मुंबईतले सर्वात चांगले सी फूड रेस्टॉरंट कोणते?

Submitted by पाटील on 3 May, 2011 - 10:24

पार्ल्यात नेहमी खाण्या ची चर्चा रंगते त्यामूळे इथे योग्य उत्तर मिळायची अपेक्षा Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मासं अत्यंत लाडकं 'महेश लंच होम'. फोर्टला आणि जुहुला आहे. मी नेहमी फोर्टातल्या महेशला भेट देते. त्याच बरोबर तिथेच जवळ असलेलं 'अपूर्व'ही चांगले आहे. फोर्ट मार्केटजवळचे 'भारत रेसिडन्सी'ही छान आहे. दादरचे 'सिंधुदुर्ग' ओव्हरहाईप्ड वाटलेय - नेहमीच.

माझी आवडती रेस्टॉरंट्स त्याच क्रमाने
१. फ्रेश कॅच - माहीम - भंडार लेन च्या विरुड्ध बाजुला
२. हायवे गोमांतक - वांद्रे
३.हरिश - पार्ले (इर्ला)
४ मालवणी कालवण - ऑर्लेम
५.महेश- फोर्ट
६. समथिंग फिशी - MIDC अंधेरी
७.सायबा - वांद्रे
८.मॉडनॅ लंच होम - सायन
९. जयहिंद - परळ डेपो जवळचे

लालू, ते अनंताश्रम. गिरगावातलं. हो आता आताच म्हणजे गेल्यावर्षी बंद झाले. मस्त प्रकरण होते. तिथल्या मालकांना जेवण ताटात टाकलेलं अजिबात चालत नसे. माशांकरता ते प्रसिध्द असले तरी तिथे खाल्ली तशी लाल भोपळ्याची भाजी मी अजून खाल्ली नाहीये.

अनंताश्रम मधे तसाही जरा कडक

अनंताश्रम मधे तसाही जरा कडक कारभार असायचा. पण मालकांचं बारिक लक्ष असायचं सगळीकडे. माझ्या आवडत्या सी फूड रेस्टॉरंटमधे त्याचा पहिला नंबर! (आता बंद झाल्याने आणखी जास्तच "अरेरे" वाटते)

आजकाल सी फूड साठी नविन ठिकाणी जावेसे वाटत नाही (चांगले नसले आणि मासेच नकोसे वाटू लागले तर!!) पण तरी ही काही जुनीच ठिकाणे आणि तिथले आवडते पदार्थ... (क्रम नाहीये केवळ आठवले तसे.)

महेश लंच होम (फोर्ट) - महेश स्पेशल प्रॉन्स, कुठलीपण गस्सी आणि अप्पम. त्यांच्याकडे क्रॅब्स स्पेशल वीक वगैरे असेल तेव्हा खेकडे चुकवू नका.

तृष्णा - बटर पेपर गार्लिक टाईपचा कुठलाही प्रकार. इथले स्टारटर्स जास्त चांगले असतात मेन कोर्स पेक्षा असे मला वाटते.

गजाली - गजाली मधे बोम्बिल फ्राय!! हाय स्ट्रिटला जे गजाली आहे (होते?) तिथे एकदा फारच सही भरले पापलेट खाल्लेले पण पार्ल्याच्या गजाली मधे कायतरी वेगळेच देतात.

हायवे गोमंतक - अनेक वर्षांपुर्वी (बहुदा प्रॉन्सचं) किसमुरं म्हणून एक कोशिंबीरी सारखा प्रकार खाल्लेला. एकदम टेस्टी होतं! बाकी जेवण पण घरगुती आणि उत्तम असते.

गोमंतक (शिवाजी मंदीर समोरचं) - सुरमई पापलेट फ्राय, प्रॉन्स, सुरमई आमटी ई प्रकार आधी उत्तम मिळत मधे एक दोनदा गेल्यावर मला चव बदलल्या सारखी वाटली शिवाय नारळ पण बारिक नव्हता वाटलेला आमटीत.

याशिवाय बंद झालेल्यात विवा पश्चिम पण उत्तम होते. तिथे तिसर्‍या मस्त असायच्या.

हो, तेच. Sad बंद झाले.
परवा इथे वर्षूने टाकलेले पापलेटचे फोटो बघून तेच आठवले.
हह, मी तुला एक मत देते. अधिक माहिती दिल्याबद्दल.

विले पार्ले मधीलच इर्ला ब्रिज पासून पुढचं... कोकण आस्वाद... पापलेट फ्राय थाळी मस्त !
मालवणी पद्धतीचं हवं असेल आणि आजूबाजूच्या छोटेखानी गल्ल्या व थोडीफार अस्वच्छता नजरेआड करता येत असेल आणि थोडा वेळ चिंचोळ्या जागी रांगेत, वेटरची ताटे, थाळ्या शिताफीने चुकवत वाट बघणं जमत असेल तर... गोरेगाव मधील सत्कार!
दादरमधील शिवसेनाभवन च्या मागचं सायबिणी... भरलेलं पापलेट स्पेशालिटी... बाकी गजाली, गोमांतक... भारंभार रेट आणि पूर्वी चव घेतलेली असल्याने त्यामानाने खालावलेली क्वालिटी म्हणून ते नापास!

मी गेल्याच आठवड्यात जयहिंद मध्ये जेवले. नीर दोश्यासोबत सुरमई चिली नावाचा जो पदार्थ घेतला होता निव्वळ अप्रतिम होता. चव मन्गलोरीयन होती पण एकदम चविष्ट होता. सोबत भरले बोंबील, सोलकढी आणि कोलंबी पुलाव. आहाहा! आठवूनच तोंडाला पाणी सुटले.
वल्लरी, अचूक सांगता येणार नाही पण दादरवरून आम्ही taxi वाल्याला परळ डेपो सांगितलं आणि डेपोच्या जरा अलीकडेच उजव्या हाताला आम्हाला दिसलं हे जयहिंद लंच होम.

Ekach number lower parel chya kamala mills samorache jay hind. Aashita mhanat aahe tya jai hind pekshahi kititari uttam.

गिरगावातलं अनंताश्रम मस्तच होते.तिसर्‍या अफलातून असायच्या.
गोवंडीतलं नीलदुर्ग पण झकास होतं.तिसर्‍या/ कालवं कोशिंबीर,कोलंबी मसाला छान असायचा.
चेंबूरचे रत्नागिरी पण ठीक.

खूपच जिव्हाळ्याचा विषय म्हणून.
'सर्वोत्तम' हा व्यक्तीनिष्ठ किताब आहे. तरी पण -
'सत्कार' , गोरेगांव [पू] - वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे 'डेकॉर्'ची अपेक्षा न ठेवतां फक्त चवीसाठी;
'सायबा', वांद्रे [प] - विशेषतः कोलंबी पदार्थ [गाडीवाल्यांसाठी सूचना - पार्कींगचा प्रॉब्लेम];
'भारत रेसिडन्सी' , फोर्ट मार्केट - 'मामी'नी वर सुचवलंय; खात्रीचे ताजे मासे, विशेषतः ' फ्राय' सुरमय, पापलेट इ.
जे.जे.स्कूल ऑफ आर्ट समोरचं [ हाज यात्रेकरूंसाठी बांधलेल्या इमारतीशेजारीं ] हॉटेल [नांव पटकन आठवत नाही] - जरा तिखटावर हात सैल सोडत असले तरी मासे ताजे व कोकणी पद्धतिचं चांगलं जेवण;
'सचिन', दादर - साधं,स्वच्छ व सोयीच व बर्‍यापैकीं वैविध्यपूर्ण 'सी फूड'.
'सचिवालय जिमखाना', मंत्रालयासमोर - तिथल्या सर्वाना खुल्या असलेल्या 'कँटीन'मधे बर्‍यापैकीं कारवारी पद्धतिचे 'सी फूड' मिळतं.
[ ह्यापुढे सचिनच्या अनेक अप्रतिम खेळी आठवतच बसावं लागणार आहे तीच गत झालीय गिरगांवच्या'अनंताश्रमा'तल्या विविध मत्स्य खासियतेची ! पाटीलजी, आणखी एक सांगू ? सर्वोत्तम 'सी फूड' साठी अट्टल मासेखाऊ घर किंवा कोकणातल्या साध्या , खाणावळ पद्धतिच्या हॉटेलना पर्याय नाही ].

anold.JPG

भाऊ ते हज बिल्डींग च्या बाजुचे म्ह़णजे ग्रँट हाऊस अर्थात पोलिस कँटिन, तीथले मासे छानच पण खिमा पाव लाजवाब.

<< म्ह़णजे ग्रँट हाऊस अर्थात पोलिस कँटिन >> बरोबर.वास्तविक हें आधीं हज बिल्डींगच्याच कंपांऊंडमधे होतं व जे.जे.च्या विद्यार्थ्यांचं आवडतं. आजही बरेच मोठे कलावंत 'नोस्टॅल्जिया' म्हणून भेट देतात या हॉटेलला.

पार्ले गजालीत जामच निराशा झाली. हायवे गोमंतक त्यामानाने खूप छान. "महेश"ची चव उत्तम आहेच पण बिल आल्यावर आनंदाला ब्रेक लागतो. कोकणात साध्या साध्या खानावळीत जसे मिळते तसे चवदार जेवण मोठ्या शहरात मिळूच शकणार नाही की काय असे आता वाटू लागले आहे. अशा स्थितीत वॅल्यू फॉर मनी म्हणून बार्बेक्यू नेशनचा पर्याय छान वाटतो. एकसुरी स्टार्टर्स असले तरी प्रॉन्स आणि बाकी मासे छान ताजे असतात. तंदूरी खेकडा लाजवाब. बुकिंगची कटकट आहे पण ते फिक्स झाले की निवांत जेवण होते.

फोर्ट मधे RBI बिल्डिंग च्या बाजूला खाली भारत आणि वर एक्सलन्सि अशी दोन हाटेल आहेत. किचन एकच. भारत साधं तर एक्सलन्सि मधलं माहोल जास्त पॉश असतं. तिथे भले मोठ्ठे जिवंत खेकडे ठेवले असतात. तुम्ही नर/मादी वगैरे निवडून कुठला हवा तो सांगायचा. किलोच्या भावाने बिल येतं. क्र्याब इन रेड सॉस ही तिथली माझी आवडती डिश. बाकी सुरमय/रावस/पापलेट/हलवा/बोंबील फ्राय, प्रॉन कोळीवाडा वगैरे डिश छान मिळतात. हा बार असल्यामुळे भारत मधे सहकुटुंब शक्यतो कोणी जात नाही. मित्रांचे ग्रुप तिथे गप्पा मारत आणि पेग वर पेग रिचवत बसलेले असतात. हल्ली ४-५ वर्षात तिकडे गेलो नाही त्यामुळे लेटेस्ट खबर नाही.

त्याशिवाय हायवे गोमंतक हे मराठमोळ हॉटेल देखील स्वस्त आणि मस्त घरगुती मासे खिलवत.

कोलडोंगरीला क्रीडासंकुलच्या समोर एक छोटं रेस्टॉ आहे - बहुतेक मालवणी आस्वाद असं नाव आहे . तिथे तिसर्‍यांचे सुके, सुक्या सुंगटाची किसमूर, भाकरी , सोलकढी एकदम भारी. आत बसून जेवायला जागा अगदी छोटी आहे. पण पदार्थ एकदम मस्त आहेत.

मालाड / कांदिवली इथे लिंक रोडच्या जवळ एक मालवण कालवण नावाचे रेस्टॉ आहे . तिथे फ्राइडफिश एकदम खास. ऑर्डर दिल्यावर तुकड्या तळून देतात. री-फ्राइड वाटत नाहीत .

अंधेरी इस्टला हायवेच्या जवळ महाराजा नावाचे रेस्टॉ आहे. तिथे मंगळुरू स्टाइल सीफूड , नीर दोसा फार भारी मिळतात.

<< म्ह़णजे ग्रँट हाऊस अर्थात पोलिस कँटिन >> बरोबर.वास्तविक हें आधीं हज बिल्डींगच्याच कंपांऊंडमधे होतं व जे.जे.च्या विद्यार्थ्यांचं आवडतं. आजही बरेच मोठे कलावंत 'नोस्टॅल्जिया' म्हणून भेट देतात या हॉटेलला.>>> amhihi nostalgic jhalo Happy

fort madhla "fountain inn" pan bestach (american dryfruits javalchi galli)

गोरेगावंच सत्कार सध्या overhyped आहे... कायच्याकाय रेट आणि क्वांटीटी/चव यांची बोंबाबोंब. 'मालवणी' या नावाने गहिवरुन जाऊन किंवा पूर्वीच्या चवीला स्मरुन कोणी गेलात तर निराशाच पदरी (खर तर खिशाशी) येईल.

कोलडोंगरीला क्रीडासंकुलच्या समोर एक छोटं रेस्टॉ आहे - बहुतेक मालवणी आस्वाद असं नाव आहे . तिथे तिसर्‍यांचे सुके, सुक्या सुंगटाची किसमूर, भाकरी , सोलकढी एकदम भारी. आत बसून जेवायला जागा अगदी छोटी आहे. पण पदार्थ एकदम मस्त आहेत.>>>++११११

<< पूर्वीच्या चवीला स्मरुन कोणी गेलात तर निराशाच पदरी (खर तर खिशाशी) येईल. >> असं असेल तर मात्र 'सत्कार'ला मीं दिलेला अग्रक्रम सत्कारणीं नाहीं असंच समजावं ! [हल्लीं मीं नाही जेवलोय तिथं ]

पूर्वीच्या चवीला स्मरुन कोणी गेलात तर निराशाच पदरी (खर तर खिशाशी) येईल. >> असं असेल तर मात्र 'सत्कार'ला मीं दिलेला अग्रक्रम सत्कारणीं नाहीं असंच समजावं ! [हल्लीं मीं नाही जेवलोय तिथं ]>> +११

बोरीवली पंगत आणि दक्षिण. मुंबईमधील खादाडीच्या धाग्यावर अजून धागेदोरे सापडावेत Happy

कमला मिल्स समोरचं? - मी वर्ष्भर होते तिथे आणि एकदा पण तिथे जेवायला नाही गेले ...- भोकाड पसरून रडणारी बाहुली.

मेधा , मी बोरिवलीत राहाते. लिंक रोडने बरेचदा जाते, मालवण कालवण दिसलं नाही कधी नक्की कुठे आहे?

मालवणी कालवण ऑर्लेमला आहे. लिंक रोड वर चे मलाड,मार्वे क्रॉस रोड सोडुन इन ऑर्बीट्च्या दिशेने थोडे पुढे आल्यावर डावीकडे रस्ता जातो (सुंदर लेन - पुर्वी या कोपर्‍यावर HSBC चा ATM होता), त्या रस्त्याने सरळ गेल्यावर पहिल्यांदा अंकल्स किचन आणि त्यापुढे मालवणी कालवण

अरे वल्लरी, मिठचौकीहून ओर्लेममार्गे मालाडला जाणारा जो रस्ता आहे तिथे आहे हे मालवणी कालवण. त्याच्या समोरच्या रस्त्याला बी बी सी बिर्याणी सेंटर आहे.

गोरेगावचे सत्कार पण सी फूड साठी बेस्ट आहे.
पुण्यात पण आहे ह्यांची ब्रांच.... मस्स्स्स्स्सत असते.

मंडळी, दादर वेस्ट.. आगर बाजार च्या गल्लीतले ' चैतन्य' कसे विसरलात..
'पुरेपुर कोल्हापुर' च्या पुढचे...

एकदम ऑथेन्टीक चवीतले मालवणी प्रकार मिळ्तात.. ' सुरमई' तुकडी तर घरचीच खातोय असे वाटते...

बोरिवलीच्या पंगत पेक्षा नॅन्सी कॉलनीतले.. जास्त चान्गले आहे..

तसे दहिसर ईस्ट चे साईड वॉक पण चान्गले आहे.. पण फॅमिली रुम ची अपुरी सोय .. पण तंदूर प्रॉन्स, भरलेले पाप्लेट, प्रॉन्स तिकले, प्रॉन्स बिर्याणी अप्रतीम असते.. हल्ली जरा प्रत्येक डिश ची साइज मात्र कमी झालीय..

आता, एक 'महाराजा' च्या लिंक मधले 'महाराजा' पण ओपन झालेय दहीसर - हाय वे ला.. तीथे साउथ इंडीयन स्टाइलच्या मसाल्यातले मासे असतात.. सोबत आप्पम, दोसे असे सगळे..

अंधेरी, साकिनाका इथे पण तेच महाराजा आहे

साऊथ ईंडियन प्रकारातले मासे भारत बोर्डिंग (आता फिशलँड) वरळी नाका येथे चांगले मिळतात, थोडया मिरच्या जास्त असतात काही डीशेस मधे

साऊथ ईंडियन प्रकारातले मासे भारत बोर्डिंग (आता फिशलँड) वरळी नाका येथे चांगले मिळतात > अगदी अगदी.. आता जावच लागणार.

परळच्या मेरबानजी स्ट्रीट वरिल तृप्ती पण चवदार आहे.

सायनचे मॉर्डन आणि त्यालाच पाठमोर असलेलं सायन लंच होम या दोघांचा भटारखाना एकच आहे.

पुण्यात रसिकसाहित्य वगैरेच्या जवळ एक फिश करी अ‍ॅण्ड राइस नावाचे रेस्टॉ आहे . तीनेकवर्षांपूर्वी मी गेले होते. तिथे एकदम घरगुती चवीचे सुरमई फ्राय, मुडदुशांचे कालवण अन कुर्ल्या खाल्ल्या होत्या. व्हेजीटेरियन पदार्थ सुद्धा छान होते. जागा छोटीशीच होती त्यामुळे मोठा गृप असल्यास वेगवेगळे बसावे लागेल.

पुण्यात सदाशिव पेठेतलं 'सॄष्टी' [ एसपी कॉलेजच्या समोरच्या गल्लीत]. मालवणी पद्धतिचं - आंबोळ्या, भाजलेल्या सुक्या माशाची कोशिंबीर पण !! [ इथंही जावून वर्षं लोटलीं. सद्यस्थिती माहित नाही ]