काय करु?

Submitted by सोना२ on 3 June, 2014 - 15:23

मला माहित नाही हा विषय कोणीतरी बोलल आहे का आधी. पण सध्या मी खुप त्रस्त आहे.
मी सध्या ऑफिस मधे आहे. बे एरिया मधे. माझ्या ऑफिस मधे एक कलिग होता. जो पर्यंत कलीग होता तो पर्यंत सगळ ठीक होत. पण आता जेंव्हा तो सोडून गेला माझी कंपनी तेंव्हा त्याने मला मेसेज पाठवला. मी पण बोलले त्याच्याशी. मग आमची टीम सगळी त्याला लंच ला भेटली. पण आता त्या नंतर तो मला सारखे मेसेजेस पाठवतो. मागचे दोन आठवडे मी त्याला मेसेज रीटर्न केला नाही. मग त्याने मला फोन केला. आणि म्हणला की मिस केल तुला वगैरे. मी मग त्याला झापल आणि सागीतल मला ईंटरेस्ट नाही .. तर त्याने एकदम माझ्याच मनात वाईट विचार आहेत असा पवित्रा गेतला. म्हणाला की मी फक्त मित्र म्हणून वागत होतो. तुझ्या मनात अस कस आल. मग मला कळेना की नक्की काय कराव. मग मीच सॉरी म्हणल त्याला. माझ चुकल का? मी नक्की काय करायला हव?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्पष्ट सांगा की मला मेसेज, फोन करू नकोस म्हणून. एवढं सांगूनही न ऐकल्यास फोन उचलू नका, मेसेजला उत्तर देऊ नका.

....<<मग त्याने मला फोन केला. आणि म्हणला की मिस केल तुला वगैरे. >>
ह्या 'वगैरे' मधेच गोची आहे.
म्हणजे ... 'ए, कशी आहेस?... जाम मिस करतोय तुला.... तुझ्याशी बोलल्याशिवाय चैन पडेना... तुला माझी आठवण येतेय का?...'
आणि
'... काय चाल्लय? अरे काही आठवण-बिठवण काढायची पद्धत आहे का नाही तुमच्यात? का आम्हीच मिस करायचं? ऑ?'
ह्यात बेसिक फरक आहे... आणि तुमच्या "वगैरे" मधे हे सगळं येतं.
असो...

तुम्हाला संबंध ठेवायचे नसल्यास, अत्यंत शांत स्वरात, '.. असेल माझाच गैरसमज झाला असेल... खरच सॉरी. पण आता गढुळलय सगळं . तेव्हा... मला नाही जमणार अगदी मैत्रिण म्हणूनही वागायला... मला फोन करत जाऊ नका. मी उचलणार नाही... माझ्याकडून शुभेच्छा तुम्हाला'

ह्यातलं 'शांत स्वरात' फार महत्वाचं. Happy

मी मेसेज रीटर्न करत नाही आहे. त्याने मला २ दिवसात जवळ जवळ ४० मेसेजेस केले. म्हणून मी नंबर देखिल ब्लॉक केला.
फोन मात्र त्याने केला तो दुसर्‍या नंबरवरुन. त्यामुळे पटकन कळले नाही मला की त्याचाच फोन आहे. आणि वाटल की एकदा सांगाव की मला हे नको आहे. आणि म्हणून बोलले मी की मला हे नको आहे. पण माझाच गैर समज झाला आहे आणि माझ्याच मनात असले विचार आहेत, अस त्याने भासवल. पण आशा आहे की आता हे बंद होईल.

हो दाद त्या मी तुला खुप मिस केल आणि २ दिवसात कोण मित्र ४० मेसेजेस करतो? आणि मी फारशी बोलायचे देखिल नाही. पण जेंव्हा त्याने मला अस भासवल की मीच चुक आहे. त्यावेळी मात्र मी गडबडले. मी सॉरी म्हंटल आणि माझा गैर समज झाला असेल पण मला हे जमणार नाही अस सांगीतल.

अनोलखि नम्बरचे फोन घेउ नका. मेसेज आले कि न बघता डिलित मारा. तिकडे त्याल एखान्दी गोरि मेम भेटुन जाइल मग तो विसरुन जाइल. तोअपर्येन्त हवा देउ नका.

२ दिवसात जवळ जवळ ४० मेसेजेस केले>>ही धोक्याची घंटा होती जी तुम्ही बरोबर ओळखलीत(no need to feel sorry about it), तो जरी आता सांगत असेल की त्याच्या मनात असं काही नव्हतं तर मला नाही वाटत ते खरं असेल म्हणुन.
म्हणाला की मी फक्त मित्र म्हणून वागत होतो. तुझ्या मनात अस कस आल. मग मला कळेना की नक्की काय कराव. मग मीच सॉरी म्हणल त्याला. माझ चुकल का? मी नक्की काय करायला हव?>>
पवित्रा बदललेला दिसतोय, हळुहळु तुमच्या विचारात/निर्णयात बदल करण्याची संधी शोधायचा प्रयत्न असु शकतो. दाद यांनी सांगितल्या प्रमाणे, जर पुढे जायचं नसेल तर शांत आणि स्पष्ट शब्दात सांगणेच योग्य वाटते आहे.
शुभेच्छा!

तुम्हाला जर harassment च्या लेवलला त्रास होत असेल तर...
तुम्ही अमेरिकेत आहात..त्याला एकदा समज द्या कि:
"मला पोलिसात जायचे नाही आहे..पण हे जर थांबले नाही तर मला नाईलाजाने जावे लागेल. नंतर काही झाले त्याला मी जबाबदार राहणार नाही."
त्यानंतर तुम्हाला या जन्मी त्याचा परत फोन येणार नाही.
कृपया हे लाईटली घेउ नका आणि याचा वेळीच इलाज करा. काही वेळा "लाथो के भूत बातो से नही मानते".

तसाहि तो तुम्हाला आवडत नाहिये ना
त्याला सांगा कि तुम्हाला मुलांमधे रस नाहिये
बोलुन तर पहा कदाचित इफेक्ट(मराठित शब्द सुचत नाहि) होइल

तुम्ही बे एरिया मधे आहात तर अ‍ॅथोरिटींकडे तक्रार करुन ठेवा.
तसेच तुमच्या संस्थेत सुद्धा काही लोकांना सांगुन ठेवा ह्या बद्दल.

अशी माणसे mentally unstable असतात, काय करतील सांगता येणार नाही. तुमची केस बिल्ड करुन ठेवा.

सोना एक सांगु का? रागवु नकोस.. तु बे एरिया मधे काम करतेस...सुज्ञ आहेस... मग या फालतु कारणावरुन तु सल्ले का मागते आहेस?? कॉलेज किंवा बाहेरही या गोष्टी सर्रास घडतात ना?? काय करतो अशा वेळेला आपण???
बाकी सर्वांनी उपाय दिलेच आहेत..पण हे साधे साधे उपाय तुला सुचु शकत नाही का गं?? मी वाईट हेतुने बोलत किंवा उगाच उचकवत नाहीय तुला पण मला सहज ही गोष्ट विचारावीशी वाटली... इथुन तिथुन मदत घेण्यापेक्षा जरा स्ट्राँग बन.... त्याचा नक्कीच फायदा होईल तुला....एक फालतु मुलगा त्रास देतो काय आणि तु इथे मदत मागतेस काय...मला स्वता:ला हे पटत नाहीय म्हणुन लिहीलं...जर काही चुकीच लिहीलं गेलं असेल माझ्याकडुन तर सॉरी...

@ अनिश्का - एकदम पटले.

उद्या सोना मॅडम "जेवायला काय करु" असे सुद्धा विचारतील. कसा दिला त्यांना अमेरिकेचा विसा कोणास ठाउक Sad

अनिश्का कदाचित जरी तिने " मी नक्की काय करायला हव " अस जरी विचारलं असेल तरी झालेल्या प्रकाराने ती डिस्टर्ब झाली असेल . ती तिथे एकटी असेल.तिला कोणाला तरी सांगावेसे वाटत असेल .सगळेच काही मनानी
स्ट्रोन्ग नसतात. भांबावून जातात.
आई वडिलांना सांगावे तरी त्यांना त्रास होईल म्हणून त्यांना सांगता येत नसेल तिला. इथे बोलून जरा हलके वाटत असेल Happy

हो सुजा...अस असु शकेल...फक्त ती समस्या मांडते आहे म्हणुन बाबापुता करणं मला बरोबर वाटत नाही...पुढील आयुष्यात असे कित्येक प्रॉब्लेम येतील मग काय सोना प्रत्येक वेळेस माबो वर येउन मन हलकं करत राहणारे का??
माझं बोलणं ( कटु ) सर्वांना पटेलच असं नाही..पण जरा विचार करुन पहा हे खरच बरोबर आहे का??

चलो, जे झालं ते झालं ... इग्नोरास्त्र मारा यानंतर...!

पुन्हा फोन आला तर - बिंदास शिव्या घाला (जशा जमतील तश्या :डः)

ही मुलगी आहे ती जिथे आहे तिथे बहुतेक एकटी आहे आणि हे जे काही होत आहे त्यामुळे भेदरलेली आहे अस मला वाटतेय. तिची मानसिक स्थिती थोडी सैरभैर झाली असणे साहजिक आहे. आणि त्यासाठी तिने इथे सल्ला विचारला तर त्यात गैर ते काय आहे?
काही सल्ला देता येत नसेल तर देउ नये पण उगाच इथे का विचारतेस किंवा अमेरिकेचा विसा कोणी दिला असे कुजकट शेरे मारुन तिला डिस्करेज कशाला करताय? सगळे तुमच्यासारखे रफ आणि टफ असु शकत नाहीत. प्रत्येक जण आपल्या प्रॉब्लेम्सना वेगळ्या तर्‍हेने सामोरे जातात तिला तिच्या तर्‍हेने जाउ द्या ना.

मनस्मी कदाचीत माझा प्रतीसाद चुकीच्या पद्धतीने घेतला जातोय किंवा मी चुकीचं लिहीलय.....
मला फक्त इतकच सुचवायचं की सोना ने जरा स्ट्राँग बनायलाच हवं.... बाकी हवं तर मी रिप्लाय उडवते आधीचा

@ अनिश्का - काही प्रतिसाद वगैरे उडवु नका तुमचा.

लोकांनी जे काही उपाय सुचवले ते सर्वांना सुचण्या सारखे होते. त्यात मदत मागण्या सारखे काय आहे? सोना नी त्यांना आलेला अनुभव म्हणुन लिहिला असता तर गोष्ट वेगळी, पण त्यांना सल्ला हवा होता.

बर सोना भारतात नाही की जिथे कायद्याचे राज्य नाही, अमेरिकेत पोलिस काम करतात.

सोना ,

इग्नोर करा, शक्य असल्यास नंबर चेंज करा. जास्तं मनावर घेउ नका तुम्ही डीस्टर्ब झालात , घाबरलात तर तो अजुन त्रास देईल, अशी माणसे कमकुवत माणसालाच त्रास देउ शकतात. तुम्ही काही चुक करत आहात असं तो भासवत असेल तर तो खुप मोठी चुक करतोय असं तुम्ही त्याला भासवुन द्या तेही खडया शब्दात.

मनस्मि +१

सोना तुम्ही तिथे एकट्या असाल तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला आपण स्ट्राँग असल्याचा बुरखा पांघरावा लागेल, (नसाल तर) कदाचित तुम्ही जास्त न बोलता सुद्धा या मुलाने ओळखले असावे की मऊ लागणार म्हणून खोदून पहात असेल. तुम्ही जितकं इग्नोर कराल तितकं ते घाबरून करताय असा समज होऊ शकतो. एकदाच काय तो मनाचा धडा करून ठणकवा त्याला चांगला. आणि तसा ठणकवला की समोरचा गारद होतो हे लक्षात आलं की हाच काय अजून ५६ आले तरी तुम्ही घाबरणार नाही. आणि तुमचा असा आवेश चेहर्‍यावर एक प्रकारचा आत्मविश्वास घेऊन येईल आणि पुन्हा कुणिही तुमच्या वाट्याला जाण्याचा प्रयत्न सुद्धा करणार नाही.

तुमच्य तुमच्या HR सोबत बोलून बघा की.स्टेपवाईज जायला हवं तुम्ही...
जर फारच त्रास असेल तर पोलिस हा ऑप्शन आहे...
Be Strong...तुम्ही मराठी मुलगी असा ना..मग घाबरतस काय?एक कोल्हापुरी चप्पल पार्सल पाठवू काय..? अमेरीकन पब्लिकला रोड शो बघता येईल.. Happy

सोडा,बाकी शांतपणे पाऊल उचला... आत्ताच चिडला,रागावलात तर चेव येईल त्याला... कदाचीत तुम्ही एकट्या आहात,नविन आहात तिथे याचा फायदा उचलत असावा तो...

नविन आहात तिथे या >>> त्या अमेरिकेत नविन आहेत असे कोणी सांगितले तुम्हाला. त्या माबो वर नविन आहेत, आणि इथला ( माबो चा) अनुभव घेतल्या वर तो ४० मेसेज टाकणारा त्याना बरा वाटला असेल.

ही मुलगी आहे ती जिथे आहे तिथे बहुतेक एकटी आहे आणि हे जे काही होत आहे त्यामुळे भेदरलेली आहे अस मला वाटतेय. तिची मानसिक स्थिती थोडी सैरभैर झाली असणे साहजिक आहे. आणि त्यासाठी तिने इथे सल्ला विचारला तर त्यात गैर ते काय आहे?
काही सल्ला देता येत नसेल तर देउ नये पण उगाच इथे का विचारतेस किंवा अमेरिकेचा विसा कोणी दिला असे कुजकट शेरे मारुन तिला डिस्करेज कशाला करताय? सगळे तुमच्यासारखे रफ आणि टफ असु शकत नाहीत. प्रत्येक जण आपल्या प्रॉब्लेम्सना वेगळ्या तर्‍हेने सामोरे जातात तिला तिच्या तर्‍हेने जाउ द्या ना.

+११११११

मनस्मीने वरती दिलेला सल्ला योग्य आहे. त्याही आधी "तू मला फोन करू नकोस. मला वाटले तर मीच करेन" म्हणून सांगा आणि पुन्हा कधीही त्याचा फोन उचलू नका. त्यानंतरही हे थांबले नाही तर कंपनीच्या एच आर कडे तक्रार करेन म्हणून सांगा. त्याने तुमची कंपनी सोडली असली तरी त्याने काही बदलत नाही. हॅरॅसमेण्ट चे नियम सगळीकडे लागू असतात.

तो ऑफिस मधे असताना असे काही सिग्नल्स दिले होते का त्याने?

Thank you . तुमच्या सगळ्यांशी बोलून खूप बर वाटल.
मीच स्ट्रोंग व्हायला हवे हे खरे आहे. मी प्रयत्न करत आहे. मी अमेरिकेत नविन आहे आणि बे एरिआमधे नुकतीच आले आहे. गेल्या २ आठवड्यापासून थोडी अस्वस्थ होते. मी हे सगळ केल - मेसेजेस ना रीप्लाय न करण, फोन इग्नोर करण, अननोन नंबर घेतला आणि जेंव्हा समजल की तो आहे तेंव्हा वाटल एकदा बोलून हे प्रकरण संपेल. ईथे विचारायचा हेतु इतकाच होता की कोणाला असे अनुभव इथे आले आहेत का आणि अजून मी काय करु शकते.
ऑफिस मधे असताना त्याने बरीच मदत केली मला. पण कधी वावग वाटल नाही. त्यामुळे मला अस काही होईल अस वाटलच नव्हत. मी एका फॅमिली बरोबर रुम शेअर करते आहे. सध्या ती फेमिली भारतात गेली आहे. त्यामुळे थोडी अजून अस्वस्थ होते.
मला HR कडे जाता येइल माहित नव्हत. मी परत त्याचे फोन आले तर मी HR शी बोलून बघते.

सोना२
दुसर्‍या कुणाच्या अनुभवांचा ऊपयोग तुम्हाला कसा होईल. व्यक्ती तितक्या प्रकृती. एका घटनेमध्ये दोन व्यक्ती जर आततायीपणे वागल्या असतील तर तश्याच प्रकारच्या घटने दुसर्‍या दोन व्यक्ती समजूतदारपणे वागणारच नाहीत असं थोडीच आहे.

ऑफिस मधे असताना त्याने बरीच मदत केली मला. पण कधी वावग वाटल नाही. >> वावगं म्हणजे नेमकं काय? त्याने बरीच मदत केली थोडंफार मैत्रीचं नातं तयार झालं असेल (किवा त्याने ते गृहीत धरलं असेल) आणि तो आता कंपनीत नाही म्हणून मैत्रीचं नातं संपलं हे तुम्ही ठरवलं असेल तर ते त्याला तसं कळवायला हवं ना? तुमच्यामध्ये काय संभाषण झालं ते तुम्हीच जाणता पण (तो भारतीय आहे असे गृहीत धरून) तो समजा भारतातल्या मेट्रोमधून आलेला असेल, दिल्ली, मुंबई मधल्या कॉस्मोलॉलिटन वगैरे सारख्या फ्री कल्चर्ड को-एड मध्ये शिकला असेल, कौटुंबिक वातावरणात असे विषय टॅबू नसतील तर त्याने मैत्री साठी अ‍ॅडवान्स केला तर तो लगेच वाईट माणूस होत नाही की त्याचे हेतू गलिच्छ होत नाही.

जगात सगळ्या प्रकारचे लोक भेटतात आपल्या कंझर्वेटिव पार्श्वभुमीमुळे आपण खुपदा बर्‍याच लोकांबद्दल जजमेंटल असतो(च). नाहक भिती बाळगून काही चांगल्या मोकळ्या मनाच्या 'फ्री सोल' लोकांपासून दूर पळतो. असे अनुभव पुढील आयुष्यात खर्‍या/ढोंगी, मोकळ्या/आतल्या गाठीच्या लोकांना ओळखण्यासाठी कामी येतात, आत्मविश्वास वाढवतात, अनुभवविश्व समृद्ध करतात.
अर्थात सुरक्षितता आणि कंफर्ट महत्वाचं आहेच, त्यापुढे काही मोठं नाही. तुम्ही कुठल्याही भितीखाली किंवा अस्वस्थ मनस्थितीत राहण्याची गरज नाहीये.

मला वाटतं तुमची, 'तो एवढाही वाईट वागला नाहीये की त्यावर कुणाला सांगून अ‍ॅक्शन घ्यावी आणि त्याने त्याचा अ‍ॅग्रेसिव पावित्राही तुम्हाला अस्वस्थ करतोय' अशी द्विधा मनस्थिती झाली आहे.
फोनवरून स्पष्ट बोलणं आणि विचारणं, सांगणं आणि ऐकणं हाच ऊपाय आहे. तोडून टाकल्याने 'ईगो' हर्ट होतो. तो समजूतदार असेल तर ठीक पण जर तो खरोखरंच ईगोईस्टिक असेल, नकार पचवणे त्याला अवघड जात असेल तर तो कदाचित थांबणार नाही.

वावग कळत की हो आपल्याला? ४० मेसेजेस २ दिवसात वावगच नाही तर काय? फोन उचलत नाही आहे तर दुसर्‍या नंबरवरुन कॉल करणे वावगच नाही का? समजत हो तितक.. हो माझी ही हीच अपे़क्षा आहे की मी स्पष्ट बोलले आहे आता,, पण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे उगीच नाहक कोणाबद्दल तक्रार कशाला करायची. मला देखिल हे इथेच आणि थोडक्यात थांबाव असच वाटतय.

दिवसातून २० मेसेज करायला वेळ होतो ...त्याच्या कंपनीत नोकरी लागली पाहिजे मला!!! Happy

कलीग/एकस-कलीग हा प्रकार फार प्रेमपूर्वक हाताळावा लागतो. चुकून उद्या परत बॉस किंवा कलीग म्हणून भेटला तर जास्त पेनफुल. नाहीतरी तो मैत्रीच म्हणतोय आणि तुझीही त्याला ना नाही मग फोन आला आणि चुकून घेतलास तर त्याला फैलावर घेऊ नकोस. "मिस केल" म्हणाला तर "आय नो, ट्रान्झीशन इज डीफिकल्ट" म्हणून सोडून दे. टेक्स्ट/इमेल फेबु इतर कुठलेही डिजिटल माध्यम वापरल तर उत्तर देवू नकोस. प्रोफेशनल रहा, इमोशनल नको. दीपिका बघ कशी रणबीर बरोबर हिट देते. तुझ तर कलीग बरोबर अफेयर पण नव्हत. मग प्रोफेशनल गप्पा टाकायला काय जात??

४० मेसेजेस २ दिवसात वावगच नाही तर काय? फोन उचलत नाही आहे तर दुसर्‍या नंबरवरुन कॉल करणे वावगच नाही का? >> हो हे अगदी ऑब्व्हियस आहे.

मनस्वी >>+ १००
मला पण असेच वाटले.

सोना, तु बिनधास्त जा एच आर कडे. वाट नको बघुस. आधी केलेले मेसेजेस आहेत ना तुझ्या फोन वर? ते घेवुन जा. एच आर हेड ला सांग हे असे सगळे झालेले आहे. आत्ता लगेच कंप्लेंट करुन अ‍ॅक्शन नाही घेतली तरी ते लोक लुप मधे राहतिल आणि वेळ आली तर तुला खंबीरपणे मदत करतील.

माझ्या माहिती प्रमाणे... जर तुझ्या डायरेक्ट मॅनेजर ला सांगीतलेस तर हे सगळे एच आर ला सांगणे हि त्याची जबाबदारी होते. आणि त्याने तसे नाही केले तर तो गोत्यात येवु शकतो. ( निदान माझ्या बघण्यात तरी अशी दोन उदाहरणे आहेत).

पहिले उदा. माझ्या ऑफिस मधे असे मिश्र अर्थाचे काही संभाषण एक माणुस एका स्त्री ला बोलत होता . ती गोंधळली आणि तिने बचावात्मक बोलणे सुरु केले. मॅनेजर ने ऐकले आणि एच आर ला कळवले. तिच्या मते हे सगळे जाने दो होते पण मॅनेजर ने ऐकले असल्याने नियमाप्रमाणे त्याने तक्रार केली नाही आणि जर दुसरीकडुन हे बाहेर पडले तर तो गोत्यात येवु शकतो. यात सगळे अमेरिकन होते. आणि हे एका शैक्षणीक संस्थेत झाले.

दुसरे उदा. माझे . मला माझ्याच ऑफिस मधल्या एका वयाने आणि हुद्द्याने मोठ्या बाईने धमकिचे मेल तिच्या ऑफिस अकाऊंट वरुन माझ्या परसनल अकाऊंट ला केले.तिला वाटले कि मी घाबरुन तिचे ऐकेन . माझा घाबरुन गोंधळ. कलिग कडुन मॅनेजर ला आणि तिकडुन एच आर ला कळाले. एच आर ने तिला कॉल करुन फैलावर घेतले. मॅनेजर ने सांगितले कि हि बाई ऑफिस च्या वेळेत आणि ऑफिस रिसोर्स वापरुन धमक्या देते.

सो, एच आर खरच मदत करतात ( बहुतेक वेळा).
हे एका नावाजलेल्या कंपनी मधे.

chaila.... ignore kar saral

bol krupaya mendu chya nasa tanu naye...

caller id madhe 100 asa number pan saved ahe

का उगाचच चर्चा कालबाह्य झालेले जुने धागे उचकटून वर काढत आहात? त्याचसाठी हा आयडी काढला आहे का? चार वर्षापूर्वीची समस्या आहे. अजूनही तो त्यांना मेसेज पाठवून त्रास देत असेल असे वाटते का आपल्याला?

Sorry Inamdar

Punekar ahat watta

Itka kadu bolna kasa kay jamta?

ID ka kadhla ha prashnach mulat chukicha ani asambandha ahe.

Sorry Inamdar
Punekar ahat watta
Submitted by ग्लोरिया on 20 June, 2018 - 14:53>>>>

पुणेकरच आहेत ते!

आपण मायबोलीवर नवीन आहात, त्यामुळे आपल्या माहितीसाठी: एखाद्या प्रतिसादाखालील त्या सदस्याच्या नावावर क्लिक केले की त्या सदस्याची पूर्ण प्रोफाईल दिसते.

असो, आता यापुढील चर्चा इथे नको. चार वर्षांपूर्वीचा वैयक्तिक समस्येवरील धागा वर काढण्यात काहीच हशील नाही!
(अर्थात हा प्रतिसाद देऊन मी देखील हेच केले, त्याबद्दल क्षमस्व!)

आपण मायबोलीवर नवीन आहात, त्यामुळे आपल्या माहितीसाठी: एखाद्या प्रतिसादाखालील त्या सदस्याच्या नावावर क्लिक केले की त्या सदस्याची पूर्ण प्रोफाईल दिसते.

असो, आता यापुढील चर्चा इथे नको. चार वर्षांपूर्वीचा वैयक्तिक समस्येवरील धागा वर काढण्यात काहीच हशील नाही!

Mala kalat nahi ahe kahi?

sadasyachi purna profile ka baghu mi?

ani june dhage ukrayche nastat kalpana navhti

mhanun punekaranni itka kadu bolava?

jaude aso!