क्रेडीट

Submitted by योग on 25 January, 2008 - 17:39

सरकारने dance bar बन्दी कितिही रोखठोकपणे लागू केली असली तरी काना कोपर्‍यातील गल्लो गल्लितील डान्स बार असे पटकन बन्द थोडीच होणार होते.. एकवेळ दन्गलीच्या भितीने मन्दीर मशिदीला कुलुप लागलेही असते पण मन्द प्रकाशात, धुराच्या तरन्गात, मद्य अन जवानीच्या सुगन्धात आयुष्याच्या बाजाराची बोली लावणारी ही स्वप्नमन्दीरे बन्द झाली तरच नवल...
अव्या आज पुन्हा या बार मधे आपल्या आयुष्याचा डाव मान्डून बसला होता. दारूचे घुटके घशाखाली उतरवताना ह्रुदयातील बोच बुडवण्याचे प्रयत्न चालू होते पण मेन्दूच्या झिणझिण्या काही संपत नव्हत्या... खर तर अवी हे इथले रोजचे गिर्हाईक, बार मालकापासून नेहेमीच्याच बार बालान्पर्यन्त सर्वानाच अव्याचा चेहेरा ओळखीचा. रोज इथे यायचे डाव मान्डायचा अन कधीतरी नशीब बदलेल याची वाट बघत बसायची. या तरूण पोराच्या वैफल्यावर आताशा बार मालकालाही दया येवू लागली होती.. "देवा याच पण नशीब बदलू दे रे".. तो स्वताशीच पुट्पुटायचा..

पण नेहेमी आन्गलट करू पाहणार्‍या पोरिन्वर आज मात्र अवी उचकून होता.. हरामखोर कुठल्या, सगळ्या साल्या मतलबी.. स्वताशीच पुट्पुटत होता..

सन्गीताच्या तालावर आपल्या अन्ग प्रत्त्यान्गान्चे ठुमके लावणार्‍या त्या नर्तिका नजरेच्या इशार्‍याने एकमेकीन्शी कुजबुजत होत्या.."आज फिर बिबी से झगडा करके आया लगता है..."

अव्या त्याच्या टेबलावर असा एकटाच धुसफ़ुसत होता अन अचानक चक्रवर्ती सर समोर येवून बसले..
अरे सर तुम्ही? अव्या एकदम शुध्धीवर आल्यागत बोलला..
काय अविनीत आजकाल ल्याब सोडून इथेच पडीक दिसतोस... अरे काय बरबादीचा जशन चाललाय काय...? चक्रवर्ती सरानी नेहेमीच्या मस्करीच्या थाटात थेट मुद्द्यालाच हात घातला..

सर, आता तुम्हाला तर सर्वच माहिती आहे, साला शेवटी आपल्याला पण एका बाईनेच दगा दिला, Do hale with this modern society and its modern women.. नावाला नुसत्या पुढारलेल्या विचारानी अजून मागासलेल्याच या.. शेवटी जात दाखवलीच बाईने..

अवी पेपरात वाचल मि. आधी विश्वास बसला नाही, पण एकन्दर सविस्तर व्रुत्त वाचल तेव्हा म्हटल कदाचित तू अस करू शकतोस.. नव्हे करशीलच, अरे हाडाचा scientist तू, अतिशय मनस्वी अन impulsive, संशोधन यशस्वी करायचे म्हणून कुठल्या टोकाला जाशील काही सान्गता येत नाही..

तेच तर म्हणतोय मि सर अव्या आता पूर्णपणे शुद्धित आल्यासारखा बोलत होता..

सर तुम्ही सोडून गेलात अन आपली लॅब अशी ओस पडली. किती दिवस रात्र एक केलेत आपण, कधी तुम्हाला कम्पनी द्यायला मि बसायचो तर कधी माझा प्रयोग सम्पेस्तोवर तुम्ही ल्याब मधे थाम्बून रहायचात. ती एक नशा आपल्याला या दारूपेक्षा जास्त लागली होती.. सर तुम्ही तर माझे आदर्श, human genetics मधले प्रसिध्ध विश्वविख्ख्यात scientist.. , P.C. Chakravorty.
सर तुमचे management शी बिनसले अन तुम्ही एका रात्रीत तडकाफडकी निवृत्त सुध्धा झालात..

अरे अवी साले सगळे फ़ुकटचे क्रेडीट घ्यायला टपलेले.. मी जन्मभर मेहेनत घेतली, अन जेव्हा DNA research वरील एक पेटन्ट माझ्या नावे करायचे म्हटले तेव्हा याना लॅब अन संस्था आठवली. मग काय, म्हटले तुम्ही आणि तुमची ल्याब बसा बोम्बलत, मी निघालो...माझा राजिनामा फ़ेकला त्यान्च्या तोन्डावर.. पण शेवटी सगळे साले दलाल, यान्च्या पॉलिटीक्स मुळे माझी नोबेल पुरस्काराची सन्धी हुकली अन frustrate होवून मि research कायमचा सम्पवून टाकला..
हो ना सर तुम्ही गेल्यापासून पण मग ल्याब कोण सम्भाळणार होत, सर आठवतय? माझ्या वादग्रस्त संशोधनाला केवळ तुमच्या पाठीम्ब्यामूळे funding मिळाल होत..?

अवी अरे मि कसे विसरेन, माझ्या आजवरच्या कारकिर्दीत असे non conventional and challenging संशोधन करणारा तूच एक भेटलास, बाकी सगळे साले त्याच त्याच जुन्याच विषयान्वर, नाहीतर accidental abortion सारख्या रोजच्या विषयावर संशोधन करत इथल्या फ़न्डीन्गवर आपले संसार चालवत होते.. पण तूला जगावेगळ संशोधन करायच होत..

होय सर, सतराव्या शतकात दिमीर रोजोवास्की या रशियान शास्त्रद्याने त्याच्या मानवी जन्माविषयी संशोधनाच ठामपणे पण एक धाडसी conclusion लिहील होत:
"स्त्री आणि पुरुष यान्चा शरीर संबन्ध येतो तेव्हा त्यावेळी त्यान्च्या मनात असणार्‍या विचारानुरूप चान्गली वा वाईट सन्तती निर्माण होते. किम्बहुना त्या समागमातून गर्भधारणा होताना त्या गर्भात प्रवेश करायला अनेक जीव उत्सुक असतात, जशी भावना तशी धारणा. "
सर, दिमीर च ते conclusion हाच माझ्या संशोधनाचा मूळ पाया. रशियात तेव्हा माजलेली अनागोन्दी, स्वैराचार, अत्त्याचार या सर्वावर उपाय म्हणून स्त्री पुरुषान्मधे एक प्रेम, आदर, अन security ची भावना निर्माण व्हावी केवळ याच उद्देशाने दिमीर ने असे लिहीले असावे हे मला पटले नव्हते. सर, afterall we are scientists, and our job is to objectively prove or disprove.. and unless proven otherwise we do not dismiss or accept the concepts, बरोबर?

दिमीर ने त्या बाबतीत केलेले संशोधन त्याच्या म्रुत्त्यूनन्तर अपूरे राहीले.

येस! अवि, I Rmember you wanted to continue with his research work..

सर बलात्कार, अत्त्याचार, मनाविरुध्ध सम्बन्ध यातून जन्माला येणारी सन्तती ही शुध्ध नि़खळ प्रेम, किव्वा सहसम्मतीतून, normal healthy relationship मधून जन्माला येणार्या सन्ततीपेक्षा निकृष्ट, प्रसन्गी घातक दर्जाची असते हेच मला सिध्ध करायचे होते. कबूल आहे समाज, सन्स्कार याचा परिणाम पुढे होतो पण सर जर बीजच चान्गले नसेल तर फ़ळ तरी कसे चान्गले येईल..? एक सुदृढ, निकोप पिढी अन पर्यायाने राष्ट्र जन्माला यायची असेल तर मूलतहा जन्माला येणारी सन्तती देखिल चान्गलीच हवी ना.? हाच हेतू होता आपल्या संशोधनामागचा. सर हे संशोधन सोपे नव्हते.. म्हणजे यात sample मिळवण्यापासूनच अडचण होती. एकतर याबद्दल उघडपणे बोलणारे लोक कमी, पुन्हा एखाद्या वैवाहिक जोडीला विचारायचे तरी सम्बन्धाच्या वेळी त्यान्च्या मनात असणारे भाव, त्यातून पुढे जन्माला येणारे आपत्त्य इत्यादी सर्वाचा अभ्यास करून हा research पुरे करणे was a lifetime work. तुम्ही म्हणायचा देखिल, अवी by the time you conclude with this research, तुझी नातवन्डे देखिल जन्माला आलेली असतील. पण सर तुम्हीच म्हणला होतात की असा जगावेगळा अन धाडसि रिसर्च हा नोबेल पुरस्कारासाठी देखिल पात्र ठरू शकला असता.

अवी फ़ार धाडसी अन वादग्रस्त होता तुझा research.

होय सर ल्याब मधे आपण दिवस रात्र एक केले, उन्दीर, कुत्रे, अशा प्राण्यान्पासून सॅम्पल healthy breeding तर कधी forecful breeding करवून त्यान्च्या बिजान्ड, प्रजनन अन सन्ततीच्या Behavioral Patterns चा अभ्यास केला.. Sir, we had some amazing discoveries and findings.. मग कधी पैसे चारून, कधी विनवण्या करून, तर कधी चोरीच्या मार्गाने आपण स्त्री पुरुषाची बिजान्डे मिळवली, लॅब मधे वेगवेगळ्या प्रकारचे प्रजनन घडवले, जन्माला येणार्‍या अर्भकान्ची आपण behavioral patterns test करत असू..

अवी तुझ्या अशा वेड्यासारख्या भारवालेल्या मनस्थितीमूळे कित्त्येक वेळा तुझी बायको, निलिमा चिडायची, घाबरायची, अस्वस्थ व्हायची..माहिती आहे ना. ?

होय सर, कबूल आहे या सर्वात तीच्यावर थोडा अन्याय झाला, खर तर आमच पहिल मूल, आमच्या प्रेमाच प्रतिक तीच्या उदरात वाढत होत पण त्या वेळी मि तिला माझा वेळ देवू शकलो नाही, रीसर्च च्या व्यापात तिच्याकडे लक्ष देवू शकलो नाही.. पुन्हा media वाल्यानी या संशोधनावर गदारोळ माजवून आमच खाजगी आयुष्यही पार बिघडवून टाकल...

अवी अरे पण म्हणून तू या extreme ला जाशील अस वाटल नव्हत, तू चक्क नुकत्याच यौवनात पदार्पण केलेल्या एका मुलीवर बलात्कार केलास? कशासाठी? अरे तुझ्या घरी कामावर येणार्‍या मोलकरणीची पोर ती..

सर, मला तुम्ही impulsive म्हणता पण तुम्हीही असेच तडक लॅब सोडून गेलात ना? सर तुमचा आधार नव्हता, माझ संशोधन महत्वाच्या टप्प्यावर आल होत, पण results येईपर्यन्त मी हतबल होतो.. i just wanted to prove to the world that I was not insane and I wanted to do it right away... सर त्या दिवशी दारूच्या धुन्दीत सकाळीच घरी गेलो, कामवाली नेहेमीप्रमाणे पोरीला आमच्या घरी सोडून इतर कामावर गेली, रोज ती पोर निलीमाकडे शिकायची.. त्या दिवशी निलिमा थोड्या वेळासाठी बाहेर गेली होती...
That was it! या मुलीवर अत्त्याचार करून तीच्या पोटि जन्माला येणारी सन्तती ही आमच्या (माझ्या अन निलूच्या) सन्ततीपेक्षा निकृष्ट, प्रसन्गी घातक, हीन दर्जाची असेल.. That would have been the perfect proof for my research त्या एका क्षणात मि निर्णय घेतला.. आणि....

अरे पण निलिमाचा काही विचार.. ?

हा! निलिमा, सर निलू फक्त नावाला पुढारलेली, मॉडर्न पण मनाने मागासलेली... तिला मि खर तर नन्तर समजावल देखिल, म्हटल हे बघ, या बलात्कारातून जर एखादा हैवान जरी जन्माला आला तरी त्यात आपला विजय आहे.. एका प्रसिध्ध nobel prize winner ची पत्नी, म्हणून जगशील. सुख, पैसा, यश, सर्व सर्व आजन्म आपल्या पायाशी असेल.. पण निलू इतर सामान्यान्सारखी निघाली.. अत्त्य्युच्च, अप्राप्य प्राप्त करायचे तर त्यागही तितकाच मोठा लागतो हे तिला कळलच नाही..
Gold medalist scientist म्हणून कॉलेज मधे माझ्या प्रेमात पडली, माझ तेव्हाच यश, फेम बघून भाळली, घर दार आई वडील सोडून माझ्या बरोबर आली, स्वताचे निर्णय, आयुष्य स्वतः जगूया म्हणत माझ्याबरोबर सुख दुख्खात सात जन्म एकत्र राहण्याचे वचन देवून सप्तपदी चालताना पुढे कुठल्याही प्रसन्गात माझी साथ देणारी, मला समजावून घेण्याची गोड वचन देणारी निलू, त्या घटनेनतर मला कायमची सोडून तिच्या कॉलेज च्या जुन्या दोस्ताकडे जावून कायमची राहिली.
सर ती मोलकरीण पण पैसे घेवून गप्प बसायला तयार होती, अन त्या पोरीलाही आम्ही सम्भाळली असती... पण निलूने सर्व उधळून लावले..
सर माझ्या विरुध्ध कोर्टात साक्ष देणारी माझी पत्नी...? सगळ्या या बायका अशाच, double standards....

अवी पेपरमधे असही वाचल की "गेल्या सहा महिन्यात निलिमा ही त्या धनाड्य व्यापार्‍याची पत्नी म्हणून ओळखली जाते.. निलिमाच्या सुखी समाधानी संसाराच सार क्रेडीट तीने त्यालाच दिल आहे.. अवी सारख्या विक्षीप्त, नराधमापासून तिची सुटका केली म्हणून.." तू वाचलेच असशील .

तेच तर म्हणतोय सर मि.. त्याचा निलिमावर आम्च्या कॉलेज पासून डोळा होता.. खर तर निलू माझ्या प्रेमात पडली याचा बदल घेतला त्याने. इतके वर्ष मी आमचा संसार, वैयक्तीक सुख दुख्ख पणाला लावून फ़क्त research केला, आमच्या दोघान्साठी झटलो, पण क्रेडीट मात्र त्याला... काय तर म्हणे निलूच्या तशा गर्भार अवस्थेत त्याने तिला आधार दिला..

अवी, नीलू ने तर तुमच्या मुलाला जन्म दिला पण पुढे त्या मोलकणीच्या पोरीच काय झाल रे...?

हा! काय होणार सर, निलिमा तर निघून गेली तीच्या दोस्ताकडे. त्या पोरीला दिवस गेले.. लहान वयात complications होतील या भितीने अन पैसे पदरात नसल्याने मोलकरणीने तीचा गर्भपात केला नाही. खर तर पोरीचा वापर करून अन निलूची सहानुभूती मिळवून, तिला अन तीच्या मित्रावर प्रसन्गी मानसिक दबाव आणून त्या गर्भश्रिमन्त दोस्ताकडून बक्कळ पैसे उकळले त्या मोलकरणीने. वर "पोरी नशीब काढलस बघ्" म्हणत त्या पोरीला पण समजावल.
आता त्यात क्रेडीट कुणाच सर..?

अवी जाऊदे, साली दुनीया क्रूर आहे... आपण कष्ट करतो पण माल कुणि दुसराच खातो. व्हायचे ते झाल, निलू च्या साक्शी अन इतर पुराव्यावर खटल्यात तुला मोठी शिक्षा झाली, त्या वैफल्यग्रस्त अन दुभन्गलेल्या अवस्थेत मग तूही रिसर्च तसाच अर्ध्यावर टाकून लॅब सोडून कायमचा निघून गेलास.. आता पुढे काय...?

काय सर विचारताय तुम्ही पण? once a scientist always a scientist... आज ना उद्या मी ते संशोधन पुरे करून जगासमोर आणणार, I Should Get The Credit I Deserve!
ते कसे काय? चक्रवर्ती सरानी विचारले..

तितक्यात, बारमालकाने खडसावले," ओ साहेब चला आता हा अप्सरा बार बन्द व्हायची वेळ आली अन तुमची पण निघायची वेळ झाली." ए जा रे साहेबाना त्यान्च्या मुक्कामी सोडून ये".. मालकाने बारच्या द्वारपालाला हुकुम सोडला..

कुठे जाणार साहेब, मुक्काम कुठे? मालकाने विचारले..

अरे वा इतके दिवस इथे खेटा घालतोय, रोज माझा नम्बर लागेल म्हणून बसलोय अन आज बरे मला मुक्कमी पाठवायला मदत करताय..? अवी ने जरा उपरोधानेच मालकाल विचारले.

" आता "वरून" order आलीये साहेब, आज तुमचा नम्बर लागलाय!" मालक उत्तरला.

"अस? अरे वा!" छदमी हासत अवी त्याला म्हणला, "बर मग त्या मोलकरणीच्या पोरीच्या पोटी नेवून सोडा हैवान म्हणून. "

"तुम्ही काय सुधरणार नाही बघा" म्हणत मालकाने द्वारपालाला खुणावले, अन अवीला मुक्कामी पोचवायला गाडी निघून गेली...

अन तुम्ही ओ साहेब? तुम्हाला कुठ सोडायचे..? इतका वेळ अवी बरोबर बसलेल्या चक्रवर्ती साहेबाना न्याहाळत मालकाने विचारले..

चक्रवर्ती साहेबानी आपला कोट चढवला, एक वेगळीच विजयी मुद्रा चेहेर्‍यावर झळकली, डोळे चमकले, अन आपल्या दाढीला शान्तपणे कुरवाळत म्हणले, "आणी कुठे, सोडा याच्याच मागे, दिमीर च्या संधोधनावर nobel prize winner संशोधन पूर्ण करणारा पहिला वैज्ञानिक म्हणून. "

मालकाने अप्सरा बार आजच्या पुरता बन्द केला, उद्या कुठल गिर्हाईक येणार या चिन्तेत.

(समाप्त.)

गुलमोहर: 

छान वेगळा विषय योग. खरेच असे संशोधन झालेय का ?
अशी शंका येण्याईतपत कथा छान आहे.

आणि मला खरेच ते जाणुन घ्यायचे आहे.

कथेचा विषय अगदी वेगळा आहे आणि जमलीये पण मस्त. शेवट तर खासच झालाय. 'वरुन' ऑर्डर - मस्तच!

वेगळा विषय होता पण मांडणी तितकीशी जमली नाही. अप्सरा बारचे रुपक बरेच ओढुन ताणून जुळवल्यासारखे वाटते. आज फिर बीबीसे झगडा करके आय है सारखी वाकये तर खूप विसंगत.
कथासूत्रात विसंगती आहे, गर्भधारणा होतांना जीव/ आत्मा प्रवेश करतो, आणि त्यावर त्यावेळच्या विचारांचा प्रभाव असे आहे तर मग आता ती घटना घडून, त्याची केस कोरर्टात चालून, शिक्षा होऊन मग कधीतरी अवी मरून आता पुन्हा त्या क्षणात जाऊन त्या पोरीच्या पोटी कसा जन्म घेणार बुवा.
आणि बलात्कारातून निपजलेले एक बालक हैवान निघाले म्हणून संशोधन कसे पूर्ण होणार.

तरी पण वेगळे लिहिण्याचा तुमचा प्रयत्न चालू ठेवा. सुसंगत तपशीलाकडे अधिक लक्ष द्या. शुभेच्छा.

>>आता पुन्हा त्या क्षणात जाऊन...

अरे वा! मास्तुरे, बरेच दिवसानी.. Happy
तुमचा तर्क वरकरणी बरोबर आहे... पण कथेत ज्या क्शणी अवी बलात्काराचा impulsive निर्णय घेतो तेथेच हा तर्कही मरतो, उरते फक्त एका frustrated, talented, desparate शास्त्रज्ञाचे हव्यासापायी केलेले कृत्त्य!
technicality पेक्षा या कथेतून (कथेच्या शेवटातूनही) एक वेगळा संशोधन विषय अन scientists चा वेडा अविरत ध्यास अधिक प्रकर्षाने समोर आणण्याचा प्रयत्न आहे... असो.