एका लग्नाची तिसरी गोष्ट!!!

Submitted by मी मधुरा on 18 September, 2013 - 01:19

'एका लग्नाची दुसरी गोष्ट....' माझी सर्वात लाडकी आणि पहिली मराठी आवडलेली मालिका, जी मी पहिली आणि शेवटपर्यंत पाहत राहिले. ती मालिका मात्र २५ ऑगस्ट २०१२ ला संपली. Sad

आणि आता त्या मालिकेतले दोन कलाकार, उमेश कामत (अबीर-एका लग्नाची दुसरी गोष्ट) आणि स्पृहा जोशी (कुहू-एका लग्नाची दुसरी गोष्ट) हे दोघे पुन्हा पडद्यावर येत आहेत, तेही एकत्र....'एका लग्नाची तिसरी गोष्ट' घेऊन!!!! Happy

ए.ल.दु.गो. नंतर मालिकांमध्ये प्रेम कथा, Joint Family दाखवण सुरु झाल, मालिकेत नवीन म्हणजे,
खास मालिकेसाठी तयार केलेली गाणी दाखवण्याची सुरवात झाली...म्हणूनच ए.ल.ती.गो. पाहण्यास मी खूप उत्सुक आहे. Happy

सध्या मिळालेली माहिती:

कथा: श्रीरंग गोडबोले
पटकथा: चिन्मय मांडलेकर (आधीचे एपिसोड), संदेश कुलकर्णी (आत्ताचे एपिसोड्स)
दिग्दर्शक: विनोद लव्हेकर
संगीत: सलील कुलकर्णी
मालिका सुरु होण्याची तारीख: १४ ऑक्टोंबर २०१३!
ekalagnachi.jpgमहत्वाचे:

इथे भांडत बसू नये.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इशाची आई आल्यापासून काहीच्याकाही चालू आहे! फार्स बिघडलाय पूर्ण. अती होतंय सगळंच. सिरियलपेक्षा नाटक झालंय.
पण एक्स्प्रेशन्स, रिअ‍ॅक्शन्स सगळेच कलाकार मस्त देत आहेत. कथा मात्र पार विसरलेच आहेत Sad

हो. सगळंच गडबडालंय. टॉयलेट ह्युमर अति केलाय.
पण मला तुषार दळवीचं काम भारी आवडतंय.

"तुम्ही उत्तम खोटं बोलता" वर त्याचे एक्स्प्रेशन भारी होते. शिवाय काल त्याचा आणी ओमचा मी थॅंक्स म्हणणार आहे वाला सीन पण चांगला झाला.

त्याचा आणी ओमचा मी थॅंक्स म्हणणार आहे >> हो Happy ओम गोड आहे Wink Proud

मला इशाच्या आईचे एक्स्प्रेशन्स आवडतात आणि एक्स्प्रेशन क्वीन म्हणजे शोभनामावशी! Lol

फायनलि ओम्च्या खरया आईने खरया बाबाला एकदा तरी झापलं .उपरति जरी झाली तरी लगेच माफ कदाचित कोनिहि करणार नाही.लेखक थोडासा जागा आहे नशिब .बाकि कालचा तुषार दळवी आणि शिल्पा तुळसकर चा अभिनय बेस्ट्च .चांगले actors असले की गोष्टीत जीवंतपणा येतो. ओम् आणि एशाची गाडी मात्र flashback मधेच अडकली आहे.

कालचा शिल्पा तुळसकर आणि तुषार दळवी ह्यांचा अभिनय अप्रतिम.>> +१ सीन लिहिला पण खूप छान होता, आणि दोघांनी काम पण सुंदर केले.

शोभनामावशी खरंच भन्नाट आहे. मागे एकदा सुशांत आल्यावर इशा हा यांचा भाऊ म्हणून ओळख करून देते तेव्हा ती अगं भाऊ काय? आत्तेभाऊतरी म्हण" असं म्हनते तेव्हा तिचे एक्स्प्रेशन काय सही होते.

आज उ.का आणि स्पृ.जो. दोघांनीही शेवटच्या भागात उत्कृष्ट काम केलं....दोघांनाही ⭐️

khup mast kam kele doghanni....episode asa agadi angavar ala...

पण ओमची आई जरा थोडी अति वाटते काही वेळा. त्या हाताखालच्या लोकांना काय झापत असते सारखी. कसंही बोलत असते. आणि मला अजूनही ती तिथेच मुंबईत असून ओमला कधी भेटली पण नाही आणि मग तो भेटला तेंव्हा माझं खूप प्रेम आहे वगैरे म्हणाली ते काही पटत नाही. ओमचे बाबा त्यामानानी त्यावेळीपण आणि आत्ता पण जेन्युईन तरी आहेत. ही बाई कधीच नव्हती जेन्युईन असं वाटतं.
तुषार दळवी आणि उमेश कामत दोघंही जबरी आहेत.

ओमची आई मस्त उंटावरून शेळ्या हाकतेय. ओमची तिला कधीच काळाजी नव्हती आणि आता त्याच्या बाबाला सांगतेय की तू त्याच्या आयुष्यापासून दूर रहा. कोणत्या अधिकाराने?

ओम आणि त्याच्या बाबातले नाते आणि त्यात होणारे बदल मस्त दाखवलेत. एकदम पटणेबल आहेत.

@सुमेधाव्ही.... पूर्ण एपिसोड पाहिला नाही मी, फक्त शेवटची ४-५ मिनिटे पाहिला, तेव्हा ईशा-ओमचा अभिनय छान होता असे वाटले....:)

असे वाटते की ओमची आई मानसिक रुग्ण झाली नव-याने असे सोडल्यावर आणि मुलाचे आयुष्य वाया जाऊ नये म्हणून त्याला राहत्या घरी आजीवर सोडून गेली असावी

ओमची आई मस्त उंटावरून शेळ्या हाकतेय. ओमची तिला कधीच काळाजी नव्हती आणि आता त्याच्या बाबाला सांगतेय की तू त्याच्या आयुष्यापासून दूर रहा. कोणत्या अधिकाराने?>>> ती ज्या चष्म्यातून बघतेय तिथून ती बरोअब्र आहे, अजित चुकीचा, त्यामुले ती असंच बोल्णार ना?

कुणीही बरोबर नाही आणि कुणीही चूक नाही, असा प्रत्येक कॅरेक्टरला केलेलं आहे. आणि ते प्रचंड आवडलंय. कुणीही सद्गुणांचा पुतळा नसल्याने कुणीही येताजाता उपदेशाचे डोस पाजत नसल्याने पहायला फार आवडतं. अगदी ओम आणी इशा या दोन मेन कॅरे़टरमध्येपण बरेच अवगुण आहेत. ते तसंच घेतले आहेत. टिपिकल स्टीरीओटाईप मालिकापात्रांपेक्षा म्हणून ही पात्रं जास्त अस्सल वाटतात.

बाकी, दोन मध्यंतरी भावी विहीणींनी केलेली धमाल भारी होती.

<< ....ओम आणी इशा या दोन मेन कॅरे़टरमध्येपण बरेच अवगुण आहेत. >> आणि दोघानांही कांहींसा वेळ लागला तरीही अंतर्मुख होवून ते अवगुण मान्य करायची कुवत व मॅच्यूरिटी आहे, हें ही तितकंच महत्वाचं ! मलाही वाटतं कीं उमेश कामत, तुषार दळवी व स्पॄहा जोशी यांच्या सहजसुंदर अभिनयाचं बरचसं श्रेय ओम, रणजित व ईशा या वास्तववादी, 'इंटरेस्टींग' व म्हणूनच आव्हानात्मक अशा व्यक्तीरेखांनाही जातं.

मला खूप आवडते आहे ही मालिका सध्या! हळूहळू गमतीजमतीतून ताण वाढवत नेलाय आणि आता तो दिसायला लागला आहे! खूप वास्तवदर्शी, अनेक पदर असेलली आणि तरीही fantastic असा कथेचा नाजूक तोल सांभाळण्यात सगळी टीम यशस्वी झाली आहे.
ही मालिका बघून संबंध तुटलेल्या, तुटण्याच्या मार्गावर असलेल्या जोडप्यांना किमान आपल्या कटुतेचा निचरा करण्याची सुबुद्धी होवो. Proper closure न देता तुटलेली नाती नीट न शिवलेल्या जखमेसारखी असतात. ती जखम कधीच पूर्ण भरून येत नाही आणि जरा ताण आला की लगेच उघडी पडते Sad
आई आणि बाबा यांच्यापैकी एकाचीच कायमची निवड करायची हा किती दुष्टपणा आहे!ओमची आई कितीही बरोबर असली तरी आत्ता ती ओमच्या बाबतीत चुकते आहे.
अरे देवा! ही मालिका संपल्यावर मी काय बघू?

<< अरे देवा! ही मालिका संपल्यावर मी काय बघू?>> चौथी, पांचवी, सहावी...... अडसष्ठावी... .....,,,गोष्ट ! Wink

Pरोपेर cलोसुरे न देता तुटलेली नाती नीट न शिवलेल्या जखमेसारखी असतात. ती जखम कधीच पूर्ण भरून येत नाही आणि जरा ताण आला की लगेच उघडी पडते अरेरे >>>> अगदी+111111

ओमची आई कितीही बरोबर असली तरी आत्ता ती ओमच्या बाबतीत चुकते आहे. >>> ओमची आई तेव्हा चुकली होती व आत्ताही ती चुकते आहे, असं मला वाटतं. वडील, बायको मुलाला टाकून निघून गेले. बरोबर चूक काहीही असो, पण त्याला काही कारण होते. ओमची आई मुलाला टाकून का गेली? त्याचे कारण अजून तरी तिने सांगितलेले नाही.
मागच्या एपिसोडमधे अगदी शेवटी ती डॉ.ला सिडेटीव्ह घेऊ का म्हणून विचारते. मग डिप्रेशन हे कारण असू शकतं का? पण ते लेखकानी जस्टिफाय केलं नाही तर ती एक आततायी आई व बायको वाटू शकते. असो.
बाकी सिरीयल मस्त चालली आहे. ओम आणि तु.द. मस्त अ‍ॅक्टींग करताहेत.

वडील, बायको मुलाला टाकून निघून गेले. बरोबर चूक काहीही असो, पण त्याला काही कारण होते. ओमची आई मुलाला टाकून का गेली? त्याचे कारण अजून तरी तिने सांगितलेले नाही. >>> +१००.

तु.द. फारसा आवडत नसूनही त्याचे पात्र खूप वास्तव असल्याने त्याची भूमिका आवडतेय. पण शिल्पा तुळसकर सारखी अभिनेत्री मात्र काहीच प्रभाव पाडू शकत नाहीये .

काल त्या दोघांचं भांडण सुरू होतं तेव्हा ओमवर त्याचा पुन्हा परिणाम होतो- तो चाचरायला लागतो- भारी दाखवलं ते. इतकं सिक्वेंसिंग आणि कन्टीन्युइटी मराठी मालिकेत ऑलमोस्ट दिसत नाही!
उमेश-शिल्पा-तुषार- अभिनय बघताना मजा येते. कालचा भाग मस्त झाला.

ओम गोड आहे Happy

पूनम. +१

त्या दोघांचं भांडणदेखील अगदी सही लिहिलेलं होतं खास करून जिथं अजित उभा राहून तिच्यावर ओरडतो "बाई" म्हणून आणि ती त्याला म्हणते "गौरी नाव आहे" (अधी दोनच मिनिटं माझं नावदेखील घेऊ नकोस" म्हणून ती ओरडलेली अस्ते) तो भाग एकदम व्यवस्थित झाला. या पूर्ण एक्चेंजच्या दरम्यान ओम आणि इशाचे भाव लाजवाब.

काल त्या दोघांचं भांडण सुरू होतं तेव्हा ओमवर त्याचा पुन्हा परिणाम होतो- तो चाचरायला लागतो- भारी दाखवलं ते. इतकं सिक्वेंसिंग आणि कन्टीन्युइटी मराठी मालिकेत ऑलमोस्ट दिसत नाही! >> agadee agadee

कालच्या एपिसोडमधे ईशाच्या मैत्रीणीच्या तोंडचं एकच वाक्य वास्तविक कथानकाच्या उभारलेल्या या सर्व छान डोलार्‍याला सुरुंग लावूं शकतं- " ईशा, तूं जे हें सर्व खोटं बोलते आहेस, त्याचं टेन्शन आहे हें; सांगून टाक ना सगळ्याना खरं काय तें !". केवळ वेळ मारून नेण्यापुरतं केलेलं तात्पुरतं नाटक इतकं ताणत नेणं यामुळें ह्या दर्जेदार कलाकृतिला [ लेखन, अभिनय, दिग्दर्शन या सर्वच बाबतीत ]दुर्दैवाने फार्सिकलचं स्वरुप आलंय, असं मला वाटतं व याचं खूप वाईटही वाटतं.

<< पण ते लेखकानी जस्टिफाय केलं नाही तर ती एक आततायी आई व बायको वाटू शकते. असो.>>

आततायी किंवा विचित्र आई ती नक्कीच आहे. मुलाला असं टाकून जाणं योग्य नव्हतं.

पण आततायी बायको नाही म्हणता येणार. कारण एका एपिसोडमध्ये ओमचा काका सांगतो की माझ्या भावाने दुसरं लग्न करायचं ठरवलं त्यात वहिनीचा काहीच दोष नव्हता. नवरा मनात येईल तेव्हा बायको मुलाला सोडून देणार, विवाहबाह्य संबंध ठेवणार, मग पुन्हा मनाला वाटेल तेव्हा परत येणार. आणि जर बायको त्याचा स्वीकार करत नसेल तर ती आततायी?

मुळात या मालिकेत ओमच्या आईवडिलांचं पुन्हा लग्न व्हावं हा अट्टाहास का आहे?

ओमचे पालक cordially वागू लागले, ओमसाठी चांगले co-parents झाले तर ते पुरेसं नसेल का? ओमच्या आईला दुसरं लग्न करायला तिला नीट वागवणारा कोणी जोडीदार मिळू शकत नाही का? एकदा नकोशी झाली म्हणून टाकून देणारा पुरुषच तिने पुन्हा का स्वीकारावा?

Pages