आठवण - अर्धशतशब्दकथा

Submitted by बेफ़िकीर on 31 August, 2013 - 02:18

"ये ना"

"नको"

"का?"

"बघतात"

"बघूदेत"

"हसतात"

"हसूदेत"

"लवकर ये"

"कशाला?"

"कससंच होतंय"

"पण एकदाच हं?"

"हो"

"घे, आले"

"गर्र्घर्र्र्र्र्र्र्स्स्स्स्स्स्स"

"झालं?

"हो, आता बरं वाटतंय"

"आता एकदम रात्रीच्या जेवणानंतर"

"चालतंय"

"तोवर आठवण नाही येणार माझी?"

"तोवर कशी आठवण येईल?"

"का?"

"तुझी आठवण जेवणानंतरच येणार... तू तर एक ढेकर आहेस ना?"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol Biggrin

मस्त

काहीही.....:)
बेफी आता पावशतशब्दकथा आणि त्यानंतर अर्धापावशतशब्दकथा पण येऊ द्या

"घे, आले" ............ तू तर एक ढेकर आहेस ना?........ ढेकर "आले" का बोलेल? ... लिंगभेद???

ढेकर स्त्रीलिंगी असावी ... ढेकर आली ...
मुंबईकडे ढेकर आला पण म्हणतात ...पण शुद्ध काय ते सांगता येत नाही ... लोक असे पण म्हणतात ... चहा पिली .. light आला वगैरे ...

मला आधी वाटलं डाऊन स्ट्रोक विषयी आहे की काय? शेवटी अप स्ट्रोकच निघाला. अप स्ट्रोकला इतकं कशाला लाजायचं? येऊद्याकी बिनधास्त...

preetiiii | 20 December, 2014 - 17:00 नवीन

बेफिकीर यांनी एक टिंब जरी काढला ना तरी १०० प्रतिसाद येतील

तुम्ही तर बेफिकीर यांना ऋन्मेऽऽष मायबोलीकर, शाहरुख खान आणि सई ताह्मणकर यांच्या पंक्तीला नेऊन बसवलंत.

अरे, कुठे नेऊन ठेवलात बेफिकीर माझा....

Pages