काय करावे? धंदा-उद्योग की?

Submitted by उडन खटोला on 13 March, 2015 - 13:35

नमस्ते मंडळी. माझ्या "नक्की किती पैसे पुरेसे?" या धाग्यावर ज्या
माबोकरांनी सल्ले दिले होते त्यांचे मनापासून आभार मानून आज एक नवीन
मुद्दा उपस्थित करत आहे. तर मंडळी सध्या मी कोकणातील घरी निवृत्त जीवन
जगत आहे. जोडीला एम्टीडीसी च्या न्याहरी निवास योजनेमध्ये सहभागी होवून
घरातील काही खोल्याचा वापर पर्यटकांसाठी देवून त्यातून महिन्याला काही
रक्कम उभी राहते. ज्याना या उन्हाळ्यात कोकणात यायचे असेल अशानी जरूर
संपर्क करावा!

तर आमच्याकडे वरील न्याहारी निवास योजने अन्तर्गत काही पाहुणे गेल्या आठवड्यात आले होते . त्यातील एक सुमारे चाळीशीचा दाढीधारी इसम होता . त्याच्याशी चांगलीच मैत्री झाली .त्याने आपली कहाणी सांगितली. सदरहू इसम मूळचा कोकणातील असून गेली 10 वर्षे आफ्रिकेत टेक्निशियन म्हणून कामाला होता. मात्र मागच्याच महिन्यात त्याच्या कंपनीने कामगार कपात केल्याने तो गावी परत आला. येताना सुमारे 15/20 लाख रुपये सेव्हिंग होते . त्याचे मुंबई किंवा अन्य शहरात घर नसून एकटाच आहे. गावी एक जुने घर आंब्याची दोनचार कलमे आहेत .
अशा परिस्थितीत पुढे काय करावे ? असा प्रश्न त्याला पडला होता . परत दुसरी नोकरी शोधून परदेशी जाण्यात त्याला इंटरेस्ट नव्हता. पण हाताशी असलेल्या पैशात काय करावे ज्यायोगे पुढील आयूष्य चांगले जाईल? कारण तो तर वैतागून आध्यात्मिक संन्यास घेण्यासाठी हिमालयात जाण्याचा विचार करत होता !

चाळीशीत असल्याने लग्न करण्यात इंटरेस्ट नव्हता किंवा कदाचित आर्थिक परिस्थितिमुले शक्य झाले नसावे, त्याबाबतीत बोलायला फारसा उत्सुक नव्हता . निघताना त्याने त्याचा मोबाइल नंबर आणि पत्ता मला दिला आणि योग्य तो सल्ला द्यावा अशी विनंती केली .
तर मंडळी, त्याने पुढे काय करावे?
1. धंदा /उद्योग ? कोणता?
2. नोकरी ?
3. शेअर्स/इन्व्हेस्त्मेंट ?
4. लग्न करावे का? का करावे?
5. संन्यास /अध्यात्म की अन्य काही ?

आपल्या उत्तरांच्या प्रतीक्षेत ...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सन्यास अध्यात्म वगैरे घ्यायचा असेल तर कृपया पैसे मला देऊन जावे.

मी ते पैसे सांभाळुन ठेवीन.

समजा नंतर काही वर्षानी निर्णय बदलला तर पैसे परत करीन... साठलेल्या व्याजावर मात्र निम्मा हक्क माझा राहील.

पण कृपया अध्यात्माच्या नावाने सगळा पैसा कुठल्याही कल्टला देऊ नयेही नम्र विनंती

सदरची व्यक्तीचा पूर्वीपासून अध्यात्माकडे ओढा होता ,मात्र नोकरीसाठी सतत व्यस्त असलेने त्याला त्यासाठी पुरेसा वेळ मिळत नव्हता

क्रूपया या धाग्याचे निमित्त करून महान भारतीय अध्यात्म व हिन्दु-धर्म आणि संस्कॄती व इतिहास यावर दुगाण्या झाडन्याचे आपले परमकर्तव्य इथे बजावु नये अशी विनन्ती !

सन्यास घेतला तर बरे पडेल

सन्यास घेतला तर बरे पडेल किंवा एक मध्यम मार्ग म्हणजे आनंद वन किंवा तत्सम संस्थेत स्वयंसेवक म्हणून काम करणे. एक ब्रेक घेउन गावाकडील घराची सोय काही रिपेअर वगैरे असतील ते बघणे. पैशाची संबंधित कामे करणे असे करता येइल.

प्राण्यांची देखभाल करणारे रिझर्वज असतात तिथे स्वयं सेवकगिरी करता येइल. ते आफ्रिकेत राहिले असल्याने त्यांना तेथील जास्त माहिती. तिथे एलिफंट रिझर्व आहेत. ह्याची अ धिक माहिती जालावर मिळेल.

गावाकडील घरी इकोटुरीझम वगिअरे करता येइल.

उत्तरेत जाणार असतील तर संभाळून राहायला सांगा. पैसे जपा उ गीच कोणावरही विश्वास ठेवून इन्वेस्ट करू नका. आधी म्हातारप णाची सोय करून मग पुढील पाउल टाकावे. शुभेच्छा.

पर्यटकांसाठी निवास देणे हा एक चांगला उद्योग आहे, पण त्यासाठी मार्केटींग तर हवेच शिवाय आलेल्या पर्यटकांना सुविधा देण्यासाठी कायमस्वरुपी माणसेही हवीत. या व्यक्तीला ते शक्य होईल असे दिसत नाही.

कोकणात लघूद्योगासाठी जागा भाड्याने देणे, किंवा गोदाम म्हणून देणे हे देखील करता येईल. फारसे लक्ष घालावे लागणार नाही व नियमित उत्पन्न मिळेल.

आमचे स्वतःचे मालवणचे घर, देखभाल करायला कुणी नाही म्हणून विकावे लागले. ज्या व्यक्तीने ते खरेदी केले त्याने तिथे एक हॉटेल काढले. ते बरे चालत होते.

पर्यटकांना जेवण देणारी पण बरीच होटेल्स मालवणात निघताहेत. अशा कारणासाठी पण भाड्याने जागा देता येईल. नियमित उत्पन्नाची सोय झाली तर स्वतःला हवे तसे जगता येईल.

उत्तरेत जाणार असतील तर संभाळून राहायला सांगा. पैसे जपा उ गीच कोणावरही विश्वास ठेवून इन्वेस्ट करू नका. आधी म्हातारप णाची सोय करून मग पुढील पाउल टाकावे. शुभेच्छा.
<<
सन्यास घेतल्यावर म्हातारपणाची सोय कशाला हवीये वेगळी?

चार भाग करावेत उर्वरित रकमेचे.
एका भागाची fd करावी
दुसरा भाग बिझिनेस साठी वापरावा.
तिसरा भाग बिझिनेस चा ब्याकप म्हणून राखून ठेवावा
आणि चौथा भाग रोजच्या खर्चासाठी अगदी व्यवस्थित राखून वापरावा. कारण अजून साठ वर्षांची तजवीज असलेली बरी.

लग्न करायची मुळातच स्वत:हूनच इच्छा नसेल तर त्यांच्यासारखे नशीबवान तेच!
त्यांना खरे तर काय करावे ऐवजी काय करावे आणि काय नाही असे झाले पाहिजे, सिरीअसली!
एखाद्या आवडीला, छंदाला ते पोटापाण्याच्या व्यवसायात बदलू शकतात आणि पोटापाण्यापुरते जरी कमावले तरी सुखासमाधानात जगू शकतात.
साली ना कल की फिकर ना आज का टेंशन, मी तर फक्त लाईफ एंजॉय करायचा सल्ला देऊ इच्छितो Happy

अध्यात्म, सन्यास अशा गोष्टी सल्ल्यानुसार घेता येत नाही त्यासाठी स्वत:च्या मनाची तयारी लागते. निर्विकार व्हावे लागते , आवड असणे आणि सन्यास घेउन तो निष्ठेने निभावणे यात फरक आहे , पुढे जाउन सन्यासी जीवन जमले नाही तर दुसर्‍याने सल्ला दिला म्हणुन मी सन्यासी झालो असा पश्चात्ताप व्हायला नको (हे माझे वैयक्तिक मत आहे )

उत्तर मिळाले आहे पण मला वाटतं त्यांनी परत ऑफ्रिकेत नोकरी शोधावी..१५/ २० लाख सध्याच्या महागईत ५ ते १० वर्शे पुरतील मग नंतर कसे होणार? त्यापेक्षा परत तिकडे नोकरी करुन पुढच्या ५ ते १० वर्षात ८० ते १०० लाखाची तजवीज करावी मग निवृतीच्या निर्णय घ्यावा