ऑस्ट्रेलिया ट्रीप संबंधी माहिती हवी आहे

Submitted by saakshi on 3 January, 2013 - 05:44

नमस्कार मंडळी,
पुढच्या महिन्यात सिडनीला जाणार आहे. ५ दिवस सिडनीत मुक्काम असेल. तिथल्या कोणत्या गोष्टी must see आहेत. गूगलवर माहिती आहे पण जर कोणी स्वतः गेले असतील आणि अनुभव सांगितले तर खरच फायदा होईल.
तसेच सिडनी-मेलबर्न २ दिवसांची ट्रीप केली तर साधारणतः किती खर्च येईल? अर्थात हा चॉईस असेल, मेलबर्नला जावे की इतर दुसरे शहर जास्त प्रेक्षणीय आहे?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी ६ महिन्या पुर्वी च Melbourne वरुन परत आलो. Sydney पण राहिलो होतो आधी. Sydney मधे opera house सोडुन अगदी बघण्यासारखे special काही नाही. जर तुम्ही युरोप US बघितला असेल तर वेगळे फार नाही. beaches आहेत चांगली. सध्या समर पण आहे चालु.

पण एक करता येईल, म्हणजे नक्कीच करा.

sydney ला public transport म्हणुन ferry service पण आहे. सिडनी ला समुद्र बर्‍याच ठिकाणी खाड्यांसारखा आत येतो. public transport चा day pass काढा ( २०-२५ $ ). Circular Quay पासुन ह्या सगळ्या फेरी सुटतात. ६-७ routes आहेत. सगळे try करा. चांगले आणि वेगळे सिडनी दर्शन होईल.

खालचे फोटो फेरी मधुन काढले आहेत.

Opera_House_from_Ferry-5.JPGThe_City_from_Ferry-3.JPGThe_City_from_Ferry-5.JPG

Sydney - Melbourne Trip - सिडनी - Melbourne return ticket $400 पडेल. Melbourne ला पण special असे बघण्या सारखे काही नाही. पण Melbourne रहाण्या साठी उत्तम शहर आहे. melbourne बरी hotels $१०० ला मिळतील, weekend टाळा ( दर जास्त होतात ).
आत्ता melbourne ला F1 असेल, ते बघुन जा, f1 असेल तेव्हा hotels आणि विमानाची tickets फार महाग होतात. कधी कधी मिळत पण नाहीत.
Cityedge नावाचे चांगले hotel आहे. melbourne ला "Great Ocean Road Tour म्हणुन एक tour असते. ( $१२० ). पुर्ण दिवसाची Tour असते. समुद्राच्या किनार्‍या किनार्‍र्यानी बस नी नेतात. ती चांगली आहे.

आम्ही ऑगस्ट मध्ये सिडनीला गेलो होतो. ९ दिवस होतो. मला तर दिवस कमी पडले असच वाटलं.
पहिले दिवशी हार्बर ब्रिज, ऑपेरा हाउस आणि सिडनी टावर पाहिला.
एक दिवस सिडनी झू पाहिलं, तिथे जाताना फेरी राइड वर जायला गंडोला राइड आणि झू मधले शो पण छान आहेत. मुलांना फार मजा आली. बर्ड शो ला व्हू फार छान आहे.
एक दिवस डार्लिंग हार्बर एरियात घालवला. तिथे चायनीज गार्डन, lindt cafe असा टीपी केला
सिडनीहून एक दिवसाची ट्रीप ब्लू माउंटन ला केली. एक दिवसाची ट्रीप हंटर व्हॅली ला वाइन टेस्टिंग/पिकनिक ला केली, एक दिवस कॅनबरा ला जाउन पार्लमेंत हाउस, वॉर मेमोरियल पाहिलं,
एकदा सिडनीमध्येच मॅनली बे आणि नॉर्थ हेड्स ला गेलो होतो. बॉन्डाय बीच ला जायचं थंडीमुळे राहिलं.
मला तर सिडनी ला परत एकदा जायला फार आवडेल.
आम्ही मैत्रिणीकडे राहिलो त्यामुळे हॉटेल स्टे चा खर्चाचा अंदाज नाही सांगू शकत. पण बाकी फूड पण अमेरिकेपेक्षा दीडपट महाग वाटलं साधारण.

धन्यवाद प्रसाद, शूम्पी Happy
प्रसाद, ferry service नक्की ट्राय करेन Happy
शूम्पी, >>>>पहिले दिवशी हार्बर ब्रिज, ऑपेरा हाउस आणि सिडनी टावर पाहिला>>> नोटेड Happy