कौटुंबिक स्नेहमेळाव्यामधे खेळता येण्याजोगे खेळ

Submitted by रीया on 22 December, 2014 - 01:51

येत्या काही दिवसांमधे आमचं फॅमेली गटग असणार आहे.
वर्ष ८ ते ८० मधे प्रत्येकाला खेळता येतील असेल इन डोअर गेम हवे आहेत. जेणे करून सगळे नातेवाईक खेळांमधे बिझी रहातील आणि नेहमी चालणार्‍या कुचाळक्या आणि मतभेदांसाठी फारसा वेळ मिळणार नाही.
ग्रूप पाडून खेळ खेळत यावेत.
मला किमान ५ खेळ हवे आहेत (५ राऊंड्स). सध्या ठरवलेले नेहमीचे यशस्वी खेळ पुढील प्रमाणे :-
१) अंताक्षरी
२) डम शेराज
३) कलरफुल ट्रेजर हंट

आणखी काही गेम सुचवा प्लिज
*****************************************************************************************************************************
मायबोलीकर रॉक्स! इथे सुचवल्या प्रमाणे पुढील २ गेम मी माझ्या लिस्ट मधे अ‍ॅड केलेत :
४) कानगोष्टी/ अक्षरवार्ता
५) फॅमेली Quiz

माझं काम झालंय. पण इथे ज्याला जसे सुचतील तसे गेम्स लिहित गेलात तर सगळ्यांना उपयोग होईल Happy
तेंव्हा तुम्हाला सुचतील ते गेम्स नक्की इथे लिहून लिस्ट वाढवा Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रीया.. तुझा धागा उघडल्या उघडल्या दोन गेम आठवले बघ चटकन
१. काही वस्तु, घ्यायच्या त्या समोर टेबलवर मांडुन ठेवायच्या आणि जमलेल्यांच्या हातात कागद, पेन देउन त्या समोरच्या वस्तुंवर असणार म्हणजे एकतर ती वस्तु गाण्यात वापरली असली पाहीजे किंवा त्या वस्तुचा उल्लेख गाण्यात असला पाहीजे.. अशी जास्तीत जास्त गाणी लिहायची... एक मिनिट वगैरे वेळ द्यायचा..

उदा.. बुगडी - बुगडी माझी सांडली ग
एखाद फुल - फुल तुम्हे भेजा है खत मै
बांगडी - चुडी नही ये मेरा दिल है
कागद+पेन - प्यार के कागज पे दिल की कमल से किंवा नुसता कागद असेल तर वो कागज की कश्ती..

२. उपस्थित सर्व मंडळींना दिलेल्या वेळेत जास्तीत जास्त दागिन्यांची नाव लिहायला सांगायची...

अजुन एक आहे पण तो कसा खेळतात ते नक्की माहीत नाहीये तो उद्या किंवा दुपारी सांगते माहिती मिळवुन...

मुग्धा थँक्स. पण मग सगळे गेम गाणी गाणीच होतील ना. अंताक्षरी कॅन्सल करून हा घेता येईल किंवा अंताक्षरीमधेच २रा राऊंड याचा घेता येईलः)
तू जो दागिन्यांचा म्हणते आहेस त्याच्या जवळपास जाणारा कलरफुल ट्रेजर हंट ठेवायचा ठरवलाय. म्हणजे एका ग्रूपला जो रंग येईल. त्या रंगाच्या वस्तू गोळा करायच्या. ज्या ग्रूपच्या वस्तू जास्त तो ग्रूप जिंकला. वस्तू रिपिट होईला नको. म्हणजे एकदा सॉक्स घेतला की ४-५ सॉक्सच असं नको.
(कळतोय का गेम जो मी एक्स्प्लेन करतेय त्यानुसार? Uhoh )

किती गं पटकन प्रतिसाद दिलास Happy थँक्स. आणखी तिसरा लवकर सांग Happy
आणखी सुचले तर ते ही सांग

हाय होप्स! कुचाळक्या करणारे पुढच्या वेळी ह्या खेळांवरून कुचाळक्या करणार Happy तेव्हा ... Happy

"नाव गाव फळ फुल"

पासिंग दि पार्सल

फॅमिली ट्री तयार करणे.

संगीत खुर्ची सारखे संगीत गोल (जमिनीवर गोल काढायचे कारण एवढ्या खुर्च्या असतातच असे नाही)

पण मग सगळे गेम गाणी गाणीच होतील ना. >>>> अग यात गाणी म्हणायची नाहीत... फक्त लिहुन काढायची आहेत....

अग तो तिसरा गेम ट्रेजर हंट सारखाच आहे काहीसा... हातात लाटण घेउन मागे धरायच खांद्याजवळ येईल अस आणि समोर खूप बांगड्या पसरुन ठेवायच्या त्यातला ठराविक रंगाच्याच बांगड्या प्रत्येकाने जमा करायच्या आणि एका वेळी एक अशा मागच्या लाटण्यात अडकवायच्या.. यात फक्त दोन डाउट्स आहेत एकावे़ळी एकच बांगडी टाकायची की हातात येतील तेवढ्या आणि बांगड्या उघड्या डोळ्यांनी उचलायच्या की बंद... तेवढ कन्फर्म करुन सांगते...

रीया अगदी खर सांगु का कितीही चीड येणारा किंवा चेष्टेचा विषय झालेला असला ना तरी असल्या गेम्ससाठी हो मिनिस्टर हा कार्यक्रम उत्तम आहे... नवनवीन गेम्स बघायला मिळतात त्यात.. डम शेराजमध्ये नुसत गाणी किंवा पिक्चरची नाव ऐवजी एखादी म्हण, सुविचार अस अ‍ॅड करता येईल...

संगीत खुर्ची दुसर्‍या दिवशी ठेवलाय Proud
नाव गाव फळ फूल इतक्यांमधे कसं खेळायचं? म्हणजे क्ल्पना देऊन ठेव.
फॅमिली ट्री तयार करणे. >> हा नव्या लोकांसाठी ठेवलाय खेळ. म्हणजे जे गेल्या ३ वर्षात घरात नवे आलेत त्यांना ज्याचं नाव येईल त्यांची फॅमेली ट्री त्यांनी बनवून दाखवायची. हा ग्रूप खेळ नाही Happy

होम मिनिस्टर Happy मी नाही बघत आणि आमच्याकडे टिव्ही बंद असल्याने बघणं शक्य नाही Happy
त्यातले तुला आठवतील ते गेम सांगितलेस तरी चालतील.

डमशेराज मधे म्हणीच ठेवणार आहे Happy Wink
(माबो ववि रॉक्स )

पत्ते खेळता येईल. अर्थात पत्ते खेळण चालत असेल तर
>>>>>
ईथे हाऊजी पण चालेल, कोणालाही खेळता येते..

पत्ते खेळणं चालेल (म्हणजे खेळू नये वगैरे असे काही नियम नाही घरात) पण पत्ते खेळायला लागलं की वेळ आपल्या हातात रहात नाही. कितीही वेळ चालतो हा पत्तेगेम पण हा आमच्याकडे ने।अमी सगळे घरी जमतात तेंव्हा खेळला जातोच. त्यामुळे आमचे म्हातारे कोतारे जाऊन झोपतील सरळ Uhoh (नेहमी प्रमाणे Angry )
नवीन काही असेल तरच इंटरेस्ट घेऊन खेळतील. याच मुळे तंबोला, पत्ते, कॅरम हे नेहमीचे यशस्वी खेळ बाद होतायेत लिस्टीतून

लहान मुलं / कपल्स करिता खेळ.
साहित्यः मोठ्या आकाराचे फुगे.. बस्स..

लहान मुलं असतील तर एकाच उंचीच्या (शक्यतो) २-२ मुलांच्या जोड्या. किंवा ३-४ कपल्स.
पाठमोरे उभे राहून, दोघांनी आपल्या पाठीच्या आधाराने फुगा बॅलेन्स करत एका ठिकाणाहून दुसरी कडे नेणे. पाठमोरेच राहून एकमेकांचे हात पकडून किंवा न पकडता दोन्ही प्रकाराने हा खेळ खेळता येईल. एका मिनिटांत जास्तीत जास्त फुगे नेणे हे खेळाचे उद्दिष्ट.

हा खेळ आम्ही आज्जीच्या

हा खेळ आम्ही आज्जीच्या नव्वदीला खेळलो होतो.

२-२ जणांचे १०-१२ गूप्स केले होते. एक प्रश्णावली बनवली होती. त्यामधे आजीच्या संदर्भातले १५-२० प्रष्ण होते. अगदी तिच्या लहानपणापासूनचे. शाळेचे नाव, जन्मगाव इत्यादी.

प्रत्येक बरोबर उत्तराला एक मार्क. ज्या जोडीला जास्त मार्क ती जोडी जिंकली.

गटग काही खास कारणाने होत असेल तर उत्सवमुर्तीवर हा खेळ खेळाता येईल

रीया ,

१ ते ९ आकडे लिहिलेले कागद एकेका टीमच्या एका एका मेंबरकडे द्यायचे . अन तुम्ही आकड्यात उत्तर येणारे प्रश्न विचारायचे . उदा : भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले ? . जी टीम सर्वात आधी पुढे येऊन १९४७ तयार करेल तिला १ पॉईंट Happy धमाल मजा येते . लोक कमी असतील तर एकाच्या हातात २ कागद द्यायचे

नाव गाव फळ फूल! किंवा pictionary! Dumb charade सारखं पण चित्रातून सिनेमा ओळखायचा. It'll need a white board and pen.

नताशा, छान आहे हे पण मला एकाला पकडावं लागेल त्यासाठी Proud
मलाच माझ्या पुर्ण फॅमेलीची पुर्ण माहीती नाही Lol
पण हे मस्त आहे Happy धन्स

झगड्या, केदार : खुप पळापळी, धावाधावी नाही करता येणार कारण म्हातारे जास्त आहेत आणि कार्येक्रम रात्री घेणार आहोत + हॉल लहान आहे.
केदार, तुझी आयडिया वापरून दुसरं काही तरी खेळता येईल का याचा विचार करते.

ऋन्मेष : हाऊजी बाद होईला कारण पत्ती साठी जे दिलंय तेच आहे., जाहिरात बनवणे थोडासा क्लिष्ट होतो आणि मार्क्स कसे द्यायचे याचाही गोंधळ. तरी विचार करते Happy

४ खेळ झाले. आता आणखी एक-दोनच हवेत..

जमले की कुचाळक्या करणार्‍या आणि मतभेद असणार्‍या नातेवाईकांचे गटग करावेच कशाला हा महत्वाचा प्रश्न.

बर्‍याच दिवसांनी अनेक वेगवेगळी लोक भेटल्यावर त्यांच्याशी गप्पा गोष्टी करायच्या सोडुन खेळ कशाला खेळायचे? ही काय कॉर्पोरेट टीम इव्हेंट आहे का? हा अजुन एक प्रश्न.

हलके घ्या.

रीया, Team building activities असं गूगल केलंस तर तुला अनेक प्रकारचे गेम्स व्यवस्थित तपशीलात सापडतील. मला नेहमी मदत होते याची.

माझ्या नातेवाईकांचं काय करू हा प्रश्न नसून खेळ कोणते खेळता येतील हा प्रश्न आहे.त्याचं उत्तर माहीत नसल्यास तुम्ही या बीबी कडे दुर्लक्ष करू शकता Happy धन्यवाद!

बाकी मी तुमची पोस्ट अजिबात हलकी घेतलेली नाही. घेण्याची माझी इच्छा नाही.

अरे माझ्या पहिल्या वविचा कानगोष्टी हा गेम कसा मिसला असेल मी Happy
तो तर एक परफेक्ट उदाहरण आहे आणि त्यातुन जरा लोकांना 'शिका काही तरी' पण सांगता येईल Lol

मला ते पॅराज मिळतील क? आशू? देऊ शकशील का? मी ते पॅराज जसेच्या तसे वापरले तर चालतील का?

आम्ही मागच्या गटग ला हा गेम खेळला होता.

दोन ग्रुप केले (आम्ही तीन तीन चे केले होते). सगळ्यांना एक एक अ‍ॅक्शन लिहिलेली चिठ्ठी दिली. ती न बोलता करुन दाखवायची. ज्यांची अ‍ॅक्शन सारखी त्यांची जोडी. सुईत दोरा ओवणे, तांदळातून हुक शोधणे आणि खुर्चीवर बसुन वाटीत बॉल टाकणे आणि असे गेम्स जो पटपट पूर्ण करेल ती पेअर जिंकली. मग फायनला परत दोन/ तीन गेम्स. त्यात एका पार्टनरने दुसर्‍याला ममी बनवणे (टॉयलेट रोल गुंडाळून), तोंडाने फुकुन बॉल लाइन बाहेर घालवणे इ.

रिकाम्या काडेपेटीत ३० ते ३५ बारीक बारीक गोष्टी (हेयर पिन, सेफ्टी पिन, हेयर टाई, शेंगदाणा, यु पिन वगैरे) ठेवून प्रत्येकाला ५ मिनीटात लिस्ट करायला सांगायचे.जास्तीत जास्त वस्तु लिहीणारा जिंकेल.

मी? मी नव्हते लिहीले ते. निंबुडाने लिहीले होते बहुधा, २०१२ चा ववि ना? माझ्याकडे नाहीत.

प्रेरणा, अगं हॉल लहान + म्हातारे कोतारे Happy

अनुतै, हाही गेम छान. वस्तू सजेस्ट कर ना प्लिज.
५ मिनिट खुप होतात मी अर्धा मिनिट देईन Proud

office pin
हुक
बटन
तिळ
शेंगदाणे
मुगाची डाळ
पेपर क्लीप
टाचणी
स्टेपलर च्या पिना
मटकी
राजमा
गहु
सुइ
रंगीत कागदाचे चिठोरे
तांदुळ
थोडासा दोरा
मिरची
खराट्याची काडी
मोहरी
जिरे
शाहजिरे
लवंगा
टुथ्पीक
अ‍ॅल्युमीनीयम फॉईल चा तुकडा
औशधाची एखादी गोळी
कानातल्याचा पेच
ई.ई.ई. Wink Happy

एक कपल्स गेम आहे, आधी प्रश्न बनवून ठेवावे लागतील, म्हणजे थोडी तयारी आधी करावी लागेल.

कपल्सना बसवायचे, बायका एका साइडला आणि नवरे विरुद्ध बाजूला. कागद पेन द्यायचं सगळ्यांना आणि बायकोबद्दलचे प्रश्न विचारायचे नवर्‍यांना, त्यांना उत्तरे लिहायला लावायची व त्याच प्रश्नाची उत्तरे बायकांनाही लिहायला लावायची. उदा. बायकोच्या खास मैत्रिणीचे नाव काय? बायकोचा आवडता पर्फ्युम कोणता? शँपू कोणता? असे बरेच. असेच प्रश्न नवर्‍याच्या बाबतीतही तयार करुन बायकांना विचारावेत. प्रत्येक प्रश्नानंतर उत्तरे कपल्सवाइज गोळा करुन ज्या नवरा-बायकोची उत्तरे जुळतील त्यांना मार्क.
गेमचे नाव आहे जोडी तुझी नि माझी

छोटा खडा
झाडु चा तुकडा
पेंसील चं नुसतं शिसं
पेंसील सोलल्यावर झालेला कचरा
तुळाशीचं पान
खोबर्याचा तुकडा
पोहा
वायरीचा तुकडा
खराब झालेल्या काँपॅक्ट चे तुकडे Wink

रीया. माझा फॅमेली गेट टूगेदर मधला आवडता गेम
गेम कंडक्ट करणार्याने एक लिस्ट बनवायची वस्तूंची आणि समोर उभे राहून एक एक वस्तू मागायची जो पहिल्यांदा पुढे येऊन दे ईल त्याला एक कॅडबरी/ चॉकोलेट गिफ्ट.
काही उदाहरणे
१. सर्वात जास्त क्रेडीट कार्ड कुणाच्या वॉलेट मधे आहेत? ( लोका कडे ७/८ पर्यंत ही असतात)
२. सर्वात मोठा पांधरा केस
३. पिन्क जेन्ट्स रुमाल
४. सर्वात जास्त हजार च्या नोटा
५. सर्वात जास्त अंगठ्या
७. वॉलेट मधे बायकोचा फोटो
८. वॉलेट मधे नवर्याचा फोटो
९. सर्वात जुने मोबाईल चे मॉडेल
१०. दातांची कवळी (अश्या काहीही विअर्ड गोष्टी अ‍ॅ ड करता ये तील
११. सर्वात जास्त सेफ्टी पिन्स
१२. फाटलेले मोजे ( लोक चक्क बूट काढून मोजे घेऊन धावत येतात)
१३. सर्वात जास्त फाटलेला/मळलेला रुमाल
१४. मोबाईल मधे सर्वात जास्त मेसेजेस.
वैगरे वैगरे

सगळे एन्जॉय करतात, सिनीअर लोक पण वस्तू घेऊन चक्क धावत धावत येतात.

सामी च्या लीस्ट पु ढे चालु
१५. डोकेदुखीचे गोळी
१६. लग्नाची पत्रीका
१७. नेल्पेंट
१८. रेस्टॉरेंट चे बील
१९. बायकोच्या साडीची खरेदी रसीद
२०. २ फोन असणारी व्यक्ती
२१. जस्तीत जस्त बांगड्या घातलेली व्यक्ती
२२. मोजे न घालता बुट घातलेली व्यक्ती

हा एक बैठा खेळ. एक सोडा वॉटर, कोका कोला सारख्या पेयाची रिकामी बाटली जमिनीवर ठेवायची. सर्वांनी त्याभोवती गोलाकार बसायचे. काड्यापेटीतल्या काड्या घ्यायचा. या बाटलीच्या तोंडवर प्रत्येकाने एक काडी आडवी ठेवायची. असे करताना आधीच्या काड्या पडता कामा नयेत.

श्वास रोखून हे काम करावे लागते. ज्याने काडी ठेवल्यावर सर्व काड्या पडतील तो बाद वा त्याला शिक्षा !

रीया, वविचा डमशेराज चांगला होता खाद्यपदार्थांचा. कपल्स गेम ठेवताना विचार कर, सिंगल्सना वाईट वाटू शकतं. वन मिनिट गेम पण चालतील, पण बसल्या जागी खेळता येतील असे ठेव

२० क्वेश्चन्स --- एका माणसाने मनात एक प्रसिद्ध व्यक्ति ठरवायची. इतरांनी त्याला हो किंवा नाही असेच उत्तर देता येइल असे २० प्रश्न विचारायचे आणि ती प्रसिद्ध व्यक्ति ओळखायची. अर्थात उत्तरे देणार्‍या माणसाने खरी उत्तरे देणे अपेक्षित असते. मनात प्रसिद्ध व्यक्ति ठरवायची आणि उत्तरे द्यायची संधी सर्वांना आळीपाळीने मिळली तर खेळात मजा येते.

नुकतेच आमचे गेटटुगेदर सिंहगडपायथ्याला झाले. त्यात एक गेम होता की
टेबलवर एका शेजारी एक फुटभर अंतरावर दोन बाऊल ठेवलेले, पैकी एकात थर्माकोलचे गोल दाणे. स्पर्धकांन्ना स्ट्रॉ दिलेले. सुरुवात झाल्यावर स्ट्रॉने हवा ओढुन गोळा पकडून दुसर्‍या रिकाम्या बाऊल मधे टाकायचा. वेळ सम्पेस्तोवर ज्याचे सर्वात जास्त तो विजयी.
दुसर्या गेममधे पाच दोन एक रुपयांची नाणी बाऊलमधे दिलेली, ती मुठ करुन, अंगठा ताठ करून पालथ्या अंगठ्यावर रचत जायचे. प्रथम पाच रुपये, ते संपल्यास दोन ते ही संपल्यास एक रुपयाची... नाणी मधेच पडली, तर पुन्हा सुरुवात. दिलेल्या वेळेत ज्याची जास्त नाणी रचली जातील, तो विजयी.
पायाला फुगा बांधून दुसर्‍याच्या पायाचा बान्धलेला फुगा फोडायचा गेम होता.
त्या आधि जास्तीत जास्त फुगे फुगवायचा (गाठ मारून) गेम होता, (अनासायेच पायाला बान्धायला फुगे मिळाले)

मस्त गेम्स मिळालेत Happy
काही काही गेम टिम आऊटिंगसाठी परफेक्ट आहेत Happy

आशिका, कपल्सचा खेळ मुद्दामच ठेवला नाहीये. इतक्यातच नात्यात काही व्यक्ती गेल्या. त्यांच्या पार्टनर्संना उगाच जाणवायला नको पटकन Happy आणि आमचे ४ ग्रूप आहेत आणि ४ ग्रूप मधे खेळता येईल असा गेम हवाय.
सामी, धनुकली : तो गेम ठेवायचा विचार होता (पुन्हा एकद ववि रॉक्स Wink ) पण आम्ही २ च गरिब बिचारे संयोजक आहोत. एवढे लोकं (४०+) आमच्या अंगावर तुटुन पडतील Proud आणि आमच्याकडचे आजी आजोबा लोक्स त्या (अति) कलकलाटाने वैतागून जातील.

सुमुक्ता, तो गेम ग्रूप v/s एकटा असं खेळायला मज्जा येते. साधारण १० ते २० लोकं असले की आम्ही खेळतोच. फार मज्जा येते हा गेम खेळायला.
नंदिनी, आमच्याकडचे लोक्स चिडके आहेत Proud त्यांना डेअर दिली तर जातील झोपायला निघून सरळ Proud
दिनेशदा, लिंबूदा : ४०+ वेगळ्या वेगळ्या वयोगटांतील लोकांसाठी जरा वैताग होतात हे गेम. आम्ही कंपनीत मात्र ठेवले यातले काही आत्ताच क्रिसमस खेळांमधे. याच्या पुढे आणखी एक खेळ सुचला. एक मुलगी डोक्याचा अंबाडा करून खुर्चीवर बसणार. तिच्या पार्टनरने तिच्या डोक्यात स्ट्रॉ खोचायचे Proud जिच्या डोक्यात जास्त स्ट्रॉ ते कपल जिंकलं Proud

मिनू, खापंचा नाही पण म्हणींचा डमशेराज आहेच. म्हणी सुचवा भारी वाल्या.
'वड्याचं तेल वांग्यावर' ही म्हन की वाक्प्रचार?

एक मुलगी डोक्याचा अंबाडा करून खुर्चीवर बसणार. तिच्या पार्टनरने तिच्या डोक्यात स्ट्रॉ खोचायचे फिदीफिदी जिच्या डोक्यात जास्त स्ट्रॉ ते कपल जिंकलं >>> हा खेळ नवर्‍याच्या कुंपणीच्या अ‍ॅन्युअल प्रोग्रॅममध्ये खेळला होता.. पार आदीवासी केल होत मला त्याने...

सर्वात उपयुक्त बायकांसाठी खेळ
जान्व्ही चे पुढे काय होईल यावर बायकांचे चर्चासत्र घ्या. त्यातच २-४ तास सहज जातील.
नंतर देवयानी वगैरे बर्‍याच आहे ज्यांवर गुर्‍हाळ चालु केल्यास ३-५ दिवस सहज जातील.

माझे २ आणे -
- एक मोठा फुगा
- एक मोठ्यातमोठा टी-शर्ट
- एक लुंगी
- एक चपलेचा मोठ्यात मोठा जोड
- टोपी

मोठा फुगा फुगवून ठेवायचा. ज्याकोणावर हा प्रयोग होणार असेल त्यानी चप्पल/बूट काढून ठेवायचे. त्या माणसास एका ठिकाणी उभं करायचं. त्याच्या सरळ रेषेत ठराविक अंतरावर क्रमानी टी-शर्ट, लुंगी, चप्पल अन शेवटी टोपी ठेवायची.
आता फुगवलेला फुगा त्याच्या हातात द्यायचा अन वर उडवायला लावायचा. आता फुगा खाली न पडू देता समोर ठेवलेल्या गोष्टी एक एक करून घालायच्या. सगळ्या गोष्टी अंगावर घालेपर्यंत फुगा खाली पडता कामा नये. असाच गेम रीपीट करायचा अन जी व्यक्ती कमीत कमी वेळात पूर्ण करेल त्याला बक्षिस!

सगळ्यात शेवटी त्या कपड्यांच्या ध्यानाचे फोटोज घ्यायला विसरायचं नाही!

थ्र्माकोलचे रिकामे ग्लास घ्या. (३०/४० हवेत). ते एकात एक घालून त्याचा टॉवर करा. सगळ्यात वरच्या ग्लासला एक खूण करा. आता प्रत्येक स्पर्धकाने टॉवर हातात घेऊन एका मिनिटात एक एक करून सर्वात खालचा ग्लास काढून सर्वात वरती ठेवायचा.

आंधळी कोशिम्बिर हा खेळ तर सर्व श्रुत आहेच , पण डोळे बंद करून , पुढील खेळ खेळता येतील
१) समोरील भिंतीवर एखादा फळा अगर मोठा कागद लावावा.त्यावर बिन शेपटीच्या गाढवाचे चित्र काढावे.
फळ्यापासून १५ / २० फुटांवर सरळ अंतरावर ,एकेकाला आळीपाळीने , डोळ्यांवर पट्टी बांधून , हातात खडू
अथवा स्केच पेन घेवून उभे करावे. त्याला एक गिरकी देवून , गाढवाच्या चित्राला, योग्य ठिकाणी , शेपटी
काढावयास लावणे .शेपटी लावून झाल्यावर ,डोळ्यावरील पट्टी काढावी. भलत्या ठिकाणी लावलेली शेपटी पाहुन
सर्वांची करमणूक होइल.
२) वरील प्रमाणेच , समोर एखादा मोठा रिकामा ड्रम / डबा , खुर्चीवर अथवा फार उंच असेल तर जमीनीवर ठेवावा.
ज्याच्यावर राज्य आहे, त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधून , त्याच्या हातात एक लहानशी काठी द्यावी. डब्यापासून
१ ५ / २० फूट अंतरावर उभे करून, त्याला स्वत:भोवती एक गिरकी द्यावी आणि त्याने , डोळे बंद असलेल्या
अवस्थेत ,पुढे जावून हातातील , काठीने , डब्यावर प्रहार करावयाचा. इतरांनी , त्याला दिशा चुकीची सांगत ती
व्यक्ती डब्याकडे जाणार नाही , अशी काळजी घ्यायची