सर्दी

Submitted by वृष on 18 February, 2014 - 04:59

नमस्कार मन्डळी,
मी मायबोली ची नवीन सदस्य... माझा मुलगा ९.५ महिन्याचा आहे. त्याला बर्याचदा सर्दी असते. थोदे दिवस चान्गले गेले कि परत सर्दी खोकल्याने हइराण होतो बिचारा..... काही घरगुती उपाय आहेत का यासाठी? मी कालच त्याला कुमारी आसव चालु केले आहे. (आजेसासून्चा अनुभव.... नवर्याला दिले होते लहानपणी)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जवस अथवा ओव्याच्या पुरचु॑डिने छातिवर आणी पाठीवर हलके-हलके शेकावे. अ॑गात शक्यतो छातिला उब मिळतिल अशे कपडे घालावे. जर धुरि देत असाल तर त्यात लसणाच्या पाकळ्या घाल्याव्यात.
आ॑घोळि न॑नतर टाळुच्या भागावर थोडी वेख्॑ड पुड लावावी.
तुम्ही बाळाला गुटी देताक? देत असल्यास कुठली देता?
कुमारी आसव : - बाळ अजुन लहान आहे त्या मुळे काढ्यासारखी औषधे डोक्टरच्या सल्यानेच द्या.

मोठ्यान्च्या सल्ल्याने बाळगुटी देत जा. त्यातले बेहेडा, ज्येष्ठमध, सुन्ठ व वेखन्ड ही औषध सहाणेवर पाण्यात थोडे उगाळुन मधातुन चाटव. अन्घोळ झाल्यावर वेखन्ड, ओव्याची धुरी दे. अन्गाला, छातीला, तळहाताला व तळपायाला वेखन्डाची सुकी पावडर चोळत जा. घरात सुद्धा कान झाकुन ठेवावे. सध्या सगळीकडे थन्डी आहे, बाहेर वार्‍यावर नेऊच नको.

सुन्ठ थोडी उष्ण असल्याने सासुबाई किन्वा आईला विचारुन त्याचे गुटीतले फेरे वाढव.

कुमारी आसव बद्दल विचारले आहे. गुटि चालु केली होती पण डॉ. चे म्हणणे की सर्दी ची औशधे चालू असताना इतर suppliments थांबवा. आणि ती इतकी continue असतात की सर्व suppliments बन्द झाले. Sad
बाकी उपाय चालु असतात. लसणीच्या पाकळ्या माहित नव्हत. करून बघेन.

आडुळसा > डॉ च्य सल्ल्याने

ओव्या चे उकळुन गार केलेले पाणी प्या

तुमचे वास्तव्याचे ठिकाण कुठले आहे? तिथे खूप प्रदुषण वगैरे आहे का? तुमच्या मुलाला होणारी सर्दी ही 'सर्दी-पडसं'पैकी सर्दी आहे, की अश्या एखाद्या बाह्य कारणामुळे आहे याची खातरजमा करून घ्या. माझ्या मुलाला लहानपणी सतत सर्दी-खोकला व्हायचा. मी बरेच दिवस वर दिलेली सर्व औषधं द्यायचे. मग लक्षात आलं, की आम्ही रहायचो तिथे रासायनिक कारखान्यांचं अती जास्त प्रदुषण होतं आणि मुलाला त्यापायी सर्दी-खोकला होत होता. त्याला ही औषधं काहीही कामाची नव्हती. एकदा हे लक्षात आल्यावर त्या दृष्टीने उपाययोजनांची दिशा बदलली.

निर्झरा यांनी सांगितलेच आहे.
बाळाला स्नान घालताना तेलमॉलिश करत असालच. स्नानानंतर त्याच्या तळपायाला, तळहाताला, छातीला थोडीशी कोरडीच वेखंडाची पावडर चोळावी. त्याचे कारणच मुळी सर्दी होऊ नये हेच असते.

गरम कपडे घालावेत हे बरोबरच. त्यासाठी आम्ही केलेली सोपी युक्ती सांगते. इतक्या लहान वयातील बाळं स्वेटर घातलं की इरिटेट होतात. घालू देत नाहीत. एखादी टाकाऊ पँट असतेच. कोणाची ना कोणाची तरी. घरगुती टेलरकडून त्याचे बाळासाठी अंगाच्या मापाची बिनबाह्याची बटनाची जॅकेटस शिवून घ्यावीत. आठवणीने जॅकेटसना कॉटनाच्या ओढणीचे अस्तर लावावे. कॉटनला उब असते. बाळं मजेत घालतात. टोपीलाही तेच अस्तर लावावे.

बाळाच्या छातीला शेक देण्याआधी अगदी कोमट तेलाने मॉलिश केल्यास शेक चांगला बसतो. ओव्याच्या शेकाचा फायदाच होतो. उन्हाळ्यात मात्र तिळाचे तेल फारसे वापरत नाहीत. कारण ते उष्ण असते. त्यामुळे वैद्यांच्या किंवा घरातील ज्येष्ठांच्या सल्ल्याने तेल वापरावे.

धन्यवाद सगळ्यांनाच..... यातल्या बर्याच गोष्टी चालु असतात.... वास्तव्य आमची मुंबई च..... तरीही आम्ही राहतो तो एरिया जरा आत असल्याने प्रदुषण बरेच avoid होते.

पँट च्या जॅकेट ची कल्पना सहीच एकदम..... लग्गेच उपयोगात येईल.... थँक्यू सो मच.... Happy

वेखंडाच्या पावडरीनी पण सर्दी बरी होते. छाती, तळपाय, पाठ, Temple (मराठीत काय म्हणतात? अक्कल असते किंवा नसते तिथे Happy ) चोळावी.

निलगिरीचे तेल अंगाला लावायच्या ऐवजी उशी, ड्रेसवर एखाद-दोन थेंब टाकावेत, तेवढे पुरतात.

अ‍ॅलर्जी असेल तर डॉक्टरना विचारुन अ‍ॅलर्जी मेडीसीन्स द्या.
शर्टच्या आत स्लीवलेस मऊ थर्मल घालू शकाल. बॉडी केअर वगैरे चांगल्या प्रतीचे.