फेरफार नक्कल देण्यास टाळाटाळ केली जात आहे...

Submitted by LonelyBoy on 16 April, 2014 - 03:52

आम्ही तहसिल मध्ये फेरफार नक्कल मिळवण्यासाठी अर्ज केला होता, पण ते म्हणाले या फेरफारचे रजिस्टर त्यांच्याकड नाही आहे, ते तलाठीकडे आहे. फेरफार 15-20 वर्षापुर्वी झाला होता. मग बरेच प्रयत्नानंतर तलाठीची भेट झाली, तो म्हणाला हा फेरफार नक्कल असलेला रजिस्टर त्यांच्याकड नाही आहे, ते यापुर्वी जो तलाठी होता त्या तलाठीकडे आहे. आम्ही खुप वैतागुण गेलो आहोत तलाठ्यांच्या या कारभाराला! एक तर ते कधीच फोन उचलत नाहीत. आणि त्यांची भेटही होत नाही. काहितरी उपाय सांगा जेणेकरुन मला फेरफार नक्कल लवकर मिळुन जाईन. या विषयी माझे काही प्रश्न/शंका-

(1) फेरफार नक्कलसाठी तहसिलमध्ये अर्ज केल्यावर जर वर सांगितल्याप्रमाणे त्यांनी कारण सांगितले किँवा नक्कल सापडली नाही याबद्दल जे काही कारण असेल ते त्यांनी अर्जावर लिहुन देणे बंधनकारक असते का?

(2) फेरफार नक्कल साठी शासकिय फी किती आहे?

(3) जर फेरफार नक्कल सापडली नाही तर ते आपल्याला संबधित तलाठीकड जायला सांगतात, असा पण कुठला शासकिय नियम आहे का? ते स्वतःच तलाठीकडील दफ्तर मागवुन नक्कल का देत नाहीत? कारण तलाठी लोक फार टाळाटाळ करतात कोणतेही काम करायला

(4) मला असे वाटते फेरफार नक्कल साठी अर्ज आवक जावक मध्ये दिला की 1-2 दिवसानंतर त्यांच्याकडच आपली फेरफार नक्कल आली पाहिजे, जेणेकरुन मामुली गोष्टीसाठी इकडेतिकडे पळण्याचा मनस्ताप होणार नाही, असे काही करता येते का?

मला हे सर्व टाईप करण्यासाठी 45 मिनीटं लागली, कारण हे मोबाईल वरुन टाईप केले, कृपया मला योग्य मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या धाग्या मध्ये मला अजुन एक पण प्रतिसाद का मिळत नाहीये, तुम्हाला या विषयी जेवढे माहित असेल तेवढेच सांगितले तरी चालेल.

ग्रामीण भागातले मायबोलीकर मोजकेच असतील.
या साइट्सचा काही उपयोग होतो का ते पहा (आणि इथे लिहा)
http://mahabhulekh.maharashtra.gov.in/
http://jalna.nic.in/webrcis/aspx/saatbara.aspx

http://www.satbara.co.in/InnerPages/ShetiVishyakMahiti_3.html

जालना जिल्ह्यात इन्फर्मेशन कियॉस्क्सद्वारेही ही माहिती मिळू शकते असे दिसते.
http://jalna.nic.in/html/nicjln.html

7/12 आणि फेरफार नक्कल दोन्ही अलग अलग गोष्टी आहेत, आणि अजुन महाराष्ट्र मध्ये फेरफार नक्कल ऑनलाइन नाही टाकले त्यांनी

फेरफार नक्कल उपलब्ध न करून देण्याचे कारण लिहून मागितल्याशिवाय मिळणे कठीण, कारण फेरफार नक्कल आपण मागितली पण त्यासाठी व्हिटॅमिन एम्‌ ची विचारणा किंवा मागणी आपल्याकडे झाली किंवा नाही,

दुर्दैवाने याशिवाय असल्या ठिकाणी कामे होत नाहीत, हे सत्य आहे. याविरुद्ध लढा देण्यासाठी वेळ, काळ, पैसा खर्च करूनही मनस्ताप भोगण्याची तयारी ठेवावी लागते अन्याथा कामास अमर्यादित विलंब सहन करावा लागतो. पैसे देण्यास तयार असाल तर आपण किती पैसे देता यावर त्यांच्या सेवा ठरतील.

घरपोच फेरफारचा उतारा देणारे लोकही असतात पण त्यासाठी आपण भले माणूस आहात व व्हिटॅमिन एम्‌ चा डोस ही जास्त देता आहात याची खात्री पटावी लागेल.

याउपरोक्त तलाठ्याविरोधात माहितीच्या अधिकाराखाली अर्ज कोणत्या कार्यालयात करावी याबाबत तहसील ऑफिस मध्ये विचारपूस करून तसा अर्ज देऊन त्याची पोच घ्यावी.

आणखी माहिती हवी असेल तर विपुतून संपर्क करा

नाही, Vitamin M ची विचारणा नाही झाली अजुन, मला वाटते बहुदा हा अलिखित नियम असावा सरकारी नौकरांचा की काम करण्यास टाळाटाळ केल्यास असे समजावे की तुम्ही त्यांना Vitamin M स्वतःहून द्यावे, पण त्या मुर्खांना हे समजत नाही की सर्वच लोक अन्याय सहन करणारे नसतात.

सरकारी नौकरांना जरा लाज वाटली पाहिजे, किती प्रचंड पगार असतो त्यांना, त्यातच त्यांनी समाधान मानावे, स्वतःला नशीबवान समजावे, कारण आज किती खुप शिकलेले लोक बेरोजगार पडलेले आहेत..

सरकारी नौकरांना जरा लाज वाटली पाहिजे, किती प्रचंड पगार असतो त्यांना, त्यातच त्यांनी समधान मानावे, स्वतःला नशीबवान समजावे, कारण आज किती खुप शिकलेले लोक बेरोजगार पडलेले आहेत..

थोडा पैसा खर्च करुण गाव गुंड बरोबर घेउन जा आणि लोकल पोलिस स्टेशन ला पैसे दाबा

आणि मग रुबाबात तुम्हाला हवा असलेला फेरफार मागा

ज्याचा पुत्र गुंडा
त्याचा तिन्ही लोकी झेंडा

फेरफार नक्क्ल म्हणजेच ६/१२ चा उतारा ह्याची नोंदवही ही संबंधीत गावाच्या तलाठ्याकडेच उपलब्ध असते, तलाठी बदलला तरी नोंदवही बदलत नाही. साधारणतः एका फेरफार नक्कलेकरिता रूपये १०/- इतका आकार पडतो. संबंधीत तलाठी आपणास फेरफार देण्याकरिता टाळाटाळ करीत आहे असे दिसते, त्याची अनेक कारणे असु शकतात. उदा. त्या फेरफारामुळे गावातील एखाद्या परीचित अथवा प्रतिष्ठीत (गावगुंड) माणसाचे हितसंबंध गुंतलेले असु शकतात, तलाठ्याला पैसे खाण्याचा रोग असु शकतो इत्यादी. तरी तुम्ही तलाठ्याकडे केलेल्या अर्जाची साक्षांकित नक्कलप्रत तुमच्यासोबत ठेवा आणि स्थानिक तहसिलदार कार्यालयात मा॑हितीच्या अधिकारात अर्ज करा. तहसिलदार कार्यालयात अर्ज घेण्यात टाळाटाळ केली की सरळ तहसिलदाराला तलाठ्याकडे केलेल्या अर्जाच्या नक्कलेसोबत समक्ष भेटा. म्हणजे ते अर्ज स्विकारतील व तलाठ्याकडे वर्ग करतील. मग तलाठ्याला ३० दिवसांच्या आत आपल्या अर्जावर कारवाई करावीच लागेल. एखाद्या फेरफाराचे नोंदवहीतील पान फाटले आहे अथवा गहाळ झाले आहे अश्या आशयाचे प्रमाणपत्र तलाठी आपल्या सही शिक्क्यानिशी देतात.

तुम्हा सर्वाँचे मन:पुर्वक आभार!

@ नरेश माने

एखाद्या फेरफारचे नोंदवहीतील पान फाटले असल्यास किंवा गहाळ झाले असल्यास त्याचा आपल्यावर तर काही विपरीत परिणाम होऊ शकत नाही ना?

नाहीतर म्हणतील फेरफारची नोँद दिसत नाहिये किँवा ते पान फाडलेले दिसत आहे, तुम्ही काही काळे पांढरे करुन तर शेत जमिन नावावर नाही केली ना?

हे कंच्या गावचं इचारुन राह्यला?
तलाठयाला स्पष्ट विचारला का काय प्रॉब्लेम आहे...जरा चहा पाजा... Happy
दुसरं सात-बारा ऑनलाईन आहे का बघा... काहीतरी स्थानिक कारणच असणार ?
असा कोण आहे की तो फेरफार तुम्हाला द्यायला नकार देतोय? व्हिटा-एम द्या.तलाठ्याला तसा काही फार पगार असतो असं नाही.आणि तुमचे पैसे येण्या-जाण्यात खर्च होअणार... तुम्हाला मिळेल...फेरफार रजीस्टर गहाळ झालं तरी सात-बारावर रजीस्टर करा... फेरफार गहाळ होत नसतं..पानं फाडली असतील तरी..काही तरी झोल आहे.. स्थानिक माणसाल मदतीला घ्या....