जुनी रूट कॅनल त्रास देते आहे, काय करावे?

Submitted by sneha1 on 10 November, 2015 - 18:46

नमस्कार मंडळी,
माझ्या एका दाढेची रूट कॅनल काही वर्षांपूर्वी झाली आहे.. आता ती दाढ काही कडक पदार्थ चावताना त्रास देते आहे, म्हणजे दुखते. दुखणे असह्य नाही. डेंटिस्ट ने एक्स रे काढून सांगितले की सध्या तरी ठीक आहे , काही इन्फेक्षन नाही..पण त्याने हे पण सांगितले की जर त्या दाढेच्या हिरडीवर एखादा फोड आला, तो अतिशय पेनफुल असला आणि त्यातून पस वगैरे आला तर ती रूट कॅनल पुन्हा करावी लागेल. तुम्हाला कोणाला याबद्दल माहिती आहे का?
धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

येस. त्रास म्हनजे कॅनालची पोकळी पूर्वीच भरून काढलेली असल्याने त्या 'ऑपरेशनचा ' त्रास पुन्हा होत नाही. फक्त नवी कॅप बसवण्याचा त्रास होतो मात्र. तो पूर्वीपेक्षा कमी असतो Happy
खिशाला तेवढाच होतो

डॉक्टरने तीन चार दिवसांची औषधे देतील. त्याने त्रास कमी होईल
.
पुन्हा त्रास होऊ शकतो.

कडक पदार्थ त्या दाढेने खाणे टाळा. दोन टाईम ब्रश करा.

मी केले आहे एका दाढीचे रुकॅ आणि कॅप सारखी निघत राहते म्हणून मी ती घालतच नाही. त्रास अजिबात होत नाही सवय होऊन जाते.

रूट कॅनल झाल्यावर परत दुखते, म्हणजे इंफेक्शन असणारच. कॅप रिप्लेस करून घ्या. एक्सरेत कॅपमुळे काय प्राॅब्लेम आहे नीटस कळत नाही. दाताची काळजी घ्या दुर्लक्ष केले तर दात इंप्लाट करावा लागेल जो अधीक खर्चीक असेल.

धन्यवाद सगळ्य्यांना!
रॉबिनहूड, नवी रूट कॅनल केल्यानंतर दाताचा उपयोग आधीसारखा होतोय का?
जव्हेरगंज , मी दोनदा ब्रश , फ्लॉस सगळे नीट करते.
बी , काही कडक चावले तर दात दुखतोय. नुसत्या कॅपचा प्रॉब्लेम नाही Sad
भगवती, डेंटिस्ट ने सांगितले की इंफेक्शन नाही म्हणून Happy

स्नेहा, मुळात रू कॅ केलेला दात आतून डेड केलेलाच असतो पण कॅपच्या फटीतून अन्नकण जाऊन किडण्याची , इन्फेक्शनची क्रिया सुरु होते व आजूबाजूने दात बाधीत होतो. पुन्हा कॅप बसवल्यावर पहिल्यासारखेच सगळे होते. काळजीचे कारण नाही. ते म्हणजे एक टोपी काढून दुसरी बसवल्यासारखेच आहे. मूळ दाताचा बेस रुंद असला की जास्त प्रॉब्लेम येत नाही नव्या कॅपला

माझही एकाच दाढेचं रूट्कॅनोल ९-१० वर्षांनंतर परत एकदा झालेलं आहे. त्रास काहेच नाही. एंडोडाँटिस्ट कडून करून घे.

दहा वर्षांपूर्वी लहान वयातच माझ्यावर रूट कनाल करायची वेळ आलेली.
पण चार वर्षानी पुन्हा दाढ दुखू लागली सतत.
या मधल्या चार वर्षात ज्याने ते रूट कनाल केलेले तो डॉक्टर परदेशी उडाला, कायमचाच.
मग दुसरा पकडला. त्याने सांगितले की रूट कनाल करताना दातातील किड बरोबर मारली नाहीये वगैरे.
तर कॅप काढून दात पोखरून पुन्हा पुर्ण साफ करावा लागेल.
त्याला म्हणालो, विचार करून सांगतो सात दिवसांनी, तात्पुरत्या पेनकिलर गोळ्या तर द्या.
त्याने दिल्या आणि दोन दिवसात दुखायचे थांबले, तरी ते तात्पुरतेच असल्याने पुन्हा रूट कॅनाल करावे तर लागणारच आहे म्हणत चार दिवसांनी त्याकडे अपॉईंटमेंट घ्यायला गेलो .
तर समजले हा सुद्धा आठवड्याभरासाठी बाहेर गेलाय. मग नाईलाजाने थांबावेच लागले.
या दिवसांत गोळ्या न घेताही पुन्हा काही दुखले नाही, म्हणून काही दिवस आणखी थांबूया म्हटले. कारण दुखत नसताना ऑपरेशन करायचे जीवावर येते.
बस्स तेव्हापासून आजपर्यंत ६ वर्षे झाली .. थांबलोच आहे Happy

अर्थात, हा माझा अनुभव झाला. आपण यावरून काही निष्कर्श काढून रिस्क घेणार नाहीत अशी आशा.

(ही उत्तरे डेंटिस्टकडून सल्ला घेऊन मग लिहिलेली आहेत)

काही वर्षापूर्वी केलेल्या रूट कॅनाल मध्ये पुन्हा दिसणे हे अनकॉमन नक्कीच नाही. दुखर्‍या दातावर कडक चावू नये हा एक टेम्पररी उपाय आहे पण पुन्हा डॉ कडे जाण्यापूर्वी करायला हवा. पण परमनंट सोल्युशनसुद्धा करून घ्यावे.

हिरडीवर फोड आला आहे की नाही हे प्रत्यक्ष एक्झामिन करून किंवा एक्स रे बघून डॉ. सांगू शकत नाही आहे का? तसं असेल तर काही उपाय करण्यापूर्वी सीबीसीटी करणे उत्तम. खर्च जास्त असतो पण सीबीसीटी मध्ये दाताला सगळ्या बा़जूंनी पाहिले गेल्याने काय प्रॉब्लेम आहे हे व्यवस्थित समजते. उपचार काय करायचा ह्याचा अधिक चांगला अंदाज येतो.

प्रत्यक्ष एक्झॅमिन केल्याशिवाय आणि एक्सरे पाहिल्याशिवाय (आणि सीबीसीटी पाहिल्याशिवाय) डेण्टीस्टनेही काही कमेण्ट करणे योग्य ठरणार नाही. प्रत्येकाचं सिम्टम सारखं दिसलं तरी प्रत्येकाचा प्रॉब्लेम वेगळा असू शकतो. डेंटिस्ट आणि केवळ डेण्टिस्टच प्रत्यक्ष एक्झॅमिन करून आणि एक्सरे आणी सीबीसीटी पाहून मगच तुम्हाला योग्य सल्ला देऊ शकतो. दात फृअ‍ॅक्चर झाला आहे का? रीरूट कॅनाल केलं पाहिजे का? आजूबाजूच्या दाताचा काही प्रॉब्लेम आहे का किंवा जबड्याच्या जॉईंटचा काही प्रॉब्लेम आहे का हेही डॉ.च सांगू शकतील. पण ह्या संभावना देखील तपासून पाहायला हव्या.

अजून काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. वेळ मिळेल तसे उत्तर दिले जाईल.

बी, रूट कॅनाल झाल्यावर दात डेड झालेला असतो त्याची स्वतःची स्ट्रेंथ कमी झालेला असते. तो फ्रॅक्चर होऊ नये म्हणून कॅप बसवलेली असते. जर कधी कॅप निघाली तर लगेचच पुन्हा लावून घ्यावी. काही काळाने ती नीट बसत नाही आणि मग सतत निघत राहाते. हवे तर एखाद्या प्रॉस्थोडोण्टिस्टकडून दुसरी कॅप बनवून घ्या पण कॅप नाही वापरणे योग्य नव्हे. दात काढायची वेळ येऊ शकते.

धन्यवाद वल्लरी..
मी डेंटिस्ट कडे जाऊन आले, त्याने एक्झामिन करून आणि एक्स रे काढून सांगितले की काहीही इन्फेक्शन नाही..फोड आला होता पण तो माउथ जेल लावल्यावर बरा झाला. डेंटिस्ट म्हणाला की दाढेच्या हिरडीवर एखादा फोड आला, तो अतिशय पेनफुल असला आणि त्यातून पस वगैरे आला असे झालेच तर मात्र लगेच दाखवायला या. सध्या त्या दाताने कडक चावणे टाळल्यास काहीच त्रास होत नाही...