आजपासुन झी कॅफे वर "पॉयरो".. पहायला विसरु नका..

Submitted by mansmi18 on 25 November, 2013 - 08:41

नमस्कार

आजपासुन झी कॅफे वर रा ११:०० वाजता अगाथा क्रिस्टीचा डिटेक्टिव "पॉयरो" चे एपिसोड्स दाखवणार आहेत.
हे सगळे भाग युट्युबवर आहेतच पण टीव्हीवर पहायला आणखी छान वाटेल.

सी आय डी किंवा अदालत मधले बिनडोक भाग पाहुन कंटाळा आला असेल तर त्यावर उत्तम उतारा..

Enjoy!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी, रिपीट कधी असेल कोण जाणे, दिवसा बघायला मिळेल की नाही अश्या विचाराने काल बघितलाच. Happy
रोज असणार आहे की फक्त सोमवारी?

चेक केलं वेबसाइट्वर. रोजच असणार आहे, आणि रिपिट टेलीकास्ट सकाळी ११ वाजता असेल.

यूट्यूबवर आहेतच या माहितीबद्दल धन्यवाद. पॉयरो वाचूनही १७-१८ वर्षे झालीत. पुन्हा मजा येईल.

सकाळी ११ वा असणारे का? मला रात्रीपेक्षा तेव्हा वेळ काढता आला तर बघते

काल शेवटचा अर्धा तास पाहिला. Five Little Pigs दाखवत आहेत. पूर्वी हे सगळे भाग पाहिले असले तरी परत पहायला मजा येतेय

झकास Happy

फाईव्ह लिटल पिग्ज चालूअ आहे ना? सकाळी ११ वाजता पाहणं मला पण चालेले. रात्री अकरा म्हणजे खूप उशीर होतो. (आणि १०च्या स्लॉटला एकपण चांगली सीरील नाही सध्या जळ्ळं मेलं लक्षण!!!)

प्वारो.. पॉयरो नाही.

मला जास्त आवडणारे दोन म्हणजे - 'मर्डर इन मेसोपोटेमिया' आणि 'एलेफंट्स कॅन रिमेंबर'.. 'मर्डर इन मेसोपोटेमिया'मध्ये वापरलेलं पार्श्वसंगीत सुंदर आहे.

ही सिरियल अचानक थांबवलीये का? काल रात्री दुसराच कार्यक्रम ( द मेंटॅलिस्ट) सुरु होता. नेटवर मात्र अजूनही वेळापत्रकामध्ये काही बदल दिसत नाहीये

ते युट्युब वर होते पण बहुतेक कॉपीराईट मुळे काढलेत आणि जे आहेत ते भारतातुन दिसत नाहीत. इंग्लंड्/अमेरिका मधुन कदाचित दिसतील. काही भाग www.itv.com वर आहेत.. पण सेम प्रॉब्लेम..भारतातुन दिसणार नाहीत.
गूगल वर सर्च केले तर काही साईट्स आहेत ज्यावर ते एपिसोड्स आहेत पण व्हायरस इ. चा धोका आहे.