teaching मधील सन्धींबद्द्ल (सार्वजनिक धागा)

Submitted by धनश्री गानु on 15 May, 2014 - 01:14

मला मुलगा झाल्यानंतर मी IT मधील नोकरी सोडली. त्यानंतर बरेच दिवस मी वेगवेगळ्या विचारात होते की मी इतर काय करु शकते. इथे बर्याच लोकांना हे माहित पण असेल. मी बर्याच गोष्टींची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला.
मला इथल्या सगळ्यांनी खूप मदत पण केली. (वेगवेगळी महिती तसेच सल्ले देउन) त्याबद्द्ल सर्वांना धन्यवाद.
आणि आता मी निर्णय घेतला आहे. strugle has come to an end Happy
मी 11th 12th तसंच CA CWA foundation च्या students ना mathematic शिकावणार आहे.

CA CWA foundation ची १ batch मी पूर्ण केली आहे.

तरी आता मला अजून एक मदत हवी आहे. ती म्हणजे एखद्या college मधे मला visiting म्हणून जाण्याची इच्।आ आहे. तसेच मी BE E&TC आहे. त्यातलेही काही विषय मी शिकवू शकेन.

अशा काही संधींबद्द्ल कोणाला काही माहिती असल्यास मला जरुर सांगा.किंवा त्यासाथी काय करावे लागेल तेही सांगा.
याबद्द्ल नेटवरुन फारशी माहिती मिळाली नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रत्यक्ष कॉलेजेसना भेट देऊन तेथील माहिती घेऊन त्यानुसार तिथे अर्ज करायला काहीच हरकत नाही.
कॉलेजेस् च्या वेबसाईटवर आणखी माहिती मिळू शकेल.

कॉलेज लेवलला शिकवणार्या मायबोली सदस्यांकडून किंवा शिक्षण क्षेत्रात काम करणार्या सदस्यांकडून अधिक माहिती मिळू शकेल.

धनश्री,
तुला काय माहिती हवी आहे? देशातिल फार माहिती नाही पण अमेरिके बद्दल , इथे शिकवण्या बद्दल माहिती हवी असल्यास मला जमेल ती माहिती देण्याचा प्रयत्न करेन. गेले काही वर्षे शिकवते आहे मी ईथे.

रिमझिम, इथे शिकवण्याबद्दल जास्त सांगशील का? मला जाणून घेण्यात इंटरेस्ट आहे. काय क्वालिफिकेशन लागतं वगैरे सांग.

११,१ २ ला शिकवने छान वाटते. जागोजागी क्लासच्या जाहिराती असतात. त्याना फोन केला तर लगेच काम मिळेल. आता नव्या ब्य्य्चेस सुरु होतील
पण क्लासवाले एका तासाला कितीही विद्यार्थी असले तरी मास्तरला जेमतेम ५ शे देता. .त्यातही धडे ३ / ४ लोकाना वाटुन मिळतात. एकालाच देत नाहीत. हळुहळु प्रायवेट क्लासेस घ्या.

मीही माझे काम साम्भाळुन ११ ,१ २ ला बाओ लोजी शिकवतो.

सायो, तुला कोणत्या लेव्हलला शिकवण्याची माहिती हवीय ? मी सात वर्षे अमेरिकेत कम्युनिटी कॉलेजला शिकवले आहे. मास्टर्स असावीच लागते इथल्या लेव्हलची. आणि जो विषय शिकवायचा आहे त्यातील १८+ क्रेडीट लागतात.
स्कूल लेव्हलला शिकवायचे असेल तर सर्टिफिकेशन असावे लागते.
अजून काही माहिती हवी असेल तर जरुर सांग.

मी पण गेली ८ वर्षे अमेरिकेत कॉलेज मधे बायोलॉजी आणि जेनेटिक्स शिकवते आहे. कोणाला या बाबत काही माहीती हवी असल्यास देऊ शकते.

college मध्ये शिकवन्यासाठी नेट सेट उत्तीर्ण असावे लागते
निदान पोस्ट graduation तरी हवेच
म्हणजे कॉमर्स फैकल्टी म्हणून जायचे असेल तर निदान एम कॉम असायला हव

ही माहिती कॉलेज प्रोफ़ेसर कडून साभार

प्रतिसादबद्द्ल धन्यवाद. मी असे ऐकेले आहे की कॉलेजमधे आवरली बेसिस वर घेतात. पण त्याची जाहिरात करत नाहीत जास्त. त्याबद्द्ल माहिती असेल तरी सांगा.

धनश्री, मी मुंबईच्या एका कॉलेजमध्ये अवरली बेसिसवर C शिकवले आहे. बायोडेटा, शिक्षणाचा अनुभव, प्रशस्तीपत्रके घेऊन धडकायचे सरळ. एखादे लेक्चर तेव्हाच्या तेव्हा घ्यायची तयारी ठेवावी.

कॉलेजेस किंवा विद्यापीठात व्हिजिटींग फॅकल्टी म्हणून जायचे असेल तर नेट-सेट वगैरे काही लागत नाही.
मी २००१-२००२ पासून पुणे विद्यापीठात(ललित कला केंद्र) आणि २००३-२००४ पासून मुंबई विद्यापीठात(अ‍ॅकेडमी ऑफ थिएटर आर्टस) व्हिजिटींग फॅकल्टी आहे. नेट - सेट ची गरज नाही.

engg college मध्ये lecturer साठी ME/ MSc असावे लागते. जर तुम्हि MSc असाल तर permanent post साठी NET compulsory आहे. I am teaching in engg institute in pune
so if you need help send me message.

BE असेल तर विजिटिंग म्हणुन पण नाही का काम करता येत?

आणि अजुन एक ऑप्शन ऐकला होता की बी ई आहोत आणि त्याच कॉलेज मध्ये एम ई करत तिथेच शिकवाय्च?

अशे काही पर्याय असतात का?

सॉरी मी खुपच उशीरा आले ईथे.
माहिती बरिच लिहिलिच आहे सर्वांनी.

मी कॉम्प सायन्स चे अंडर ग्रॅड लेव्हल शिकवते. शिकवण्याचा अनुभव आणि मास्टर्स अथवा डॉक्टरेट असावे लागते.

कम्युनिटी कॉलेज मधे शिकवण्यासाठी त्या विषयामधे मास्टर्स असावे लागते ( ( माझी एक मैत्रिण देशात एम फिल करुन ईथे शिकवत होती). युनि व्हर्सिटी मधे मात्र पी एच डी असावी लागते त्या त्या विषयात.