आवाज वाढव डीजे ......

Submitted by उडन खटोला on 10 February, 2016 - 09:57

शांताबाई ...............
बाणूबाया ....../......
पोपट पिसाटला ............
नागाच्या पिल्लाला ..........
ही पोळी साजूक तुपातळी ....
जपून दांडा धार ...
आणि काय काय ?
तर.........
तुझ्या आयची ......?

हेच का ते मराठी फिल्म म्युजिक ?
श्रीनिवास खळे , सुधीर फडके , दत्ता डावजेकर ,जयवंत कुलकर्णी आणि इतर नामवंत दिग्गजांनी ज्या उंचीवर नेवून ठेवले होते ...

तो दर्जा ... तो लेवहल नक्की किती खाली आणावं याला काही मर्यादा ?

की फक्त डीजे मध्ये वाजते एवढीच गाण्याची पातळी?

दिङ्मूढ उ.ख.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा व्वा मराठी संगिताला सुगीचे दिवस आले

ते "पप्पी दे पारूला" या अजरामर गाण्याचा सुध्दा समावेश करावा.

आजही अनेक उत्कृष्ट गाणी येत आहेत ,
कट्यारची सगळी गाणी उत्तम होती ,
'काकण'च टायटल सॉन्ग
'कॉफी आणि बरच काही'मध्ये संजीव अभ्यंकरांच खूप सुंदर गाणं होत
'निळकंठ मास्तर'मधे 'श्रेया घोषाल च अतिशय सुरेल गाणं होत असो ...आत्ताच्या काळातल्या उत्तम गाण्यांचे यादी करायची ठरवली तर बरीच मोठी यादी होईल.

कौशल इनामदार,अजय -अतुल,निलेश मोहरीर यांच्यासारखे बरेच उत्तम संगीतकार उत्कृष्ट काम करताहेत .

मनाली +१

कॉफी मधलं तू असतीस तर हे सुंदर गाणं मूळ गजानन वाटव्यांचं भावगीत आहे. कवी मंगेश पाडगावकर. पण कॉफीच्या निमित्ताने ते नव्या पिढीच्या आवडीचं झालं हे चांगलं झालं.