कंपनी चे शेअर्स मार्केट मधे कसे आणावे?

Submitted by vijay darode on 7 March, 2015 - 05:20

मी आणि माझे आणखी २ मित्र मिळून ठिबक सिंचन साठी लागणारे प्लास्टिक चे सर्व सामान तयार करणारी कंपनी सुरु करणार आहोत . आम्हाला या कंपनी चे काहि शेअर्स ओपन मार्केट मधे ठेवायचे आहेत. कंपनी चे शेअर्स मार्केट मधे कश्या प्रकारे आणावे ?
त्यांची दर्शनी किंमत कशी ठरवावी?
१% मधे किती शेअर्स असावे? जेणे करुन १० ते २०% मधे १कोटि रुपये येवु शकतिल?.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कंपनीचे शेअर्स मार्केटमध्ये आणण्यासाठी खूप अटी आहेत. मुख्य म्हणजे पब्लिक लिमिटेड कंपनी असली पाहिजे आणि कंपनी रजिस्टर झाल्याला कमीत कमी एक वर्ष झाले असले पाहिजे. अन्य खूप अटी आहेत. पण तुमची कंपनी अगोदर पब्लिक लिमिटेड कंपनी (कमीत कमी ७ सभासद आणि कमीत कमी रु. ५ लाख गुंतवणूक) रजिस्टर करून घ्या. त्यासाठी मी मदत करू शकेन. पण प्रत्यक्ष भेटले पाहिजे.

कंपनीचे शेयर्स बाजारात आणायचे असतील तर पब्लिक लिमिटेड कंपनी स्थापन करणे हाच उपाय आहे. पब्लिक कंपनीला सेबी गाइड लाइन्स, लिस्टिंग अग्रीमेंट फॉलो कराव्या लागतात. नुकताच आलेला सुधारित कंपनी कायदा २०१३ च्या तरतुदिही पाळाव्या लागतील .