मुलीच्या मासिक धर्माविशयी

Submitted by गंगी on 30 July, 2013 - 10:18

माझी मुलगी ११ वर्षांची आहे... आणि मे मध्येच तिचे पिरियडस सुरु झाले.... बरं झाले तर झाले ते फारच अनियमित आहेत... दर ८ .. १५ दिवसला येतात... आयु. औषधे चालु केली आहेत.. २ महिने झालेत... पण एलोपथी डॉ. म्हण्तात.. काहीच गरज नाही औषधांची... सुरुवात ही अशीच असते... पण ती ( माझ्यामते) फारच लहान आहे ... आणि ह्या अनियमितपणाला अगदिच कंटाळली आहे...तिला समजावुन सांगता माझी नाके नउ येत आहे...
काय करावे समजत नाहीये... ह्यातुन काय मार्ग काढावा.. आयु औषधे चालु ठेवावि का एलोपथी घ्यावे.... पण मग साइड इफेक्ट ची भिती वाट्ते... अजुन फारच लहान आहे ती हे सगळं सहन करण्यासाठी Sad

कूणाला काही अनुभव असल्यास प्लीज शेअर करा.... अथवा काही माहिती असल्यास प्लीज सागा...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तिला तिच्या पेडीकडे का नेत नाही?
तुम्ही जर 'सहन करणं' वगैरे म्हणालात तर तिलाही तसंच डोक्यात बसेल तेव्हा तुम्ही आधी मनातून काढून टाका बघू.

अगदी अबोबर आहे सायो... हे मी इथेच लिहिते.. तिला नाही म्हणाले... पेडी कडे नेले ते म्हणाले काहे गरज नाही औषधांची... सुरुवात अशिच असते.. पण दर ८-१५ दिवसांनी होणार म्हण्जे ती पन कंटाळुन जाते...

आठपंधरा दिवशी येतात? अशाने अ‍ॅनिमिक होईल ना. आयर्न सप्लिमेन्ट्स वगैरे दिल्यात का डॉक्टरने? सुरुवातीला अनियमित पाळी येऊ शकते हे खरं आहे, पण ही फ्रीक्वेन्सी जरा जास्त आहे. सेकन्ड ओपिनिअन घेऊन बघावा असं मला वाटतंय.

डॉ. ने सांगीतले नसेल तर औषधांची गरज नाही. स्वतःहून औषधे देऊ नका. तीला स्वच्छता नीट समजावून सांगा आणी लहान वय आहे म्हणून जरा काळजी घ्या.

सुरु झाल्यापासून सुमारे ६ महिने ते वर्षभरापर्यंतचा काळ जातो नियमितपणा येण्यात, असा सल्ला माझ्या मुलीच्या पेडीने दिला होता. आणि तसंच झालं. मुली वैतागतात, पण दुसरा काही उपाय नाही. औषधं न घेतलेली बरी. तरी देखील मनाच्या समाधानाकरता एकदा गायनॅक कडे जाऊन या. तिला मल्टी विटॅमिन (तिच्या एजग्रूपला योग्य असे) घ्यायला सांगा, तसेच भरपूर पाणी पिणे पण गरजेचे आहे. गुडलक!

पहिल्यावर्षी अनिमियतता असतेच. तरी एकदा गायनॅकला दाखवून घ्या हवे तर.
मुलगी लहान आहे. कंटाळणारच. पण तुम्ही आणि ती दोघी काहीतरी नवीन सुरु करा छंदवर्ग वगैरे म्हणजे हा ताण शेअर करायला मदत होईल. लक्षही विचलीत होईल.
पुढल्या वर्षी योगासनं शिकुन नियमीत केली तर बरं. त्याने अनियनिमतता कंट्रोल व्हायला थोडी मदत होते, शिवाय शारिरिक फिटनेस आणि ताणनियमनाची सवय लागते ते वेगळेच.
बाकी तिच्यासमोर उद्वेगाने काही म्हणु नका... किंवा अचानक जास्त जाचक नियम लागू करु नका. त्याचा जास्त कंटाळ येईल.
तिच्या वर्गात ती एकटीच आहे का या फेजमध्ये? त्याचाही कदाचित थोडा ताण येत असेल.

.

आणखी एखाद्या गायनॅकच मत घ्या'च'.

पण इतक्या लहान वयात उगाच'च' आयुर्वेदीक औषधांचा मारा नको. हि औषधे देन्यापुर्वी ह्या आयुर्वेदीक डॉकने कुठल्या चाचन्या करून औषधे दिली?

मुलीचा आहार चौरस असू द्या(तो तुम्ही बघत असालच). मुलगी एका बदलातून जातेय तेव्हा तिला मानसिक साथ देणे जरूरीचे आहे जसे वरती सर्वांनी म्हटले तसे.

@झंपी +१

आयुर्वेदीक किंवा तत्सम भोंदू पद्धतीची औषधं देउ नका. तुमच्या डॉक्टरांवर विश्वास ठेवा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे अगदी नैसर्गिक आहे त्यात वेगळं वाटण्यासारखं काही नाही हे मुलीला पटवून द्या. घरातल्या बाकीच्यांनी सुद्धा हे समजाउन घेणं गरजेचं आहे.

धन्यवाद सर्वांना....
बाकी सर्व मी बहुतेक सांगितले आहे तिला... तसे ती फार चिडत नाहीच.. she is a haapy gal Happy
फक्त मला तिला औष्धे एलोप्थी द्यावी का अयुर्वेदिक ते समजत नहिये....
@ तुर्रमखान>>>> भोंदू औशधांचा प्रश्न्च नाही येत......

झंपी ...नाही चाचण्या तरी नाही केल्या काही.... Sad

कोथरुड मध्ये चांगला गायनॅक सुचवाल का प्लीज ..

माझी मुलगी १० वर्षांची आहे . तिला पण गेल्या महिन्यात पाळी आली . मी गोन्धळुन गेले आहे . काय करू ? मला स्व:तालाच ताण आला . अजुन लहान आहे ती . Sad

माझ्याही मुलीला लवकर १० वर्षाची असताना पाळी आली मीच इतकी गोंधळून गेले होते की तिला सम्जवण्याच्या मनस्थितीत नव्हते. मी एका चांगल्या समुपदेशकाची मदत घेतली होती.

आमच्या वेळेला साधारण १३-१४-१५ या वर्षी पाळी येण्यास सुरुवात व्हायची.
रहाणीमान,खाण्या-पिण्याच्या सवयी बदललेल्यामुळे हल्ली पाळी बहुतेक मुलींना लवकर येते.
खरच चिंता वाटते.काही शाळेमध्ये मुलींना मासिक धर्माचे शिक्शण दिले जाते. शाळेत इतर मुलीही असतात.त्यामूळे मुलींना अगोदरच माहीती असते.
योग्य त्या गायनिकचा सल्ला घ्या.

डॉक च्या सल्ल्याशिवाय भारंभार औषधे नकोत, पण हिमोग्लोबीन वाढवणारा आहार असावा. वाढीचे वय असल्याने योग्य प्रमाणात दूध, दही, फळे, फळभाज्या, पालेभाज्या,सॅलेड, तसेच ताजे ज्युस असे आहारात असु द्या. वेगवेगळ्या चटण्यांमधुन पण लोह मिळते. उदा. कढीपत्त्याची वगैरे. सुकामेवा पण योग्य प्रमाणात खायला द्या. तसेच राजगीर्‍याचे लाडु, नाचणी सत्व, खजूर, खारीक वगैरे खाण्यात असु द्या. कारण आता वाढीची खरी सुरुवात आहे.

व्यायामाने तर संतुलीतपणा येईलच. सगळ्यांचे सल्ले उत्तम.

कोथरुड मध्ये चांगला गायनॅक सुचवाल का प्लीज ..>>>>> आमचे फॅमिली गायनॅक डॉ. सुषमा साठे आणि उपेंद्र साठे.
शंकरनगरी वनाज कंपनीपुढे.
अतिशय उत्तम डॉ. नवराबायको आहेत.

मुलींचे पाळी येण्याचे वय ९ पासुनच सुरु आहे >>>>>
माझी बंगलोरची मैत्रीण सांगत होती की मुलामुलींचे वयात येणे हल्ली फार लवकर होतेय.
तिथले एक डॉ. सांगतात की दुध देऊ नका मुलांना
कारण दुध जास्त यावे म्हणून artificial growth hormone ची ईंजेक्शन दिली जातात गायींना.
त्यामुळे हार्मोन्स मध्ये बदल होऊन मुले व मुली लवकर वयात येत आहेत.

>>त्यामुळे हार्मोन्स मध्ये बदल होऊन मुले व मुली लवकर वयात येत आहे>>>> ओह असे आहे का !!!
पण ऑर्गॅनिक दुध कुठे मिळते?

लहान मुलांना Organic दूध आणि अंडी द्यावी.

ऑर्गॅनिक अंडी मिळतात आता पण अजुन ऑर्गॅनिक दुध पाहिले नाहीय कुठे.

आणि तसेही भारतात कितीही पैसे दिले तरी त्यात भेसळ असण्याची शक्यता प्रचंड असते. मी वेगवेगळ्या कंपन्यांचे शुद्ध तुप (त्यातली एक अमुल) वापरलेय, एकजात सगळ्याला डालडाचा वास येतो. एखाद वेळेस एका बॅचमध्ये आला नाही, म्हणुन परत त्याच कंपनीचे तुप घ्यावे तर पुढच्या वेळेस फसवणुक होणार नाही याची गॅरंटी नाही.

त्यामुळे ऑर्गॅनिक म्हणुन डबल भावाने तीच मुळची वस्तु गळ्यात मारतील याची भिती वाटते. मी तरी अजुन ऑर्गॅनिकचा पर्याय फारसा वापरला नाहीय.

तिथले एक डॉ. सांगतात की दुध देऊ नका मुलांना
कारण दुध जास्त यावे म्हणून artificial growth hormone ची ईंजेक्शन दिली जातात गायींना.
त्यामुळे हार्मोन्स मध्ये बदल होऊन मुले व मुली लवकर वयात येत आहेत

गायींना इंजेक्शने देतात हे माहित आहे पण याचा असाही परिणाम होऊ शकते ही शक्यता लक्षात आलीच नव्हती. असो.

भारतात कितीही पैसे दिले तरी त्यात भेसळ असण्याची शक्यता प्रचंड असते>>>
+१
भारतात ऑर्गॅनिक दुध कुठे मिळते का काही कल्पना नाही.
कॅल्शियमसाठी नाचणीचा रोजच्या आहारात समावेश करता येइल ना.