वास्तु विषयक माहिती

Submitted by viewinteriors on 19 November, 2012 - 04:48

नमस्कार !

एका संकेत स्थळासाठी वास्तु विषयक माहिती हवी होती ,ती मिळविण्यास कोणी मार्गदर्शन करू शकेल का ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वास्तू शास्त्राविषयीची अनेक तज्ञांनी लिहीलेली पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत, ती तपासावीत.
मात्र, या पुस्तकातून हिंदू पद्धतीचे वास्तूशास्त्र अन हल्ली येऊ घातलेले फेंगशुई /चायनीज वगैरे यातिल घोळ तपासुनच घ्यावा कारण हिन्दूपद्धतीमधे दक्षिण दिशा तितकिशी शुभ मानली नाहीये, व सर्व शास्त्र पूर्वेकडे तोंड करुन सूर्यसिद्धान्तावर/मार्गक्रमणेवर आधारीत आहे, तर चायनीज पद्धत पूर्णतः वेगळी ठरते. सबब पहिल्यांदा नक्की ठरवावे की काय माण्डायचे आहे, का माण्डायचे आहे, केवळ वाचकांच्या आकर्षणाकरिता माण्डायचे असेल तर "काहिही" मान्डलेत तरी चालून जाइल, पण शास्त्रशुद्धरित्या मांडायचे असेल, तर स्वतः अभ्यास करुनच माहिती मांडावित.
(जर पुस्तकांचा संदर्भ घेतलात तर पुस्तक/लेखक यांचा संदर्भही श्रेयनामावलीत द्यायला विसरू नका)
धन्यवाद.