दालचीनी चा वजन/ चरबी कमी करण्यासाठी उपयोग

Submitted by तनुदि on 2 July, 2013 - 13:44

दालचीनी चा वजन/ चरबी कमी करण्यासाठी उपयोग होतो असे नेट वरुन समजले. या बद्दल कोणाला माहिती आहे का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

टकाटक..... ग्रेटचं हां Happy

तुम्ही व्यायाम कुठले केलेत की फक्त वॉक्स? आणि मिक्स औषध घेतली म्हणता ती वेट लॉस साठी का? आयुर्वेदिक औषध का?

तुमचे आधी आणि अत्ता असे फोटो असतिल तर बघायला आवडेल... अर्थात तुमची हरकत नसेल तरचं...

http://vaidikhealthtips.blogspot.in/2013/04/blog-post_2.html

इथे म्हणतात की गंजेपनपेभी .... ऐकलत का मित्रांनो... पण ते खायच का डोक्यावर (म्हणजे टकलावर लावायच ते दिलं नाही.

टकाटक :- भारिच बुआ... अगदी अशक्य ते शक्य केलत.... ज्वारी कुठे मिळेल ते बघाव लागेल Sad

माझी एक मैत्रिण आहे तिची बायपास झालेली आहे. ती माउंट अबूला रहात असलेल्या एका डॉ.ची ट्रीटमेन्ट घेते.
त्या डॉ. नी तिला रोज सकाळच्या चहात चिमूटभर दालचिनी पावडर घ्यायला सांगितलं आहे.
हे डॉ. बरीच वर्षं यूएसेत हार्ट स्पेश्यालिस्ट म्हणून काम करत होते.
आता ते माउंट अबूला हार्ट पेशंटससाठी निवासी शिबिरं घेतात.

टकाटक, गाजवलात हा बाफ. Lol
माहितीबद्दल आभार

( या पोस्टवर असे बाफ गाजवणे हा त्यांचा टीपी आहे वगैरेसारख्या कमेण्ट्स येण्याची शक्यता आहे. त्यांना समजून घ्यावे ( दुर्लक्ष करावे) ही विनंती) Lol

<<<( या पोस्टवर असे बाफ गाजवणे हा त्यांचा टीपी आहे वगैरेसारख्या कमेण्ट्स येण्याची शक्यता आहे. त्यांना समजून घ्यावे ( दुर्लक्ष करावे) ही विनंती) >>>>

याच कारणामुळे मी स्वतंत्र बाफ टाकला नाही.

रेसिपीज : -

ज्चारी इंस्टंट डोसा -
ज्वारीचं पीठ , आले - लसुणाची पेस्ट , कांदा - टोमॅटो पेस्ट, मिरची बारीक चिरुन, कोथिंबीर बारीक चिरुन , जीरे , मीठ सगळे एकत्र करुन नॉनस्टीक तव्यावर लगेचच डोसा थापा. तवा नॉनस्टीकच हवा नाहीतर डोश्याऐवजी गोळा होतो. डोसा शिजायला वेळ लागतो लगेचच परतु नका.

ज्चारी पराठा - ज्वारीचं पीठ , आले - लसुणाची पेस्ट , कांदा - टोमॅटो पेस्ट (हवी असल्यास), मिरची बारीक चिरुन, कसुरी मेथी , भोपळा किसुन, जीरे , मीठ सगळे एकत्र करुन व्यवस्थित मळुन घेउन पराठ्या प्रमाणे लाटावे. तव्यावर भाजावे.

कधी कधी भोपळा न टाकता बनवता येतो. कधी भोपळयाच्या जागी दुधी किसुन घालावा, कधी मेथीची अथवा अन्य पालेभाजी चिरुन घालावी. कधी मुळा किसुन घालावा
ज्वारीचे पीठ थंड पाण्यात मळण्यापेक्षा गरम पाण्यात मळले तर चपाती नीट लाटता येते.

ज्वारीचे पिठले : -
१ कप ज्वारीचे पीठ २ कप गरम पाण्यात कालवुन (गुठळ्या काढुन)
आले - लसुणाची पेस्ट ,
कांदा - बारीक चिरुन ,
टोमॅटो बारीक चिरुन ,
मिरची बारीक चिरुन,
कोथिंबीर बारीक चिरुन ,
जीरे , मीठ, तीळ , राई
तेल.

पॅन मधे तेल तापवुन त्यात जीरे , तीळ , राई तडतडवणे , नंतर आले - लसुणाची पेस्ट ,मिरची , हळद घालणे. नंतर कांदा - टोमॅटो , मीठ घालुन परतवणे, थोडे शिजल्यावर ज्वारीचे गरम पाण्यात कालवलेले पीठ मिक्स करणे , झाकण ठेवुन थोडा वेळ शिजवणे. कोथिंबीर घालुन गरमागरम खाणे.

आणखी एक रेसिपी ही मा.बो. वरुनच घेतली होती. आख्खे मुग दळुन , पीठात आले - लसुणाची पेस्ट , हळद , मीठ घालुन लगेचच धिरडी थापावीत. हा अगदी भरपेट नाश्ता होतो.

काही वर्षांपुर्वी मी वजन्वाढ, अ‍ॅनेमिया, थकवा इ.इ. समस्या घेऊन एका आयुर्वेदीक डॉ. कडे गेलेले आणि त्यांनी वर टकाटकने खाऊ नयेत म्हणुन जी लिस्ट दिलीय तीच लिस्ट दिलेली हे खाऊ नका म्हणुन.

घरचे हसले लिस्ट पाहुन.. काय खायचे ते लिहीले असते तर एवढे लिहायचे कष्ट वाचले असते म्हणुन. मला ते डायेट काही झेपले नाही कारण स्वतःसाठी नी घरच्यांसाठी असे दोन दोन सैपाक बनवणे झेपणारे नव्हते. Sad

एक प्रश्न तेव्हाही पडलेला आणि अताही आहे - आंबवलेले पदार्थ का वाईट? ते बंद केले तर सौदेंडीयन रोज काय खातील? लिस्टमधले बहुतेक पदार्थ वातुळ आहेत (वांगी, गवार, कोबी इ.) म्हणुन तर नसेल? कोणी आयुर्वेदातले तज्ज्ञ सांगु शकतील का काही?

<<<लिस्टमधले बहुतेक पदार्थ वातुळ आहेत (वांगी, गवार, कोबी इ.) म्हणुन तर नसेल?>>>

होय. अशा खाण्याने वात वाढतो. त्यामुळेही आपले शरीर फुगत जाते..

>>>> रफली जितके इन्च तितके किलो भरतीय पुरुशाला <<<< हे सगळ्यात सोप्पे झाले
बारापन्चेसाठ अधिक आठ बरोबर अडुसष्ट इन्च म्हण्जे मला अजुनही पाचसहा किलो वजन वाढले तरी फिकीर करायची गरज नाही! बरोबर ना डॉक्टर इब्लिस?

<<<<<तनुदि | 4 July, 2013 - 00:03
0Vote up!मी अस एकलय की दालचीनी मुळे metabolism rate वाढतों म्हणुन हा प्रश्न विचारला होता.>>>>>>>

आमच्याकडे मेडीकल चेकअप झालं होतं तेव्हा metabolism rate वाढवण्यासाठी अ‍ॅलोपथी डॉक्टरांनी मला पुढील नुस्खा सांगितला होता. पण माझं हे डाएट चालु असल्याने मी काही केलं नाही.

रोज रात्री एक ग्लास पाणी घेउन त्याच्यात ७-८ मेथीचे दाणे (जास्तीत जास्त) रात्रभर भिजत घालावेत व सकाळी ते पाणी प्यावे.

पण आयुर्वेदीक डॉक्टरांनी असे काही सांगितले नाही.

आंबवलेले पदार्थ का वाईट? ते बंद केले तर सौदेंडीयन रोज काय खातील? लिस्टमधले बहुतेक पदार्थ वातुळ आहेत (वांगी, गवार, कोबी इ.) म्हणुन तर नसेल?>>>>>>>>>>>>>>>>>>>>

होय. अशा खाण्याने वात वाढतो. त्यामुळेही आपले शरीर फुगत जाते..>>>>>>>>>>>>>> माझ्या पाहण्यातल्या बर्‍याच सौदींडीयन बाया अगदी काटक आहेत. रोज चे रोज इ डो उ ना च खाउनही. ते कसं काय?

<<<माझ्या पाहण्यातल्या बर्‍याच सौदींडीयन बाया अगदी काटक आहेत. रोज चे रोज इ डो उ ना च खाउनही. ते कसं काय?>>>>>

ते मला सांगता येणार नाही. मला माझ्या आयुर्वेदीक डॉक्टरांना विचारावं लागेल.

दुधाचे पदार्थ वर्ज्य , दुध आयुर्वेदीक डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे रात्री झोपताना प्यायचे नाही सकाळी पिउ शकता. ताक बंद.

इडली डोसाच काय वरती जे खाउ नका म्हणून लिहिलय ते सगळं खाउन शिडशिडित असणारी भरपूर लोकं
असतात, पण ही चर्चा अशा सुदैवी लोकांकरता नाहीये ना..:) आमच्यासारख्या इतर लोकांकरता आहे

इडली डोसाच काय वरती जे खाउ नका म्हणून लिहिलय ते सगळं खाउन शिडशिडित असणारी भरपूर लोकं
असतात, पण ही चर्चा अशा सुदैवी लोकांकरता नाहीये ना..>>>>>>>>>>>>> Happy

स्मिते, त्यांचा तांदुळ आणि शिजवण्याची पद्धत वेगळी असते...
तांदूळ शिजत आला की त्यातलं पाणी ते पुर्णपणे काढुन फेकुन देतात..... हे असावं का कारण? Uhoh

टकाटक --- मस्त रेसिपी .....भिडले मी अता ....... चहा चे काय करावे बरे ????? घेइन म्हणते सकाळी ... Happy

चहासाठी साखरे ऐवजी गुळाचा वापर करता येईल. १-२ वेळा मी मध घालुन पाहिलं होतं पण गरम चहामुळे मधाची चव काही वेगळीच लागली, अजिबात आवडली नाही.

आपण लहानपणापासून जे अन्न खातो ते पचवण्यासाठी शरीराची तयारी झालेली असते, म्हणून पंजाबी लोक रोज पनीर् खाऊ शकतात, दाक्षिनात्य रोज इडली डोसा आणि कोकणी लोक खोबरे खाऊनदेखील बारीक असू शकतात (सगळेच असे नव्हे), पारंपारिक आहार असतो तो तिथल्या भौगोलिक परिस्थितीला, हवामानाला, लोकल प्रोड्युसला अनुसरून असतो. ते बदलत गेल्यास तब्बेतीवर पर्रिणाम होतातच. म्हणून आपला आहार आपण जिथे राहतो त्या हवामानाला आणि भौगोलिक परिस्थितीला योग्य असावा, तसेच जे आपण लहान्पणापासून खात आहोत त्याला अनुसरून असावा.

इथे आयुर्वेदिक तज्ञ आहेत ते अधिक माहिती देऊ शकतील यावर.

रोज रात्री एक ग्लास पाणी घेउन त्याच्यात ७-८ मेथीचे दाणे (जास्तीत जास्त) रात्रभर भिजत घालावेत व सकाळी ते पाणी प्यावे.>>>>>माफ करा. हे सर्वांसाठी उपयोगी नाही.ढाळ होऊ शकतात.

रोज रात्री एक ग्लास पाणी घेउन त्याच्यात ७-८ मेथीचे दाणे (जास्तीत जास्त) रात्रभर भिजत घालावेत व सकाळी ते पाणी प्यावे.

यावरुन आठवलं सौ.च्या एका मैत्रीणीने दोसा/इडली पीठ भिजवताना ४ मेथीचे दाणे टाकायला लावले होते, त्याने कदाचित वाताचा त्रस होत नसावा ?

रीये इडली-डोस्याचे तांदुळ शिजवत नाहीत. आंबवलेले पदार्थ खायचे का नाही त्याबद्दल आहे ते.

@विजय देश्मुख हो इ-डो चे तांदुळ डाळ भिजवताना ४-५ दाणे मेथीचे ही भिजवावेत.

चहासाठी साखरे ऐवजी गुळाचा वापर करता येईल. १-२ वेळा मी मध घालुन पाहिलं होतं पण गरम चहामुळे मधाची चव काही वेगळीच लागली, अजिबात आवडली नाही.>>अहो, मध कधीही गरम पाण्यात/चहात घालू नये. आयुर्वेदानुसार अशा मधाचे विषारी तत्वात रुपांतर होते जे आरोग्यास आत्यंतिक अपायकारक असते. तेव्हा, जरा जपून.

वजन कमी करण्यासाठी सकाळी आमोशापोटी कोमट पाण्यात मध घेतात. ते पाणीही 'चुकुनही' कोमटपेक्षा जास्त गरम होऊ देऊ नये.

अविकुमार | ,
जास्त गरम झाले तर काय होता ते सांगा की राव !! डेली सोप सारखा 'अगले एपिसोड' चा सस्पेन्स आहे का?

<<<<<अविकुमार | 5 July, 2013 - 14:52
0Vote up!चहासाठी साखरे ऐवजी गुळाचा वापर करता येईल. १-२ वेळा मी मध घालुन पाहिलं होतं पण गरम चहामुळे मधाची चव काही वेगळीच लागली, अजिबात आवडली नाही.>>अहो, मध कधीही गरम पाण्यात/चहात घालू नये. आयुर्वेदानुसार अशा मधाचे विषारी तत्वात रुपांतर होते जे आरोग्यास आत्यंतिक अपायकारक असते. तेव्हा, जरा जपून.

वजन कमी करण्यासाठी सकाळी आमोशापोटी कोमट पाण्यात मध घेतात. ते पाणीही 'चुकुनही' कोमटपेक्षा जास्त गरम होऊ देऊ नये.>>>>

धन्यवाद सांगितल्याबद्द्ल , खरंच हे माहीत नव्ह्तं..

>> ब-याचदा मित्रमंडळी , नातेवाईक जेलसीमुळे सुद्धा खायला लावुन आपला नियम तोडायला लावतात कारण त्यांना स्वत:ला असं करणं जमत नाही>><<

+१

मी आतावर बरेच डायट केलेत उलटे सुलटे. पण माझा अनुभव (नेहमी ह्याच मतावर आलेय मी) हाच सांगतो आनंदाने खाल्ले की शरीराला चांगले लाभते.
प्रमाणात सर्व (अगदी कधी मधी जिलेबी सुद्धा खाल्लीय) खावून सुद्धा माझे वजन कमी झालेय हा अलीकडचा अनुभव आहे. तेच डायट करून सुद्धा माझे किलो (आयडीयल वजन पेक्षा ८ किलो ज्यास्त होते) कमी होत न्हवते.

ताजं अन्न ह्यावर मी भर दिला. तसेच मला जे आवडते अधून मधून ते ही खायचे. दिल खुश रहता है तो सब कुच हजम होता है असे जुनी लोकं म्हणतात तेच खरे.

शेवटी लहानपणापासून जे खातो तेच पचते व मन खुश रहाते. भले, जिलेबी नका खाउ रोज पण महिन्यातून तलफ आली तर काय हरकत आहे असे माझे मत पडलेय अलीकडे जेव्हा मी वाढलेले वजन कमी केले .. इंचेस सकट.

आयुर्वेदाची माफी मागून सांगते, पंचकर्म म्हणजे मला बंडल वाटते... मी ते केले तेव्हा ४ किलो कमी झाले पण नंतर त्याच वेगाने वाढले अगदी तो 'फालतू' डायट प्रकार ठेवून सुद्धा.
मला ते जमलेच नाही मग... मी सहा महिने ते ह्यांव भाज्या नको , त्यांव नको केले. पण काहीही फरक झाला नाही. सुरुवातीचे २ महिने ते पंचकर्म चालू असताना जे चार किलो कमी झाले ते परत वाढले.
आयुर्वेदीक डॉक्ला विचारले तर... अहो करत रहा मग फरक पडेल... कायम असे पथ्य पाळणे भितीच वाटली. सहा महिन्यात केले बंद व मासे गिळायला लागले.
माझ्या आयुर्वेदील डॉ ने मासे, मटण, अंडी बंद करायला लावलेले... मला त्या गोष्टीचा त्रासच होत होता. Proud
घरात इतर मासे खाताहेत, तंदूरे खाताहेत तर मी दूधीची भाजी गिळतेय/खातेय... मनाला भारी यातना व्हायच्या.
पम्चकर्मात ते तूप पिणे सकाळाची शिक्षा वाटायची मला. मग ते रेचकं... अर्धा अधिक काळ सं** मध्ये. कुठे जायची भिती.. :फिदी:.

आजकाल तर दुकानं उघडल्यासारखी पंचकर्माची अ‍ॅड असते. काही काही ठिकाणं तर इतकी गलिच्छ व अस्वच्छ असतात की किळस वाटतो... डॉ पा** हे एक उदाहरण... बर ते असो. Happy
Wink
जसे सर्व नियमित खायला लागले तसे ठिक झाले.... फक्त अति खाल्ले तरच माझे वजन वाढते. पण प्रमाणात खाल्ले तर्(जे प्रमाण मला सूट होते ते) तर वजन लगेच कमी होते.
मी एक जिलेबी खाल्ली तर ठिक रहाते, पण चार्-पाच खाल्ल्या तर मात्र वजन वाढते.(हे एक उदाहरण आहे). तळलेला मासा एकच खल्ला तर ठिक...
शेवटी तोंडावर कंट्रोल लागतोच. पण मन मारून रहाणे कठिण आहे माझ्यासाठी.

मला भेंडी आवडतात तर ते बंद करायला लावले आयुर्वेदीक डॉक ने. मश्रूम्स मी खाते आवडीने कधी कधी.

एखाद वेळेला छुपी अ‍ॅलर्जी असलेले पदार्थ खाल्ले तर वजनाचा प्रॉबलेम होवू शकतो. म्हणून काही काळ पुरते ठिक आहे माहित करून घ्यायला पण कायम नुसते हेच खा, तेच खा नाही जमत.

(कोणाला निरूत्साही करायला पोस्ट नाही केली पण प्रत्येकाने आपल्या शरीराला जे जमेल , झेपेल व मोळात म्हणजे आवडेल तेच करावे मगच फायदा होतो असे माझ्या अनुभव आहे).

मध व लिंबू मला कधी वर्क झाले नाही कारण विकतचे मध बहुधा बेकार साखरेचा पाकच असतो. त्यामुळे ते सुद्धा एक थोतांड वाटते(मलातरी).

रफली जितके इन्च तितके किलो भरतीय पुरुशाला. स्त्री यतून उणे>>>>>>>>>> अरे देवा!
नजरचुकीने ६-७ किलोचे addition दिले.

झम्पि------ Happy बेस्ट्च .....सगळच भावलय ...अता करावे तरी काय? सोचतीये .... ... Uhoh

एकदा TV वर एक programm पाहिला होता त्यात Dr म्हणत होती कि रात्री आम्बट खाल्ल तर सकाळी पोट फुगल्या सारख होत. शीवाय salad नेहमी थोड blanch करुन घ्याव.
उ.दा गाजर बीट, पान कोबी etc.

झंपी | 7 July, 2013 - 10:30

<<<<माझ्या आयुर्वेदील डॉ ने मासे, मटण, अंडी बंद करायला लावलेले... मला त्या गोष्टीचा त्रासच होत होता.
घरात इतर मासे खाताहेत, तंदूरे खाताहेत तर मी दूधीची भाजी गिळतेय/खातेय... मनाला भारी यातना व्हायच्या.
पम्चकर्मात ते तूप पिणे सकाळाची शिक्षा वाटायची मला. मग ते रेचकं... अर्धा अधिक काळ सं** मध्ये. कुठे जायची भिती.. .>>>

मला पंचकर्म हे वजन कमी करण्यासाठि करायला सांगितले नव्हते. शरीर शुद्धीकरणासाठी सांगितले होते. आणि तुप पिणे हा प्रकार मला नव्ह्ताच. मासे हा प्रकार मला बंद नव्ह्ता , बाकी मी जे काही खाल्ले त्याला घरच्यांनी जरी नाक मुरडले तरीही मी ते आनंदाने खाल्ले ओढुनताणुन नाही त्यामुळे मला काही जड गेले नाही.

मला तर ह्या गोष्टींचा फायदा झाला. माझ्या एका मित्राने देखील तिथे जाउन कंसल्ट केलं आनी त्यालाही खुप फरक पडलाय. मी आधीच्या पोस्टमध्ये सांगितलेच आहे कि मुख्य म्हणजे आपला तोंडावरचा कंट्रोल महत्वाचा. बाकी हे प्रत्येकावर आहे की त्याने आपल्या शरीराची काळजी कशी घ्यावी.

roj sakali dalchinichi chimutbhar pavdar tondat taklyas hi-b.p kami honyas madat hote.

झंपी..

तुम्चे म्हणणे पट्ते!

आता बघा नं..पंजाबी माणसं कशी भरपूर खातात अन आनंदी राहतात! अगदी हरयाणवीसुद्धा!

आपण मराठी लोकंच ज्यास्त बाऊ करतो कि काय असे वाट्ते. पंजाबी मुलं मुली ऊत्साहाने नुसती फसफसत असतात ! नाहीतर आपल्या मराठी मुलं मुली..!!

हेच स्पॅनीश, ईटालीयन, फ्रेंच, ह्यांच्याबद्द्लही म्हणता येईल नव्हे कां?

>>मला पंचकर्म हे वजन कमी करण्यासाठि करायला सांगितले नव्हत>><<

मलाही पंचकर्मे 'फक्त' वजन कमी करायला म्हणून सांगितलेच न्हवते. लिहिताना नीट न लिहिल्याने तसे वाटले असेल.

पन मला तरी एकंदरीत पंचकर्मे वगैरे बेकार वाटले... ते तसे असायचे कारण बहुधा ते सेंटर तसे असावे.
तिथे वापरले जाणरे जिन्नस नसावे चांगले.... वगैरे वगैरे.
पण माझ्याच बॅच मध्ये असलेल्या व तिथे येणार्‍यांचे असेच अनुभव होते... बंडल म्हणून.

असो.

इथं त्या प्रिस्क्रीप्शन, पुरावे, अभ्यासक्रम, जेल, आयुर्वेद खतरेमे वाल्या पोस्टस कशा काय नाहीत ?

vajan kami hoil ki nahi mahit nahi pan ek atyant mahatvacha upyog ----- 3 gm dalchi ek cup panyat ukalun te pani ardhe karayche ani ase 21 diwas sakali uthalyavar kahihi khaychya adhi ghyayche ani nantar ardha tas kahihi khayche nahi kinva chaha pan pyaycha nahi. yane vadhlele cholesterol nakki kami hote ani lakshniya ritya kami hote.

Pages