तुळशीच्या मंजिरी वाढत नाहीत

Submitted by ई-पूर्वाई on 11 May, 2014 - 15:33

नमस्कार!

माझ्याकडे तुळशी चे एक रोपटे आहे. सुरुवातीला ते खूप फिक्के पडत होते. नंतर लक्षात आले कि त्याला अति प्रमाणात पाणी देण्यात येत होते व पाण्याचे प्रमाण कमी केल्यावर आपोआप त्याचा रंग परत हिरवागार झाला. त्यापुढची गोष्ट. ते रोपटे आता वाढले आहे आणि त्याला मंजिरी येऊ लागल्या आहेत. पण त्या नव्या आणि कोवळ्या असतानाच कोमेजून जात आहेत आणि तपकिरी पडत आहेत. वाढत नाहीत. काय कारण असावे?

कृपया मार्गदर्शन करावे . धन्यवाद

ई-पूर्वाई

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कारणे :यांपैकी एक
१)पाण्याचा निचरा होत नाही . २)शेणखत घातले असल्यास ते पूर्ण कुजलेले नसेल .३)चिकट माती आहे .४)वरून सावली येत असेल .५)'वैजयंती' सोडून रोपांचे आयुष्य चार महिन्यांचे असते .६)मातीत शंख अथवा वाळवी आहे .
उपाय :१)ओला कचरा टाकू नका .२)जमिनीतले काढून पुन्हा उंचावर लावा .३)दीड दोन महिन्यांचे असल्यास हे रोपच काढून टाका .४)कुंडीतले काढून पुन्हा चिकट नसलेल्या नवीन मातीने भरून लावणे .५)फुलवाल्यांकडे जे काळया पानांचे खूप दर्प असणारे तुळशींचे शेंडे असतात ते आणून लावा .ही वैजयंती तुळस बारमाही असते .रोपे होतात .

धन्यवाद!

मला वाटते यापैकी जवळ जवळ सगळी कारणे लागू पडतायत! मला वाटले नव्हते की माझ्या कुंड्यांमध्ये शंख असतील. पण तेही निघाले !!!