जिभेचे चोचले ...

Submitted by टीना on 15 January, 2011 - 08:33

खर तर याला काय म्हणावं यात माझ्याच मनाच द्वंद्व होतंय आणि सरतेशेवटी मी या नावावर शिक्कामोर्तब केल ... तुम्हाला अगर आणखी काही शीर्षक योग्य वाटेल तर स्वागतच ...

झाल अस कि दुपारच्या अतिशय कंटाळवाण्या वेळी हा popcorn वाला घरासमोरून चालला होता ...
झाल सगळ्यांना (अर्थातच आम्हा बच्चे कंपनीला) मोह आवरला नाही ...
घेतल्यावर अस वाटल कि निव्वळ popcorn खाण्यातही काय मजा आहे , सो operation popcorn तुम्हासमोर सादर ...
यातले content नका हो विचारू please ...
खाण्याजोग हाताला जे येईल ते टाकत गेले ...
तरीही सांगायचं झाल तर
tomato flavour च्या potato chips , बारीक चिरलेला कांदा , बारीक चीरलेल गाजर , एक मिरची , चाट masala , थोडी जिरपूड , कोथिंबीर , तिखट , मीठ etc ...

खायला तर एक नंबर आणि बघूनही eye vitamin मिळत बर का ...!!

DSC04997-Optimized.jpgDSC05001-Optimized.jpg

गुलमोहर: 

बरेच दिवस टाकायचं म्हणत होते आणि आज net ची speed चांगली होती म्हणून घाईघाईत टाकल पण बघा नाव लिहायलाच विसरले ....
मला या पाककृती ला "popcorn चाट" म्हणायचं होत ....:इश्श:

मस्तच एकदम... आवडली ही चाट.

मस्त! .. पण फ्लोवर?!

काल एका फार्मवर गेले होते. तिथे असेच मस्त फ्लॉवर्स तयार होत होते. फवारणी वगैरे अजिबात न केलेले ते फ्लॉवर्स असेच तुरे तोडुन कच्चे खाल्ले. खुप छान लागले. मी एरवी फ्लॉवरची भाजीही खात नाही, पण हे ताजे फ्लॉवर एकदम कुरकुरीत आणि चविष्ट लागले.