फिट-बिट फ्लेक्स ची उपयुक्तता

Submitted by शूम्पी on 29 July, 2014 - 12:54

सध्या मी खूप लोकांना फिट-बिट् ब्रेसलेट्स घलून मिरवताना बघते. मी पण फिट्-बिट फ्लेक्स घ्यायचा सिरियसली विचार करते आहे.
ते ब्रेसलेट वापरून तुमची झोप, अ‍ॅक्टिव्हिटी, जाळलेल्या कॅलरीज, चाललेली पावलं इ. इ. ट्रॅक होतं. गोल्स सेट करता येतात आणि आपली प्रगती किती आणि कशी चालू आहे ते पण समजतं. मोबाइल फोन अ‍ॅप पण अर्थातच आहे.

इथे फिट्-बिट फ्लेक्स वापरणारे किती लोक आहेत आणि त्यांची त्याबद्दलची मतं विचारायला हा धागा.
ते नुसतच फॅड आहे की त्याचा खरच फायदा होतो? नव्याचे नउ दिवस संपल्यावर पण किती लोक नीट त्याचा वापर करतात?

फिट्-बिट बद्दल आधिक माहिती: http://www.fitbit.com/flex

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेच्या. असं नुसतं पल्स घे म्हणून कसं चालेल? का ते नको का कळायला? जरा नीट सविस्तर उत्तर दे की. पल्स मध्ये कोणते जास्तीचे फिचर्स आहेत असे? मला फ्लेक्स मध्ये हार्ट रेट मॉनिटर नाही दिसत. ते आहे का पल्स मध्ये? अजून काय चांगलं काय वाइट आहे त्याच्यात? तू दोन्ही वापरलेस का?

नेटवर शोधताना दोन्हीची कंपॅरिझनच मिळाली Happy
http://fitness-trackers.findthebest.com/compare/6-9/Fitbit-Flex-vs-Withi...
पल्स ची बॅतरी लाइफ चांगली आहे , हार्ट रेट मॉनिटर पण आहे.
पण विंडोज बरोबर चालत नाही आणि बर्‍याच फीत्नेस अ‍ॅपशी पण कंपॅटिबल नाही असं दिसतय.
वापरायच्या दृष्टीने ते क्लिप प्रकारचं आहे, ब्रेसलेट जास्ती घालायला सोयीचं पडेल असं माझं मत.

इथे वाच http://www.withings.com/us/withings-pulse.html

वेब अ‍ॅप आहे तेंव्हा windows/mac वगैरे प्रश्न येत नाहि. क्लिप आहे, नि हवे असेल तर ब्रेसलेट/wrist band पण बनवता येते. तेंव्हा comfort च्या द्रुष्टीने जास्त सोयीचे आहे. मी जनरल reviews वाचलेले ते सगळे प्ल्सच्या फेव्हर मधे होते तेंव्हा हे घ्यायचे ठरवले होते.

माझ्याकडे दोन्हीही नाहित Happy

याची अ‍ॅक्युरसी कितपत आहे हे समजले तर बरे होईल. बहुतेक असे स्लीव्ह वर घालायचे, पिन ने अटॅच करण्याचे पेडोमिटर्स काहीच्या काही रीडिंग देतात. नुस्ते जरा हलले तरी १० एक स्टेप्स अ‍ॅड होतात !! Happy

मी pedometer apps, calorie counter etc etc पासून ते साधे clip on pedometer सर्व वापरून पाहिले आहे. अगदी एकावेळी २ apps, devices एकत्र वापरून calibrate वगैरे करून पाहिली आहेत. तुम्ही चालताय, पळताय, सायकलींग करताय, हायकिंग करयात, की खेळताय या प्रमाणे खूप variaton येऊ शकते.
सध्या व्यायाम करताना, किंवा वर दिलेल्या कोणत्याही गोष्टी करताना मी कोणतेही device, app वापरत नाही. कारण शेवटी exercise आपण स्वत:साठी करतो, की लोकांना सांगायला, की 'मोजमाप करायला' ह्याचं माझं उत्तर स्वत:साठी असं आहे… हा वेळ मी कोणतीही devices, electronics यापासून दूर असण्यासाठी वापरते Happy
मला वाटतं listening to your body signals serves as the best indicator/monitor. तुम्हाला श्वास कमी पडतोय, हार्ट रेट खूप वाढलाय हे शरीराला जाणवलं तर irrespective of the digital reading one should just slow down.
आणि endurance वाढवायला किंवा गोल सेट करायला, जिथे शरीराची लिमिट संपलीये असं वाटेल त्याच्या पुढे किमान १०० आकडे मोजून होईपर्यंत activity (walking, running, cycling, hiking, climbing) करत राहायची. (if you are doing weights, pushups 100 will be too big a number… त्यामुळे कोणती activity करतोय याचंही लॉजिकल भान असायला हवं !! ) … muscles have amazing memory !!!

(फारच लिहिलं का ! सॉरी Happy )

rar यांच्या प्रतिसादाला १०० टक्के अनुमोदन !

fitbit flex पेक्षा fitbit क्लीप-ऑन device उत्तम आहे व स्वस्त देखील ! $१ ला मिळणारा पेडोमिटर सुद्धा तीच बेसिक माहिती देतो.
प्रत्येकाच्या क्रयशक्ती आणि आवडीवर अवलंबून आहे.

Such devices are merely instruments of for motivation but what is more important is persistence or the power of perseverance !

Such devices are merely instruments of for motivation but what is more important is persistence or the power of perseverance !>>> क्या बात है!!

रार, तुझं म्हणणं पटतय पण...
मी पण साधा डॉ. स्टोअरवाला पेडोमीटर वापरून पाहिला आहे.
मला त्याच्या अक्युरसीबद्दल उत्सुकता आहे. मैत्रेयीच्या प्रश्नावर तुझा अनुभव काय उत्तर देतो?

वरती डॉ. सुरेश शिंदे काकांनी म्हटलेलं एकदम बरोबर की ह्या सगळ्या गॅजेट्स चा फायदा म्हणजे आपल्या प्रयत्नात सातत्य राखण्यासाठी मोटिव्हेशन मिळावं म्हणूनच. काहीवेळेस असं मोटिव्हेशन बाहेरून (स्वयंप्रेरणा नसताना) यानात्या उपायाने मिळत असेल तर गैर नाही.

मी पण व्यायामाचा वेळ हा माझा स्वतःचा गॅजेट्सपासून दूर राहण्याचाच समजते त्यामुळे हातात ब्रेसलेट्सदृष काही असल्याने त्याच्याकडेच लक्ष जाइल असं नाही..

आता काही घेतलं तर त्याचा अनुभव इथे नोंदवीन आठवणीने Happy

बादवे, मी फिट्बिट घेतलच शेवटी. ते मनगटावर असल्याने मी त्रस्त समंध असते असते दिवसभर्..एकदा का ५ लाइटस लागले की जीव भांड्यात पडतो.. नवरा म्हणे उगाच तुला ते गिफ्ट दिलं...

ते टाइप A traits अस्तील थोडे जरी तरी ते लाइट्स सगळे ब्लिंक झालेले दिसले नाहीत रोज तर जीव खालीवर होतो Happy
फिट्बिट पेक्षा मला ते सॅमसंग चं गियर बरं वाटलं होतं पण ते माझ्या नाजूक कलाईवर भयाण दिसत होतं म्हणून केवळ घेतलं नाही. त्यात हार्ट रेट मॉनिटर होता आणी बाकी पण बरच काय काय होतं.

गेला महिनाभर रेग्युलरली वापरते आहे फिट बिट. मला आवडतं आहे. ते मनगटावर सतत असल्याने हालचाल जरा जास्ती केली जाते. संध्याकाळी ७ च्या आसपास पण जर १-२ लाइट्स च ऑन असतील तर वैताग येतो आणि वेळात वेळ काढून चालापळायला बाहेर पडणं होतं हा मोठाच फायदा.
नुसतं बसल्यावर काही स्टेप्स काउंट नाही झाले, किंवा टाइप करताना वगैरे पण.
सायकल चालवायला गेलं तर ते मात्र अ‍ॅक्टिव्हिटी म्हणून रेकग्नाइज नाही झालं, हात सतत हँडलवर असल्याने असणार. पण चालणं, पळणं, वॉक अ‍ॅट होम टाइपचे कार्डिओ वर्काऔट यासाठी मस्त उपयोग होतो.

तुम्हाला अगदीच हवं झालं तर घेउन टाका . होउ दे खर्च!

बादवे, मी फिट्बिट घेतलच शेवटी >>> २०१४ साली Submitted by शूम्पी on 7 October, 2014 - 22:44

शूम्पी> गेल्या चार वर्षातील तुमचा अनुभव काय आणि कसा, तुमच्या activities मध्ये सातत्य आले का, अजूनही तोच बॅण्ड वापरत आहात कि अपग्रेड केला

मी गेल्या सुमारे २ वर्षांपासून (येत्या १ नोव्हेंबरला दोन वर्षे पूर्ण होतील) MiBand 2 वापरतो आहे. यात Steps counter, calorie burn meter, distance meter, heart rate sensor आहेत. Display असल्याने त्यावर तारीख, वार व वेळ तर दिसतेच शिवाय कोणाचा फोन किंवा साधा sms आलाच तर त्या व्यक्तीचे नाव दिसते. WhatsApp आले तर नाव नाही दिसत, केवळ WhatsApp चा लोगो दिसतो. (असे आपल्याला हव्या त्या app चे notification आपण त्यावर ठेवू शकतो.) कोणाचा फोन येत असेल तर band वरील बटनाला टच करून ring silent करता येते. फोन वाजत असतांना त्याच बटनाला touch & hold केले तर कॉल रिजेक्ट करता येतो. Battery life: 25-30 days, शिवाय Water Resistant आहे. (मी स्विमिंग पूलमध्ये जातो, १० फूट खोलीपर्यंत.)
किंमत : Rs. 2000/- (मी घेतला तेव्हा), सध्या Rs. 1799/- (with Heart rate sensor), Rs. 1299/- (W/o heart rate sensor)

गेल्या चार वर्षातील तुमचा अनुभव काय आणि कसा, तुमच्या activities मध्ये सातत्य आले का, अजूनही तोच बॅण्ड वापरत आहात कि अपग्रेड केला>>>मी फिट्बिट होता तोवर नित्यनेमाने वापरला आणी मला त्याचा फायदा पण झाला. हातात अडकवलेलं असलं की त्याच्याकडे लक्ष जातं आणी हालचाल करायची आठवण होते, टोचणी लागते आणि कंटाळ्यावर मात करणे शक्य होते.
८-९ महिन्यापूर्वी फिटबिट बंद पडलं आणि मी नविन घेतलेलं नाही आणि चालण्यतलं सातत्य हरवलं आहे. आणखीही कारणं असतील पण फिट बिट हातावर नसणं हे त्यापैकी एक नक्कीच आहे.
मी आता परत थँक्सगिव्हिंग च्या सुमारास ब्लॅक फ्रायडे सेल मध्ये नविन घेणार असं ठरवलं आहे.

आणि हो, मी अपग्रेड करणार आहे. मेन कारण मला बेल्ट जास्ती सेक्युअरली बांधता येइल असा हवा आहे. म्हणजे घड्याळ्याच्या हुक मध्ये असतं तसं काहीसं. फ्लेक्स मध्ये नुसतं २ बटणं त्या स्ट्रॅप मध्ये दाबायचे हा प्रकार फार बंडल आहे माझ्या दृष्टीने. मी कुत्र्याला घेउन फिरायला जाते किंवा एकटी गेले तरिही मी फार क्लम्झी असल्याने फिट्बिट मध्येच २-३ वेळा वाटेत्पडून गेलं आणि मला समजलच नाही असं घडलं. मग मी आपली परत त्या वाटेवरून चालत गेले आणि दर वेळी मला ते सापडलं थँकफुली. पण फ्लेक्स च्या पट्ट्याचा तो एक महत्वाचा फ्लॉ वाटला मला.

मेन कारण मला बेल्ट जास्ती सेक्युअरली बांधता येइल असा हवा आहे>>>> वर्सा ला सेम घड्याळ सारखाच बेल्ट आहे.

मी फिट्बिट होता तोवर नित्यनेमाने वापरला आणी मला त्याचा फायदा पण झाला. हातात अडकवलेलं असलं की त्याच्याकडे लक्ष जातं आणी हालचाल करायची आठवण होते, टोचणी लागते आणि कंटाळ्यावर मात करणे शक्य होते. >> वोव, नित्यनेमाने वापरला आणी मला त्याचा फायदा पण झाला हे फरच महत्वचे