क्लाऊड किंवा बिग डेटा सर्टिफिकेशन केलेले कोणी आहेत का इथे?

Submitted by स्वप्ना_राज on 14 February, 2014 - 03:09

CompTIA चं Cloud certification करायचंय. क्लासरूम ट्रेनिंग करायलाच हवं का सेल्फ स्टडी चालेल? भारतात परीक्षेचं व्हाऊचर कसं मिळवायचं? कोणाला काही माहिती असेल तर पोस्टाल का प्लीज? धन्यवाद! Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्लाउड कोंप्युटिंग वर भारताच्या आय टी कमिश्नरने काही उपयुक्त माहिती दिली आहे. इथे पहा:

http://www.youtube.com/watch?v=2IhyGOL7Wo4

अगदी सोप्या रीतीने सर्व समजावून सांगितले आहे. जरूर पहा.
विग्यान का कमाल!!

धन्स झक्की, नक्की चेक करेन.

स्पार्टाकस, टेराडेटाची वेबसाईट चेक केली मी. पण हे vendor specific certification झालं ना? Job Hunting च्य दृष्टीने vendor specific certification करावं का general certification (CompTIA सारखं)? तसंच टेराडेटाच्या सर्टिफिकेशन ट्रॅक्सच्या परिक्षांच्या शुल्काबद्दल काहीच माहिती मिळाली नाही. काही कल्पना आहे का?

स्वप्ना,
जॉब हंटींगच्या दृष्टीने जनरल पेक्षा व्हेंडर स्पेसीफिकेशन असलं तर कधीही चांगलं. टेराडेटा अपाचे हडूप सर्टीफिकेशन ऑफर करत आहे सध्या. डिटेल्स चेक करुन सांगतो.

रिया,
टेराडेटा कॉर्पोरेशनमध्येच गेले सहा वर्ष डबा ( डी.बी.ए.) आहे.
happy.gif

स्पार्टाकस, खूप खूप धन्यवाद. मला Teradata 14 Certified Master मध्ये इन्टरेस्ट आहे. ह्या सर्टिफिकेशनसाठी सेल्फ स्टडी करुन परिक्षा देता येतात का? सर्व परिक्षा मिळून साधारण किती खर्च येईल? ही माहिती हवी होती.

>>अपाचे हडूप सर्टीफिकेशन ऑफर

हे डेव्हलपमेन्टचं सर्टीफिकेशन आहे का?

सॉरी खूप प्रश्न विचारतेय पण ह्यावर माहिती देणारं कोणी भेटत नाही. Sad पुन्हा एकदा मनापासून आभार Happy

स्वप्ना,

तू टेराडेटावर आधी काम केलं आहेस का ? असेल तर मग तुला बेसीक कन्सेप्टपासून ट्रेनींगची गरज नाही.
टेराडेटाव्यतीरिक्त कोणत्या डेटाबेस वर काम केलं असल्यास कमीत कमी डेटाबेस कन्सेप्ट्स माहीत असतील.

माझ्या माहीतीप्रमाणे मुंबईत टेराडेटाचं ऑफीशियल ट्रेनींग कुठेल्याही इन्स्टीट्यूट मध्ये (एन.आय.आय.टी वगैरे) होत नाही. टेराडेटा कॉर्पोरेशन आपल्या एम्प्लॉईजला इनहाऊस ट्रेनींग आणि ट्रेनींग मटेरियल देते. त्याचबरोबर कॉर्पोरेर्ट ट्रेनींगही घेतली जातात.

टेराडेटा 14 Masters साठी एकून ७ पेपर्स आहेत. सामान्यतः प्रत्येक पेपरची १५०-२०० डॉलरच्या रेंजमध्ये किंमत आहे. त्या दृष्टीने विचार केलास तर सुमारे १०००-१२०० डॉलर्स किंवा धर्मांतर केल्यावर ७० ते ७५ हजार रुपये पडतील. टेराडेटा १२ मास्टर्स असल्यास एक ब्रिज पेपर देऊन मास्टर्स अपग्रेड करता येतं. V2R5 मास्टर्स असल्यास सर्व पेपर पहिल्यापासून द्यावे लागतात.

स्वतः अभ्यास करून परिक्षा देण्यास हरकत नाही, परंतु आवश्यक मटेरियल मिळवणं कठीण आहे.

अपाचे हडूप ची माहीती मिळाली की कळवतो.

स्वप्ना,
टेराडेटाचे बेसिक्सपासून पेपर दिलेले केव्हाही चांगले. मुंबई, पुण्याचे माहीत नाही पण हैद्राबादला अमीरपेटमध्ये टेराडेटाचं मटेरियल मिळणे कठीण नसावे. फक्त मटेरियलवर विसंबून राहतायेत नाही. टेराडेटाचे फोरम्स, knowledgebase जरूर जॉईन करावे. टेराडेटाच्या नेटवर असलेल्या प्रॅक्टीस एक्झाम्स टाईमर लावून प्रॅक्टीस करणे. तसेच फोरमवर जाऊन इतरांचे प्रश्न सोल्व्ह करण्याची आणि आपली शंका विचारण्याची सवय ठेवणे. जर C programming मध्ये interest असेल तर उत्तम.
जर एम्प्लोयी पास झाले तर टेराडेटा एक्झामफी रीइम्बर्स करते. तसेच त्यांचे मटेरियल विनामुल्य अक्सेस करायला मिळते. ह्या एक्झाम जर टेराडेटा जॉईन करून मग देता आल्या तर अर्थातच फायदा होइल.

चिन्नु,
तू टेराडेटा मध्ये आहेस / होतीस काय ?

मी सर्व पेपर टेराडेटा जॉईन झाल्यावर दिलेत. अर्थातच फुकटात wink.gif

मी सध्या टेराडेटावर काम करतेय आणि सर्टिफिकेशन करायची इच्छ आहे पण योग्य मटेरिअल नाहीये जवळ
कंपनीचं यू पास वी पे स्किम आहे.
आधी ३४ हजार भरायचे आणि आपण पास झालो तरच कंपनी परत देणार. त्यामुळे जरा भिती वाटतेय.
काही मटेरिअल प्रोव्हाईड करू शकाल का बेसीक? प्लिज

रिया., तू जर टेराडेटा कंपनीमध्ये काम करत असशील तर तुल मटेरियल अक्सेसिबल असायला हवे. नसेल तर कंपनी HR कडे चौकशी करून बघ. माझी आधीची पोस्ट फॉलो केलीस तर नक्की पास होशील. खूप प्रक्टीस एक्झाम द्यायच्या.

स्पार्टाकस, चिन्नू, मी टेराडेटावर काम केलेलं नाहिये. पण डेटाबेसचे फन्डे (नॉर्मलायझेशन मध्ये थोडी गोची आहे ती सोडल्यास Happy ) माहित आहेत.

मला नक्की काय हवंय ते थोडक्यात सांगते. तीच रिक्वायरमेन्ट इथे आणखी कोणाची असेल तर त्यांनाही फायदा होईल आणि डिस्कशन करता येईल म्हणून. मी प्रोजेक्ट मॅनेजर आहे - जावाचे प्रोजेक्टस मॅनेज करते. पण मला जॉब चेन्ज करायचा आहे. क्लाऊड टेक्नॉलॉजीचे किंवा बिग डेटाचे प्रोजेक्टस मॅनेज करायचे आहेत. पण chicken and egg situation आहे. आधी तसे प्रोजेक्टस मॅनेज केलेले नसल्याने तसा जॉब मिळणं कठिण आणि तसा जॉब मिळत नाही म्हणून एक्सपिरियन्स नाही अशातली गत आहे. म्हणून सर्टिफिकेशन करायचं आहे.

तुम्ही म्हणताय त्यावरून टेराडेटा सध्या करण्यात पॉइन्ट नाही असं दिसतंय. पण simplilearn चे CompTIA चं कोर्सेस फार जनरल वाटतात. त्यामुळे मी खरंच गोंधळलेय. Sad

स्वप्ना, क्लाउड चे 'कोर्सेस' हा प्रकार मी पहिल्यांदाच ऐकला. आत्तापर्यंत फक्त सेल्सफोर्स ई चे पाहिले आहेत. क्लाउड मधे IaaS (Infrastructure as a Service), PaaS (Platform), आणि SaaS (Software) असे ढोबळ तीन प्रकार आहेत. हे कोर्सेस त्यातील कशाबद्दल आहेत?

या कंपनीचे नाव अमेरिकेत तरी फारसे ऐकले नाही. कदाचित भारतात मान्यता असेल. या क्षेत्रातील अनेक कंपन्या त्याला मान्यता देत आहेत का तेवढे कन्फर्म कर.

>>क्लाउड मधे IaaS (Infrastructure as a Service), PaaS (Platform), आणि SaaS (Software) असे ढोबळ तीन प्रकार आहेत.

हो, हे बरोबर आहे. आजच्या hot technologies म्हणजे ज्याला SMAC म्हणतात ते - Social, Mobile, Analytics, Cloud. टेराडेटा चं सर्टिफिकेशन हे Analytics/Big Data ह्यातलं व्हेन्डर स्पेसिफिक सर्टिफिकेशन आहे. क्लाऊड चं म्हणशील तर मी वर म्हटलं त्याप्रमाणे CompTIA ची सर्टिफिकेशन्स आहेत. पण ती फार जनरल वाटतात मला. तसंच त्यांचं इन्डस्ट्री मध्ये किती वजन आहे तेही ठाऊक नाही.

>>या क्षेत्रातील अनेक कंपन्या त्याला मान्यता देत आहेत का तेवढे कन्फर्म कर.
इथेच तर प्रॉब्लेम आहे. कसं कळणार? नौकरी, LinkedIn वर जॉब्ज पोस्टिंग मध्ये काही माहिती मिळत नाही.

माझ्या नवर्‍याला 'बिग डेटा' शिकायचं आहे, cloudera चा कोर्स कोणी केला आहे का ? इतकी - ६०,००० रू. का काहीतरी फी देऊन उपयोग होतो का ?