. जर हेतू माझा रंगपंचमीचा मुद्दा खोडणे ईतकाच असेल तर तो नक्कीच उदात्त नाही.

त्या दुसर्या धाग्यावर आपण म्हणाला आहात की गेले 15 वर्षे आपण रंग खेळले नाही आहात. जर पाण्याचे महत्व आपल्यालाही ठाऊक आहे तर इथे क्रिकेटचा उल्लेख करून धाग्याला फाटा फोडण्याचे प्रयोजन नक्की काय. ऋन्मेष कसा दुटप्पी स्वभावाचा आहे हे दाखवणे ईतके गरजेचे आहे का. अर्थात त्याने कोणी रंगपंचमीला पाण्याची नासाडी करणे थांबवत असेल तर ही फार छोटी किंमत आहे. ते मी स्वता कबूल करतो.

चैत्रगंधा आपण क्रिकेटच्याच मागे लागायचे काही विशेष कारण<<<<
मुळ मुद्द्यापासुन लोकांचे ध्यान भरकटवने जसे की रोहित वेमुला मुद्द्यापासुन लोकांचे ध्यान भरकटवण्या साठी कन्हैया प्रकरण आणि मग जाट आरक्षण..... Happy

हा धागा निघण्याआधी आपण क्रिकेटच्या पाण्याबद्दल स्वताहून कुठे आवाज उठवला नाहीत >>
पाण्याच्या नासाडीचे धागे आणि पोल तू काढतो आहेस मी नाही. आणि मी जेव्हा तुला क्रिकेटसाठी वेगळा धागा काढ म्हणल त्याचा तर तू अनुलेख्ख केला आहेस. आणि वर मलाच विचारतोस.
खेळाचा उल्लेख यायच कारण सुद्धा त्या धाग्यावरच दिलं आहे. मटाची लिंक वाच जरा तिथे.

चैत्रगंधा आपण क्रिकेटच्याच मागे लागायचे काही विशेष कारण<<<<
मुळ मुद्द्यापासुन लोकांचे ध्यान भरकटवने जसे की रोहित वेमुला मुद्द्यापासुन लोकांचे ध्यान भरकटवण्या साठी कन्हैया प्रकरण आणि मग जाट आरक्षण.....
>>>>>>>>

सकुरा, तुमचे राजकारणाचे मुद्दे इथे आणू नका.

मी जेव्हा तुला क्रिकेटसाठी वेगळा धागा काढ म्हणल त्याचा तर तू अनुलेख्ख केला आहेस.
>>>>>>>

चैत्रगंधा ओके.
आता मी बाहेर जातोय.
संध्याकाळी नक्की काढतो. Happy

सकुरा, तुमचे राजकारणाचे मुद्दे इथे आणू नका.<<<<<<<का आणू नका तुम्ही पण होळीत क्रिकेट आणलातच ना..
स्वता:हा धागा काढायचा ना क्रिकेटवरवर होणार्‍या पाण्याच्या गैरवापरावर अख्खा क्रिकेटच बंद व्हायला पाहिजे असे माझे मत आहे.

सकुरा, तुमचे राजकारणाचे मुद्दे मला उद्देशून आणू नका असं सांगतेय. तुमच्या बरबटलेल्या राजकारणात मला इंटरेस्ट नाही.

>>> मुळात आपण त्या प्रश्नावर माहीती वा आकडे घेऊन आलात तर योग्य ती चर्चाही करता येईल. त्याचा निषेधही करता येईल. पण तिथे हेतू पाणी बचतीचाच असावा. <<<<
मी येवढा तज्ञ नाहीये हो..... पण तिकडे एका धाग्यावर, आशुचॅम्प यांनी "लिकर निर्मिती", त्याचा खप यांची आकडेवारी दिलीये, माणकु यांनी असली प्रॉडक्ट्स बनवायला किती पाणी खर्च होते त्याची आकडेवारी दिलिये, त्याचे काय झाले? Happy
काये ना, मी तसा अज्ञ माणूस आहे, पण हातच्या कंकणाला आरसा लागत नाही , किंवा दरवेळेसच "हा सूर्य हा जयद्रथ" असे करीत सुदर्शन चक्र सरसावयाचे नसते, म्हणून फक्त हे बघताय, तर ते "केव्हडे तर्रीमोठ्ठे ते ही बघा' असे सागु पाहिले फक्त. Happy अन त्यायोगे, मूलतः " हे बघा " असे सांगणारे, त्यांचे दाखवाय्चे दात व खायचे दात कसे वेगवेगळे आहेत हे सांगु पाहिले.
तुम्हाला काडीचाही दोष देत नाहीये याचि खात्री बाळगा Happy

लिंबूटिंबू,
जर ते आकडे एवढेच मोठे होते तर आजवर तुम्हाला त्यावर धागा का काढावासा वाटला नाही? कुठे चर्चा का घडवावीशी वाटली नाही? आज होळीच्या पाण्याची नासाडी दाखवल्यावर एक मुद्दा म्हणून ते का पुढे आले?

होळीच्या पाण्याच्या नासाडीबरोबर ती नासाडी सुद्धा थांबली पाहिजे असा आपला पवित्रा हवा होता. मात्र ती नासाडी होतेय तर ही झाली तर काय हरकत आहे हा पवित्रा खेदजनक आहे.

होळीच्या पाण्याच्या नासाडीबरोबर ती नासाडी सुद्धा थांबली पाहिजे असा आपला पवित्रा हवा होता. मात्र ती नासाडी होतेय तर ही झाली तर काय हरकत आहे हा पवित्रा खेदजनक आहे. +१११११११११११११११११

आज बऱ्याच ठिकाणी डोंबिवलीत कोरडी होळी खेळली गेली. मी घरातच नवरा आणि मुलाला गुलालाचा टिळा लावला. आमच्या सोसायटीत बायकांची कोरडी होळी असते गेली २ वर्ष पण यंदा आमच्या सोसायटीतील एक महिला दीड महिन्यापूर्वी देवाघरी गेल्याने त्या कुटुंबाशी सहवेदना म्हणून आम्ही महिला खेळलो नाही. लहान मुलं कोरडी होळी खेळले. भावाच्या सोसायटीतपण थोडे रंग लावून कोरडी होळी खेळली गेली. बहिणीच्या सोसायटीत होळी नव्हती तिने पण घरात नवरा आणि मुलीला थोडेसे रंग लावले.

एकंदरीत डोंबिवलीकरांनी पाणी न वापरता माफक रंग लावून आजचा दिवस साजरा केला, असं बऱ्याच ठिकाणी दृश्य दिसलं.

यावेळी बरेच लोकांनी समजूतदारपणा दाखवला. बातम्या पाहिल्या नाहीत पण फेसबूकच्या आधारे हे विधान करतोय. माझ्या मित्रपरीवारात तरी रंगलेली तोंडे कमी आणि आम्ही आज पाणी वाचवले म्हणणारे जास्त होते.

ऋन्मेष टीव्हीवरचे रीपोर्ट्सपण लोकांनी कोरडी होळी खेळली असेच आलेत. एकंदरीत लोकांनी फार समजुतदारपणा स्वतःहुन दाखवला आणि दुष्काळग्रस्त बांधवांबद्द्ल सहवेदना दाखवली, एकंदरीत सकारात्मक प्रतिसाद होता.

असाच समजुतदारपणा रोजच्या जगण्यात पाणी-बचतीचापण दाखवतील नक्कीच.

एकंदरीत डोंबिवलीकरांनी पाणी न वापरता माफक रंग लावून आजचा दिवस साजरा केला, असं बऱ्याच ठिकाणी दृश्य दिसलं.>>> हो हे पुण्यात पण जाणवले.

त्या कुटुंबाशी सहवेदना म्हणून आम्ही महिला खेळलो नाही.>>> ह्यामुळेच ह्या वर्षी पाण्याची नासाडी करू नये अस आवाहन लोक करत होते. आपल्या घरी मुबलक पाणी आहे पण कुठेतरी लोक पिण्याच्या पाण्यासाठी तडफडत आहेत तर सहवेदना म्हणून होळी / रंगपंचमी खेळू नये.

>>>> मात्र ती नासाडी होतेय तर ही झाली तर काय हरकत आहे हा पवित्रा खेदजनक आहे. <<<
माफ करा, पण माझ्या युक्तिवादांवरुन तुम्ही काढलेला हा नि:ष्कर्ष हा तुमचा विचार आहे, मला तो मान्य नाही.
पाण्याची नासाडी, अगदी जेवायला बसल्यावर अर्धे भांडे पाणी तसेच सोडुन देणे हे देखिल चालणार नाही अशा शिस्तीत वाढलेलो मी आहे, व ते उदाहरण देखिल इकडे कित्येकदा मांडलेले आहे.
तुलना करण्याची वेळ येते, कारण केवळ अन केवळ हिंदू सणांवर रितींवर परंपरांवर श्रद्धास्थानांवर साळसुदपणे चिखलफेक करत त्याबद्दल बुद्धिभेद करताना , मोरीला बोळा अन दरवाजा सताड उघडा या पद्धतीने वागणे होतय, तेव्हा ते "निव्वळ अन निव्वळ हिंदू धर्मियांचा अवसानघात करण्याकरताच होते आहे, पाणी बचतीकरता नाहीच्च" हा दुटप्पीपणा सिद्ध करण्याकरता बाकी उदाहरणे तर्काच्या आधाराकरता द्यावीच लागणार ना? असो. तुम्हाला मी सांगतोय ते समजलेच नाहीये असे म्हणावे लागेल.

तुमचे वरील मत/नि:ष्कर्ष मला मान्य नाही.

लिंबूटिंबू,
मग तुम्ही जो निष्कर्श काढलाय की मी किंवा कोणी जे इथे होळीला पाणी वाचवा बोलत आहेत ते हिंदू धर्म विरोधी आहेत, तो निष्कर्श आम्ही तरी का मान्य करायचा Happy

तुम्ही ईतर सर्वच गोष्टीत पाणी वाचवता हे कौतुकास्पद आहेच. पण विषय होळीचा आहे. होळी खेळण्याकरता वापरलेले पाणी तुम्हाला हिंदू सण प्रथा परंपरेचा एक भाग वाटते तर मला तसे ते वाटत नाही ईतकाच काय तो फरक आहे आपल्या विचारांत. याऊपर जरी तुम्ही सिद्ध केलेत की हा एक प्रथापरंपरेचा भाग आहे तरीही मी पाण्याने होळी खेळलो नसतोच कारण अश्या दुष्काळी परिस्थितीत या प्रथेला मी प्राथमिकता दिली नसती.

तुम्ही याकडे सकारात्मकरीत्या का नाही बघत. आपल्या हिंदू बांधवांनी आपला नेहमीचा पाण्याचा सण यावेळी पाण्याशिवाय साजरा करून जगासमोर एक उदाहरण ठेवले.
तसेच या गोष्टीला जी प्रसिद्धी मिळेल त्यातून लोकांच्या मनावर पाण्याचे महत्व प्रतिबिंबित होईल आणि ते रोजच्या जीवनातही पाणी वाचवायला सुरुवात करतील.

हो नताशा, रेव्यु यांची त्याबाबतची पहीली पोस्ट खुप आवडली मला, त्यांनी फार समर्पकपणे मांडलं सर्व, ऋच्या आधीच्या धाग्यावर.

ऋन्मेष.... दगडावर डोके आपटुन काय उपयोग? 'हिंदु परंप्रेला स्मरुन धुळवडीनिमित्तने गोमय-गोंमुत्राने सर्वांग लिंपलेला तुमचा फोटो टाका' असे आवाहन त्यांना केले होते, पण त्यांनी त्याच्याकडे काणाडोळा केला आहे. ब्राझिलच्या धाग्यावर देखिल त्यांनी धर्म्/संस्कृतीला घुसडलेले आहेच. अशा धर्म्बुडव्यांकडे आपण लक्ष न दिलेले बरे.

स्कोअर
49+19 = 68 विरुद्ध 6

खरे तर असेच काहीसे आकडे इथे अपेक्षित होते. अपवाद वगळता कोणीही हट्टाने आम्ही भरपूर पाण्याने होळी खेळणारच असे इथे बोलणार नव्हते. काही जणांनी नेमके हिंदू सणांच्या दिवशीच नेमके कसे वाला मुद्दा काढला असला तरी त्यांच्या सामाजिक जाणेबद्दलही शंका नाही. वैचारीक मतभेद सोडल्यास त्यांनीही नक्कीच यावेळी पाण्याची काळजी घेतली असणार. यावेळी आपण सर्वच पाणी वाचवणार आहोत हे सर्वांनाच समजावे, आणि पाणी वाचवण्यास हुरूप यावा हा पोलचा एक हेतू साध्य झाला.
आशा करूया यंदाच्या होळीत सर्वांनीच गार्हाणे घातले असेल की पुढच्यावेळी चांगला पाऊस पडेल आणि पाण्याचा कसलाही तुटवडा भासणार नाही. शेतीलाही पाणी मिळेल आणि होळीसाठीही उरेल Happy

आवाहनाने काही होत नसेल तर पाण्याची नासाडी टाळण्यासाठी काही कायदेशीर तरतुद केली पाहिजे..