एका लग्नाची तिसरी गोष्ट!!!

Submitted by मी मधुरा on 18 September, 2013 - 01:19

'एका लग्नाची दुसरी गोष्ट....' माझी सर्वात लाडकी आणि पहिली मराठी आवडलेली मालिका, जी मी पहिली आणि शेवटपर्यंत पाहत राहिले. ती मालिका मात्र २५ ऑगस्ट २०१२ ला संपली. Sad

आणि आता त्या मालिकेतले दोन कलाकार, उमेश कामत (अबीर-एका लग्नाची दुसरी गोष्ट) आणि स्पृहा जोशी (कुहू-एका लग्नाची दुसरी गोष्ट) हे दोघे पुन्हा पडद्यावर येत आहेत, तेही एकत्र....'एका लग्नाची तिसरी गोष्ट' घेऊन!!!! Happy

ए.ल.दु.गो. नंतर मालिकांमध्ये प्रेम कथा, Joint Family दाखवण सुरु झाल, मालिकेत नवीन म्हणजे,
खास मालिकेसाठी तयार केलेली गाणी दाखवण्याची सुरवात झाली...म्हणूनच ए.ल.ती.गो. पाहण्यास मी खूप उत्सुक आहे. Happy

सध्या मिळालेली माहिती:

कथा: श्रीरंग गोडबोले
पटकथा: चिन्मय मांडलेकर (आधीचे एपिसोड), संदेश कुलकर्णी (आत्ताचे एपिसोड्स)
दिग्दर्शक: विनोद लव्हेकर
संगीत: सलील कुलकर्णी
मालिका सुरु होण्याची तारीख: १४ ऑक्टोंबर २०१३!
ekalagnachi.jpgमहत्वाचे:

इथे भांडत बसू नये.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओम- ईशा संबंधातलं द्वंद्व व त्यांच्या जीवाची घालमेल उमेश व स्पृहा यानी अतिशय प्रभाविपणे साकार केलीय !

ओमच्या खर्‍या आई-वडिलांची कांहींही ओळख नसताना व ओमच्या मनातील त्यांच्याबद्दलची अढी माहित असूनही त्याना एकत्र आणण्याचं 'मोठ्या बाबा'चं आव्हान स्विकारणं, हा ईशाचा प्रचंड आगाऊपणा म्हणतां येईल. इतकं असूनही गांवच्या भावाने प्रॉपर्टीच्या वाटणीचा आग्रह धरून ओमच्या वडिलाना नेमकं आत्तांच इथं आणलं. ओमच्या सावत्र आईने नेमका आत्तांच त्याच्या वडिलाना दणका देऊन ईशाचं काम बरचसं सोपं केलं. मग, आजीने ओमला घरासकट सर्वाचाच वारसदार करून त्याला वडिलाना घरातून हांकलून देण्याची व त्याना पूर्णपणे नामोहरम करण्याची संधी दिली. इतके योगायोग तिच्या मदतीला धांवून आलेच आहेत तर ओमच्या मनात अचानक आई-वडीलांबद्दल प्रेम निर्माण व्हायला तरी आतां काय हरकत आहे ? Wink

भाउकाका .. तुम्हीच का नाही लिहित पुढे Wink
आता मस्त चाललीयं सिरीयल.. थोडे बहुतेक संवाद असेच असतात आमच्याकडे Wink

<< ...तुम्हीच का नाही लिहित पुढे >> कारण हा चर्चेचा रंगलेला धागा मधेंच तुटूं नये म्हणून ! Wink
[ मालिकांच्या लेखन व दिग्दर्शनावर असलेलीं बंधनं, दबाव व मर्यादा यांची मलाही जाणीव आहे. हें सारं संभाळूनही ही मालिका बरीच दर्जेदार राहिली आहे व म्हणूनच मीं फक्त तीच बर्‍याच नियमितपणे पहातों. पण आपण अगदींच भोळसटपणे ती पहात नाही ना, याबाबतही जरा सावध असतो इतकंच ! ]

काल मला वाटतच होतं की इशा चांगला अभिनय करतेय इतक्यात ती दाखवून द्यायची की ती इशा नसुन कुहु आहे....
अधुन मधुन स्पृहातले कुहू बाहेर उड्या मारत येतेच

पण ठिकेय, आता वैताग कमी झालाय.
जान्हवीपेक्षा सहनेबल आहे ही

<< जान्हवीपेक्षा सहनेबल आहे ही >>आपली 'सहनेबिलीटि' कोणत्या डिग्रीवर ठेवायची/ ठेवूं शकतों हें, मला वाटतं, प्रत्येक मालिका पहाताना प्रत्येकाने ठरवावंच; नाही तर खूप तापदायक ठरूं शकतं मालिका पहाणं ! Wink

काय झालं गेल्या १-२ भागांत? आमचा टीव्ही मेलाय गेले २ दिवस. ती इशा ओमच्या बाबाला घरात आणते तो पाहिलाय मी एपिसोड, त्या नंतर काय झालं?

गोगांसारखे अपडेट द्यायचा प्रयत्न करते Wink
१) ओम-इशा हे प्रेमाच्या सायक्लिक ईमोशन्समध्ये आहेत. आपण लग्नच करूया नको असं म्हणत एकमेकांच्याच गळ्यात पडतात. सॉरी कोणी म्हणाय्चं हा सनातन ईगोविषयही चर्चिला गेला.
२) सासवडला मोहन आगाशे इशाला अल्टिमेटम देतात. इशा एका महिन्यात दुस-याशी लग्न करणार की ओमच्या आई-बाबांना एकत्र आणणार???? बघत रहा..
३) धनाकडे गोड बातमी आहे. त्याचं सेलिब्रेशन काल सुरू झालं. आज-उद्याही चालावं.

आता माझे चाराणे:
मोडलेल्या कुटुंबामधल्या माणसांची मानसिकता जुळवून घेण्याची नसते. हा मोबांचा मुख्य आक्षेप आहे. म्हणून ओमच्या पालकांनी एकत्र यावं. पण जिथे मनानेच ते लांब गेले आहेत, तिथे अशा दाखवण्यापुरत्या पॅचपने काय होणार? बर असं नाही की ओम माणूसघाणा आहे. माणसं त्याने गोळा केली आहेतच की. ते त्याचे रक्ताने नातेवाईक नाहीत, इतकंच. पण त्यांचं प्रेम अस्सल आहे. हे पुरेसं नाही का? लुक अ‍ॅट द बिगर पिक्चर मोठे बाबा प्लीज!

मुळात ओमचे बाबा ओमच्या आईला टाकून देतात ना दुसरीशी लग्न करायचंय म्हणून? याचा ओमवर काय परिणाम होईल याचाही विचार करत नाहीत. आई काय बिचारी आता नवरा टाकून दयायला निघाल्यावर काय करणार?

पण मग अशा माणसाला तिने पुन्हा का स्वीकारावं? इशाचे आजोबा म्हणतात म्हणून? म्हणजे पुन्हा तुम्ही हाच मेसेज देताय की नवरा बायकोला-मुलाला टाकून देईल, दुसरी बायको करेल, तिने लाथ मारली की पुन्हा पहिलीकडे येईल आणि पहिल्या बायकोने आणि मुलाने त्याला स्वीकारलंच पाहिजे.

आई-मुलगा यांच्यात निर्माण झालेली दरी दूर करणं ही गोष्ट वेगळी. पण ओमच्या बाबांना माफ करुन पुन्हा happy family तयार केलीच पाहिजे का?

<< आमचा टिव्ही मेलाय गेले दोन दिवस >> कदाचित तसं नसेलही ! कंटाळलाही असेल तोही बिचारा. " झालं बाबा एकदांचं ओम-ईशाचं लग्न ", असं त्याला ऐकूं जाईल एवढ्या मोठ्याने एकदां बोलून बघा; कुणी सांगावं, होईलही चालू लगेचच !! Wink
<< लुक अ‍ॅट द बिगर पिक्चर मोठे बाबा प्लीज! >> अहो, पण तसं करायला सांगणं म्हणजे " लुक अ‍ॅट द लॉन्गर सिरियल प्लीज"शी अगदींच विसंगत नाही का होणार तें ? Wink

माझ्या असल्या कॉमेंटसमुळे ओमने बापाला सांगितलं तसंच मलाही इथं " गेट लॉस्ट, आत्तांच्या आत्तां !" सांगितलं जाणार बहुतेक !! पण मला आवडते ही मालिका हेंही खरंय .

हा माझा पहिला मायबोलि वरचा प्रतिसाद आहे. हि सिरियल मला खुप आवड्ते .कधि कधि काहि प्रसन्ग फार रीयल वाट्तात.ओम चे त्याच्या वडिलाअशि असे वागणे पटते .व खोटया परन्तु सम्जुन घेणारया वडिलाशि हि ज्या प्रकारे वागतो तेहि पटते .emotions चान्ग्ल्या प्रकारे दाखवतात .

कालचा एपिसोड - ईशा कसंबसं ओमला खेंचत पाण्यापर्यंत आणते आहे पण तो अजूनही पाण्याला तोंड न लावतां खिंकाळत लाथाच झाडतो ! Wink
सध्याचे एपिसोड खरंच बरे चाललेत, अभिनय, लेखन व दिग्दर्शन तिन्ही बाबतीत.

इथे सागर आणि मधु च जमलेलं दाखवणार कि काय? होसुमि मध्ये मनीष आणि गीताच . सारख सारख चाललाय दोन्ही कडे . तिथे काका दारू पिणारा या मालिकेत खोट्या आईचा नवरा Happy

<< तिथे काका दारू पिणारा या मालिकेत खोट्या आईचा नवरा>> तिथें 'कंट्रोल' आजीचा, इथं 'मोठ्या बाबांचा' !! आणि, सिरीयल ताणणं तर तिथंही व इथंही, अगदीं तसंच !! Wink

बाय द वे, अमेरिकेहून येताना ओमचे खरे वडील फक्त बाहीवर " १०" आंकडा असलेला एकच टी-शर्ट घेवून आलेत का ? कीं, मालिकेतले त्यांचे मागचे -पुढचे सर्व शॉट्स त्यानी तो टी-शर्ट घातलेला असताना एकाच वेळीं चित्रित करण्यात आले आहेत !!! Wink

त्या धनाला स्वयंपाकाला जुंपली आहे बिचारीला. आता एक स्वयंपाकीण बाई तरी लावा. अजून एक पात्र त्या भाऊगर्दीत काही जास्त नाही. धनाला बिचारीला नुसत्या ऑर्डरी देत असतात सगळे! भाऊ, यावर एक व्यंगचित्र कराच तुम्ही! Proud
ओमच्या बाबांचे टीशर्ट एकाच प्रकारचे पण वेगवेगळ्या रंगांचे आहेत. इशाच्या आईच्या साड्या, शोभनामावशीच्या साड्या, उमाकाकूच्याही साड्या तशाच आहेत- एकच प्रकार, फक्त रंग वेगळे. कपडेपट सांभाळणार्‍याने फार कष्ट घेतले नाहीयेत. झटपट खरेदी करून टाकलीये Wink

अगदी अगदी!

आता धना कडे गुडन्युज म्हणल्यावर एखादी स्वयंपाकिण येऊ शकते.

मागे माझी बहीण एकदा म्हणालीच होती की आता ओमचा मित्र आणि मधुचं जुळणार....मार्गावर आहेत.

धनाच्या बाळंतपणात ओमची आई गरजेची वाटल्याने घरी येऊन राहु शकते का?
धनाचं बाळंतपण क्रिटिकल, आई वाचवणार, काळजी घ्यायला घरी रहायला येणार, ओमवर उपकार... तो कृतज्ञता व्यक्त करता करता आईला क्लोज होणार, आई बाबांना त्यांचे जुने दिवस आणि ओमचा जन्म आठवणार. मग सगळे एक होणार. मग आनंदी आनंद....
इतकं लॉजिकल घडेल काय काही या शिरेलीत?

इतकं लॉजिकल घडेल काय काही या शिरेलीत? >>>

लॉजिक वापरून मालिका बनवायला लागले तर सगळ्या मालिका गुंडाळाव्या लागतील. Happy
मालिका आणि लॉजिक या दोन शब्दांचा एकमेकांशी काही संबंध नाही.

धनाच्या बाळंतपणात ओमची आई गरजेची वाटल्याने घरी येऊन राहु शकते का? >>> खोटी आई नक्कीच येणार. तिच्या नवर्‍याला रिहॅब मधे पोचवलंय, त्यामुळे ती मोकळीच आहे.

<< अजून एक पात्र त्या भाऊगर्दीत काही जास्त नाही ..... >> मला तर ही कोपरखळी नाही ना ! Wink

Lol @ सुमेधा, सासवडच्या बाहेरील स्वस्तातला शिंपी असावा, व बस्त्यात येतात ना तशी स्वस्त कापडे असावीत...

खोटी आई नक्कीच येणार. तिच्या नवर्‍याला रिहॅब मधे पोचवलंय, त्यामुळे ती मोकळीच आहे.

>>>
पण मग ओम आणि त्याची आई क्लोज कसे होणार????
खोटी आई अगदीच येऊ शकणार नाही असं वाटतय Happy

खोटी आई नक्की येणार असं वाटतंय कारण धनाची तिच्याशीच जवळीक आहे ना! ओम आणि इशा करता खरी आई पण येईल. (यायलाच हवी!) तसंही त्या घरात "आओ जाओ घर तुम्हारा" प्रकारच आहे. असो.
मला एक प्रश्न पडला आहे केव्हाचा की ओमच्या बाबांनी त्याला वार्‍यावर सोडलं त्याची कारणं पटतात पण त्याची आई त्याला का सोडून गेली? नवर्‍याशी पटत नाही, घटस्फोट झाला याची शिक्षा तिनं ओमला का द्यावी? ते देखील बापाकडे कस्टडी नसताना, याचं उत्तर मात्र अजूनही मिळालं नाहीये. आणि अशा वेळी आईचा जास्त राग यायला पाहिजे. मला तरी ओमच्या आईची जास्त चूक वाटतेय.

<< ओमच्या बाबांचे टीशर्ट एकाच प्रकारचे पण वेगवेगळ्या रंगांचे आहेत.>> गेल्या तीन-चार एपिसोडप्रमाणेच आजही हिरव्याच रंगाचा , बाहीवर '१०'चा आंकडा असलेलाच, टी-शर्ट होता सायंटिस्ट बाबांच्या अंगावर !!! Wink

भाऊ, इतके दिवस निळा होता, आज हिरवा Proud

तुम्हाला कोपरखळी मारण्याची जुर्रत मी कशी करेन? Happy

नवर्‍याशी पटत नाही, घटस्फोट झाला >> ही कारणं पुरेशी आहेत की. नवर्‍यामुळे मुलगा झाला. मुलामुळे बांधिलकी आली. म्हणून त्यालाही सोडून दिलं, असं काहीतरी असेल. टीआरपी बघून त्यांना कधीही कोणत्याही क्षणी एकमेकांबद्दल आतोनात आपुलकी आणि प्रेमही वाटायला लागेल. काहीच सांगता येत नाही! Proud

मला आपली त्यांच्या स्वयंपाकाची काळजी Wink धना आडवी झालीये कालच. कसं होणार त्यांचं आता?

Pages