असं म्हणतात की, चारोळी हा कवितेतला सर्वांत सोपा प्रकार आहे. एका लयीत बसणार्या चार ओळी जमवा, 'र'ला 'र', 'ट'ला 'ट' करत दोन यमके जुळवा अन् झाली की चारोळी तयार.
पण जातिवंत चारोळी अर्थवाही असते. कमीत कमी शब्दांत अचूक आशय पोहोचवायचा म्हणजे खायचं काम नाही.
खरं म्हणजे चारोळी हे नेमक्या शब्दांत केलेलं 'मार्मिक' भाष्य! कुठल्याही ओळी जेव्हा मनात जन्म घेत असतात तेव्हा त्यामागे एक कल्पनाचित्र असतं. त्या चित्राचा अर्थ उमगत जातो तसा तसा एक आशय जन्म घेतो आणि मग त्याला शब्दांची महिरप चढवली जाते.
आता समजा या कल्पनाचित्राच्या ऐवजी एक प्रकाशचित्र दिलं आणि 'रचा' म्हटलं चार ओळी तर? सोप्पं आहे ना?
तुम्हांला फक्त एवढंच करायचंय, एरवी तुमच्याभोवती पिंगा घालत बसणार्या, पण गरज असते तेव्हा गाव भटकायला जाणार्या शब्दांना हुडकून आणून एकेका ओळीत अचूक बसवायचंय!
तुमच्यासाठी हे अवघड नाहीये... एरवी बिनविषयाच्या विषयावरसुद्धा चारोळ्यांचे रतीब घालतो आपण. इथेतर विषय तुमच्यासमोर मूर्तिमंत उभा आहे!
तुमच्यासारख्या चारोळीकारांना काही नियम लावणं बरोबर नाही, पण काही किमान अपेक्षा आहेत!
१) चारोळीचा विषय प्रकाशचित्राला धरूनच असावा.
२) शब्दमर्यादा नसली तरी ओळीमर्यादा पाळावी.
३) एका आयडीला कितीही चारोळ्या लिहिता येतील. फक्त त्या वेगवेगळ्या पोस्टमध्ये पोस्ट कराव्यात.
४) दरदिवशी एक नवीन चित्र देण्यात येईल.
५) तुम्हाला तुमच्या आवडत्या चारोळीला 'लाइक' करायची सोय दिलेली आहे.
६) ही स्पर्धा नाही, एक खेळ आहे.
तर होऊन जाऊ द्या.... छायाप्रकाशाच्या चित्रलिपीला लेखणीच्या शब्दलिपीचा इंगा दावा!
आजचे चित्र:
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया
अभंग तुकोबांचे, शिवबांची
अभंग तुकोबांचे,
शिवबांची तलवार,
दोघांनी केला,
समस्त प्रजेचा उद्धार.
का किंतू येई मनात तूझिया का
का किंतू येई मनात तूझिया
का विचलित होसी ध्येया
जा तूझ्याच मार्गा; धर्मरक्षणा
'पाईक' वदु आम्ही सर्व जना..
(पाईकः तूकोबांचे मावळ्यांसाठीचे पाईकीचे अभंग)
एक सुर्य तो महाप्रतापी एक
एक सुर्य तो महाप्रतापी
एक सुर्य हा असे अध्यात्मी
भेट अशी ही नर-तार्यांची (शक्ती-भक्तीची)
भाग्य उजळती महाराष्ट्राची..
शिवबा तू ही मी ही
शिवबा तू ही मी ही लढलो
भाग्यासाठी मायमातीच्या
का मग आता वापर अपुला
राजकारणी जात पातीच्या
चंबू आणि साती मस्त. चंबू
चंबू आणि साती मस्त.
चंबू पहिली चारोळी फार सुंदर.
अंजु ,चंबु, साती विषयानुरूप
अंजु ,चंबु, साती विषयानुरूप लिहलय तुम्ही
अतिउत्तम. साती ही पण क्लास प्रखर वास्तवावर आधारीत.
साती, फारच सुंदर
साती, फारच सुंदर
खरं म्हणजे माझी चारोळी एवढी
खरं म्हणजे माझी चारोळी एवढी विषयाला धरुन नाहीये, तलवार कुठेच नाहिये चित्रात पण सुचतंच नव्हती अजिबात आणि बराच वेळ कोणीही चारोळी लिहीलीच नाही, म्हणून जी सुचली ती लिहीली.
तुकोबांचे मावळ्यांसाठीचे अभंग हे मला माहीतीच नाहीयेत, चांगली माहीती चंबु.
-
-
अरे .. धन्यवाद..शिकाऊ उमेदवार
अरे .. धन्यवाद..शिकाऊ उमेदवार आहे..पण मजा येतेय लिहायला..!
शिवबा तू ही मी ही
शिवबा तू ही मी ही लढलो
भाग्यासाठी मायमातीच्या
का मग आता वापर अपुला
राजकारणी जात पातीच्या
>>>>>>
अगदी समर्पक !
खरेच कुठे रस्त्यात येता जाता यांसारखे थोर पुरुष एकमेकांना भेटले तर नक्की सर्वात पहिले असेच बोलतील..
साती....मस्तच जमलय!
साती....मस्तच जमलय!