हॉस्पिटल बांधकाम

Submitted by शाम्भवी on 9 March, 2013 - 02:53

आमच्या इथे एका सेवाभावी संस्थेस २५ बेड असलेले हॉस्पिटल बांधायचे आहे.त्याकरीता
इंजीनीयर किंवा आर्किटेक्टला काय काय requirments सांगाव्या लागतील?
साधारण लीस्ट
१) पार्किग
२)वेटींग लॉबी
३)डॉक्टर केबीन
४)ऑपरेशन थेटर
५)स्पेशल रुम
६)जनरल वार्ड
७)टॉयलेट
इथे बरेच डॉक्टर,अनेक बुध्दीमान लोक आहेत तरी जाणकारानी मदत करावी.
हॉस्पिटलमधील function आणि त्याप्रमाणे circulation असा काही चार्ट आहे का?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खळी, प्रत्येक जिल्ह्यातील हॉस्पिटल सेट अपचे नियम वेगळे असतात.
उदा .आमच्या गावात २५ बेडसाठी कंपल्सरी पार्कींग, प्रत्येक डॉ ची केबिन १०० चौ फूट, रिसेप्शन एरिया २५० चौ फूट , प्रत्येक इनडोअर बेडसाठी ७२ चौ फूट इतकी जागा आवश्यक आहे.
त्याप्रमाणे आपल्या गावात अ‍ॅलोपथी नर्सिंग होमसाठी काय स्पेसोफिकेशन आहेत त्याचे माहितीपत्रक डिस्त्रिक्ट हेल्थ ऑफिसर कडून घ्या. मग टाऊन प्लॅनिंगकडे जाऊन त्यांचे ड्रेनेज पार्किंग ई साठीचे स्पेसिफिकेशन घ्या. तसेच ई पी सी ऑफिस म्हणजे पोल्यूशन कंट्रोल वाल्यांचे स्पेसिफिकेशन घ्या. हॉस्पिटलमध्येच औषधांचा काऊंटर असेल तर ड्रग कंट्रोल बोर्डकडून त्यांचीही मेडिकल शॉपसाठीची ठराविक चौ फूट जागा,एसी फ्रिज अशी रिक्वायरमेंट असते ती ही लिस्ट पडताळून पहा.
अनुभवी आर्किटेक्ट्/बिल्डरकडे ही माहिती असतेच.
अजून काहि माहिती हवी असेल तर विचारा .

मम

ऑपरेशन थिएटर्स बद्दलः
जनरल हॉस्पिटल करीत असाल तर यात तुम्हाला किमान ४ ते ५ वेग वेगळी शस्त्रक्रीया गृहे (ओ.आर. - ऑपरेशन रूम) लागतील. त्यात क्लीन व सेप्टिक असे दोन प्रकार असतात. गायनॅकची लेबर रूम वेगळी लागेल.

ऑर्थो, गायनॅक, सर्जरी व ई एन टी एक ओटी शेअर करू शकतात. पण २५ बेड म्हटल्यावर २ मोठ्या क्लीन ओ.आर., एक छोटी ओ.आर ऑफ्थॅल्म साठी (अल्ट्रा क्लीन. जागा असेल तर मोठी बनवा, मग ऑर्थो जॉईंट रिप्लेसमेंट वगैरे त्यात शेअर होईल. पण यूज्वली डोळ्याचे सर्टिफिकेशन वेगळे होईल) म्हणजे ३ झाल्या.

क्र. ४ सेप्टीक प्लस ट्रॉमा.

क्र. ५ लेबर रूम.

कॅज्युअल्टि सेक्शन ला (इमर्जन्सी रुग्ण व अपघातग्रस्त पेशंट जे २४ तास येत रहातात, त्यांच्या साठीचा विभाग) जोडून एक अनक्लीन ओटी लागते. इथे छोट्या मोठ्या जखमा शिवणे, प्लास्टर बांधणे इ. लागेल.

प्रत्येक ओ.टी. (ऑपरेशन थिएटर) काँप्लेक्स मधे, देवळाचा गाभारा असावा तशी सेंटरला ओ.आर. असते. हा अती निर्जंतुक एरिआ. यात येणारी हवा देखिल आजकाल फिल्टर वापरून निर्जंतुक करून (पॉझिटिव्ह प्रेशर) आणलेली असते. हायटेक इम्प्लांट साठीच्या ओ.आर मधे लॅमेलर एअर फ्लो असतो.

इथे फ्लोर टु सिलींग ग्लेझ्ड टाईल्स विथ मिनिमम जॉईंट्स, संपूर्ण कन्सिल्ड इलेक्ट्रिकल फिटींग, व वॉटरप्रूफ झाकता येतील असे इलेक्ट्रिक बोर्ड्स अपेक्षित असतात, जेणेकरून भिंती पाणी मारून धुता येतील.
फ्लोअर जॉईंटलेस (जसे कोटा फरशी, मिरर पॉलिश सह : हा लो बजेट ऑप्शन आहे. हाय बजेटला पॉलिमर फ्लोरिंग असते, जे बॅक्टेरिआ रिपेलंट असते) हवी. जमीनीवर सांडणारे रक्त व तत्सम इन्फेक्शन युक्त पदार्थ नीट स्वच्छ करता आले पाहिजेत. ऑपरेशन सुरू करण्या आधी या रूमची परिस्थिती सरळ फरशीवर जेवण वाढून खाल्ले तरी खाता यावे यापेक्षाही जास्त स्वच्छ असते.

व्हेंटिलेशन एसी मधून येते. फ्युमिगेशन काढण्यासाठी एक्झॉस्ट फॅन कॅबिनेटमधे बंद हवेत. म्हणजे फॅन बंद केला, की त्याची कॅबिनेटही बंद व्हावी, मग बाहेरची हवा त्या मार्गे आत येऊ नये.
सिलिंग फॅन ओटीमधे अलाऊड नसतो. (त्या पंख्याच्या हवेचा फ्लो जमीनीवरील जर्म्स उडवून पेशंटच्या जखमेत नेईल)

मायक्रोस्कोप वापरत असाल (न्यूरो, ईएन्टी, ऑफ्थॅल्म इ.) तर ओटी मधे अंधार करावा लागतो. त्या दृष्टीने खिडक्या प्लॅन कराव्या. आत पडदे लावू नयेत. (धूळ जमा होते.) इतर सर्जन्स ना किती उजेड हवा तसे पहावे. याशिवाय कृत्रिम उजेड भरपूर करता यावा. डिफ्युज व इन्डायरेक्ट लाईटसोर्स हवेत. खोलीचा प्रत्येक कोपरा उजळला पाहिजे.

एंडोस्कोप्स साठी मॉनिटर्स, लाईटसोर्स, फायबर ऑप्टिक केबल्स, सक्शन, सेंट्रल ऑक्सिजन इ. वा सिलिंग माऊंटेड मायक्रोस्कोप, सर्जिकल लँप्स असतील तर त्याप्रमाणे फिटिंगची अ‍ॅरेंजमेंट आधीच करावी लागते (स्लॅब घालताना. भिंती बांधताना.)

कोणत्याही प्रकारे धूळ जमा होईल असे लॉफ्ट वै नसावेत.

खाली कप्पे नसलेले ग्रॅनाईट वर्क टॉप्स, एक किंवा दोन भिंतींचा स्पॅन होईल इतपत.

१-२ ग्लास कॅबिनेट्स मोठ्या, आवश्यक औषधे इ. साठवायला.

ओ.आर. चे क्षेत्रफळ तिथे मशिनरी काय लावणार यावर असते. सी आर्म, एण्डोस्कोपी ट्रॉली, बॉइल्स अ‍ॅपरेटस, ओटी टेबल, अ‍ॅनास्थेटिस्ट चेअर, सर्जन्स चेअर, असिस्टंट्स चेअर, हे सगळे ठेवून मग पेशंटची ट्रॉली फिरेल इतकी जागा हवी.

दरवाजे आत्/बाहेर दोन्हीकडे उघडतील असे, डबल डोअर असावेत. घाईत ट्रॉली ढकलत आणताना, सोबत अंबू बॅग, आयव्ही, ब्लड इ. धरलेल्या लोकांसकट आत येता येईल, इतका प्रत्येक दरवाजा मोठा हवा.

ओआरच्या भिंती/फ्लोअर्/सिलिंगमधून कोणत्याही प्रकारच्या ड्रेनेजचे (अगदी पावसाच्या पाण्याचे देखिल) पाईप जाणे निषिद्ध आहे.

**
काही ओ.आर. मधे 'सर्व्हिंग विंडो' सेंट्रल ऑटोक्लेव्ह एरियात उघडते.
**
या दरवाजा बाहेरचा पॅसेज हा सेमीस्टराईल एरिया असतो. इथे सर्जन्/स्टाफच्या चेंजिंग रूमचे दार उघडते. इथेच स्क्रब एरिया असू शकतो, किंवा डायरेकट कनेक्टेड असतो.

स्क्रब बेसिन. हे टिपिकल खोल बेसिन असते. त्यात एक बारिक जाळी नॉर्मल बेसिनच्या डेप्थला असते. हेतू हा, की हात धुताना बेसिनच्या फ्लोरवरून पाणी रिफ्लेक्ट होऊन परत हातावर उडू नये. रेडिमेड स्टेनलेस स्टील बेसिन्स मिळतात. वा ग्रॅनाईट/कडप्प्याचे बनवता येतात.

नळ आपोआप सुरु होणारे, वा फूट कंट्रोल्ड, वा लांब दांडीवाल्या हँडलचे असावे लागतात. साबण व स्क्रब केमिकल डिस्पेन्सर्स असावे लागतात.

ओ.आर धुताना, पाणी या पॅसेजमधे येईल, मग बाहेर जाण्याची जाळी जमीनीवर असेल असे अपेक्षित आहे.

*
या पॅसेजचे दार बाहेर उघडेल, जिथे पेशंट प्रेप एरिआ/रिकव्हरी रूम एकत्र करता येते. सर्जिकल आयसीयू असेल तर इथेच अ‍ॅटॅच होईल.
***
ऑटोक्लेव्ह.
हा विभाग ओटीशी कनेक्टेड पण थोडा दूर असावा लागतो. किती मोठी यंत्रे आहेत यानुसार.
इथे इन्स्ट्रूमेंट्स धुणे व निर्जंतुक करणे असे दोन्ही होते. ओटीचे कपडे धुण्याची सोय इथे करता येईल.
***
एकंदर मिनिमम ३ डोअर सेपरेशन लागते. म्हणजे किमान ३ दरवाजे ओलांडल्याशिवाय कुणीही गाभार्‍यात (मुख्य ओ.आर.) पोहोचणार नाही.
***
सेमीस्टराईल एरियात देखिल संपूर्ण कपडे व पादत्राणे बदलून व कॅप मास्क घालूनच प्रवेश असतो.
त्या बाहेरच्या एरियात पादत्राणे अलाऊड नाहीत. बाहेरचे कपडे चालतात.
***

हुश्श!
हे खूप त्रोटक लिहिलेले आहे. अधिक माहीती आठवेल तशी लिहीन.

अरे हो! या सगळ्या चंबूगबाळ्याच्या बाहेरच्या काचेच्या दारावर मोठ्या अक्षरात "नो एण्ट्री" "ऑपरेशन थिएटर" असे मोठ्या लाल अक्षरात लिहावे.
दाराच्या डोक्यावर एक लाल एक हिरवा असे दोन दिवे लावून ठेवावे. Wink (याशिवाय तो "फील" येत नाही)
लॉबीमधून ते दिवे दिसले पाहिजेत. बसण्याच्या खुर्च्या दिवे दिसतील अशा स्ट्र्याटेजिकली मांडाव्या. तसेच एकादे सर्वधर्मीय देऊळ/देव्हारा उदा. साईबाबा या लॉबीमधे असू द्यावे. (बाहेर वाट पहाणार्‍या नातेवाईकांच्या मनोबलासाठी चांगले असते.)

इब्लिस/ साती यांनी खुप मोलाची माहिती दिलीच आहे.
मी डॉक्टर/ आर्कीटेक्ट नाही पण खालील मुद्दे सुचवावे वाटले.
- Emergency Exit (आपात्कालीन व्यवस्था)
- Emergency विभागासाठी वेगळा entrance तसेच ambulance साठी जागा.
- access for disabled people
- x-ray room / Lab साठी व्यवस्था
- रक्तपेढी किंवा रक्त वगैरे साठवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था
- रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी स्वच्छता गृह / उपहार गृह आणि विश्राम गृह. मुख्य म्हणजे शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
- computerization/ monitoring system वगैरे असेलच. त्यासाठी लागणारी जागा आणि construction करतानाच wiring.
- पर्यायी power supply (generator, solar system etc) चा विचार करुन त्यासाठी लागणारी arrangement.

अनुभवी आर्किटेक्ट्/बिल्डरकडे ही माहिती असतेच.>> +1

साती ,इब्लिस,महागुरु खुप खुप आभारी आहे तुम्ही दिलेल्या मोलाच्या माहिती बद्द्ल...
पण तरी थोड्या शंका आहेत.
हॉस्पिटल मधील movement ,circulation कस आसव जेणेकरुन वेळेची जास्ती जास्त बचत होइल.
तेसेच safetyसाठी काय काय कराव लागेल? waste disposal कस करतात्(छोट्या हॉस्पिटल मधील )
आश्या बर्‍याच बारीकसारीक गोष्टी ज्या बांधकाम करतानाच केल्या पाहिजेत त्या कळल्या तर बर होइल.

हॉस्पिटलमध्ये कोणत्या स्पेशालिटी असणार आहे, लॅब फार्मसी असणार आहे का? कोणत्या स्पेशालिटीचे डॉक्टर किती वेळ अ‍ॅवेलेबल आहेत, मेजर पेशंट कुणाचे यावरही वेळ वाचावा म्हणून असलेले बांधकाम अवलंबून आहे. तसेच किती फ्लोअरचे बांधकाम आहे हे कळल्यावर सांगणे सोपे होईल. एक हून अधिक मजले असल्यास लिफ्ट देताय की रँप यावरही बरेच अवलंबून.

आणि चूक लक्षात उशीरा आली की झालेले बांधकाम काय पाडून टाका?
Sad

खळी, सगळ्यात सोपा उपाय म्हणजे तुम्हाला ज्या प्रकारचे हॉस्पिटल आवश्यक आहे त्याप्रकारची आसपासच्या गावात असलेली नावाजलेली हॉस्पिटले पाहून या. सोबत तुमच्या मुख्य डॉक्टरला घेऊन जा. खूप आयडिया मिळतील.

कॄपया आपण एक रफ स्केच प्लान देउ शकता जेणेकरुन सरक्युलेशन कळेल.
अजुनी बाकीचे डिटेल्सही कळ्ळे तर बर होइल.
<<<

Image and video hosting by TinyPic

(वरील चित्रावर राईट क्लिक करून तुमच्या काम्प्युटरात सेव्ह करा, व पहा, मोठे चित्र दिसेल.

वरील चित्रात खोल्यांच्या साईझेस लिहायला विसरलो.
मेजर ओ.टी. = १५*१६ फूट (पहिला आकडा आडवे, दुसरा खालून वर मोजलेले अंतर)
रिकव्हरी = ९**
सेप्टीक ओ टी = १३*१४
लेबर रूम (डिलिव्हरी साठी, १ पेशंट १ का वेळी.) १३*१० फूट.
ही खोली बरीच अस्वच्छ असणारे, प्लस जोडून टॉयलेट असणे मस्ट आहे. या रूममधून इमर्जन्सी सिझेरियन सेक्शनचे ऑपरेशन करावे लागले तर डायरेक्ट पेशंटला सेप्टीक ओटी मधे नेता यावे म्हणून ३अ क्र. दिलेले दार तिथे ठेवता येते.

छोटी दारे २.५ फूट, व मोठी (बायफोल्ड डोअर्स) ५ फूटाची आहेत, यावरून रफ अंदाज यावा. आत्ता प्लॅन मॉडिफाय करायला वेळ नाहीये. Sad

इथे गायनॅकॉलॉजी नसेल, तर लेबर रूम ऐवजी सेप्टिक ओटी करता येते, मधले ३अ दार गायब. छोटी ओटी ई.एन.टी. + ऑफ्थॅल्म वापरू शकतात, मोठी ओटी सर्जरी + ऑर्थो इ.

किंवा सेप्टिक ओटी नकोच असेल, तर तिथे कॅथलॅब. किंवा कसेही पर्म्यूट्/कॉम्बो. तुमच्या सर्जिकल टीमला विचारून ठरवता येईल.

आधी छोटे मग वाढवायचा प्ल्यान असेल तरी फर्स्ट फ्लोअर वर हा किमान कॉम्प्लेक्स करून ठेवा असे सांगावेसे वाटते. बेड्स ठेवायच्या खोल्या बांधताना कॉम्प्रोमाईझ चालेल. (देवळाचा सभामंडप कसाही बांधा वा वाढवा, गाभारा नंतर वाढवता येत नाही.) नंतर मजला वाढवला तर हेच काँबो वर उचलता येते.)

शक्यतो बिल्डिंगच्या ट्रॅफिक वाल्या रस्त्यापासून दूरच्या साईडला हा काँप्लेक्स बनवावा.

दोन्ही मुख्य ऑपरेशन खोल्यांना बाहेर कोणतीच खिडकी दाखवली नाहीये. बनवली तरी मजबूत व अपारदर्शक काचेची, न उघडता येणारी बनवावी.

पॉझिटिव्ह प्रेशर व्हेंटिलेशन नसल्यास किमान १ एक्झॉस्ट फ्यान प्रति ओटी असावा. ऑटोक्लेव रूमला असा पंखा मस्ट आहे.

पेशंट लाऊंजमधे ऑपरेशनला जाणारे पेशंट वा त्यांचे नातेवाईक इ. वाट पहाण्यासाठी जागा आहे. सर्जिकल आयसीयू ला ओटीमधून डॉक्टरांना डायरेक्ट अ‍ॅक्सेस आहे.

वर दिलेय ते आयडियल आहे. अधिक उणे, उदा, वेस्ट डिस्पोजल 'श्यूट', लाँड्री श्यूट इ. वेगळे बनवावे लागतात.

पहिल्या प्रतिसादात दिले तसे फ्लोरिंग सिलिंग व भिंतींचे स्पेसिफिकेशन्स आहेत. शक्य तितका युनिफॉर्म, व छिद्रे नसणारा पृष्ठभाग, धूवून स्वच्छ करण्यास सोपा, असे आवश्यक आहे.

waste disposal कस करतात्(छोट्या हॉस्पिटल मधील )
<<

यासाठी प्रत्येक गावात/शहरात एक एन.पी.सी.बी. (नॅशनल पोल्युशन कण्ट्रोल बोर्ड) व पालिका/महापालिका इ. नि ऑथराईज केलेला एक 'एजंट' असतो. हा एजंट कचरा 'उचलण्यासाठी' अमुक रुपये/प्रतिदिवस/प्रति बेड या हिशोबाने चार्ज करतो. (अवांतरः गावातल्या सगळ्या बेड्स चा हिशोब केला, तर या माणसाच्या कमाईचा अंदाज येतो, व यात माफिया का असतात तेही कळते)

विशिष्ट प्रकारच्या बायोडीग्रेडेबल प्लॅस्टीक बॅग्ज, ज्या कलर कोडेड असतात, त्या याच्याच कडून मिळतात (अव्वाच्यासव्वा किमतीत) त्यात कचर्‍याचे वर्गीकरण करून टाकायचे असते.

काही प्रकारचा कचरा त्याला देण्याआधी 'ऑटोक्लेव्ह' करावा लागतो, त्यासाठी वेगळे यंत्र (ओटीबाहेर) वापरावे.

हॉस्पिटलचे ड्रेनेज, म्युनिसिपल ड्रेनेजमधे सोडण्या आधी, एका चेंबर मधे जमा करा. यात डायरेक्ट आंघोळ इ. वापराचे पाणी + सेफ्टी टँकचे अ‍ॅफ्लुअंट दोन्ही येतील. यांचे केमिकल स्टरलायझेशन इथे आपण करणे अपेक्षित आहे. मगच ते पाणी 'सरकारी गटारीत' जाऊ शकते.

शार्प्स डीस्पोजल. प्रत्येक ४-६ खोल्या मिळून, (जिथे इंजेक्शने दिली जातात) १ इंजेक्शनची सुई जाळणारे व सिरिंज नष्ट करणारे यंत्र हवे. हे स्वस्त आहे.

या व्यतिरिक्त ऑर्गन्स (ऑपरेशन मधे कापून काढून टाकलेले भाग इ.) पॅथॉलॉजी लॅबमधील रिएजंट्स व इतर वस्तू, रेडिऑलॉजी डिपार्टमेंटमधील वस्तूंची वेस्ट डिस्पोजल वेगळ्या प्रकारे लागते,

ही सगळी माहिती, 'बाँबे नर्सिंग होम अ‍ॅक्ट' चे रजिस्ट्रेशन घेताना मिळेलच.

१ एकर जागा आहे, तर किमान ५० बेड्स प्लॅन करा. त्यापेक्षा लहान हॉस्पिटलला विविध विमा कंपन्या व सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही.

चॅरिटेबल हॉस्पिटल बिझिनेस म्हणून चालविता येते, व ते तसेच चालवावे. नीट चालवलेत तर फक मेडिकल स्टोअर्स व लॅब + रेडीऑलॉजी मिळून संपूर्ण मेण्टेनन्स निघेल इतके इन्कम जनरेट होते, पेशंटला नाममात्र फी मधे उपचार देता येतील. तुम्ही चॅरिटेबल हॉस्पिटलची बिल्डिंग बांधलीत म्हणून स्टाफने चॅरिटी म्हणून नोकरी करणे लॉजिकल नाही. तसे अपेक्षित केलेत तर पेशंटला सर्विस मिळणार नाही, हॉस्पिटल बंद पडेल. तुमचा हेतू प्लस चॅरिटी दोन्ही वाया जातील. सबब, रिकरिंग एक्स्पेन्सेस निघतील इतपत फी प्लस वरील सोर्सेस(इन्शुरन्स्/सरकारी योजना. आजकाल सरकारी हॉस्पिटलातही पिवळे कार्ड इ. लागते.)कडे लक्ष द्या.

तुमचे लक्ष नीट असू द्या. डिझर्विंग गरीबाला फ्री उपचार मिळेलच हे बघा. पण त्यालाही किमान १० रुपये तरी फी लागलीच पाहिजे. अ‍ॅफोर्डिंग असेल तर थोडे चार्ज केलेच पाहिजे. नाहीतर फुकट उपचार व औषधांची किंमत रहात नाही हे स्वानुभवाने सांगतो.

...संपूर्ण..

ता.क.
१. स्क्रब बेसिनचे डिझाइन टाकायचे राहून गेले. रेडिमेड घेणार नसाल तर आठवण करा. इथे टाकीन.
२. स्पेस क्रंच नाहीये. सबब लिफ्ट पेक्षा रँप सोपा. व स्वस्त. शिवाय मेण्टेनन्स फ्री.

लिफ्ट किंवा रँप नक्की नक्की द्या! अगदी कळकळीची विनंती! एका नातेवाईक स्त्रीचे हाल अगदी जवळुन बघितले आहेत लिफ्ट्/रँप नसलेल्या दवाखान्यात. इब्लिस म्हणताहेत तसं रँप बेस्ट.