सल्ला हवा आहे - forged signatures on cheques

Submitted by pshital on 29 September, 2014 - 04:05

Hi

this is my first post and need some suggestion for following case.

On Thursday, one man came to our home and gave some cable scheme for senior citizen to my dad. A big mistake, my dad signed a Rs 74 cheque for him. During that time he stolen one cheque from cheque book and made duplicate sign and take big amount from my dad's bank.

We did the police case. But I need any suggestion from experts what else can be done?
Please help

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पोलिस केस हाच उपाय आहे. बॅंका शक्यतो मोठी रक्कम कोणी बेअरर चेकने काढत असतील तर चेक घेउन येणार्‍याचे पॅन कार्ड किंवा इतर ओळखपत्र मागतात. त्याच्यावरून तुम्हाला/पोलिसांना त्याची ओळख पटवता येइल. शिवाय बँकेत कॅमेरे असतात त्याचाही वापर करता येइल. पोलिस केस केलीच आहे तर पोलिसांना हे सगळे माहिती असतेच. त्यांच्याबरोबर फॉलोअप करा. त्यांना शक्य ती सगळी माहिती पुरवा.

ती सही आणि बाबांची सही यात

ती सही आणि बाबांची सही यात सहज लक्षात येण्याजोगा फरक नसेल, आणि रक्कम ५०,००० रुपयांपेक्षा कमी असेल तर बँकेचा काहिही दोष नाही. पॅन कार्ड / ओळखपत्र वगैरे यापेक्षा मोठ्या रकमेसाठीच मागितले जाते.
रक्कम ५०,०० रुपयांपेक्षा मोठी असेल तर बँकेकडे काहीतरी कागदपत्र असेल. तेही बनावट असण्याची शक्यता आहे.
तसे घेतले नसेल तर बँकेची जबाबदारी आहे. बॅंकेकडे पण लेखी तक्रार केली आहे का ?
चेकबूक वा चेक चोरीला गेल्यास ताबडतोब बँकेला कळवायचे असते. फोन केला तरी चालतो ( मग मात्र लेखी द्यावे लागते. )
बँकेत सीसीटीव्ही कॅमेरा असेल तर पोलिसांना तपास करणे सोपे जाईल पण ती केस कोर्टात जाण्यापूर्वी पोलिस "तडजोडी"ला बोलावतील. त्यावेळी नीट विचार करून जा. कोर्टात गेलीच तर केस उभी रहायला, तिची सुनावणी व्हायला अनेक वर्षे जातील.

सध्या तरी परीसरातील सर्व रहिवाश्यांना या प्रकाराची, त्या माणसाच्या वर्णनासकट कल्पना द्या.

तुम्ही खूप महत्त्वाची माहिती दिली, धन्यवाद

दिनेश तुम्हि सांगितलं तस्च चालु आहे सध्या...
रक्कम ५०,०० रुपयांपेक्षा मोठी आहे

hopping for some positive outcome

प्रतिसाद दिल्या बद्द्ल सर्वाचे खूप धन्यवाद

थोड हिंसक सोलूशन आहे पण हाच पर्याय सध्यातरी दिसतोय... तो मनुष्य जर का पोलिसी खाक्याने घाबरणार असेल तर हे नक्की आजमवा..

एखाद्या पोलिसाला (जिथे कम्प्लैंट केली आहे तिथला) विश्वासात घ्या... त्याची वैयक्तिकरित्या मदत घ्या... त्या पोलिसाला घेउन त्या व्यक्तिच्या घरी जा.. आणि "तुमची कम्प्लैंट केली आहे या व्यक्तिने आणि अटक करण्यासाठी मी आलो आहे".. असे तिथे पोलिसांना बोलायला सांगा... विरोध केला किंवा जुमानला नाही तर जमल्यास ४ फटके टाकायला सांगा.. आजकाल हिच भाषा समजते अश्या लोकांना... या घडीला तो फक्त घाबरूनच पैसे परत करेल येवढेच लक्ष्यात घ्या...तेंव्हा असेच पर्याय वापरावे लागतील... केस-कचेरीत वेळ आणि पैसा वाया जाईल...

त्याचं घर माहीत आहे?

आजूबाजूला आणखी कोणाला असा गंडा घातलाय किंवा घालायचा प्रयत्न केलाय का ते शोधा. विशेषतः एकटे राहणारे ज्ये.ना.

पोलिसांकडेही तक्रारी आल्या असतीलच.

५०००० पेक्षा जास्त रक्कम बँकेतून काढणे खरंतर सोप्पं नाहीये.. तरी पण काढले ह्याचा अर्थ नक्की कुठेतरी घोटाळा आहे.. चेक बेअरर देऊनच बँकेतून पैसे काढल्यासारखे वाटते आहे...

इथे सांगितल्या बद्दल धन्यवाद.. सर्व जेष्ठ नागरिकांना काळजी घ्यायला सांगयला पाहिजे..

made duplicate sign and take big amount from my dad's bank.... यापूर्वी वडलांनी असे जास्त पैसे बँकेतून चेकद्वारे काढले होते का? कारण नेहमीपेक्षा मोठ्या रक्कमा काढल्या तरी बँकेकडून फोन येतो.हा सारस्वत बँकेचा,आईबाबतीत चांगला अनुभव आहे.
तुमच्या बाबतीत दिनेश व मनीष यांनी योग्य ते सुचविलेच आहे.

हा प्रकार ऐकलेला आहे आणी एका ओळखीच्यांच्या बाबतीत झालेला देखील आहे. बहूदा रिलायन्स केबल च्या नावाने हा गंडा घातला जातो.

अतिशय विश्वासार्ह पद्धतीनं हा माणूस ही तथाकथित स्किम समजावून सांगतो. मग तुमच्याकडूनच ७४ रू. चा चेक लिहून घेतो. नंतर एखादं नसलेलं डॉक्यूमेंट मागतो. ते आणायला तुम्ही नजरेआड झालात की त्या चेकबूकातला मागचा एखादा चेक काढून घेतो आणी नंतर त्या चेक वर बनावट सही करून पैसे काढतो.

ही व्यक्ती टोपी घालून बँकेत जाऊन ५०,००० पेक्षा कमी काढते. टोपी मुळी सीसीटीव्ही कॅमेर्यात अजून ही व्यक्ती सापडू शकलेली नाहीये (ह्या कारणास्तव माझ्या वडिलांना एकदा बॅम्केच्या दारातच टोपी काढून आत जायला सांगितले होते). ५०,००० पेक्षा कमी रक्कम असल्यामुळे बिनबोभाट पणे रक्कम काढता येते.

बापरे, फारच भयंकर प्रकार आहे...शितल, तुमच्या वडीलांचे पैसे परत मिळोत ही सदिच्छा!

In the mean time, we should all share this with our friends and families and ask everyone to be careful! May be sharing on our Facebook will spread the word fast!

ह्या सारख्या फसवणुकी टाळायच्या असतील तर चेक बुक मिळाल्या मिळाल्या सर्व चेक क्रॉस करुन ठेवावेत.
मी तसेच करतो.

बहूदा रिलायन्स केबल च्या नावाने हा गंडा घातला जातो.>>>
हो . माझ्याही घरी आला होता १ मुलगा . खूप गोड बोलून आणि आग्रह करून रिलायन्स केबल ची scheme घ्यायला लावत होता .. पण तो चेकच मागत होता आणि चेक बुक वरचा १ विशिष्ट नंबर मागत होता . मला संशय आल्यामुळे त्याला तीथुन हाकललं आणि २- ३ दिवसातच ह्या विषयावरच्या बातम्या पेपर मध्ये झळकायला लागल्या . त्यात हे लोक कसे फसवतात ते डिटेल मध्ये सांगितलं होतं. TV वरच्या फालतू serials बघण्यापेक्षा रोज नियमितपणे पेपर वाचन आणि बातम्या बघणं ह्या मुळे अनेक गोष्टींपासून आपण वाचू शकतो

कमी रकमेचा चेक काढुन घेताना हे लोक त्याखलाचा एक कोरा चेक काढुन घेतात(जो नंतर मोठी रक्क्म काढण्यासाठी वापरला जातो), लक्षात येइ पर्यंत उशिर झालेला असतो. वयोवृद्ध व्यक्तिंना टार्गेट केलं जातं कारण ते सोपं आहे.

कोणत्या भागात ह्या घटना घडत आहेत ? माझ्याही घरी ही व्यक्ती आली होती. मी त्यांना घरात न घेता पाठवुन दिले.

<ह्या सारख्या फसवणुकी टाळायच्या असतील तर चेक बुक मिळाल्या मिळाल्या सर्व चेक क्रॉस करुन ठेवावेत.
मी तसेच करतो.> बरेच ज्येष्ठ नागरिक cash withdrawal चेकने करतात. सगळ्यांनाच एटीएम झेपतं असं नाही.

जरी केस कोर्टात उभी राहिली, तरी तो चेक चोरला होता, राजीखुषीने दिला नव्हता या मुद्द्यावर आरोपीचे वकील भरपूर उलटतपासणी करतील. ते तसे सिद्ध करणे अवघड आहे. ती सही खोटी आहे अशी हस्ताक्षर तज्ञांची साक्ष घ्यावी लागेल.

पुण्यात बर्याच ठिकाणी घडलं असं ऐकलय. माझ्या ज्या परिचितांच्या बाबतीत ही घटना घडली (वृद्ध, एकटे) ते सिंहगड रोड परिसरात रहातात.

ओह ओके.

इंडियन ओव्हरसीजबद्दल माझं एकूणच मत चांगलं नाहीये. अनेक बँकात फोर्ज सहीचा संशय जरी आला तरी चेक रिजेक्ट करुन टाकतात. इथे तसं काहीच झालं नाही.