लॉस एंजिलीसमधील खादाडी

Submitted by बस्के on 13 July, 2015 - 20:59

सध्या एलएच्या संबंधित धागे चक्क पळतायत. क्यालिफॉर्निया ग्रुपात बेएरियातील खादाडी आहे पण एलए- खादाडी असा धागा दिसला नाही. म्हणून हा ही धागा काढला.

माझं मत एलएतील देसी फुडबद्दल इतकं काही बरं नाहीये. माझ्या मते बे एरियातले फुड सुपर्ब असते. पण ते असो. कदाचित ह्या धाग्यातून एखादी नवी जागा कळेल..

आश्चिगने दिलेली लिंक : https://www.google.com/maps/d/edit?mid=zqwbl4XtsLTY.kZZuytXx9nv8

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आशिष, धन्यवाद. आज ट्राय करून पाहीन. काल काहीच जमत नव्हते. Uhoh
माऊ फोटो भारी!! Happy
रायगडः Proud तू पण कर अ‍ॅडीशन्स. Happy
सायो, छान होते फुड. Happy

डीजे, मी समहाऊ एलए मध्ये आल्यापासून इतकं मेडिटरेनिअन फुड खाल्लेच नाही. :| कॅमरिओमध्ये असताना दोन तीन जागा आवडीच्या होत्या. दरबांद नावाचे थाउंजंड ओक्समध्ये होते बहुतेक. विसरले आता. छान होते. चॅनल आयलंडला सीसाईड पर्शिअन ग्रील, कॅमरिओ अन थाउंजड ओक्सच्या मध्येच अलीबाबा नावाची अगदी खाणावळच होती छोटी. मस्त होते पण ते. फलाफल, श्वार्मा, बकलावा अन तुर्की कॉफी. ह्या गोष्टी प्रचंड आवडीच्या आहेत माझ्या..
ज्वेलरी डिस्ट्रिक्ट म्हणजेच फॅशन डिस्ट्रिक्ट म्हणतेस ना? तिथे मी कधीच काही खात नाही. तू लिहीलेल्या जागा बघते नेक्स्ट टाईम.

श्याश्कच्वान कॅनडातल एक राज्य आहे, अल्बर्टाच्या जवळ आहे. बरेच इंडियन (फर्स्ट नेशन्स) लोक राहतात, पण मी नाही रहात तिकडे Proud धनी, ओंटारिओला आहे रे मी.

तुमचा कढीपत्ता असा पूल मॅट्रेस वरच्या मल्लिका शेरावत सारखा सुखाने तरंगतो कसा काय? आमचा कढीपत्ता प्रेमचोप्रा नायतर रणजित जसा लव्हस्टोरीत मधे मधे करायाचा तसा दाताखाली येणे आद्य कर्तव्य मानतो. Sad

Lol

बस्के +१

पण तयार चटणीत कच्चा (फोडणीत न घातलेला कढिपत्ता थोडा इस्त्री फिरवून Wink असा बरोब्बर खोचून ठेवता येत असेल )

बरं आल्यासारखी दोन रेस्टॉरंट्सबद्दल लिहून टाकते.

'अनारबाग' ह्या वुडलँड हिल्सच्या रेस्टॉरंटला आम्ही नेहेमी जायचो. तिथला चिकन टिक्का जीव ओवाळून टाकावा इतका सुरेख असतो. एलए मध्ये आल्यावर तिकडे जाणं लांब पडू लागल्याने बंद झाले. पण पुंडलिकाभेटी आला पांडुरंग! बेव्हर्ली हिल्सला अनारबाग सुरू झाले आणि आमचा जीव भांड्यात पडला. अतिशय सुपर्ब फुड क्वालिटी. बेव्हर्ली हिल्सच्या इथल्या किंमती पण जास्त आहेत. पण वन ऑफ द बेस्ट! http://www.anarbaghbeverlyhills.com/

दुसरं अगदी अलिकडेच सुरू झालेले, 'कार्डेमम' (7233 Beverly Blvd ) ह्यांचं हैद्राबादी मुर्ग टिक्का मसाला अफलातून असतो. बाकीच्याही डिशेसना थोडी वेगळी(ऑथेंटीक?, रीजनल? मला नक्की वर्णन करता येत नाहीये) चव असते. आवडतं आम्हाला हे पण. http://cardamomla.com/

एक प्रश्न,

एल ए ला जाऊन सुद्धा आपण इंडियन रेस्टोरेंट्स बद्दल का चर्चा करताय ? (अर्थात खाणेपिणे हा निरतिशय वैयक्तिक प्रश्न झाला) मी अगदी सहज विचारतोय, आम्ही लोक जे काही टीएलसी किंवा फॉक्स लाइफ ला रोज बघतो ते सिद्धहस्त मराठीत वाचायला आवडेल, उदा एल ए चे वातावरण तिथले स्थानिक शेतीमाल, लोकल इंग्रेडिएंट्स, मीट्स, क्योर्ड मीट्स, चीज़, वाइन, लोकल cullinary influences वगैरे गोष्टी.

सोन्याबापू, एलेला जाऊनही आम्ही मायबोलीवर का येतो? तेच उत्तर आहे ह्याचे. खाणे तर फार जीवाभावाचा प्रश्न. आणि इथे चांगली इंडीयन रेस्टॉरंट्स कुठली आहेत हे असे देसी लोकांचे रिव्ह्यूज वाचूनच नीट कळते. ते तर यायलाच हवे त्यामुळे.

बाकी तुम्ही जे म्हणता आहात ते ही येईलच हळुहळू. Happy माझ्या घरासमोरच लॉस एंजेलीसचे 'द ओरिजिनल' फार्मर्स मार्केट आहे ते खूप प्रसिद्ध आहे.. १९३४ सालापासून सुरू आहे ते... (थर्ड & फेअरफॅक्स) http://www.farmersmarketla.com/
मी त्याचे फोटो काढून इथे देईन. जनरली फार्मर्स मार्केट्स दर वीकेंडला वगैरे भरतात, परंतू हे रोज व रात्री उशीरापर्यंत चालू असते. नुसत्याच फळं व भाज्या विकायला आहेत असं नाही तर येथे भरपूर प्रमाणात फूड स्टॉल्स आहेत, अगदी चष्मा दुरूस्त करून देऊ, अल्टरेशन्स करून देऊ अशीही कित्येक दुकानं आहेत. शेजारीच 'द ग्रोव' हा फेमस आउटडोअर मॉल आहे. http://www.thegrovela.com/ अगदी सुंदर हॅपनिंग जागा आहे! अजुन फोटोज देईनच .. हा एक घ्या तोवर.. Happy ग्रोव्हमधले डान्सींग कारंजे असलेले तळे व त्यावरचा पूल...

11182637_10153513603982018_8268216853654139388_o.jpg

melting pot कोणी ट्राय केलयं का? मला तिथले chocolate fondue फार आवडले होते...
85 degree bakery मधे फार सुंदर mango Mousse cake मिळतो...

मँगो मूस केक खावा तर बरबँकच्या पोर्टोज चा. अफलातून आहे. दोन दिवसात ५ पाउंड वाढतील याची खात्री.

१. चिकन अँड वाफल्स् (waffles)

- 'सोल फूड' हा दक्षिणेतल्या राज्यांतल्या कृष्णवर्णीय खाद्यसंस्कृतीचा भाग. आता अर्थातच त्याला वर्णाची वा प्रदेशाची बंधनं राहिलेली नाहीत. डीप-फ्राईड चिकन हा या कुझिनचा महत्त्वाचा भाग. वाफल्सची मोट त्याबरोबर बांधणं कदाचित तितकंसं स्वाभाविक वाटणार नाही, पण ही जोडगोळी तशी पारंपरिक आहे.

लॉस एंजिलीसमध्ये Roscoe's नावाच्या चेनच्या पाच-सहा शाखा असाव्यात. तिथे ही डिश उत्तम मिळते. (कॉलर्ड ग्रीन, बिस्कीट-ग्रेव्ही सारख्या इतर 'दाक्षिणात्य' साईड डिशेस् मात्र तितक्या ऑथेंटिक वाटल्या नाहीत.)

२. उमामी बर्गर्स

- उमामी हा चवीचा एक मूलभूत, पण तसा निराळाच प्रकार आहे. (अधिक माहिती येथे.) त्या चवीचे बर्गर्स देणारी 'उमामी बर्गर' ही चेन आहे. तिथल्या ट्रफल फ्राईज + बर्गर हे कॉम्बो खासच लागतं. (शाकाहारी/टर्की बर्गर्सही मिळतात. पण त्यांची चव बहुधा 'उमामी' नसावी.)


​एलेमधील खादाडीमध्ये ही माझी भर.....
१. Flavor of India : दोन शाखा: बेव्हर्ली हिल्स व बरबँक येथे. मला बरबँकची शाखा जास्त आवडते. शाही पनीर आणि मिर्ची टिक्का मसाला अत्युत्कृष्ट.... या रेस्टॉरंटमध्ये जाणे अनेकदा होते.
Flavor-Of-India-.jpgFlavor-Of-India-2-800.jpg

२. हॉलीवूडमधील Crown of India.: येथील lunch buffet ची पद्धत वेगळीच असते. चिकन टिक्का (मसालारहित) मस्त. सामोसेही उत्तम

Indian foodचा मी विशेष पंखा नाही. त्यामुळे आता नॉन-देसी फूड.......
३. हॉलीवूडमधील Bossa Nova: उत्कृष्ट ब्राझिलिअन फूड साठी. इथला Pesto Verde Pizza, Marsala Chicken Grill आणि SALMÃO GRELHADO (सॅमन फिश) लाजवाब.

Bossa Nova.jpgBossa Nova2.jpg

४. Bossa Nova ला खाल्ल्यानंतर जवळच Mashti Malone's Ice Cream खाल्लेच पाहिजे. Iranian owner असलेल्या या दुकानात saffron rosewater, mango असे अनेक अप्रतिम फ्लेवर्स मिळतात.
Masti Malone 1.jpgMasti Malone 2.jpg

५. तुम्ही शाकाहारी आहात (माझी बायको) व तुम्हाला मांसाहारी लोकांच्या (मी) स्व-कौतुकाचा कंटाळा आलाय का? मग तुमच्यासाठी आणि मांसाहारी लोकांसाठी Doomie's Home Cookin' ला भेट देणे आणि प्रत्यक्ष Doomie साहेबांना भेटणे अतिशय निकडीचे आहे. Casual dinner साठी यांच्याकडचे Southern Fried Chicken, Grilled chicken burger आणि Country Fried Steak म्हणजे शाकाहारी लोकांसाठी पर्वणीच!!!!
Doomie.jpgdoomie2.jpg

६. वरचीच अट (शाकाहारी असून, खायचे जणू मांंसाहारी असल्यासारखे) पुन्हा लागू केल्यास Silverlake येथे Bulan Thai Vegetarian restaurant आहे. इथे मला आवडणार्‍या गोष्टी म्हणजे Appetizer मध्ये येणार्‍या Chicken Hot Wings व Main Course मध्ये Sizzling Pla Rad Prig Fish

Bulan thai.jpgBulan thai 2.jpg

सध्या इतकेच....अजून आठवतील तशी भर घालतोच...

अवांतर.......वरती नंदनने लिहिलेल्या 'सोल फूड'च्या निमित्ताने दक्षिणेकडे राहत असताना New Orleans ला जाण्याचा योग आलेला आठवतो. तेथे एका Food Competition मधे "Deep Fried Butter" या डिशला प्रथम क्रमांक मिळाल्याचे 'याचि देही याचि डोळा' पाहिले आहे.

आर्टेशियामधील जागा मुद्दामच लिहिल्या नाहीत कारण बहुतेकांना त्या माहित असतात.​
(सर्व छायाचित्रे आंतरजालावरून)

बरेच दिवसात इथे कुणी फिरकलेलं दिसत नाही.

आज काही दिवसांपुर्वीच आर्टेशियामध्ये उघडलेल्या अंजप्पार रेस्टाॅरंटमध्ये जाऊन आलो. अंजप्पार थाळी मागवली. जेवण वाजवी दरात तरिही चांगल्या प्रतीचं आणि भरपुर वाटलं. विक डे असुनही थोडी वाट पहावी लागली. विकांताला म्हणे १-२ तास वाट पहावी लागते.

या धाग्यावर ज्या ज्या रेस्टॉरंटांची नावं आली आहेत ती सगळी अजूनही अस्तित्वात आहेत का?

Pages