दागिने कुठे घ्यावेत? अमेरिकेत की भारतात

Submitted by साहि on 10 May, 2011 - 17:24

योग्य किमतीला चान्गले दगिने कुठे घ्यावेत ईथे कि तेथे? कहि जण म्हणतात तिकडे स्वस्त असतात वगेरे
योग्य उहापोह व्हावा हि विन्नती

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोन्याच्या किमतीत भारत व अमेरीकेत जास्त काही फरक नाही. त्यामूळे तुम्हाला डिझाईन्स व करागिरी शुल्क पहावे लागेल. भारतात तुम्हाला तुमच्या आवडिच्या डिझाईन मधे व कमी लेबर किमतीत मिळू शकेल.
अमेरिकेत बर्‍याच जागी भारत व सिंगापुरात बनविलेले दागिने येतात. सिंगापुरी दगिण्यास जास्त शुल्क मोजावे लागेल.

साही, मला द्यायचे असल्यास भारतात घ्या! Happy

गंमत मोड ऑफ

तुम्हाला गुंतवणूक म्हणून सोने घ्यायचे आहे का?
रोजच्या वापरासाठी दागिने हवे आहेत का?
ह्या दोन प्रश्णांवर तुमचा प्रेफरंस ठरवा.

गुंतवणूक म्हणजे मुलीसाठी नंतर मोडायचे इ. असेल तर शकत्यो चेन, वळे, मुद्रा असे काही तरी घ्या. हे दागिने कुठेही घेतलेत तरी फारसा फरक पडणार नाही. हे मुद्रा सोने एच्.डी.एफ्.सि वै. बँका परदेशातुनही घेऊ देतात.
रोजच्या वापरातले दागिने ज्या देशात रहाता तिथे घ्या.. म्हणजे तिथले पेहराव आणि लेटेस्ट फॅशन ह्याला योग्य ते दागिने घेता येतात. जर तुम्ही परदेशातही भारतीय पेहराव वापरत असाल तर भारतातून नाजुक दागिने घेतले तरीही शोभतात.
कार्यप्रसंगी घालायचे दागिने भारतात घेतले तर मोती, पोवळे, हिरे व सोने ह्यांची ट्रॅडीशनल डिझाईन्स घेता येतात. ह्यात मुलांसाठी म्हणून नाजुक दागिने देखिल घेता येतात... जसे मोत्यांचा एक सर नेकलेस, इ. भारतातही हिर्‍यांची सर्टीफिकेट्स मिळतात, त्यामुळे फसवणूक टाळता येईल.

अमेरिकेत कोणी गोल्ड कॉईन घेतलं आहे का? गुंतवणूक म्हणूनच घ्यायचे आहे. साधारण काय रेट असतो कोणाला महित आहे का?

अंजली_१२: Without any doubt US मधेच घ्याव and make sure you buy "Credit Suisse" bars and NOT coins. You do get bars in 1/5/10/20/50gms variations and its easy to sell back home in India if at all you need to liquidate.

In Manhattan, NY there are many banks which sell such bars might be lot easier to buy as well.

I hope this helps... Happy

योगीबेअर +१
चोख सोने (वळं, नाणी, चीप, वीट Happy इ.) घेणार असाल तर अमेरिकेतच घ्या. किंमतीत फार फरक पडत नाही. आणि विश्वासार्हता, सर्टिफिकेट वगैरे यात फसवणूकीची शक्यता जवळजवळ नाहीच. भारतात कुठे, कोणत्या सराफाकडून घेताय याला खूप महत्व आहे. त्यांचे प्रमाणपत्र पण सगळीकडे चालेल असं नाही. पण अमेरिकेत मिळाणारं प्रमाणपत्र सगळीकडे लागू होतं असावं.

दागिने करून घेणार असाल तर भारतात कारण हवं तसं डिझाईन, पारंपरिक प्रकार करून मिळतात. इथे करून पाहिले नाहीयेत दागिने पण लेबर कॉस्ट जबरी असणार असं वाटतं. पण इतर गोष्टी - हीरे, मोती, बाकीची रत्ने यांचे तयार दागिने अमेरिकेत जे मिळतात ना त्यांचे फिनीशिंग चांगले असते. भारतात फार कमी सरांफाकडे उत्तम फिनिशिंग क्वालिटी दिसते.
अर्थात असे जे उत्तम सराफ आहेत त्यांच्या दुकानात जाऊन, तासनतास वाट बघून अतिशय दुर्लक्षितपणे वागवले जाऊन तुम्हाला पोतेर्‍याची किंमत झेलायची तयारी हवी. Happy

In Manhattan, NY there are many banks which sell such bars might be lot easier to buy as well>>> धन्यवाद योगीबेअर्...
हे बार बँकेत जाऊन घ्यायचे होय? ज्वेलर्स कडे मिळत नाहीत का? कारण मी न्यू जर्सीत अगदी सराफकट्टा म्हणतात ना (गुजराथी समाजाचा) त्याच्या फारच जवळ राहते. Proud
माफ करा मी अगदी काहीतरीच प्रश्न विचारतेय का?

चोख सोने (वळं, नाणी, चीप, वीट इ.) घेणार असाल तर अमेरिकेतच घ्या. किंमतीत फार फरक पडत नाही. आणि विश्वासार्हता, सर्टिफिकेट वगैरे यात फसवणूकीची शक्यता जवळजवळ नाहीच>>> हे पटलंच.

इतर गोष्टी - हीरे, मोती, बाकीची रत्ने यांचे तयार दागिने अमेरिकेत जे मिळतात ना त्यांचे फिनीशिंग चांगले असते. >>> म्हणजे जे मॉलमधे वगैरे विकतात तसे का?

इतर गोष्टी - हीरे, मोती, बाकीची रत्ने यांचे तयार दागिने अमेरिकेत जे मिळतात ना त्यांचे फिनीशिंग चांगले असते. >>> म्हणजे जे मॉलमधे वगैरे विकतात तसे का?
>>> हो म्हणजे मेसीज, झेल्स, कोस्टको अशा ठिकाणी जे स्टोनचे, मोत्याचे दागिने असतात त्यांचे हूक, मधल्या साखळ्या, किंवा अंगठीत मधे स्टोन असला तर आजुबाजुला जे डिझाईन असते ना ते चांगल्या प्रतीने घडवलेले असते. पुण्यात तशी क्वालिटी गाडगीळ, वामन हरी यांच्या दागिन्यांमधे पाहिली आहे. पण सगळ्या सराफांकडे असतेच असं नाही.

>>इथे सोन खरेदी केल तर भारतात परत जाताना कस्टम मध्ये काही प्रॉब्लेम होतो का>>>> भारतात त्यावेळी जो ऑफिसर एअरपोर्टवर आहे त्याच्या मर्जीवर अवलंबून आहे हे. Happy Happy
जोक्स अपार्ट. मी अमेरिकेतील सोने अजून कधी भारतात नेले नाहीये. पण एक, दोन मैत्रिणींचा अनुभव असा आहे. जिने दागिने नेले होते तिला काहीच त्रास झाला नाही. हे माझे वापरातले दागिने म्हणून नेऊ शकली. दुसरीने आईवडिलांसाठी चोख सोने घेतले होते तिला अडवले. आणि बहुतेक ड्युटी भरावी लागली. याबद्दलचे नियम आहेत पण कसे चेक करतात ते माहित नाही.

Assumption:
You are NOT carrying KGs of gold bars back to India!!! ofcourse it is dutiable and you cannot hide it at all.

General:
If you are carrying 5/10/20gms bars then you usually get them in plastic bags (very small thick plastic bag). Just attach a safety pin and put it as a locket and NO one in customs will ask you about it.

अंजली_१२: किती तो आळशी पणा!!! एक काम करा, $ मला पाठवुन द्या म्हणजे मी खरदी करतो आणि जमेल तसे भारतात पाठवत जाईन आणि हो विकुन पैसे सुद्धा मझ्याच bank मधे जमा करीन म्हणजे आपल्याला काही त्रास नाही बघा... Proud (just kidding)

If you buy from banks then it will be bit cheaper than buying from your local Gujarati jewellery store.

FYI: Recently duty on gold imports is increased by 2% by government hence gold in India is going to get costly....

Hope this helps... Happy

योगी पुन्हा एकदा धन्यवाद, म्हणजे (जस्ट किडींग) साठी नव्हे बरं का Proud

भारतात सोनं अजून किती महाग होणारे देव जाणे?

पेरु: Just think of it more like where it is produced...
Brands:
1. Perth Mint Gold - Australia brand
2. Credit Suisse Gold - Swiss brand (very popular since it is known to masses)
3. PAMP Suisse Gold - Swiss brand (just another producer)
4. NTR Gold - Another producer

Typically, #2 is very popular as it is the most known brand, #1 & 3 are also known brand but not to many, #4 is less known brand.

Does price change!!!
YES, but not much as difference is probably $1-5 per Oz.

Hope this helps... Happy

दोन दिवसांपुर्वी नेटवर सोन्याची किंमत २4K साठी ३०५५०/- प्रती तोळे (१० ग्रॅम) होती. सोनाराकडे विचारल्यावर त्याने हॉलमार्कच्या दागिन्यांसाठी ३०८५०/- प्रती तोळे सांगितली. ईतर काही ज्वेलर्स कडे देखिल तीच किंमत होती.
एका सेल्समॅन ला या फरकाबद्दल विचारल्यावर त्याने सांगितले की 'जी लोक टनांमध्ये सोने खरेदी करतात, त्यांच्यासाठी ती किंमत असते'
दागिन्यांची किंमत प्रतीग्रॅम = ३०८०(सोने)+१८०ते४०० घडन + १% वॅट

न्युजपेपर किंवा नेटवर डिस्प्ले केलेल्या किंमतीचे सोने कुठे मिळेल?male30-male-sad-lonely-smiley-emoticon-000072-large.gif

yogibear, माहिती साठी धन्यवाद. मी सध्या पर्थमध्ये आहे. त्यामुळे मी पर्थ मिन्टचा विचार करत होते.
पण सोने घेताना coin चांगले कि bar? आणि कोइन किंवा बार (थोडक्यात शुद्ध सोने) विकण्याची आणि विकत घेण्याची किंमत वेगवेगळी असते का? (खुपच भा. प्र.)?

भारतात प्रत्येकी १ किलो पर्यंत सोने सीमा शुल्क भरल्या शिवाय आणता येते. त्या साठी कोणतेही सीमा शुल्क द्यावे लागत नाही. मग हे सोने कोणत्याही स्वरुपात असो. प्रत्येक खरेदीची रीसीट बरोबर असणे गरजेचे आहे. तुम्ही जर इन्व्हेस्ट्मेंट म्हणुन कोणत्याही देशातुन सोने आणले तर १ किलो पेक्षा जास्तीच्या सोन्यावर सीमाशुल्क भरावे लागेल.

सीमा शुल्क हे नेहेमी त्या वस्तुची भारतातली किंमत धरुन आकारले जाते. त्या मुळे १ किलो पेक्षा जास्त सोने तुम्ही कोणत्या भावाने खरेदी केले त्याला महत्व नाही. दोन किंवा तीन माणसे एकत्र प्रवास करणार असाल तर रीसीट वेगवेगळ्या नावांनी बनवुन घ्या...

साधारण सीमा शुल्क सोन्या साठी साधारण २८% ते ३०% पर्यंत आहे.

हो तेच ते !!! कस्टम ड्युटी....त्याला हिबृ मधे सीमा शुल्क म्हणतात !!!!

ऑक्ट्राय हा महानगरपालिका चार्ज करते. त्याचा संबंध फॉरेन हुन वस्तु आणण्याशी नाही. प्रत्येक महानगर पालिका महाराष्ट्रात ऑक्ट्राय लावते. हा कर महाराष्ट्रात आहे. अनेक राज्यात नाही.

धन्यवाद् मोकीमी..मग तसे असेल तर कोणालाही १ किलो पर्यंत (सिमाशुल्काशिवाय) सोने आणता येणार आणि तसेही १ की सोने कुठे आणतो आपण? आणले तर जास्तीत जास्त १ तोळा ते अगदी लग्न वगैरे असेल तर १० तोळे वगैरे म्हणजे कोणाही अमेरिकेहून येणार्‍या घरच्या नातेवाईकास सांगून आणणे फारच सोयीचे होईल ना.

पेरु: The rate we see on internet for Gold/Oz is known as SPOT rate very similar to currency exchange rate and is never available on the street.

We are always buying from agents/banks/dealers/etc.

Buying Gold - You will always end up paying little more than that spot rate
Selling Gold - You will always end up getting little less than that spot rate

Bars are more popular and hence easy to sell than coins.

Happy

एक किलो सोनं आणता येतं................ ही तर मोठी बातमी झाली.

माझ्या अल्प माहितीनुसार फक्त रुपये २०,०००/- किंमतीचंच सोनं तुम्हाला भारतात आणता येतं. कितीतरी वर्षांपासून ही रक्कम बदलली नाहीये. आता तर किती तरी पटीने सोन्याची किंमत वाढलीये पण भारतात आणण्यासाठी अजूनही तीच रक्कम आहे.

भारतात जांताना स्पेशली नागपूर, जयपूर अशा विमानतळांवर बर्‍याच मैत्रिणींना त्रास सहन करावा लागलाय. पैसे भरावे लागले आहेत.

जर कोणाला कस्टमची नियमावली इथे देता आली तर बरं होईल. "याची देही, याची डोळा" Happy

१०-१५ वर्षांपूर्वी दागिने केलेले असतील आणि भारताबाहेर वास्तव्यास असल्यास, पुन्हा भारतात परत जाताना काही त्रास होतो का? प्लिज नोट या दागिन्यांची मूळ पावती नाही, भारतातून बाहेर पडताना काही नोंद पण नसते तर अशावेळी कस्ट्मने विनाकारण त्रास दिला तर काय करावे?

१०-१५ वर्षांपूर्वी दागिने केलेले असतील आणि भारताबाहेर वास्तव्यास असल्यास, पुन्हा भारतात परत जाताना काही त्रास होतो का? प्लिज नोट या दागिन्यांची मूळ पावती नाही, भारतातून बाहेर पडताना काही नोंद पण नसते तर अशावेळी कस्ट्मने विनाकारण त्रास दिला तर काय करावे? >>>>> कारण २०००० पेक्षा जास्ती किंमत तर छोट्याश्या मंगळसुत्राची पणअसते Uhoh

धनश्री: You will fall in a category called "change of residence" and visitor rules does not apply to you. For most part no customs duty on any household items but for jewellery you may have to directly inquire from customs.

धन्यवाद योगीबेअर.
आमचा परतीचा वगैरे विचार नाही पण प्रत्येकवेळी भारतात जाताना कोणते कार्य असेल तर स्वतःचेच लग्नातले ४ दागिने नेताना भीती वाटते. २४ तास प्रवास करून दमलेल्या अवस्थेत त्या कस्टम अधिकार्‍याला काय आणि कसे सांगायचे याचे टेन्शन येते. त्यातून तो पैसे खायलाच बसलेला असतो.

मी या वेळी दिराच्या लग्नासाठी जाताना मोठं मंगळ्सूत्र आणि नेकलेस (जे नॉर्मली आपण लग्नात घालतो ना तसं) सोन्याच्या २ बांगड्या नेल्या होत्या हँडबॅगेत. काही चेक नाही केलं.

अंगावर जे दागिने असतात त्यांना नाही बसत ना कस्टम ड्युटी. मी मागच्या वेळेस गेले होते तेव्हाही नेकलेस हँड्बॅग मधे नेला होता. काही प्रोब्लेम आला नाही. पण आता गोल्ड्बार न्यावा कि नाही हा विचार करते आहे Uhoh

बार बँकेत जाऊन घ्यायचे होय? ज्वेलर्स कडे मिळत नाहीत का? कारण मी न्यू जर्सीत अगदी सराफकट्टा म्हणतात ना (गुजराथी समाजाचा) त्याच्या फारच जवळ राह>>>>>>
ओक ट्री रोडवरील सराफांकडे स्विस गोल्ड बार मिळतात १ आउन्स पासुन . फक्त तुम्हाला कॅश द्यावी लागेल. ते कार्ड घेत नाहीत.

दुबईच्या सोन्याबद्द्ल कोणाला माहिती आहे का? ईथले सोनार सांगतात की भारतातले सोने चोख नसते .शिवाय भारतात फसवणुकीची शक्यता असते कोणाला काही माहिती असेल तर नक्की सांगा.