मिती ची किती माहिती आहे ???

Submitted by रणथंबोर on 2 April, 2014 - 06:02

तर मंडळी ... "अमानवीय" या धाग्यावर थोडी चर्चा झाल्यावर जरा आता इथे अंग झाडून चर्चा करू....

मिती (Dimention) बद्दल माझे समज / ज्ञान खालील प्रमाणे आहे ..चुकलो असेल तर सांगा....

१) आपण राहतो ती एक मिती आहे ... आणि याशिवाय अंतराळात अनेक मिती असतात पण त्याचा वापर करण्याचे ज्ञान अद्याप आपल्याला झालेले नाही...
२) UFO किवा Alien ज्या वाहनातून / यानातून प्रवास करतात ती वेगळी मिती आहे ... म्हणून आपण त्यांना कधीच गाठू शकत नाही ...
३) आपले सगळे भौतिक शास्त्राचे नियम (वेग /प्रकाशवर्षे / काळ) त्या मिती मध्ये चालत नाही ...म्हणूनच हजारो प्रकाशवर्षे दूर असणार्या ग्रहावर आपण काही मिनिटात पोहचू शकतो ...
४) मिती बदलाचे अनुभव काही व्यक्तींनी घेतेले आहेत आणि त्याचे उत्तर अजून देत आलेले नाहीत... बर्मुडा Triangle वरून जात असताना एका वैमानिकाला असा अनुभव आला कि .... नेहमीच्या रस्त्याने (आकाशातल्या) जात असताना अचानक एके ठिकाणी त्याचे विमान दाट ढगातून जाऊ लागले ..काही मिनिटानंतर (साधारण १० मीन) तो त्यातून बाहेर आला ... पण त्या दरम्यान त्याचे ठिकाण दाखवणारी यंत्रणा बंद होती .... ढगातून बाहेर आल्यवर जेव्हा त्याने पहिले तेव्हा यंत्र परत चालू झालेले... आणि तो जिथे पोहोचला होता त्या ठिकाणी येण्य्साठी त्याला ५ तास लागले असते (नेहमीच्या रस्त्याने) ... त्याने इंधन तपासले तर ते पण कमी नव्हते झाले... तो बधिर अवस्थेत खाली आला आणि... काही दिवसानंतर या प्रसंगाचे कारण "मितीप्रवेश" होते असे सांगण्यात आले.
५)जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आइन्स्टयन (type करता येत नाही ) यांनी एकदा सांगितले होते कि आपल्या आजूबाजूच्या असणाऱ्या वातावरण अशी बरीच छिद्रे / मार्ग आहेत ज्यांतून आपण दुसर्या मिती मध्ये प्रवेश करू शकतो...

तर मंडळी... आता तुमची वेळ आली आहे ... जरा तुमचे पण ज्ञान वाटा आणि वाढवा....

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्हाला धागा कसा सुरू करायचा ह्याची माहिती मिळाली ह्याबद्दल आधी अभिनंदन

विषयाबाबत मला माहीती नसल्याने काय काय प्रतिसाद येतात हे बघायला मीही उत्सुक आहे

रणथम्बोर, तुम्ही मांडलेले पाचही मुद्दे तसे बरोबर आहेत, पण ते प्रयोगशाळेत सिद्ध झालेले नसल्याने "अन्धश्रद्धा" या सदराखाली येऊन त्यामुळे इथे येऊन अन्निसवल्यान्चे बरेचसे काही गदारोळात्मक बोलुन झाले, की त्या नन्तर काही एक सान्गायचा प्रयत्न करेन.
तोवर एक क्ल्यु देतोय तो पटतोय का पहा:
जे काही त्रिमिती (थ्रीडीमधे) आपण बघतो/समजतो ती आपल्या दैहिक पन्चेन्द्रियांच्या जाणिवेची करामत असते.
अन अर्थातच जितकी पंचेन्द्रियांची मर्यादा असते (जी मात्र प्रयोगशाळेत सिद्ध होऊ शकते) तितक्याच मर्यादेत त्रिमितीचे ज्ञान आपणास होते. केवळ त्रिमितीच्या विश्वातही असंख्य बाबी आत्ताही अशा आहेत व समजल्या गेल्या आहेत की ज्या बाबी पन्चेन्द्रियान्चे मर्यादेत येत नाहीत. (ध्वनी ऐकण्याची क्षमता वा विशिष्ट किरणे दिसण्याची क्षमता). या व्यतिरिक्तही असंख्य बाबी त्रिमितीमधेही आपणास अजुन कळलेल्या नसणारेत, किन्वा त्रिमितीच्या विश्वातील सगळेच आपल्याला कळले आहे असा दावा मानव करु शकत नाही.
तद्वतच, त्रिमितीपलिकडेही चौथी वा पाचवी वा अगणीत मिती असाव्यात असा कयास सर्व कालातील बर्‍याच विद्वानान्नी मांडला आहे. मानवी देहाची गुणवैशिष्ट्ये लक्षात घेता, यांचा अभ्यास केवळ मानवी देहावर विसम्बुन एकसुरी पद्धतीने करुन उपयोग नाही हे देखिल सर्व जण जाणतात.
अन तिथेच पुराणातील वान्ग्यान्चा उपयोग करुन घ्यावा लागणार आहे.
नुस्ता "मनोवेगे" हा शब्द घेऊन, मनाने अमुक जागी उपस्थित होणे ही क्रिया जर अभ्यासायची ठरली, तर आजच्या जगातील कोणतीही प्रयोगशाळा त्यास सध्या तरी पुरी पडत नाही.
स्वप्नावस्था वा स्वप्नातील भ्रमंती हा असाच एक दुर्लक्षित पण त्रिमितीच्या पलिकडील विषय आहे, पण सध्यातरी तो विषय, "मेन्दुतील केमिकल लोच्या"च्या आधुनिक विज्ञानाच्या नि:ष्कर्षान्नी बन्धित आहे. पण जेव्हा पुढे केव्हातरी बघितले जाणारे ठिकान्/वस्तु आत्ताच स्वप्नात बघतो, व ज्यान्ना याचा अनुभव आहे, त्यान्ना खात्री पटलेली असते की त्रिमिती पेक्षा वेगली काही एक वा अनेक मिती अस्तित्वात आहेत, व मानवी देहाच्या मर्यादामधुनही त्यान्ना स्पर्ष होऊ शकतो, प्रयत्नाने स्पर्ष करता येऊ शकेल.
यावर निदान माझा तरी अभ्यास राहुदेच, विषयप्रवेशही पुरता झाला नसल्याने सध्या इतकेच.

आता वाट बघुयात अन्निस अन बुप्रावाद्यांच्या भाष्याची! Happy

limbutimbu

थोड थोड म्हणून तुम्ही भरपूर माहिती दिली कि राव....त्याबद्दल आधी आभार....

अजून चर्चा झाली तर मजा येईल .... मेंदूचा भुगा झाला पाहिजे ....

एखादी
मिति आहे हे मान्य झाले की आपला पुढला प्रश्न ती किती आहे ?'किती'चा विचार
करायचा तर साधने आली .इथे लिंबुटिंबूनी मानवी पंचेंद्रियांना समजणाऱ्या
मितिंचा आवाका दिला आहे .ध्वनिचा कंप आपणास २०ते २०हजार जाणवतो .या बाबतीत
प्राणी थोडे प्रगत आहेत .अतिंद्रिय शक्ती दहालाखांत एकाला असते म्हणून तिला
सर्वसामान्य मितित गणना केली नाही .याचे बरेच विवेचन कपिलमुनींच्या
सांख्ययोगात आहे .एखादी गोष्ट मला दिसत नाही म्हणजे ती नाहीच आहे का
?इत्यादी .
बाकीच्या मितिंसाठी आपण वैज्ञानिक उपकरणे वापरतो आणि मोजतो .मोजमाप आले की
सुरुवात आणि शेवट असलाच पाहिजे हा आपला हट्ट सोडून द्यावा लागला आहे
.वैज्ञानिक पध्दत बाप दाखव नाहितर--प्रकार आहे .एक शेवट तरी दाखवा अथवा
शेवट नाही हे सिध्द करा .
जी मिति मोजायची त्याच्या अंतरंगापेक्षा सूक्ष्म अथवा मोठे साधन आपल्याकडे
हवे हीच मोठी अडचण आहे .उदा०युरोपमधले अणूचे कण शोधण्याचे यंत्र .

लिम्बुटिम्बु म्हणाले तास मनोवेगे च अजून एक पौराणिक उदाहरण म्हणजे नारद मुनींचा तिन्ही लोकातला संचार. तिन्ही लोकात संचार करण्याची शक्ती असलेले एकमेव नारदमुनी ह्याच मिती चा उपयोग करत संचार करायचे असा अज्ञाताच विज्ञान जाणणाऱ्या लोकांच म्हणण आहे

माझ्या मनात असंख्य प्रश्न आहेत अनेक कल्पना सुद्धा आणि त्या त्या कल्पना वास्तव असल्या पाहिजेत अस समजायला माझ्या पुरती तशी तशी कारणे सुद्धा. आपल्या पौराणिक कथांचा अभ्यास केला असता किंवा विचार करता बर्याच बाबी समोर येतात. काही दुर्लक्षित सुद्धा राहिले आहेत असे वाटते …काही उदाहरण खाली देतेय.

१. आपण लहानपणापासून पौराणिक कथेत ऐकत आलोय कि अनेक तपस्वी, ऋषीमुनी, साधू-संत तपस्या करण्यासाठी उंच, शांत अश्या पर्वतावर जायचे अनेक वर्ष तपस्या केल्यानंतर त्यांना कुठलातरी देव प्रसन्न व्हायचा तो त्यांच्यासमोर प्रगट व्हायचा आणि त्यांना हवा तो वर द्यायचे तो वर म्हणजे विशेष शक्ती, विशेष गुण ई. …
माझ्या मनात प्रश्न असा उपस्थित होतो कि कैलास पर्वत, हिमालय अश्याच ठिकाणी तपस्या केली कि देव प्रत्यक्ष प्रकट होतात तर अश्या काही विशिष्ट उंचीच्या पर्वतांवर दुसर्या मितीत जाण्याचे किंवा तिकडून इथे येण्याचे मार्ग तर नव्हते.

२. अनेक पौराणिक मान्यतेनुसार पुरातन महापुरुष ज्यांना देव मानले गेले होते ती लोक स्वर्गात जाऊन परत येत असत किंवा वर सांगितल्याप्रमाणे देवाधीकांचे भ्रमण तिन्ही 'लोक' मध्ये होत असे. नारदमुनी सोबतच पाच पांडवांची स्वर्गात जाऊन येण्याची कथा सुद्धा आपण ऐकलेली आहेच …. महाभारत सत्य आहे असे मानले तर पांडवांना मिती ओलांडण्याचा मार्ग माहिती होता असं समजायला हवं का ??

माझ्या कल्पनेतली मिती ची संकल्पना समजावून सांगायला एक उदाहरण देते

एखादा प्रचंड मोठा फुगा असतो अगदी पातळ लेयर चा बनलेला त्याच्या आत एक विश्व असतं त्यात त्या फुग्याला पोषक त्या प्रमाणात हवा आणि वातावरण असतं ……
आता कल्पना करूया कि आपण राहत असलेलं हे विश्व म्हणजे एक फुगा आहे या फुग्याच्या आत नांदत असणाऱ्या जीवित-अजीवीतांसाठी जे जे काही पोषक आणि आवश्यक आहे (जसे पाणी, वारा, काहीएक ऋतू, खनिजे, एक सूर्य, एक चंद्र, मर्यादित तारे-ग्रह, काही पर्वत, नद्या, सागर वगैरे ) ते ते तेवढ्याच मर्यादेत आत टाकून देऊ केले …. असे अनेक फुगे त्यांच्या त्यांच्या वाट्याचे पोषक असे वातावरण आणि जागा व्यापून एकमेकांच्या शेजारी राहत आहेत परंतु कुठल्यातरी वर्गवारी नुसार या सर्व फुग्यांना वेगळं ठेवण्यासाठी वातावरणाचा पातळसा पडदा यांच्या भोवताल निर्माण केला गेला आहे आपल्या वाट्याला आलेला हा पडदा ओलांडून पाहता येईल एवढी तीक्ष्ण आणि शक्तिशाली नजर त्याने सर्वांनाच दिलेली नाही. किंवा सर्वांनाच दिलेली असूनही आपण आपल्याच शक्तीपासून अजूनही अनभीज्ञच आहोत.

हेच उदाहरण आपण मधमाश्यांच्या पोळा प्रमाणे सुद्धा घेऊ शकतो. वेगवेगळ्या विश्वात राहणारे लोक म्हणून ….

किंवा असं बघा दोन समांतर बांधलेल्या धाग्यांवरून एकाच वेळी दोन मुंग्या प्रवास करत असतील एकाच दिशेने एकसारख्या वातावरणात आणि एकाच गतीने तरीही प्रत्येकीला निव्वळ आपलाच मार्ग तिच्या आवाक्यात असेल तेवढंच विश्व दिसत असतं.
पण आपल्यासारखाच एखादा जीव आपल्यासारख्याच एखाद्या विश्वात अगदी आपल्यासारख्याच गतीने एकाच वेळी प्रवास करत असेल हे तिच्या ध्यानी मनी सुद्धा नसतं ……… असंच काहीसं हे असावं.

महाभारत किंवा रामायणात काय झाले ते कितपत खरे याबाबत वाद आहेत,

मितीचे म्हणाल तर ...............
१) विज्ञानाच्या दृष्टीने तीन मिती ) ३ डायमेंशन आहेत (तीन दिशा ) , ज्यांचा उपयोग विश्वातील एखाद्या वस्तूचे स्थान निश्चित करण्यासाठी होतो, यातही वेळ याला चौथे डायमेंशन म्हणता येईल कारण एखादी वस्तू विशिष्ट वेळी या तीन डायमेंशन सांगत असते ती दुस-या वेळी वेगळ्या तीन डायमेंशन सांगू शकेल....
( हा प्रामुख्याने गणितीय दृष्टीकोन)

आपला मुद्दा मिती आणि मितीबदल हा भावनिक असावा
जसे माणूस चंद्रावर गेला तरी तो दुस-या मितीत गेला नाही तो आहे तसाच जगतोय ......
मात्र रोजच्या वातावरणातून जर तो पुर्णपणे बाहेर पडला असेल तर तो मितीबाहेर पडला (जस स्वप्न पाहताना आपण एका वेगळ्या जगात असतो तेथे कोणतीही गोष्ट कशीही होऊ शकते ( मॅट्रीक्स नावाचा सिनेमा पहा ज्यात माणूस एका जगातून दुस-या जगात जाऊन उचापत्या करतो हे दाखवले आहे)

मिती किती किंवा कशा याला कोणताही आधार नाही ( असल्यास मला माहित नाही) , मानवाला देवानी दिलेली बुद्धी आणि मन यांना कधीकधी मानवाचीचे चेष्टा करुशी वाटते त्यातूनच भूत,स्वप्न इ गोष्टी चालू असते.

मी रोज योगाभ्यास करतो. कधीकधी प्राणायाम करताना शरीर हलके होऊन आपला देह जणू नाहीच असा भास होतो. आपण एक ज्योत होऊन कुठेतरी फिरतो आहे असे वाटते. तो आनंद काहीतरी वेगळाच असतो. तीही एक मिती म्हणायला हवी.

खरे म्हणजे आपण फार भौतिक पातळीवर जीवनक्रम करत आहेत. एकदा भौतिक जगण्यातून बाहेर पडलो की खूप काही अविष्कार घडू शकतात. पण मायेत आपण अडकलो आहोत.

धागा खूपच छान आहे. असाच धागा माझ्या मनात होता कित्येक दिवसांपासून. धन्स.

प्रथम प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार...

बरेच नवीन नवीन विचार ऐकायला मिळत आहेत.... पुरातन काळातील उदाहरण दिल्याने मला वाटत हि संकल्पना समजायला सोपी वाटते (तुकारामांचे वेकुण्ठ्गमन हि त्याच प्रकारचे असावे) .... मयीने पण फुग्याच उदाहरण दिलंय सोप्या शब्दात ..

अजून येऊ द्या मित्रानो....

>>>>> मानवाला देवानी दिलेली बुद्धी आणि मन यांना कधीकधी मानवाचीचे चेष्टा करुशी वाटते त्यातूनच भूत,स्वप्न इ गोष्टी चालू असते. <<<<<<<
"बुद्धी व मन हे मानवाला देवान्नी दिलय" असे मानणे म्हणजे देखिल "बुद्धि व मनाने" केलेली मानवाची चेष्टाच, असेही काहीजण समजतात! Proud
असो.

या धाग्याला अनेक मिती लाभोत.

भारतीय संस्कृतीतील पुराणकथा कधी सत्यच होत्या असेही म्हणायचे , कधी म्हणायचे ती केवळ प्रतिके आहेत... हादेखील एक सोयीस्कर मितीबदलच असतो, हो ना हो लिंबुभाऊ?

एखादी गोष्ट खरी आहे कि नाही हे पाहण्यासाठी फक्त पंचेन्द्रीयांचीच कसोटी वापरायला पाहिजे असे नाही. इतर वैज्ञानिक कसोट्यांचा सुद्धा वापर करता येतोच ना ! उदा . डोळ्यांना दिसणारा प्रकाश हा इलेक्ट्रो-म्याग्नेतिक तरंगांचा छोटा भाग आहे . पण इतर तरंग लांबीच्या व डोळ्यांना न दिसणाऱ्या लहरींचे अस्तित्व वैज्ञानिक कसोट्यांवर सिद्ध झाले आहे.
तसेच मिती बाबत हि म्हणता येईल . जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत त्या फक्त कल्पनाच राहणार अहेत. मी लहानपणी ऐकलेले एक वाक्य - " सिद्ध होत नाही तोपर्यंत विश्वास ठेऊ नका , पण अविश्वास हि दाखवू नका." Happy

पाठीचा कणा ताठ ठेवून /पद्मासनात बसणे . दोन्ही हाताच्या बोटानी डोळे व कान बन्द करावेत ,व कानावर बोटानी थोडासा दाब द्यावा, आणि "ओम" चा दीर्घ उच्चार करावा किंवा येत असलेले सूक्त / मंत्र मोठ्या आवाजात म्हटल्यास काही वेळाने पिनियल ग्रन्थी उद्दीपित होवून "डायमेन्शन चेन्ज " चा अनुभव येतो ,असे मागे वाचलेले होते ...

बायनॉरल बीट्स किंवा ब्रेनवेव्ह थेरपी च्या आधारे देखील "डायमेन्शन चेन्ज " चा अनुभव येऊ शकतो. मात्र त्यासाठी आधी दुसरे एक बीट वापरून ब्रेन-ट्युनिंग करावे लागते ............

असो

रच्याकने ... रणथम्बोर जी , सदस्यता कालावधी ५ वर्षे ३० आठवडे .आणि लेख एकच ? हे कसे काय?

<<<<<
Mandar Katre | 5 April, 2014 - 17:16

रच्याकने ... रणथम्बोर जी , सदस्यता कालावधी ५ वर्षे ३० आठवडे .आणि लेख एकच ? हे कसे काय?
>>>>>

मंदार - बाकीचे लेख त्यांनी दुसऱ्या मितीत लिहिले असतील Happy
ते वाचायला त्या मितीत जावं लागेल तुम्हाला Happy

>>>>>रच्याकने ... रणथम्बोर जी , सदस्यता कालावधी ५ वर्षे ३० आठवडे .आणि लेख एकच ? हे कसे काय?

Happy Happy

अहो मधल्या काळात फक्त मा बो वर येउन जायचो .... जास्त वेळ पण नसायचा ... आता थोडा वेळ मिळत आहे म्हणून....

आणि माज्या ५ वर्षाचा आणि निवडणुकीचा काही संबंध नाही बर का !!! Happy

>>>>"बायनॉरल बीट्स किंवा ब्रेनवेव्ह थेरपी च्या आधारे देखील "डायमेन्शन चेन्ज " चा अनुभव येऊ शकतो. मात्र त्यासाठी आधी दुसरे एक बीट वापरून ब्रेन-ट्युनिंग करावे लागते "

पण जो काही अनुभव येयील तो मिती बदलाचाच आहे हे कसं ठरवायचं??

"हौ इंटरेस्टिंग!!'

म्हणजे मला 'संदर्भांकित विषय' अन आमच्या (तांत्रिक) क्षेत्रातील माझ्या द्रुष्टिकोणातून दिसणार्‍या साम्यांविषयी म्हणतोय....

जरा खुलासा करतो!

आमच्या क्षेत्रात 'बि. आय. एम.' नावाचा प्रकार आहे.त्यात 'आजमितीला' ७-डी पर्यंत माहितीचा प्रकार आहे. अधीक माहितीकरिता दुवा:

http://wplpublishing.typepad.com/.a/6a0115704f0347970b016304c1029f970d-8...

प्रत्येक 'लेव्हल' ला एक नविन मिती अन त्यासंदर्भातील माहितीचे अवगुंठन असते(? म्हणजे प्रत्येक नवीन मितितली माहिती ह्यापुर्विच्या मितींची माहिती आपल्या पोटात धारण करते...पण स्वतंत्रपणे अस्तित्त्वात असते)

मूळ मुद्दे आणि उत्तरे मांडायचा प्रयत्न करतो -

१) आपण राहतो ती एक मिती आहे ... आणि याशिवाय अंतराळात अनेक मिती असतात पण त्याचा वापर करण्याचे ज्ञान अद्याप आपल्याला झालेले नाही...

कहीसे बरोबर. बाकी मिती आहेत (केवळ गणिताने सिदध केलेल्या). त्यापलिकडे काहिही प्राक्टिकल नाहिये.

२) UFO किवा Alien ज्या वाहनातून / यानातून प्रवास करतात ती वेगळी मिती आहे ... म्हणून आपण त्यांना कधीच गाठू शकत नाही ...
UFO /Alien ह्या थियरी आहेत. त्यामुळे ते कसे प्रवास कर्तात, हाही एक तर्कच असेल.!

४) मिती बदलाचे अनुभव काही व्यक्तींनी घेतेले आहेत आणि त्याचे उत्तर अजून देत आलेले नाहीत... बर्मुडा Triangle ....
हा रेफरन्स कुठे मिळाला, जरा सांगाल का?

३) आणि५) एका मितीतून दुसर्या मितीत प्रवास -

हो. worm Holes/White Holes हे तर्क मांड्ले आहेत, पण ते आपल्याच मितीत एका (X,Y,Z) पासून दुसरया (X,Y,Z) बिंदूकडे जाण्यासाठी. अजून निरिक्षणाने काहिच सापडलेले नाही.

मिती म्हणजे डायमेंशन हे माहीत आहेच.
मल्टीडायमेंशन ही कल्पना प्रथम 'रीमान'ने मांडली.आणि ती सिध्दही करून दाखवली होती.

आपल्याला द्विमिती आणि त्रिमिती माहीत आहेच.तशात या तिनच्या पुढेही आणखी मिती असतील तर्?हीच रिमानची संकल्पना होती.
उदा.आइन्स्टाईन यांनी चौथी मिती टाईमच्या स्वरुपात मांडली.तशाच आणखीही parameters मध्ये मिती असू शकेल.
समजा एखाद्या सॉलीड वस्तूमधून आपल्याला आरपार जायचं आहे.किंवा एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी अदृश्य होऊन प्रकट व्हायचंय.यासारख्या गोष्टी करणयासाठी तीनपेक्षा जास्त मितींची आवश्यकता भासेल.अर्थात जो 3D मध्ये वावरत आहे त्याल हे शक्य होईल कां?..तर नाही असं म्हणावं लागेल.म्हणजे तीनपेक्ष्या जास्त मिती आपल्याकडे किंवा जो कोणी आहे त्याकडे असायला हव्यात.

उदा.समजा एखादा प्राणी आहे आणि त्याला दोनच मिती आहेत.समजा त्याची उंची शून्य आहे असं गृहीत धरू तर त्याच्या भोवती एखादं वर्तूळ काढलं आहे तर त्याला ते तुरूंगासारखं वाटणार.किंवा त्या सपाट प्राण्यासमोर दुसरा 3D प्राणी उभा केला तर त्याला फक्त त्याप्राण्याचे जमिअनीला स्पर्श करणारी पायांची कड दिसेल.तो पूर्ण प्राणी कसा आहे हे कहीच कळणार नाही त्याला.इकडेच त्याला बघण्यासाठी किंवा त्या तुंरूंगातून सुटण्यासाठी एक तिसरी मिती आवश्यक आहे.तशीच आपल्यालाही काही नवीन गोष्टी करण्यासाठी तीनापेक्षा जास्त मितींची आवश्यकता भसेल.

हेच ते चौथं डायमेंशन...त्याहूनही आणखी मिती असतील किंवा आहेत असं म्हणता येईल जेव्हा त्यांची वास्तवता समोर येईल.

हायपर क्युब आणि हिंटॉन बद्दल वाचायला पाहिजे म्हणजे या संकल्पना कळू लागतील.

(वरील संदर्भःअच्युत गोडबोलेंच्या एका लेखावरून)

मिती ही वेगवेगळ्या पॅरामिटर्स मध्ये असू शकते.म्हणजे वेगवेगळी काँबीनेशन्स असू शकतात.अंतर्मनाचा(जे खरेच अस्थित्वात आहे की नाही कोणास ठाऊक) यात काही संबंध नसावा.म्हणून भास्,स्वप्ने यांचाही संबंध मितीमधेय लावता येईल असं मला तरी वाटत नाहीये.परंतू जर एक मिती म्हणून त्यांचा वापर केला गेला तर कदाचीत काही रहस्य उलगडली जातील.अगदी अतर्क्य,अमानवीअय इ.

बाकी चर्चा चालू दे.अजून काही नवीन विचार यायला हवे होते इकडे.

मेंदूवर असणार्‍या ताणामुळे जर काही भास झाले किंवा इंट्यूशन्स किंवा सिक्स्थ सेंन्स वगैरे तर त्यांना कृपया मितीमध्ये आणू नये.मिती म्हणजे फक्त अंतर नसून ते एक Unit आहे असं म्हणता येईल.

"अमानवीय" या धाग्यावर थोडी चर्चा झाल्यावर जरा आता इथे अंग झाडून चर्चा करू..>>

कुणीकडे गेले सगळे डिबेटर्स?

मितीची गती मंद झाल्यासारखी वाटतेय...बादवे,कधी घड्याळ वेगाने जात आहे तर कधी ते नेहमीपेक्षा हळू सरकते आहे असे वाटते...यावर मितीचा उपयोग करून कोणी उलगडा करील काय?

अनुअभवस्वरूप प्रतिसादसुध्द्दा चालतील...

""""""""""""""""""""""""""""""""""""

Evrything In This World Is Science Based.

दुसर्या मितींमध्ये जाण्यासाठी विशिष्ट अध्यात्मिक पातळी गाठावी लागते . भौतिक शास्त्राने सिद्ध होण्यासारखी गोष्ट नाही हि

१) आपण राहतो ती एक मिती आहे ... >>>>> नव्हे. आपण तीन मिती वापरतो.
>>>>>आणि याशिवाय अंतराळात अनेक मिती असतात पण त्याचा वापर करण्याचे ज्ञान अद्याप आपल्याला झालेले नाही...>>>> असा कयास आहे.
२) UFO किवा Alien ज्या वाहनातून / यानातून प्रवास करतात ती वेगळी मिती आहे ... म्हणून आपण त्यांना कधीच गाठू शकत नाही ...>>>>> हे एक धमाल विधान आहे. त्यांना कधीच गाठू शकत नाहीत तर तुम्हाला या असल्या प्रकाराबद्दल माहिती कोठून मिळाली? त्यामुळे एकंदरीतच विचार करू जाता हे विधान धामालखोर आहे हेच खरे.
३) आपले सगळे भौतिक शास्त्राचे नियम (वेग /प्रकाशवर्षे / काळ) त्या मिती मध्ये चालत नाही ...>>>> मग काय चालते?
म्हणूनच हजारो प्रकाशवर्षे दूर असणार्या ग्रहावर आपण काही मिनिटात पोहचू शकतो ...>>>> या दोन विधानांचा एकमेकांशी नेमका काय संबंध असावा या विचाराने मला अंतर्मुख केले.
४) मिती बदलाचे अनुभव काही व्यक्तींनी घेतेले आहेत आणि त्याचे उत्तर अजून देत आलेले नाहीत... >>> अरेच्चा! अजून नाहीत तर मग अनुभव समजले कसे त्यांचे? हेहेहे… अजूनच धमाल!
बर्मुडा Triangle वरून जात असताना एका वैमानिकाला असा अनुभव आला कि .... नेहमीच्या रस्त्याने (आकाशातल्या) जात असताना अचानक एके ठिकाणी त्याचे विमान दाट ढगातून जाऊ लागले ..काही मिनिटानंतर (साधारण १० मीन) तो त्यातून बाहेर आला ...
पण त्या दरम्यान त्याचे ठिकाण दाखवणारी यंत्रणा बंद होती .... ढगातून बाहेर आल्यवर जेव्हा त्याने पहिले तेव्हा यंत्र परत चालू झालेले... आणि तो जिथे पोहोचला होता त्या ठिकाणी येण्य्साठी त्याला ५ तास लागले असते (नेहमीच्या रस्त्याने) ... त्याने इंधन तपासले तर ते पण कमी नव्हते झाले... तो बधिर अवस्थेत खाली आला आणि... काही दिवसानंतर या प्रसंगाचे कारण "मितीप्रवेश" होते असे सांगण्यात आले.>>>> अस्वल यांनी योग्य प्रश्न विचारला आहे. पोस्टकर्त्याने उत्तर द्यावे.
५)जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आइन्स्टयन (type करता येत नाही ) यांनी एकदा सांगितले होते कि आपल्या आजूबाजूच्या असणाऱ्या वातावरण अशी बरीच छिद्रे / मार्ग आहेत ज्यांतून आपण दुसर्या मिती मध्ये प्रवेश करू शकतो...>>>> अस्वल यांचे प्रतिपादन योग्य आहे. बाकी सगळा गोंधळ. विरंगुळा असला म्हणून काय झाले? काहीही खोटी विधाने वैज्ञानिक सत्य म्हणून दडपून सांगू नयेत.

सारिका->>>दुसर्या मितींमध्ये जाण्यासाठी विशिष्ट अध्यात्मिक पातळी गाठावी लागते . भौतिक शास्त्राने सिद्ध होण्यासारखी गोष्ट नाही हि>>>> मग ज्याने कशाने सिद्ध होईल त्याने सिद्ध करून टाका.

मिती हा शब्द तरी भौतिक आहे कि नाही? की तो देखील वेगळ्या शास्त्राशी संबंधित आहे?

Lol धमाल धागा. माझी भौतिकशास्त्राची पदवी वाया गेली. मी योग्य वेळी मिती बदलली असती तर या धाग्यावर निरूपयोगी ठरलेले भौतिकशास्त्र अभ्यासायची गरज नव्हती. Sad

.

चौथी मिती काय आहे हे सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतो आहे.

समजा आपण कारने घाटातून चाललो आहोत. रस्ता अरुंद आहे. आपल्या डाव्या बाजूला खोल दरी आहे. आणि समोरून मोठा ट्रक येत आहे. आता इथे पुढच्या क्षणी काय काय घडण्याच्या शक्यता आहेत?

१. आपली कार आपण थोडीशी डावीकडे घेऊ. तो ट्रक उजवीकडून आपल्या मागे निघून जाईल. आपण डाव्या बाजूने पुढे जाऊ.

२. आपण ट्रकला चुकवायच्या नादात कार जरा जास्तच डावीकडे घेऊ जिकडे खोल दरी आहे. आपण दरीत जाऊ.

३. डावीकडे खोल दरी आहे म्हणून आपण ट्रकला न जुमानता कार तशीच पुढे नेऊ. कार आणि ट्रक ची धडक होईल.

४. समोर ट्रक दिसल्यावर आपण काहीही न करता जाग्यावर ब्रेक मारून कार थांबवू. ट्रक उजवीकडून वाट काढत निघून जाईल.

५. समोर ट्रक दिसल्यावर आपण काहीही न करता जाग्यावर ब्रेक मारून कार थांबवू. ट्रकचालक गोंधळून जाईल. कार ला धडकेल.

६. समोर ट्रक दिसल्यावर आपण काहीही न करता जाग्यावर ब्रेक मारून कार थांबवू. ट्रकचालक गोंधळून जाईल. नियंत्रण न झाल्याने ट्रक दरीत जाईल.

पुढच्या क्षणांत तिथे काय काय घडू शकेल याच्या याव्यतिरिक्त आणखीन अनेक शक्यता आपल्याला सांगता येतील. अशा अनेक शक्यता चौथ्या मितीत एकाच वेळी अस्तित्वात असतात. पण प्रत्यक्षात मात्र त्यातील एकच शक्यता आपल्याला अनुभवता येते. कारण आपला मेंदू त्रिमितीय जगच अनुभवू शकतो. म्हणून चौथ्या मितीतील एकाच दिशेत (त्रिमितीय) जे काही अस्तित्वात आहे केवळ तेच आपल्याला अनुभवता येते. (जादा वाचनासाठी: ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ एर्विन श्रॉडिंगर यांच्या पुंजभौतिकीमधील "श्रोडिंगरचे मांजर" (Schrodinger's Cat) याविषयी जरूर वाचा)

द्विमितीय आणि त्रिमितीय उदाहरणाद्वारे स्पष्टीकरण:
तुमच्या आसपासची एखादी वस्तू घ्या. तिचा कोणत्याही एका भागाचा द्विमितीय प्रतलातील छेद विचारात घ्या. या द्विमितीय प्रतलात एक द्विमितीय जीव आहे अशी कल्पना करा. या जीवाला त्याच्या भवतालचे सगळे जग द्विमितीयच वाटेल. ती अखंड त्रिमितीय वस्तू त्याला अनुभवता येणार नाही. पण ते प्रतल त्या त्रिमितीय वस्तूमधून ज्या दिशेने पुढे जाईल त्यानुसार त्या जीवाचे अनुभव (द्विमितीय) वेगवेगळे राहतील. पण प्रत्यक्षात आपल्याला (त्रिमितीय जीवाला) मात्र त्या साऱ्या शक्यता एकाच वेळी पाहता येतात. हेच तत्व त्रिमितीय आणि चार मितीय जगांबाबत लागू पडते.

याबद्दल काय म्हणणं आहे? स्त्रोतः https://en.wikipedia.org/wiki/Observer_effect_%28physics%29

When discussing the wave function ψ which describes the state of a system in quantum mechanics, one should be cautious of a common misconception that assumes that the wave function ψ amounts to the same thing as the physical object it describes. This flawed concept must then require existence of an external mechanism, such as the mind of a conscious observer, that lies outside the principles governing the time evolution of the wave function ψ, in order to account for the so-called "collapse of the wave function" after a measurement has been performed. But the wave function ψ is not a physical object like, for example, an atom, which has an observable mass, charge and spin, as well as internal degrees of freedom. Instead, ψ is an abstract mathematical function that contains all the statistical information that an observer can obtain from measurements of a given system. In this case, there is no real mystery that mathematical form of the wave function ψ must change abruptly after a measurement has been performed.

तुम्ही पुढे डोमा स्मायली का टाकली? त्यावरुन तुम्ही गमतीने म्हणताय हे दिसून येते, म्हणुन आता मराठीत अनुवाद करुन लिहित नाही.
अन्यथा लिहिले असते. Wink

नाही. भाषा वैज्ञानिक आहे म्हणून तुम्हा दोघांना म्हणालो की "मराठी" मधे लिहा.

अतुल पाटील आणि तुम्ही माहीती चांगली दिली आहे पण समजायला पटायला फार अवघड आहे.
अतुल पाटीलांचे उदा. ने अजुन गुंता वाढत आहे

>> तुम्हा दोघांना म्हणालो की "मराठी" मधे लिहा.

मी मराठीत लिहिलेले नाही?

>> अतुल पाटीलांचे उदा. ने अजुन गुंता वाढत आहे

हो. हा क्लिष्टच विषय आहे. म्हणून दोन प्रकारे सांगायचा प्रयत्न केला आहे. चौथ्या मितीत, एकाच वेळी आपण दरीत पण पडलो आहोत. पुढे पण जात आहोत आणि जाग्यावर पण थांबलो आहोत हे तिन्ही अस्तित्वात असते. हे कल्पना करायला अवघड आहे. कारण आपण त्रिमितीय जीव आहोत. म्हणून प्रत्यक्षात आपल्याला त्यातील एकच अनुभवता येते. म्हणून पुढे द्विमितीय जीव त्रिमितीय वस्तू कशा अनुभवेल याचे उदाहरण दिले आहे. जेणेकरून तेच तत्व त्रिमितीय आणि चार-मितीय गोष्टींना लागू करून पाहता येईल.

एकाच वेळी आपण दरीत पण पडलो आहोत. पुढे पण जात आहोत आणि जाग्यावर पण थांबलो आहोत हे तिन्ही अस्तित्वात असते. >>
जरा स्पष्ट करा.
तुम्ही पडला म्हणजे तुम्हाला गती मिळाली आहे. गती मिळाल्यामुळे तुम्ही पुढे जात आहे. पुढे जात आहे तर तुम्ही "स्थिर" कसे म्हणू शकतात?
मी ट्रेन मधे स्थिर बसलोय आणि ट्रेन चालत आहे. पण माझ्या शरीराला तर गती मिळत आहे. कारण ट्रेन ने जर अचानक ब्रेक लावला तर माझे शरीर स्थिर असून सुध्दा पुढच्या बाजूस जाऊन आदळेल.
हे सगळे त्रिमितीमधे घडते

>> गती मिळाल्यामुळे तुम्ही पुढे जात आहे. पुढे जात आहे तर तुम्ही "स्थिर" कसे म्हणू शकतात?

चौथी मिती म्हणजे काळ. जो आपण त्रिमितीय जीव एकाच "वेळी" मागचा व पुढचा न अनुभवता केवळ वर्तमान अनुभवू शकतो. जसे द्विमितीय जीव फुटबॉल म्हणजे मोठे होत जाणारे वर्तुळ अशा रुपात अनुभवेल. पण त्यांना एकाच वेळी पूर्ण फुटबॉल आपल्यासारखा अनुभवता येणार नाही. तसेच चौथ्या मितीत जगणाऱ्यांना सध्या आपण ज्याला "काळ" म्हणतो तो अस्तित्वात नाही. त्यामुळे आपण ज्याला गती म्हणतो ती पण तिथे अस्तित्वात नाही. चौथ्या मितीत, सध्या आपण ज्याला भूत-वर्तमान-भविष्य असे संबोधतो ते एकत्रच अस्तित्वात असते. म्हणूनच ज्या काही शक्यता असतात (गतीने जाणे, थांबणे वगैरे जे आपल्यासाठी कालसापेक्ष आहे) त्या चौथ्या मितीत एकत्रच पाहता येतात.

दीपस्त, ओके.

अतुल पाटिल, तुम्ही सांगताय ते क्वांटम मेकॅनिक्सचे Multi-Worlds Interpretation आहे ना? त्या साठीच मी वर लिंक आणि त्यातिल उतारा दिलाय.

शेवटी ते एक Interpretation आहे.

>> अतुल पाटिल, तुम्ही सांगताय ते क्वांटम मेकॅनिक्सचे Multi-Worlds Interpretation आहे ना?

बरोबर

>> शेवटी ते एक Interpretation आहे.

क्वांटम मेकॅनिक्सची दोनच प्रकारची Interpretations आहेत (माझ्या माहितीनुसार) एकामध्ये "निरीक्षणामुळे होणारे Wave function collapse" गृहीत धरले जाते ज्यामुळे केवळ एकच शक्यता अस्तित्वात असते असे मानले जाते. याउलट दुसऱ्या प्रकारात (Multi-Worlds Interpretation) Wave function collapse गृहीत धरलेले नसून सगळ्या शक्यता अस्तित्वात असतात असे मानले आहे.

Pages