शारजा आणि दुबई व परिसरातील मायबोलीकरांची एक परिचय भेट SRK म्हणजे श्रुती मोहन यांच्या सक्रीय पुढाकाराने घडली. आम्ही मोजकेच मायबोलीकर उपस्थित राहू शकल्याने मायबोलीतील प्रचलित लौकिकार्थाने ते 'गटग' अथवा GTG नव्हते. म्हणून मी तिला परिचय भेट म्हणतो. मी, म्हणजे मुकुंद कर्णिक, श्रुति मोहन, m_varsha म्हणजे वर्षा म्हसकर-नायर, ndive म्हणजे नरेंद्र, आणि रूपेश असे पाचजण दुबईमधील 'लॅम्सी प्लाझा' या शॉपिंग मॉल मधील फूडकोर्टमध्ये काल शुक्रवारी (२२ मे २००९) संध्याकाळी साडेचार वाजल्यानंतर भेटलो आणि वैयक्तिक माहितीची देवाणघेवाण झाल्यानंतर मायबोलीमधले आपआपले अनुभव, वेगवेगळे बा फ, सभासदांचा त्यांतील सहभाग, प्रतिसाद (उखाळ्या पाखाळ्यांसह असलेला) वगैरे खूप गोष्टींवर दिलखुलासपणे जवळजवळ अडीच तीन तास बोललो. वेळ खूप चांगला गेला. पुन्हा एकदा लवकरच भेटण्याचे ठरवून ही परिचय भेट संपली. वर्षा, श्रुती आणि नरेंद्र, तुम्हीही आणखी काही या परिचय भेटीच्यासंबंधी जरूर लिहा.
दुबई मायबोलीकरांची परिचय भेट
Submitted by एम.कर्णिक on 23 May, 2009 - 05:41
गुलमोहर:
शेअर करा
"सगळं नीट
"सगळं नीट झालं! सगळ्यांनाच छान वाटत असेल नं?" मी. नवरा समजूतदार हसला. मॉलच्या बाहेर आल्यापासून एका तासात कमीत कमी १० वेळा तरी मी हे म्हंटले असेन. झालं काय की,
मी नुकतीच मायबोलीवर परतले. इथल्या मायबोलीकरांना भेटावं असं वाटत होतच. वर्षा आणि योग यांच्याशी बोलल्यावर एवेएठि (एका वेळी एका ठिकाणी) चा विचार पक्का झाला. "पश्चिम आशियातले मायबोलीकर" मधुन १६/१७ जणांना विपुत निरोप ठेवला. ६ जणांनी येण्याची इच्छा असल्याचं कळवलं. सगळ्यांच्या संमतीने २२ मे ही तारीख ठरली. मधे २ आठवडे असल्यामुळे निश्चिंत होते. सगळं कसं छान व्यवस्थित होणार. काय घाबरायचं गटग ऑर्गनाईझ करायला? हाय काय अन नाय काय!
आणि...
विश्वासाला पहिला धक्का:- योगनी मी नेमका त्याच विकेंड्ला भारतात जात असल्यामुळे येऊ शकत नाही असं कळवलं. अंजलीच्या मुलांच्या परीक्षा असल्यामुळे ती येणार नव्हतीच. तरी अजून ३/४ जणं आहोत की असा विचार करुन थोडी शांत झाले. तरी दुष्ट मन ऐन वेळी त्या दिवशी कोणी येईल की नाही की बारगळल सगळं असा विचार करकरुन त्रास देत होतं.
होता होता २२ तारखेला ५ वाजता भेटायचं येवढं ठरलं. जरा घाबरतच रोज विपू बघायची आणि कुणी न येण्याबद्दल लिहिलं नसलं की नि:श्वास सोडायचा असं आठवडाभर चाललं होतं. शुक्रवारी भेटायचं असल्यानं बुधवार पर्यंत जागा पक्की होणं गरजेचं होतं. सगळ्यांच्या सोईनी "लॅम्सी प्लाझा" ह्या मॉलमधे भेटायचं ठरलं. परवाच तर भेटायचय आता काही गडबड होणं शक्य नाही असा विश्वास वाटायला लागला.
आणि.....
दुसरा धक्का:- मुकुंदना नेमकं त्याच वेळी विमानतळावर जाणं आवश्यक असल्यानी ते येणार नाहीत असं कळलं. झालं! माझ्यासकट ३ जणच असणार. आता इतर दोघांपैकी एकान जरी नाही म्हंटलं तर झालंच!
शुक्रवारी सकाळी वर्षाला फोन वरुन नक्की ये बरका वगैरे सांगितलं. तिला घशाला इन्फेक्षन झालं असुनसुधा नक्की येणार असं तीनं सांगितल्यावर निदान दोघीतरी भेटुच जर नरेंद्रपण नाही आले तरी असा विचार करुन बरं वाटलं. पण नरेंद्रनी येतोय म्हणुन कळवलं. मुकुंद यांनीही मी थोड्यावेळासाठी तरी येऊन जाईन म्हणुन सांगितलं. जरा हुश्श्श झालं.
आता गंमत अशी की वर्षा सोडली(तिच्या प्रोफाईलमधे फोटो असल्यामुळे) तर कोणीच कुणाला पाहिलेलं नाही. "बॉम्बे चौपाटी" या औट्लेट च्या समोर भेटायचं ठरलं तरी ओळखणार कसं हा प्रश्न होताच! मग फोनवरुन कुठल्या रंगाचा शर्ट घातलाय, कितव्या टेबलपाशी ते सांगुन झालं. तेवढ्यात टेबल शोधायला आलेल्या दोघातिघांना बघुन हेच नरेंद्र असावेत असं नवर्याला सांगुन घेतलं. ते मात्र एका माबोवाचक मित्र रूपेशबरोबर आले. वर्षाला लगेच ओळखलं. आणि मुकुंदच्या फोनला उत्तर दिलं तर ते टेबलसमोरच ऊभे होते!
ओळखी झाल्या. माझा नवरा, मुकुंद यांचा मुलगा आणि सून (नॉन माबोकर) मॉल मधे चक्कर मारायला निघुन गेले. एकतर हा मॉल अगदी भारतीय, आम्ही चौपाटीसमोर बसलेलो, मायबोलीविषयीच्या गप्पा सुरु असल्यानी मला अगदीच भारतातल्यासारखं वाटायला लागलं. त्यात मसाला चहा देणार्या माणसानी "चाय गुल्लक में मिलेगी?" या माझ्या प्रश्नाला उत्तरादाखल "च्यॅक" असा आवाज काढुन दाखवल्यावर गदगदुन आलं. चिमटा काढुनच आपण दुबईत आहोत याची खात्री करावी लागली. असो. तर मनापासून गप्पा मारल्या. थोड्या वेळानं (२ तासांनी) परतलेले नॉन माबोकरही बघता बघता आमच्यात मिसळले. निघु नयेस वाटत होतं पण निघावं लागणारच होतं.
मॉलच्या बाहेर आल्यापासून एका तासात कमीत कमी १० वेळा तरी मी "सगळं नीट झालं! सगळ्यांनाच छान वाटत असेल नं?" म्हंटले असेन.
मी भली
मी भली मोठी पोस्ट टाईपली, सबमिट बटन वर क्लिक केल्यानंतर काहीतरी error येउन सर्व vanish झाले.
आता सर्व त्याच भावनेसह, त्याच excitement सह पुन्हा टाईपणे शक्य नाही.
असो. थोडक्यात सांगायचे तर दुबईतल्या पहिल्या गटग चे आम्ही शिलेदार आहोत. मज्जा आली. दोन-अडीच तास कसे गेले ते कळाले देखिल नाही. मुख्य म्हणजे आम्ही सर्वजण प्रथमच भेटत असुनसुद्धा आमच्या गप्पांमधे जराही औपचारिकता नव्हती. गप्पा रंगल्या. ( सॉल्लीड गॉसिपींग केले) वेगवेगळे बाफ, सध्याचे हॉट टोपिक्स अशा अनेक विषायांवर चर्चा रंगली. माबोवरिल कविता हा आमच्या गप्पांमधला बराच फुटेज खाणारा टॉपिक होता.

बाकी सर्व तर श्रुती आणि मुकुंद ह्यांनी लिहीले आहेच.
विशेष कौतुक हे श्रुतीचा नवरा 'मोहन' ह्यांचे करावे लागेल. एकतर मुळचे दाक्षिणात्य असुनही ते अतिशय शुद्ध मराठी बोलतात आणि त्यांनी न कंटाळता २-२.३० तास मुलाचे बेबी सिटींग केले व त्याला मॉल मधे हिंडविले आणि श्रुतीला आमच्यात चकाट्या पिटण्यासाठी मोकळे सोडले.
मुकुंद कर्णिक ह्यांची सून हि देखिल नंतर आम्हाला जॉईन झाली आणि तीने देखिल आमच्याशी मोकळेपणाने गप्पा मारल्या.
तर असे झाले आमचे छोटेखानी गटग. पुन्हा असेच कधी भेटण्याचा वादा करित आम्ही तिथुन निघालो.
अरे वा........
अरे वा........ मज्जा केलेली दिसतेय...... !! छान वाटतं ना असं अनोळखी चेहे-यांमधून मायबोलीतली ओऴख शोधायला
~~~~~~
इथे डोकवा. http://jayavi.wordpress.com/
आणि कविता.... इथे http://maajhime.blogspot.com/
वा वा
वा वा चांगले वाटले वाचून! आणि लोकहो २-३ जण जमले तरी ते गटगच होते (मुळात कशाला गटग म्हणावे याबाबत अजून काही नियम नाही
). येथे कॅलिफोर्निया मधे बे एरियात प्रचंड संख्येने मराठी लोक असून गटग ला जेमतेम ४-५ असतात. तरीही मजा येते, तुम्हालाही असाच अनुभव आला असेल ना!
दुबई मधील
दुबई मधील पहिल्या गटग साठी जमलेल्या सर्वांना धन्यवाद. अर्थात सर्व श्रेय श्र्रुतीला आहे. तीच्या (अती)उत्साहा मुळेच सर्व काहि व्यवस्थित जमुन आले. अन्यथा एक एक जण गायब व्ह्यायला लागल्यावर थोडी शंका आली होती. पण मजा आली. मुकुंदरावांची अनपेक्षीत उपस्थितीपण सुखद धक्का देवुन गेली.
ते सुन आणी मुलाला घेवुन येणार असल्यामुळे त्यांच्या वयाचा थोडा अंदाज होता. मात्र श्र्रुती सुद्धा 'नवर्यामुलाला' घेवुन येणार म्हट्ल्यावर तीच्या वयाबद्दल (वरमाई) थोडा चुकीचा अंदाज केला होता ( माफ कर श्र्रुती ! हा ईनोद आहे.) पण ती नवर्याला आणी मुलाला बरोबर घेवुन आल्यामुले सर्व अंदाज चुकले. असो. गप्पागोष्टी, कविता परिक्षण, संवाद, एकुणच मस्त वेळ गेला.
आणी सर्वात आश्रर्य वाटले ते लॅम्सी सीनेमा मधे च्चक्क "मी शिवाजीराजे बोलतोय" या चित्रपटाचे पोस्टर पाहिल्यावर. (लवकरच येतोय) दुबई मधे मराठी चित्रपट ? मी तर प्रथमच बघीतल आणी खुप आनंदही झाला.
भेटलेल्या आणी भेटु न शकलेल्या सर्व मायबोलीकरांना शुभेछा!
नरेंद्र दिवे.
मात्र
मात्र श्र्रुती सुद्धा 'नवर्यामुलाला' घेवुन येणार म्हट्ल्यावर तीच्या वयाबद्दल (वरमाई) थोडा चुकीचा अंदाज केला होता ( माफ कर श्र्रुती ! हा ईनोद आहे.) पण ती नवर्याला आणी मुलाला बरोबर घेवुन आल्यामुले सर्व अंदाज चुकले. असो. >>>>
क्काय हे! हसता हसता पुरेवाट!
वर्षा तुझा वृत्तांत नवर्याला वाचुन दाखवला. तो खूप खुश झाला. मला म्हंटला "तू काही लिहिलं नाहीस माझ्याबद्दल!"
मुकुंदकाकांची सून आणि मुलगा पण सगळ्यांच्यात मस्त मिक्स झाले. रुपेश मायबोली वाचत असल्यानी वेगळे वाटलेच नाहीत.
चौघांचे मिनी वृत्तांत मिळुन एकुण सगळं कव्हर झालय!
येथे कॅलिफोर्निया मधे बे एरियात प्रचंड संख्येने मराठी लोक असून गटग ला जेमतेम ४-५ असतात. तरीही मजा येते, तुम्हालाही असाच अनुभव आला असेल ना!>>अगदी अगदी. शेवटच्या क्षणापर्यंत नक्की सगळे येणार की नाही ही धाकधुक होती. एकदा जमल्यावर मात्र अगदी "सुटलोच!"
मात्र
मात्र श्र्रुती सुद्धा 'नवर्यामुलाला' घेवुन येणार म्हट्ल्यावर तीच्या वयाबद्दल (वरमाई) थोडा चुकीचा अंदाज केला होता >>>>

अरे व्वा!
अरे व्वा!
छानच की! 
चान्गले लिहिलेत वृत्तान्त!
मला
मला म्हंटला "तू काही लिहिलं नाहीस माझ्याबद्दल!">>> तेव्हा कसं वाटलं नेमक्या शब्दात सांगाल का श्रुती
बाकी मज्जा आली असेल ना? मस्त !
***********************************
"आज खिडकीच्या गजांवर आभाळ येऊन थांबलं आहे,
ओंजळीत घेईल कवी म्हणून बरसणंही लांबलं आहे !"
नरेंद्र, तु
नरेंद्र,
तुमच्या झक्कास विनोदाबद्दल मान गये, उस्ताद!
आणि श्रुती, माझा मामा न बनवता मला काका केल्यामुळे खूप छान वाटले. नरेंद्र, रूपेश, श्रुती आणि वर्षा, तुम्हा सर्वांचा लाईव्हली सहवास पुन्हा लवकर अनुभवायला मिळावा असे वाटते.
मुकुंदकाका
मुकुंदगान:- http://mukundgaan.blogspot.com
भगवद्गीता:- http://marathi-bhagavadgita.blogspot.com