जेन्टस रुमाल घ्यायचा आहे .. (ब्रांडेड)

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 November, 2014 - 14:26

यंदा दिवाळीचा बोनस सर्व काही करून सवरून शिल्लक राहिल्याने आता जरा स्वत:च्या छोट्यामोठ्या हौसमौजेवर खर्चा करायचे ठरवले आहे. सुरुवात माझ्यासाठी मूलभूत गरजांमध्ये चौथ्या क्रमांकावर असलेल्या रुमालानेच करूया म्हटले. आजवर रस्त्यावरच सस्त्या मध्ये रुमाल घेत आलो, पण यापुढे चांगल्याचुंगल्या ब्रांडचाच वापरायचे ठरवल्याने हा धागा.

सुरुवातीला थोडाफार माझा रुमालाचा वापर सांगतो - मला सर्दीचा तूफान त्रास असल्याने मी कुठेही जाताना खिश्यात दोन रुमाल ठेवतो. अर्थात, दोन्ही वेगवेगळ्या खिशात. एक नेहमीचा हात-तोंड पुसायला, तर दुसरा गळणारे नाक साफ करायला. संध्याकाळी कामावरून घरी आल्यावर दोन्ही रुमाल एकत्रच वॉशिंग मशीनमध्ये धुवायला टाकतो. त्यामुळे पुढच्या वेळी तोंड पुसायच्या रुमालाने सर्दीचा समाचार घेणे आणि व्हायसे वर्सा होण्याची शक्यता असल्याने, दोन्ही रुमाल भेदभाव न करता एकाच क्वालिटीचे वापरतो. तसे पाहता नाक गळायचा त्रास माझा लहानपणापासूनचा आहे. तेव्हा टेलरच्या दुकानातील चिंध्या गोळा करून त्या धुवुन सुकवून स्वच्छ करून वापरायचो. पण आता एका मल्टीनॅशनल कंपनीत कामाला लागल्याने ते बरोबर दिसत नाही.

मी इथे धागा काढायच्या आधी माझ्या वतीने ईंटरनेटवर शोध घेतला होता. मला किरकोळ वस्तू खरेदी संदर्भात "जॉकी" नामक एकच ब्रांड माहीत असल्याने तिथेच शोधले. पण तिथे रुमाल वगळता इतर सर्व सटरफटर वस्तू सापडल्या. (त्यातही रुमालाला ईंग्लिशमध्ये काय म्हणतात हे माहीत नसल्याने तो शोध त्रासदायकच झाला)

असो, माझ्या इच्छा आणि अपेक्षा खालीलप्रमाणे,

१) बजेट - १७५ रुपये अर्धा डझन किंवा २७५ रुपये पुर्ण डझन.

२) रंग - प्रत्येकाचा ठसठशीतपणे वेगळा. तसेच त्यात पांढर्‍या भागाचे प्रमाण कमीत कमी जेणेकरून त्याची मळखाऊ वृत्ती वाढीस लागेल.

३) कापड - पाणी शोषून घ्यायची क्षमता जास्त असणारे आणि लवकरात लवकर सुकणारे. (मुसळधार सर्दीच्या वेळी हा गुणधर्म उपयोगी पडतो.)

४) साईज - उन्हापावसापासून संरक्षण करायची वेळ आल्यास डोक्याला गुंडाळून पाठीमागे व्यवस्थित गाठ मारता आली पाहिजे ईतपत मोठा.
तसेच त्याचवेळी मोबाईल पावसापासून वाचावायला त्यालाही दुसर्‍या रुमालामध्ये व्यवस्थित गुंडाळून ठेवता आले पाहिजे. (माझा मोबाईल - सॅमसंग गॅलक्सी ग्रॅंड आहे)

५) छापाकाटा नको - दोन्ही बाजूंनी एकसारखाच हवा. घाईगडबडीत कुठल्याही बाजूने घडी घातली तरी चालून जावे.

६) भडक रंगांना जास्त प्राधान्य - रोजच्या ट्रेनप्रवासात खिडकीतून रुमाल टाकत जागा पकडताना त्याच प्रयत्नात असलेल्या इतर सहप्रवाश्यांना उठून दिसायला हवा. नाहीतर मागाहून लफडे होतात.

तर, आपण कुठल्या ब्रांडचे रुमाल वापरतात आणि आपले अनुभव काय आहेत हे जाणून घेणेही माझ्यासाठी उपयुक्त ठरेल.

थॅन्क्स इन्ह अ‍ॅडव्हान्स,
आपलाच ऋ ... (माल)

या धाग्यावर आधारीत हा धागाही नक्की वाचाल,
http://www.maayboli.com/node/51604
Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला पण कच्छा बनियन कुठला चांगला मिळतो त्याची चवकशी करायची आहे , पण मी ते कापड दुकानातल्या पोराला विचारतो . मायबोली वर धागा काढून नव्हे ....\

मिस्टर ॠन्मेष , स्पष्टच बोलतो -तुमचे एकन्दर लिखाण आणि धागे "प्रसवण्याचे" प्रमाण आणि दर्जा पाहता त्यात फार काही आकर्षक अथवा नवीन वाटत नाही .का उगाच माबो ची बॅन्डविड्थ वाया घालवत आहात ?

त्यात पुन्हा प्रत्येक धाग्यात" माझी एक गर्लफ्रेन्ड आहे आणि मी तिच्याशीच लग्न करणार आहे " हे पालुपद असतेच

एकुणच तुमचे लिखाण अतिशय बालिश व अपरिपक्व या गटात मोडत असल्याने "पुरेसे वय" भरल्याखेरीज माबोवर लेखन करण्याच्या फन्दात पडू नका, असा फु.प्रे.स. (फुकटचा प्रेमळ सल्ला) Wink

>>णि धागे "प्रसवण्याचे" प्रमाण आणि दर्जा पाहता त्यात फार काही आकर्षक अथवा नवीन वाटत नाही .का उगाच माबो ची बॅन्डविड्थ वाया घालवत आहात ?>> सहमत. आता रूमालाबद्दल विचारताच आहात तर यापुढे नवीन धागा काढून अंडरवेअर कोणती चांगली आणि त्या अनुशंगाने पडणारे सगळे प्रश्न विचारून घ्या. त्या पुढच्या धाग्यात बनियन, मग नाईटड्रेस वगैरे सगळं इथेच विचारून घ्या.
बायदवे, तुम्ही रेडिओ सिटीवर लागणारा पोपट हा कार्यक्रम ऐकलाय का? नसल्यास त्याचं स्वरूप असं- रेडियो सिटीची लोकं कस्टमर असल्याचं नाटक करून दुकानदार, मॅन्युफॅक्चरर्सना फोन करून वर तुम्ही जे लिहिलं आहे त्याटाईपचेच प्रश्न विचारून पिळत असतात. तुमच्या ह्या (मागच्या, आगामी) बीबीत ते पोटेन्शियल नक्कीच आहे. पुन्हा रेडिओ ऐकणारा ऑडियन्स-तो ही लाखांत मिळेल. बघा प्रयत्न करून.

सायो, अगदी अगदी.
काहीही विचारायचे (आपल्याला काही तोषिस पडत नाही म्हणून)?
स्वत:ची टिमकी मिरवण्याची किती ती हौस? (उदा. multinatinal कंपनी, गर्लफ्रेंड, आई करते ते लाड यांचा वारंवार उल्लेख)

१७५ रुपये अर्धा डझन किंवा २७५ रुपये पुर्ण डझन.>> तुमचे बजेट लईच कमी आहे हो! एखाद्या बर्‍यापैकी कापडाच्या दुकानात गेलात तरी तिथे ३० रु. पासुन साधा रुमाल मिळतो.
बाकी ब्रॅन्डेड रुमाल कोणता हे एखाद्या मोठ्या दुकानात जाउन विचारले तर दाखवतील की! Happy
वॅनहुसेन, झोड्याक पण एक ब्रॅन्ड आहे पण तुमच्या बजेटमधे बसणार नाहीत.

पण आता एका मल्टीनॅशनल कंपनीत कामाला लागल्याने ते बरोबर दिसत नाही. (त्यातही रुमालाला ईंग्लिशमध्ये काय म्हणतात हे माहीत नसल्याने तो शोध त्रासदायकच झाला)

>>>>>

मल्टीनॅशनल कंपनीत काम करणार्‍याला रुमालाला इंग्लीशमध्ये काय म्हणतात माहीत नाही?
भरतीचे किमान निकष काय आहेत?

सहज गुगल ट्रान्सलेट वर रूमाल हा शब्द टाकला.... अहो आश्चर्य....इस्टोनीयन भाषा आपोआप सिलेक्ट झाली अन त्यात या शब्दाचा अर्थ काय निघावा?.... फुलीश.... मायबोली इतकी प्रसिद्ध आहे Lol

अत्यंत उपयोगी आणि महत्त्वपुर्ण धागा काढल्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो.
रुमालासारखा दुर्लक्षित पण महत्वाचा भाग रोजच्या आयुष्याचा आहे त्याकडे लक्ष दिले पाहीजे

साडीके फॉलसा कभी मॅच किया रे....ऋन्मेशच्या गर्लफ्रेन्डच्या साडीशी वा ड्रेसशी मॅच होणारा रुमाल हवा असेल त्याला.:फिदी:

सेंचुरी मिलचे बाराशे रु

सेंचुरी मिलचे बाराशे रु मिटरचे आवडेल ते 'कॉटन' आणा एका मिटरात सहा मोठे तुकडे होतील. त्याला कडेने कलात्मक ओवरलॉक केले की झोडिएकच्या नाकावर मारेल असे तुमच्या MNC जॉबला साजेसे हातरुमाल('kerchief), नाकरुमाल, फोनचं आवरण डोक्याचा रुमाल गळ्यातला (bandanna)तयार होतील.

टोपीसाठी :बायकोच्या उरलेल्या ड्रेस मटिअरिअलची फ्लैपवाली टोपी शिवली होती. रस्त्यात थांबवून अशी मैचिंग टोपी कुठे मिळते विचारायचे.

एवढ्या मोठ्या पदावर असूनही स्वभावातला आणि लेखनातला विनम्रपणा फार जाणवतो.

Lol

एंटरटेनमेंट , एंटरटेनमेंट और सिर्फ एंटरटेनमेंट. तुमची मल्टीनॅशनल कंपनी खुप पुढे जाइल हो तुमच्यामुळे..

१०० प्रतिसादांसाठी अ‍ॅडव्हान्समधे अभिनंदन....

<<मला सर्दीचा तूफान त्रास असल्याने मी कुठेही जाताना खिश्यात दोन रुमाल ठेवतो. अर्थात, दोन्ही वेगवेगळ्या खिशात. एक नेहमीचा हात-तोंड पुसायला, तर दुसरा गळणारे नाक साफ करायला. >> शी Sad

मला हा धाग्याबद्दल जे उत्तर द्यायचे होते .ते आधीच <<भडक रंगाचे रुमाल वापरु नका जर तुम्ही मल्टीनॅशनल कंपनीत असाल तर. शक्यतो पाढंरे, किंवा लाईट शेड्चे वापरा.
तसेच, मोजे कधी ही पांढरे किंवा लाइट शेड चे वापरु नका. >> +१

handkerchief / hanky म्हणून गुगलून बघा... असंख्य आकार,प्रकार, रंग, बजेट पर्याय मिळतील. जेन्ट्स क्लोद्स मिळतात तेथे बजेटनुसार प्रकार असतात. समजत नसेल तर मालकालाच विचारावे. तो पर्याय सुचवतो.

कोसळणारी सर्दी असेल तर होमिओपॅथी ट्रिटमेंट घ्याच!! बरेच प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतील. >> इथे दिले आहे.त्यामुळे मी अधिक लिहित नाही.

ऋन्मेऽऽष तुम्ही ते "माल" हा शब्द सीमंतिनी यांनी सांगीतल्याप्रमाणे उडवा.<<सेल्फ डेप्रकेटिंग ह्यूमर हा दर्जेदार मानला जातो पण .. देयर इज अ थीन लाईन नॉट मेंट टू बी क्रॉसड, जमल्यास लेखा खालची सही बदल.>> प्लिज.

तुमच्या मल्टिनॅशनल कंपनीत टिशूज नाही देत का?

एसीत बसून सर्दी होत असेल तर एसी कमी करायला हवे. किंवा तुम्ही कंपनीला सू करू शकता. तुमची हेल्थ खराब केल्याबद्दल.
गर्ल्फ्रेंड नाही का ओढणी फाडून देउ शकत? कसे काय असे शेंबडे बॉफ्रे मेंटेन करतात मुली?

गर्ल्फ्रेंड नाही का ओढणी फाडून देउ शकत? कसे काय असे शेंबडे बॉफ्रे मेंटेन करतात मुली?
<<
<<
Lol

मॉलमध्ये डझनाने चांगल्या दर्जाचे व स्वस्त रुमाल मिळतातच की.

तुम्ही लुंगी का वापरत नाही? बहूपयोगी (मल्टीपर्पज्) असते ती. रुमालाची कामे देखील सहज होऊन जातील.

... तुम्ही लुंगी का वापरत नाही? बहूपयोगी (मल्टीपर्पज्) असते ती. रुमालाची कामे देखील सहज होऊन जातील.
एकदम सही...

हम्म, नंबर ३ इज टू मच इन्फर्मेशन.
सेल्फ डेप्रकेटिंग ह्यूमर हा दर्जेदार मानला जातो पण .. देयर इज अ थीन लाईन नॉट मेंट टू बी क्रॉसड, जमल्यास लेखा खालची सही बदल.

R u serious???

जसा ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा करतात तीच सवय बहुतेक असल्याने तुम्ही दोन दोन रुमाल ठेवत असाल . स्वच्छता अभियान ची चांगली सवय आहे

कोणत्याही पुणेरी दुकानात ह्या लेखाची प्रिंट घेउन जा, योग्य रुमाल / योग्य उत्तर मिळेल. मॉल मध्ये नको तिथे बिचारे सेल्समन/सेल्सगर्ल्स थोडी तमा बाळगुन बोलतात.(काय करणार बिचारे पोटासाठी कराव लागतं त्यांना)
लेख छपरीपणाच्या (नेहमीपेक्षा) थोड्या अधिक उंचीवर गेलाय (अभिनंदन!!!!)..
रच्याकने, एक पट्टेरी चड्डी (अंर्तवस्त्र) घेण्यासाठी एक लेख माबोवर टाकावा असा विचार करतोय..

ह्यांना जर गप्पा बाफंचा रस्ता दाखवला तर तिथे असे बरेच इश्यूज वाहत्या धाग्यावर सल्ले मिळून निघून जातील. त्यांना माहीत नसल्यामुळे प्रत्येक साध्या छोट्या प्रश्नासाठी नवा लेख लिहावा लागतो असे त्यांना वाटत असेल.

लोकहो स्पष्टच लिहिते.
यांचे धागे बघुन सगळे वैतागतायेत आणि हाच या डुआयचा मुख्य मोटो आहे. याने अपोआप प्रसिद्धी झोतात रहाता येतय आणि यांची करमणूकही होतेय.
पुर्वी हे सगळं करायला हे महाशय ऑर्कुट वापरायचे पण आता ऑर्कुटने जीव दिल्याने (यांच्याच मुळे दिला असावा याची शक्यता आता जास्त वाटतेय मला) मायबोलीला यांनी झपाटलंय...
शक्य तितका अनुल्लेख करा म्हणजे शांत बसेल Angry

अॅडमिननी धाग्यांचे विषय मॉडरेट करायची वेळ आली आहे असे वाटते.>>
सिरीयसली. रुमाल आणि झाडू साठी धागा काढ्ण्यासाठी ज्यांच्याकडे वेळ नाही ते माझ्यासारखे लोक दिवसातून जेव्हा थोडा वेळ मायबोलीवर काही तरी इन्फॉर्मेटिव वाचण्यासाठी किन्वा निखळ करमणूकी साठी येतात तेव्हा पहिल्या पानावर 'रुमाल कोणता घ्यावा?' 'झाडू मिळाली नाही' असे धागे पाहून खरेच मूड ऑफ होतो.

या अश्या लेखांमुळे वाचण्यायोग्य धागे मागच्या पानावर जातात.

ऋन्मेऽऽष , तुम्ही मल्टिनॅशनल कंपनीत काम करता, म्हणजे नक्कीच तुम्ही बर्यापैकी शिकलेले असाल. रुमाल ला ईंग्लिश शब्द तुम्हाला माहीत नाही आणि मल्टिनॅशनल कंपनीतील कामा चा वेळ तुम्ही असले धागे काढण्यात् घालवता. एकंदर तुम्ही तुमच्या मल्टिनॅशनल कंपनीचे , मायबोलीचे आणि वाचकांचे ही नुकसान करत आहात.

तुमचे लाड करणार्या गल्र्फ्रेंडने(भावी बायको) किंवा आईने तुम्हाला एक डझन रुमाल ही अजून दिले नाहीत का? एखाद्या चांगल्या डॉक्टर कडे सर्दी साठी ट्रिटमेंट घ्या, खुपसे प्रॉब्लेम सॉल्व होतील.

रियाचं म्हणणं पटलं. मलाही. जमल्यास या पुढे अश्या धांग्यांवर प्रतिसाद न देण्याचीच पॉलिसी सूरू करुया. निदान त्यामुळे तरी भाराभार धागे निघणे बंद होईल.

मायबोलीवर ठराविक जणांनी ठराविक प्रकारचे लिहावे अशी अपेक्षा आहे. डेक्कन क्विनच्या प्रवाशांसारखे लिहा, बोला नाहीतर दुसरी गाडी पकडा. बोलवू का अॅडमिनला ?

सध्या मल्टीनॅशनल कंपनीच्याच ऑफिसमध्ये आहे, आपल्या शंकासुशंकांची उत्तरे रात्रीच देऊ शकेन,
फक्त एक न समजलेला प्रश्न..

कशाला बी च्या पोटावर पाय देताय?

याचा अर्थ काय ?? ते रुमाल उद्योगाशी संबंधित आहेत की काय कसे?

भडक रंगाचे रुमाल वापरु नका जर तुम्ही मल्टीनॅशनल कंपनीत असाल तर. शक्यतो पाढंरे, किंवा लाईट शेड्चे वापरा.

तसेच, मोजे कधी ही पांढरे किंवा लाइट शेड चे वापरु नका.

ऋन्मेऽऽष,

>>कशाला बी च्या पोटावर पाय देताय?

याचा अर्थ काय ?? ते रुमाल उद्योगाशी संबंधित आहेत की काय कसे?>>

स्वतःचे नवनविन धागे काढून फावल्या वेळात इतरांचे पण धागे वाचत जा! इथे तुझ्याच सारखे आणखीही मौलिक धागे आणि ते काढणारे आहेत.

ॠन्मेषा,
नेक्स्ट टाईम नाडीवर धागा काढा. माबोची नाडी बरोब्बर सापडली आहे तुम्हाला Wink
*
बाकी उडनखटोला यांच्या पक्षपाती पोस्टचा निषेध! बाकीच्याही मायबोलीकरांनी, हा धागा बी यांनी काढला असता तर तिथे जाऊन अगदी लाडालाडाने समजवून सांगितलं असतं. इथे नवा बिचारा ॠन्मेष पाहून हाडचिड चालू आहे हे अत्यंत पक्षपाती व निषेधार्ह आहे याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

आपला प्रश्न अगदी योग्य आहे.!!!

परंतू रुमालामध्ये ब्राँडेड वगैरे फारसे पर्याय ऊपलब्ध नसल्याने आपण माय्क्रोमॅनच्या
अंडरवेअर घेऊन किंवा बनियान घेऊन त्याचा नको असलेला भाग कापून टाकल्यास उरलेला भाग रुमाल म्हणून वापरता येईल. कापलेला लोगो सुई दोर्याने उरलेल्या कापडावर शिवून घ्या म्हणजे लोकांना दाखवता येईल.

टीप : सल्ल्याबद्दल आभार नाही मानले तरी चालतील. मी सर्वांना निस्वार्थपणे सल्ले देत असतो.

Lol
Thank you all. You made my day. प्रतिसाद खूप आवडले.
हल्ली मी ऋन्मेश यांच्या धाग्यावरचे प्रतिसाद वाचण्यासाठीच माबोवर येते. प्लीज नोट प्रतिसाद वाचायला.

इब्लिसदा, बी चे पर्श्न खरच निरागस असतात. मुद्दाम दुसर्‍यांना त्रास देण्यासाठी नसतात. त्यांच्याही धाग्यावर गोंधळ होतोच Happy

आणि या धाग्याचा उद्देश तुम्हीच तुमच्या पोस्टच्या पहिल्या ओळीत स्पष्ट केलाय Wink यू नो!
त्यामुळे हे असं आहे

बी शी नका हो तुलना करू यांची. बी खरच भाबडा आहे (असं मला वाटतं)

Pages