छायागीत ५ - तु इस तरहा से मेरी जिंदगी में शामिल है...

Submitted by अतुल ठाकुर on 27 February, 2014 - 22:38

Aap-To-Aise-Na-The.jpghttp://www.youtube.com/watch?v=g7VJ8AF6u3k

दिल देके देखो, शबनम सारखे जबरदस्त चित्रपट देणार्‍या उषा खन्नाला हिन्दी चित्रपटसृष्टीने संगीतकारांच्या पहिल्या फळीत स्थान दिलेच नाही. येथील यश, अपयश, संधी यांचे काय गणित आहे ते कळत नाही. पुढे उषा खन्ना आपले पती सावनकुमार टाक यांच्या चित्रपटांना संगीत देत राहिल्या. त्या चित्रपटांचा जरी विशिष्ठ प्रेक्षकवर्ग होता तरी त्या चित्रपटांच्या मर्यादादेखिल होत्या. उषा खन्ना यांचे संगीत देखिल त्या चित्रपटात पुर्वीसारखे बहरुन निघाले असे फारसे झाले नाही. पुढे ही महिला संगीतकार उपेक्षेच्या अंधारातच राहिली. मला तरी यामागे संगीत क्षेत्रातील पुरुषी वर्चस्व हे एकमेव कारण वाटते. यावर लगेच लताचे उदाहरण देता येणार नाही. गाण्याच्या क्षेत्रातील हिशोब वेगळे होते. मात्र "तेरी निगाहोंपे मर मर गये हम", "ये तेरी सादगी", मैने रख्खा है मोहोब्बत" सारखी गाणी देणारी उषा खन्ना पुढे प्रकाशझोतात आली नाही हे खरे आहे.

तर अशा कलाकाराने आपल्या संगीतकारकिर्दीच्या अगदी अखेरच्या टप्प्यात "आप तो ऐसे न थे" या चित्रपटात "तु इस तरहा से मे री जिंदगी में शामिल है" सारखे गाणे दिले. मला आठवतंय, उषा खन्नाच्या एका मुलाखतीत रफी हे गाणे गाताना आनंदुन गेल्याचं तिने नमुद केलं होतं. रफी च्या पुनरागमचा तो काळ होता. मात्र पुन्हा मिळु लागलेले यश रफीला पाहता आले नाही. त्याचे अचानक निधन झाले. उषा खन्नाच्या कारकिर्दीचा तर तो शेवटचाच टप्पा होता. एक काळ गाजवलेले दोन्ही कलाकार एकत्र आले होते.

चित्रपट बर्‍यापैकी होता. मात्र कलाकारांकडे स्टार व्हॅल्यु नव्हती. राज बब्बर, दिपक पराशर, रंजिता हे रसायन काही पहिल्या फळीतले म्हणता येणार नाही. मात्र अशी अनेक उदाहरणे हिन्दी चित्रपटसृष्तीत घडली आहेत जेव्हा चित्रपट आणि अगदी त्यातील कलाकार देखिल विस्मृतीत गेले पण गाणी लोकप्रिय झाली. लोकांच्या आठवणीत राहिली. हे गाणे याच धर्तीचे आहे. उषा खन्नाने बहारदार चाल दिली आहेच. निदा फाजलीचे शब्ददेखिल सुरेखच. विशेषतः शेवटचे कडवे म्हणजे कळसच आहे.

तेरे जमाल से रोशन है कायनात मेरी
मेरी तलाश तेरी दिलकशी रहे बाकी
खुदा करे के ये दिवानगी रहे बाकी
तेरी वफा ही मेरी हर खुशी का हासील है

रफीचा आवाज ऐकुनच कळुन येते कि गाणे गाताना त्याला किती आनंद झालाय. अगदी खुशीत गायिलेले गाणे आहे. त्याचा लागलेला स्वर प्रेयसीवर फिदा झालेला प्रियकर डोळ्यासमोर उभा करतो. उषा खन्ना आणि रफी यांनी त्यांना मिळालेला शेवटचा चेंडु पार मैदानाबाहेर टोलवावा तसे हे गाणे आहे.

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतीशय सुंदर गाणे आहे ते. जाम आवड्ते. लांब कुठेतरी फिरायला जाताना अशी गाणी असावीत संग्रहात. खरय ते, उषा खन्ना खूप गुणी संगीतकार आहेत. पण नशीबाचा भाग आहे ना शेवटी.:अरेरे:

सौतनची गाणी पण काय छान होती.

माझ्याही आवडत्या गाण्यांपैकी एक. Happy
रश्मी, +१.

रच्याकने, हे गाणं तीन वेगवेगळ्या गायकांनी गायले आहे.(मला तिघांच्याही आवाजात आवडतं). Happy
१. मोहम्मद रफी
http://www.youtube.com/watch?v=2AvK7_s6Kds

२. हेमलता
http://www.youtube.com/watch?v=7Yha-6uZte0

३. मनहर उधास
http://www.youtube.com/watch?v=vjh20uFlzKI

अतुल....

महंमद रफी आणि त्यांचा आवाज सर्वार्थाने अमर आहेत हे तर त्यांच्या कोणत्याही गाण्याने सिद्ध होते; पण या लेखाच्या निमित्ताने तुम्ही उषा खन्ना यांचा जो उल्लेख केला आहे तो अतिशय सार्थ आहे. "दिल देके देखो" पासून त्यांची सुरू झालेली कारकिर्द पहिल्याच चित्रपटापासून गाजली हे खरे, पण ती सर्वार्थाने बहरली नाही. उषा खन्ना यानी जितके चित्रपट मिळविले त्यातील प्रत्येक गाजलेल्या गाण्यांनी रेडिओ आणि बिनाकात स्थान मिळविले. "सौतन" चित्रपटाच्या प्रचंड यशात उषा खन्नाच्या संगीताचाही सिंहाचा वाटा होता.

तुमच्या लेखातील गाणे ज्या चित्रपटात आहे तो मला पाहता आला नाही.....आता कारण सांगताच येईल असे नाही, पण कदाचित त्या कलाकारांमुळेही थिएटरकडे पावले वळली नसतील. म.रफी आणि हेमलता या दोघांनीही स्वतंत्रपणे गायलेली [स्लो आणि फास्ट टेम्पोमधील] गाण्यांनी खूप लोकप्रियता मिळविली होती हे स्मरते. त्यातही रफींच्या गाण्याविषयी तुम्ही जे समरसून लिहिले आहे त्यावरून तुमच्याही हृदयी या गाण्याला कोणते स्थान आहे ते उमजते. तब्बल ५ कडव्यांचे हे गाणे आजही तितकेच विलोभनीय वाटते, हे आत्ता पुनःप्रत्ययास आले.....थॅन्क्स टु यू.

माझ्या कानावर मनहर उदासने गायलेले गाणेच जास्त पडलेय. इतके की रफीने हे गाणे गायलेय हे आठवावे लागते आहे.

माझे अतिशयच आवडते गाणे आहे. पहिल्यांदा लहान असताना एकलेले. म्हणूनच बहुधा ज्यास्त आवडते असेल जसे वरती म्हटले तसे. मला लहानपणीचे दिवस आठवतात सर्व जण जेवत छायागीत बघताना.

सुंदर अर्थ व कडवं असलेले. प्रेमात असताना गुणगुणावेसे वाटेल असे. Happy

तु पास हो या फिर भी... हि ओळ एकदमच कातिल आहे(तश्या सर्वच ओळी ह्या गाण्यातील)

.

माझ्या कानावर मनहर उदासने गायलेले गाणेच जास्त पडलेय.>>>>>भरत, नेमकं याच्या उलट माझं. मी हे गाणं नेहमी रफीच्याच आवाजात ऐकलंल. मनहर (लूटे कोई मन का नगर, आपसे हमको बिछडे हुए इ. इ.) आणि हेमलताची (अखियोंके झरोकोंसे, ले तो आये हो हमे सपनो के गांव, खुशिया हि खुशिया, मेहबूब कि मेहंदी हाथोंमें इ. इ.) गाणी आवडत असल्याने जेंव्हा त्यांच्या आवाजात ऐकलं तेही तितकंच आवडलं. Happy

हे माझे फेवरेट गाणे आहे,

तु इस तरह से मेरी जिंदगी मे शामिल है..........
जहा भी जाउ ये लगता है तेरी मेहफील है...