घरविक्री करताना घरमालकास मालमत्ताविषयक कोणता कर लागु होतो?

Submitted by आदित्य_प on 19 December, 2012 - 21:52

मी जानेवारी २००८ मध्ये चालु बांधकाम स्थितीत फ्लॅट बुक केला, बिल्डिंग ऑगस्ट २०१० मध्ये पुर्ण बनुन तयार झाली. फ्लॅट संदर्भातील शेवटचे पेमेंट ऑक्टोबर २०१० मध्ये केले. फ्लॅटचे रजिस्ट्रेशन मार्च २०११ मध्ये केले. आता जर मला सदर फ्लॅट विकायचा असेल तर या प्रोपर्टीला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागेल कि लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागेल. साधारणतः कोणत्याही प्रोपर्टीस ३ वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला की तिला लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतो. पण माझ्या फ्लॅट संदर्भात संबधित टॅक्ससाठी कोणती तारीख ग्राह्य धरायची याबाबत शंका आहे.

जर मला सदर प्रोपर्टी विकुन मिळणारे पैसे इतर ठिकाणी चालु बांधकाम स्थितीतील नविन फ्लॅट विकत घेण्यासाठी वापरायचे असतील तर मला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स दयावा लागेल का? माझ्या माहितीप्रमाने तुम्ही एखादी प्रोपर्टी विकुन ते पैसे तीन वर्षाच्या आत नविन प्रोपर्टी खरेदी करण्यासाठी वापरले तर तुम्हाला लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागत नाही. पण शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्सबद्दल नीटशी माहिती नाही.

मला सदर प्रोपर्टी विकुन नविन ठिकाणी फ्लॅट बुक करायचा आहे. तर मला कोणत्या प्रकारचा टॅक्स भरावा लागेल? कृपया जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

..

शॉर्ट टर्म लागेल. कारण रजिस्ट्रेशन २०११ चे आहे. ३ वर्षे पुर्ण नाहीत. अ‍ॅक्ट प्रमाणे ज्या वेळेस कराराची नोंदणी होते तेंव्हा तो अ‍ॅसेट ट्रान्स्फर होतो. म्हणुनच तुमची खरेदीची तारीख २०११.

लाँग टर्म टॅक्स वाचवता येतो. ज्या बद्दल इंद्रा ने सांगितलेला बाफ तुम्हाला माहिती देईल. पण त्याचा तुम्हाला सध्या उपयोग नाही. कारण तुम्हाला जो फायदा होइल, तो सरळ नॉर्मल इन्कम मधे धरायचा आहे.