टीव्ही की प्रोजेक्टर- -माहिती हवी आहे

Submitted by दिपु. on 23 September, 2014 - 01:18

आजकल मोठ्या स्क्रीनच्या टीव्हीच्या किमती पाहता प्रोजेक्टर घ्यायचा विचार आहे. त्यातुन मोठ्या स्कीनचा प्रश्न सुटेल पण अजुन काही अडचणी किंवा लुप होल्स आहेत का याबाबतीत जाणुन घ्यायला आवडेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हल्ली एचडी रेडी एलईडी टीव्ही (३२ इंची) १६००० रु पासून मिळतात. ४० इंची टीव्ही हा घरच्या वापराला होम थिएटर म्हणून पुरेसा आहे. जर एचडी टीव्ही घेतला तर त्याच्या किंमती लाखाच्या आसपास आहेत. एचडी रेडी प्रोजेक्ट्र्स देखील ५०००० च्या आसपास मिळतात. एचडी विथ थ्रीडी हे लाखाच्या पुढे मिळतात. घरात स्क्रीन वगैरे लावून खरं खुरं मिनी थिएटर करायचं असेल तर बेन क्यु चे प्रोजेक्टर्स मस्त आहेत.

एलईडी टीव्हीचे फायदे
१. अंधार करावा लागत नाही.
२. खोलीतल्या प्रकाशाप्रमाणे अ‍ॅडजस्ट होतो.
३. वेगळ्या स्पीकर्सची गरज लागत नाही
तोटे
१. स्क्रीन साईझ वाढवता येत नाही.
२. एलईडी लँपच्या रेज मुळे कमी प्रकाशात डोळ्यांवर ताण येतो

प्रोजेक्टरचे फायदे
१. डोळ्यांना सुखद
२. हवी तेव्हढी (दिलेल्या लिमिट पर्यंत) स्क्रीन कमी जास्त करता येऊ शकते
३. थिएटरचा इफेक्ट मिळतो
तोटे
१. अंधार करावा लागतो.
२. वेगळ्या खोलीची गरज आहे
३. नेहमीच्या हॉलमधे अंधार करता येऊ शकत नाही. पाहुणे वगैरे आले तर उजेड करावा लागल्याने वारंवार बंद करावा लागणे इ.

२०१४ नंतरचे अपडेट्स यात आले आहेत काय ? अलिकडच्या प्रोजेक्टर्सच्या किंमती आणि टेक्नॉलॉजी याबद्दल विवेचन आहे का ?