चेहर्यावरील चरबी कशी कमी करता येईल...उपाय काय करता येईल.?

Submitted by छोटस माऊ on 3 July, 2015 - 04:03

व्यायाम करायला वेळ मिळत नाही... दुसरा काही उपाय सुचवा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जेवणात कार्ब्स कमी करा. भरपूर सॅलड खा. नाश्त्या नंतर आणि डिनर अगोदर एक ग्लास गरम पाण्यात अर्धा लिंबू पिळून ते पाणी प्या. जेवणात खूप सॅलड खा. चरबी ओव्हरलॉल कमी होते. पर्यायाने चेहरा आणि मान बारिक होतात हमखास.

अजून एक
ओवा, शोपा, बडिशेप, जवस प्रत्येकी एक चमचा घेऊन ते भाजून त्याची पूड रोज रात्री झोपण्यापुर्वी गरम पाण्या सोबत घ्या. त्याने ही चरबी कमी होते.

व्यायाम करायला वे़ळ नसेलच तर दिवा घेउन खाली वाचा, वेळ असेल तर व्यायाम करा आणी वाचण्यात वेळ घालवु नका
अघोरी उपचार - १ महिना काहि खाउ नये, पण १ महिन्यानी बारिक झालेल्या चेहर्‍यावर चंदनाचा हार असेल, आणि तो बघायला आपण सोडुन ईतर सगळे असतिल (सो काळजीपूर्वक ठरवा)
२. गुंडा नावाचा चित्रपट दिवसात ३ वेळा बघा, अस आठवड्यात ४ दिवस तरि कराच, हसुन हसुन चेहर्‍याला व्यायाम होईल आणी आपोआप चरबी गायब

सगळ्यात सोपा उपाय - रोज आरश्या समोर जिथे उभे राहता त्यापेक्षा ४ हात मागे उभे रहा आणि बघा, चरबी थोडी कमी जाणवेलच Wink

दक्षिणा ने सुचविल्यप्रमाणे कार्ब्स कमी करा. पोळी किंवा भाकरी उत्तम पण ब्रेड अजिबात नाही अगदी ब्राउन असला तरीही.

दुसरी गोष्ट-- तुमच्या जेवणातले मीठाचे प्रमाण अतिशय कमी करा. आधी त्रास होईल कारण पण कमी मीठाची सवय एकदा सवय झाली की तेच बरं वाटतं. मीठ कमी केल्यावर खूप फरक पडतो शरीरात.

तिसरी गोष्ट-- ग्रीन टी प्या. दोन चार लहान कप भरून दिवसभर प्यायल्याने खूप फायदा होतो.

चार----कधी कधी असहि होतं की आपल्याला दुधाची आलर्जी असु शकते. बरेच वेळेला आपल्याला हे लक्षात येत नाही. पण दूधाची आलर्जी असेल तर दूध पिऊन सुद्धा शरीर ब्लोट होतं शरीराबरोबर चेहेराही. त्यामुळे काही दिवस दूध घेण्याचे टाळा. बघा काही फरक पडला तर.

व्यायामाला वेळ नसेल तर थोडाफार वॉक करता येईल का असे बघा. अगदी एका वेळेस एक तास चाललच पाहिजे असहि नाही पण आधून मधून लंच ब्रेक मधे दहा पंधरा मिनिटे जरी भराभर चाललात तर चांगले. शेवटी शरीर बारीक झाले तर चेहेर्यावरची चरबी आपोआपच जाईल.

शेवटी महत्वाचं अजुन एक म्हणजे आपलं थायरॉइड लेवल चेक करून घ्या. त्याने सुद्धा चरबी वाढु शकते.

थायरॉइड लेवल चेक करून घ्या. त्याने सुद्धा चरबी वाढु शकते.>> थायरॉईडमुळे चेहर्‍याला सूज येईल. चरबी पण वाढु शकते का??

खायचं काही समोर आलं की मान डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे वळवा.. सगळंच वजन कमी होईल. हाकानाका Light 1

भ्रमर, मला तरी असे वाटते कि थायरॉइड ने शरीराच्या रचनेवर नक्कीच फरक पडतो. माझ्या महिती नुसार तरी under-active थायरॉइड असेल तर वजन/ चरबी वाढते.

आठवड्यातून दोन वेळा एक टाईम जेवण करुन उपवास करायचा. उपवासाने खूप काही फरक पडातो तब्येतीत. मला तर उपवासाचे महत्त्व फार पटायला लागले हल्ली. देवासाठी म्हणून नाही पण तब्येतीसाठी उपवास एक सोपी गोष्ट आहे. एक वेळ जेवण करुन तर आणखीनच सोपी. माझ्या एका मित्राने तो जैन आहे त्याने कडक तीन महिने पाणी पिऊन आणि संपुर्ण तीन महिने फक्त आराम करुन राहिला तर तो आता नवाकोरा दिसतो आहे अगदी.

काही दिवस तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली निसर्गोपचार घ्या. आहारात व दिनचर्येत त्यांच्या सल्ल्यानुसार आवश्यक बदल करा. चेहऱ्याची चरबी कमी व्हायला मदत तर होईलच, शिवाय चेहरा तरतरीत, कांतिमान दिसू लागेल.
दीर्घश्वसन करा. प्राणायाम, योगासने करा. नियमितपणे व योग्य मार्गदर्शनाखाली करा.

चेहर्‍यासाठी काही बंध आणि मुद्रा आहेत. उदा. जिव्हाबंध, सिंहमुद्रा. एखाद्या जाण्काराच्या मार्गदर्शनाखाली हे करुन पहा. कपालभातीने देखिल काही प्रमाणात फरक पडेल.

Chehreya var chi charbi kami karnya sathi pantjali che lavan bhaskar churna divasatun don vela don chamche ghya. कल्पना

तीन महिने पाणी पिऊन आणि संपुर्ण तीन महिने फक्त आराम करुन राहिला तर तो आता नवाकोरा दिसतो आहे अगदी.>> बापरे फक्त पाणी पिवून आणि आराम करून नवा कोरे दिसणे कसे शक्य आहे . उपवास पण काही सोपी गोष्ट नाही .
कमी प्रमाणात योग्य ते खाणे आणि व्यायाम केला कि वजन कमी होईल .

प्रथम चेहर्‍यावर चरबी आहे का सूज हे नीट पडताळून पहा. एकंदर शरीराचं वजन वाढलं असेल तर चेहर्‍यावर पण गुबगुबीतपणा येणं सहज आहे. पण शारिरिक वजन फारसं न वाढता चेहरा गुबगुबीत दिसत असेल तर ती सूज असू शकते. सूज वॉटर रिटेंशन मुळे येऊ शकते. वॉटर रिटेंशनचं महत्वाचं कारण म्हणजे सोडीयम/ मीठाचं प्रमाण जास्त होणे. त्याचा बी पी वरही परिणाम होतो. थोडक्यात सगळं चेकींग करुन घेणे केव्हाही चांगले.

३ महिने उपास? का हि हि Uhoh

नीट सल्ले देता येत नसले तर निदान दिशाभुल वाली उदाहरणे तरी द्यायला नकोत..

खुप खुप अवांतर :स्मितः
३ महिने उपास? >>>
जैनांमध्ये जो ३ महिने उपवास असतो तो या प्रमाण असतो.
पहिला संपुर्ण दिवस उपास फक्त गरम्/कोमट पाणी पिऊन. दुसर्‍या दिवशी जेवण.
नंतर २ दिवस गरम्/कोमट पाणी पिऊन उपास तिसर्‍या दिवशी जेवण.
नंतर ३ दिवस गरम्/कोमट पाणी पिऊन उपास ४ थ्या दिवशी जेवण.
अशाप्रकारे ८ दिवस कंटिन्यु पाणी पिऊन उपवास व नंतर सांगता. या क्रमाने ३ महिने होतात. पुन्हा जे जेवण ते लोक घेतात त्यातही बरेच पथ्य असतात उदा. फक्त मुगाचे पदार्थ, पालेभाजी नाही वैगरे.
आणि जेव्हा याची सांगता असते तेव्हा मात्र फार मोठा कार्यक्रम असतो.
मला एव्हढी माहिती असण्याचे कारण म्हणजे माझा बॉस जैन आहे त्याच्या वहिनीने, बायकोने अशाप्रकारचे उपवास केले होते. गेल्यावर्षी तर त्याच्या ८वर्षाच्या भाच्याने हा उपवास केला होता.

तीन महिने पाणी पिऊन आणि संपुर्ण तीन महिने फक्त आराम करुन राहिला तर तो आता नवाकोरा दिसतो आहे अगदी>>>>>>>> का ही ही Lol

चेहर्‍यावरची काय किंवा इतर कुठली काय? चरबी ती चरबी आणि त्या करता उपाय दोनच डायट आणि व्यायाम. आपापल्या बॉडी टेन्डन्सी (फॅट डिस्ट्रिब्युशन) प्रमाणे एकदा चरबी वाढायला लागली की ती जिकडे तिकडे दिसायला लागते. काही लोकांच्या चेहर्‍यावर पटकन चढते आणि काही लोकांचा चेहरा अगदी नॉर्मल राहतो इतर ठिकाणी भरपूर चरबी असली तरीही.
एकंदरित एकदा डायट्/व्यायाम सुरु केलात की आपोआप चेहर्‍यावरची चरबी सुद्धा कमी व्हायला लागेल. सहसा एकदा वजन कमी व्हायला लागलं की बोटं, दंड, चेहरा, मान ह्या ठिकाणी आधी कमी होतं असं मी ऑब्झर्व केलं आहे. पोटावरची सरवात शेवटी. म्हणूनच थोडं जरी वजन कमी झालं तर लोकांच्या लगेच लक्षात येतं चेहरा बघून.
सो.. गेट टु वर्क. Happy

धागाकर्ती आणि आंबटगोड, दोघींसाठी एकच उत्तर. Face yoga.....
अतिशय effective असतो. 100% नाही तरी बऱ्याच प्रमाणात उपयोग होतो. अगदी समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यांना जाणवेल इतपत फरक पडतो. मी तेलकट त्वचा आणि pimples चे डाग यासाठी 10 दिवसाचे workshop attend केलं. मी तरी 10/10 मार्क्स देईन.
आणि मला आवडलं कारण, online होतं, सगळे घरगुती पदार्थ आणि वस्तु वापरून केलेले उपाय होते आणि fees नगण्य होती.