त्रिफळा चूर्ण

Submitted by शर्मिला फडके on 12 July, 2014 - 01:54

त्रिफळा चूर्ण जनरल डीटॉक्सकरता कोणीही घेऊ शकतं हा समज योग्य आहे ना? ते रोज घेतलं तर चालतं का? किती प्रमाणात? कधी? कसं?

थोडक्यात त्रिफळा चूर्ण घेण्याची योग्य पद्धती काय आहे? रिकाम्या पोटीच घ्यावं का? हल्ली टॅबलेट्सही मिळतात तर त्या घेणं तितकंच फायदेशीर ठरतं का?

त्रिफळा चूर्णाचे नक्की फायदे काय आहेत?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्रिफळा = हिरडा, बेहडा, आवळा अश्या तीन वस्तूंच्या पावडरी.
कोठा साफ ठेवणे, पचन सुधारणे हा उद्देश असतो.
कोमट पाण्याबरोबर घ्यायचे असते.

प्रमाण, रोज घ्यावे की नाही, टॅबलेटस की चूर्ण याबद्दल कुणी वैद्य व्यक्तीनेच उत्तर द्यावे.

त्रिफळा चूर्ण जनरल डीटॉक्सकरता कोणीही घेऊ शकतं हा समज योग्य आहे ना? ते रोज घेतलं तर चालतं का?>>>

माबोवरील वैद्य यावर प्रकाश टाकतीलच.पण हलका कोठा,लहान मुले ,गर्भवती यांना वैद्यांना विचारून द्यावे.त्रिफळा चूर्ण रोज घेऊ नये.

कोठा साफ ठेवणे, पचन सुधारणे हा उद्देश असतो.>>>> पण या व्यतिरिक्तही अनेक फायदे असतात ना? जनरल इम्युनिटी वाढणे इत्यादी. प्रमाणात रोज घेतलं तर काही दुष्परिणाम नाही होणार असं वाटतय. नेट्वर तर भरपूर फायदे दिलेत.

एका मित्राच्या सांगण्यावरून मी ही घेउन पाहिलेला माझा अनुभव असा आहे की त्रिफळा चूर्ण पाण्यात उकळून त्याचा काढा करून घ्याव. चूळ भरण्याआधी आपण पाणी तोंडात घोळवतो तस करून घोट घेत घेत घेतल तर अधिक लाभ होतो. तोंडाला छाले येणे , दात / हिरड्या यांना झालेला जंतुसंसर्ग, मुखदुर्गंधी यासारखे त्रास दूर होतात, आतड्यात वस्तीकरून रहाणार्‍या सूक्ष्मजीवांमुळे होणारा वायूप्रकोप दूर होतो व रेचक म्हणून होणारे लाभही अर्थात आहेतच.

हिरडा बेह्डामुळे,त्रिफळा रोज घेण्याचा प्रकार नाही..नुसता आवळा असलेले इतर भरपूर प्रकार उपलब्ध आहेत.ते वापरा.रेचक म्हणून त्रि. महिना पंधरा दिवसातून एकदाच घ्याय्वे सांगितले आहे.

शर्मिला ते रिकाम्या पोटी घेत नाहीत, शक्यतो रात्री घेतात. कोमट पाणी अथवा तुप किन्वा मधाबरोबर चाटण म्हणून चालते. रोज घेऊ नये. वर देवकीने बरोबर लिहीलेय.

माधवबाग मधील डॉ. सांगतात कि त्रिफळाचा काढा करुन तो कोमट झाला कि त्यात १ चमचा मध घालुन उपाशी पोटी घ्यावा. या उपायाने वजन कमी होते. अजुन प्रयोग केला नाही

.

मला वैद्यांनी सांगितलेली त्रिफळा चूर्ण घ्यायची पद्धत:

अर्धा कप कोमट पाण्यात एक मोठा चमचा (टी स्पूनपेक्षा मोठा असतो तो) शिगोशीग भरून (एका मध्यम लिंबाएवढे) चूर्ण कालवून ते मिश्रण रोज रात्री झोपण्यापूर्वी घ्यावे. लागल्यास वरून कोमट पाणी घ्यावे.

डीटॉक्स करता घेणार असाल तर ३ महीने तरी कमीतकमी घ्यावे लागते. पण मला तरी खरोखर फायदा झाला होता. एवढा दीर्घ काळ चूर्ण घेण्याचे तोटे काही नसावेत. पण सवय लागते. त्यामुळे वैद्यांच्य सल्ल्यानेच घ्यावे असे वाटते.

त्रिफळा चूर्ण उटणं म्हणूनही वापरता येतं. ऐकीव माहीतीनुसार त्वचेच्या खालची साठून राहीलेली चरबी या उपायानी कमी होते.
संत्र्याची सालही वाळवून पूड करून वापरता येते. अंघोळीच्या वेळेला उटण्यासारखी ही पूड वापरली तर कुठल्याही डिओ, अत्तर, सेंट, स्प्रे ची गरज पडणार नाही Happy मस्त मंद, फ्रेश सिट्रस सुवास राहातो.

दुसरा परिच्छेदही "ऐकीव माहीतीनुसार" आहे की प्रयोग केला आहे? संत्र्याची साल नुसती वापरली होती की त्रिफळ्यासोबत?

दुसरा परिच्छेदात दिलेलं वापरून पाहीलेले आहे. संत्र्यांच्या सालींची पूड होती फक्त; नो त्रिफळा.

मी गेले २० वर्षांपेक्शा जास्त वर्षे त्रिफ़ळा चुर्णाचा वापर करतो. मी दररोज घेत नाही. जेव्हा पचन मंद झाले आहे असे वाटते तेव्हा घेतो. जेवणाचा अनेक दिवस अतिरेक झाला की वापरतो. जेव्हा अ‍ॅसिडीटी वाढते तेव्हा रात्री झोपताना मी त्रिफ़ळा चुर्ण साध्या पाण्यासोबत घेतो.

अ‍ॅसिडीटी कंट्रोल होते. पचन सुधारते. हा अनुभव आहे.

ग्रीन फ़ार्मसीचे चुर्ण इतर कुठल्याही ब्रॅड पेक्शा प्रभावी आहे. फ़क्त ते जुने नसावे आणि १०० ग्रॅम चुर्णाचे पाकिट एखाद्या महिन्यात संपावे म्हणजे त्याचा गुण चांगला मिळतो.

इंदोरचे डॉ. शहा यांचे हिंदी मधे लिहलेले पुस्तक माझ्याकडे आहे. त्रिफ़ळा चुर्ण रोज सकाळी घेतल्याने ( वेगवेगळ्या रुतुत वेगळ्या गोष्टीं सोबत ) अनेक फ़ायदे होतात असे लिहले आहे. मी हा प्रयोग केलेला नाही.

त्रिफळा चूर्ण सकाळी आटवून काढा घेतल्याने (पोट साफ होते) आणि वायू झडून वजन कमी होते असा जवळपासच्या काही लोकांचा अनुभव पाहिला आहे. पण सवय लागते आणी नंतर त्रिफळा काढा घेतल्याशिवाय 'होत' नाही असे ऐकल्याने कधी प्रयोग केला नाही.
तसंच त्रिफळा चूर्णाच्या पाण्याने नियमीत डोळे धुतल्याने चष्म्याचा नंबर जातो हे पण ऐकलंय पण डोळे दोनच असल्याने आणि वजन किंवा 'जाण्याच्या' सवयी कमी-जास्त झाले तर करेक्शन करता येईल तसे डोळ्याचे कठीण आहे म्हणून प्रयोग केलेला नाही.
त्याऐवजी कच्चा आवळा तुकडे करुन खाण्याची सवय लावल्यास फायदा विदाउट साईड इफेक्ट्स होत असावा.

@नितीनचंद्र: इंदोरचे डॉ. शहा यांचे हिंदी मधे लिहलेले पुस्तक माझ्याकडे आहे. >> कृपया पुस्तकाचे नाव / प्रकाशक सांगाल का ?

@ शोधक
कल्याण चिकीत्सा प्रकाशन , १२०० , चुरुकोर्का रस्ता ( जयपुर बेंक गल्ली ) चौडा रस्ता, जयपुर ३०२००३

पुस्तकांची नावे स्वदेश चिकीत्सा के चमत्कार अणि स्वदेश चिकीत्सा सार दोन्ही पुस्तकांचे लेखक डो अजीत मेहता