इबोला

Submitted by kamini8 on 11 August, 2014 - 12:14

इबोला हा भयानक असा रोग आला आहे. या रोगाविषयी माहीती हवी आहे.
१) या रोगावर औषधे सापडलेली नाहीत.
२) लस सापडलेली नाही.
३) ४५% रोगी वाचु शकतात.
अजुन या रोगाविषयी माहीती हवी आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज वाचलेल्या वृत्तानुसार पुढील महिन्यापासून लस बाजारात उपलब्ध व्हावी.

कोणत्याही शारीरिक स्त्रावाच्या संसर्गाने हा रोग होऊ शकतो असे वाचल्याचे स्मरते.

जग फार जवळ आलेले असल्याने हा रोग कोठेही जाऊ शकतो ह्यावर विश्वास ठेवावाच लागत आहे.

काही वाचलेले उपाय / टीपा:

हात खूप वेळा धुवावेत

अपरिचितांशी संसर्ग टाळावा.

उष्णतेत हा रोग टिकू शकत नाही,

एक शंका:

असे नवे नवे रोग निर्माण का होतात?

असे नवे नवे रोग निर्माण का होतात?<<< सीरीयसली मलाही हाच प्रश्न पडतो

मला आजच कळले की ह्या रोगाचे दोन रुग्ण भारतात आढळले आहेत म्हणून .एक बहुधा वसईला एक बहुधा तामिळनाडूत .

उष्णतेत हा रोग टिकू शकत नाही, >> ह्या रोगाचा उगम (माणसांमधे संक्रमित होणे) मध्य आफ्रिकेमधे झालाय तेंव्हा हे विधान बरोबर वाटत नाही.

असे नवे नवे रोग निर्माण का होतात? >> रोग निर्माण होत नाही आहेत. हे व्हायरस माणसापेक्षा आधीपासून आहेत, जसा वन्य प्राणी नि माणसाचा संघर्ष वाढतोय तसे ते सध्या माणसामधे संक्रमित होताहेत. काही म्युटेट झाल्यामूळे अधिक लक्षात येत आहेत.

ओके. Happy

>>>मध्य आफ्रिकेमध्ये<<< असेच मलाही वाटले होते जेव्हा मी पेपरमध्ये वाचले की हा व्हायरस हीटमध्ये टिकत नाही म्हणून! नक्की माहीत नाही काहीच.

Mala aalela ebola virus sambadhi msg..........
सध्या पूर्ण जग चिंतातुर झाले आहे. इबोला नावाच्या विषानुणे. (Ebola Virus) त्यामुळे कृपया आपल्या सोभवतालच्या लोकांना त्याबद्दल माहिती दया.
हे खुप महत्वाचे आहे...

( EBOLA )इबोला काय आहे 

➖ हा एक प्रकारचा (Virus) विषाणु आहे. जो शरीरात रक्त संचालन प्रणाली वर आघात करतो.
इबोला शरीरात दाखल झाल्यानंतर, त्या व्यक्तीच्या शरीरात प्रत्येक भागातून रक्त बाहेर फेकते. जो पर्यन्त त्या व्यक्तीचा मृत्यु होत नाही.

➖ इबोला हा विषाणु संसर्गजन्य विषाणु असून त्याचा संसर्ग हा रक्तातून, लैंगिक संबधामुळे घामातुन, लघवी-शौचामधून, लाळेतुन, तसेच थुंकी आणि सर्दी मधून पसरू शकतो.
●तरी हा विषाणु हवेद्वारे पसरू शकत नाही.

गुगळून पाहीले तर बरीच चांगली माहिती सहज मिळू शकते. डब्लू एच ओ चं अधिकृत संकेतस्थळ आहे. विकी आहे..

इथे जुजबी माहीती मिळेल.
http://www.webmd.com/a-to-z-guides/ebola-fever-virus-infection

या आजाराचं गांभीर्य पाहता या क्षेत्रातील अधिकारी व्यक्तींच्या पोस्टच्या प्रतिक्षेत.

रिपब्लिक ऑफ ़़काँगोच्या इबोला नावाच्या नदीच्या काठावर वसलेल्या एका खेड्यात १९७६ साली पहिल्यांदा या व्हायरसने थैमान घातले. म्हणून इबोला नावाने ओळखला जातो.
मुख्यतः एका प्रकारच्या वटवाघळात आढळ्णारा हा आजार प्राण्यांकडून माणसात पसरला.
अजूनतरी हा आजार हवा/पाणी/अन्न यांमार्फत पसरतो असे आढळले नसून निकट सहवास आणि बॉडीस्रावांचा संपर्क अश्या मार्गाने पसरतो असे आढळले आहे. (एच आय वी किंवा एच बी एस सारखी).
लागण झाल्याच्या २दिवस ते ३ आठवडे इतक्या ़काळात लक्षणे दिसू लागतात.
या आ़जाराचि लक्षणे फार वेगळी नाहीत .
सर्दी ़खोकला घसादुखी जुलाब अश्या लक्षणानी चालू होणारा आजार अचानक रौद्र रूप धारण करतो.
पांढर्या पेशी आणि प्लेटलेटस (तंतूकणिका) कमी होतात आणी रक्त गोठायची प्रक्रिया थांबते.
सगळीकडून रक्तस्राव होऊन ९०टक्के वेळा जीवितहानी होते.
सुरुवातीची लक्षणे ़कुठल्याही साध्या व्हायरल फिवरसारखी तर पुढची लक्षणे व्हायरल्/बॅक्टेरियल हिमरेजिक फिवरसारखी.
सध्यातरी हा आजार भारतात आलेला नाही.
अफ्रिकेत साथ चालू असलेल्या भागातून कुणी पेशंट / संक्रमित माणूस आल्यास त्याच्या निकटसंपर्कात आलेल्या माणसाला हा आजार होऊ शकतो. डॉक्टर नर्सेस यांना धोका जास्त. तसेच असूरक्षित लैंगिक संबंध ठेवणार्याना. रोगातून बर्या ़झालेल्या पुरूषांच्या वीर्यात ७ आठवड्यांपर्यंत हा विषाणू सापडला आहे.
सध्यातरी या आजाराची टेस्ट भारतात सहज उपलब्ध नाही. यावर लस किंवा प्रतिजैविक उपलब्ध नाही.
पण यामुळे घाबरून जायची गरज नाही. कित्येक आजारांवर लस किंवा प्रतिजैविके उपलब्ध नाहित -उदा. डेंग्यू .
परंतु योग्य त्या सपोर्टिव ट्रिटमेंटने / योग्य वेळी रक्त्/प्लेटलेट दिल्याने जीवितहानी टाळता येते.
सध्यातरी 'हा आजार टाळणे' हे एक काम आपल्याला करता येऊ शकेल.
कृपया या आजारासंबंधी अर्धवट माहिती इथे तिथे वाचून पॅनिक होऊ/वाढवू नये.
मात्र सध्याचा सिझन खराब असल्याने सर्दी , खोकला, ताप यांकडे दुर्लक्षही करू नये.
इबोला नसला तरी इतर छोटे मोठे व्हायरल, हिमरेजिक (रक्तस्राव करवणारे) व्हायरल फिवर सध्या ़जोमात आहेत.

शनिवारच्या लोकसत्तामधला कुबेरांच 'अन्यथा' सदरातला लेख वाचा...

'साथी हाथ बढाना' http://epaper.loksatta.com/318287/indian-express/09-08-2014#page/9/1

नवनवे रोग कसे निर्माण होतात याची थोडी कल्पना येईल. (आणि अशा रोगांबद्दलच्या भीतीचा फुगाही थोडा फुस्स होईल.)

शाळेत असताना ९-१० वीला एक पुस्तक वाचल होत इबोला आनि मारर्बग विषाणु वर .. जाम इंटेरीस्टींग होत.आफ्रीकेच्या कितीतरी पिढ्यांचा नाश या विषानू मुळे झाल्याच त्या पुस्तकात लिहल होत.फारच भयंकर विषाणु आनि त्याकाळी त्यावर संशोधन करणारी लोक पण ग्रेटच.

साती, खूप छान सांगितलस. विशेषतः इतिहास.
या व्हायरसचा आकार वगैरे याबद्दल माहीती मिळेल का ?

नवनवे आजार आफ्रिकेत किंवा तिस-या जगातल्या देशातच उघड होणे यामागे काही कारणं आहेत का याची स्वयंसेवी संस्थांकडून तपासणी होणं आवश्यक आहे.

लले, गिरीश कुबेरांचा लेख वाचला. लिंकेबद्दल थँक्यू!
कौतुक शिरोडकरने लिहिलेली 'दे कॉल मी इ.झेड' ही कथा ह्याच प्लॉटवर आधारीत आहे.

धन्यवाद, छान माहीती दिली आहे.
नवनवे आजार आफ्रिकेत किंवा तिस-या जगातल्या देशातच उघड होणे यामागे काही कारणं आहेत का याची स्वयंसेवी संस्थांकडून तपासणी होणं आवश्यक आहे. ==+१००
मी आफ्रिकेतच आहे...== दिनेशदा काळजी घ्या.

जेव्हा हा १९८५ साली हा रोग उजेडात आला . तेव्हा तो तिथे पसरलेला आनि नंतर गायब झाला.. खरतर हा रोग तिथल्या गुहेत गेलेल्या काही लोकांमार्फत बाहेरच्या जगात आला.. "इबोला" हा विषाणु धाग्यासारखा आहे.. इतर विषाणुंपेक्षा बराच वेगळा तो स्वतःमधे बरेच बदल घडवुन आणत असतो त्यामुळे त्याच्यावर संशोधनात यश अजुन मिळाले नाही.. पहिल्या टर्म मधे हा विषाणु जितक्या वेगात प्रसार झाला तितक्याच रहस्यमयी रीतीने तो गायब झाला
वर बेफी जसे म्हणतात की उष्णतेमुळे ते काही अर्थ बरोबर आहे कारण संशोधकांचे थोडेफार मत असेच होते परंतु नंतर ते कारण काहीअंशीच बरोबर होते असे मानन्यात आले.. खरे तर इबोला स्वतःमधे बदल घडवुन आणत होता ( या त्याच्यात बदल घडवुन आणले जात होते .. ही देखील एक शंका आहेच )
आताचा इबोला आणि आधीचा इबोला यात काय फरक आला आहे.. यावर देखील संशोधन झाले पाहिजे .. त्यावरुनच कळेल की हा परत आलेला इबोला आहे की निर्माण केलेला इबोला आहे...

आभार मित्रांनो !

लागण झालेले देश आमच्यापासून लांब आहेत. नायजेरियातल्या मित्रांशी कालच बोललो. तिथेही काळजी करण्यासारखे कारण नाही. आमच्याकडे प्रसारमाध्यमांत विशेष दखल घेतलेली नाही.. बातम्या वगैरे आहेत त्या बीबीसी सारख्या चॅनेलवरच्याच.

मागच्या इबोला च्या साथीच्यावेळी देखील मी आफ्रिकेतच होतो.

आजकाल जगात सर्वच विमानतळांवर स्क्रिनींग केले जाते. ( येणार्‍या प्रत्येक प्रवाश्याचे चित्रीकरण केले जाते, एखाद्याला ताप असेल तर लगेच त्या कॅमेरात कळते. ) त्यामूळे झपाट्याने प्रसार होत नाही. मागच्या साथीच्या वेळी कोरिया, न्यू झीलंडला गेलो होतो. तिथे जसे कॅमेरे होते तसेच भारतातही होते. कुणाला जरा जरी बरे वाटत नसेल तर विमानतळावरच उपचार करायची सोय असते.

W H O ने अजूनतरी प्रवासावर व व्यापारावर निर्बंध घातलेले नाहीत.

"इबोला" हा विषाणु साबणाच्या फेसात मरतो. असे वाचले होते. खरे आहे का ?
हा भयानक विषाणु जर साबणाच्या फेसात मरत असेल तर आपण खुप प्रमाणात साबण वापरतो.
तर जमिनीतील इतरही जीवजंतु मरत असतील ना.

लोकसत्तातल्या लेखातली माहिती आधीही माहित होती. त्यामुळे अचानक इबोला आला आणि लगेच तो वॉट्सअ‍ॅपवरुन इकडे तिकडे माहिती रुपात ज्ञात व्हायला लागला तेव्हा हेच आठवले. पहायचे एवढेच की आता कोण याचे औषध शोधुन विकणार आहे आणि ते किती वर्षे विकणार आहे?? Happy गंमतच आहे सगळी.