त्रिंगलवाडी -- यावेळी सर झालाच

Submitted by रायबागान on 29 June, 2012 - 07:20

नवीन नाशिक महामार्गावरुन नाशिकला जाताना इगतपुरी जवळच काही डोंगर आपल्याला खुणावत असतात. आता पहिला पाऊस पडुन गेल्यानंतर सुंदर पोपटी रंगाच्या मखमालींनी वेढ्लेल्या ह्याडोंगर रांगात असलेले हे एक दुर्ग रत्न Happy

त्रिंगलवाडी गावामुळे किल्ल्याचे नावही त्रिंगलवाडी Happy
Photo0139.jpg

बळवंतगड आणि कावनई हे दोन किल्ले ही जवळपासच आहेत.

कळसुबाई डोंगररांगात हा भाग गणला जातो, इगतपुरी स्टेशन जवळूनही येथे पोहोचता येते आणि खाजगी वहानानेही पायथ्याच्या गावात पोहोचता येते. त्रिंगलवाडी धरणाच्या भिंती वरुनही वाट आहे.

किल्ल्याच्या पायथ्याशी असणार्‍या लेण्यांवरुन हा किल्ला साधारण १० शतकातील असल्याचे सांगितले जाते.
हा किल्ला मराठयांनी कधी घेतला ते माहिती नाही परंतु १६८८ च्या सुमारास मुघलांनी फितुरीने घेतल्याचे सांगितले जाते.

त्रिंगलवाडी गावातून किल्ल्यावर जाताना पांडवलेणी लागतात, अतिशय सुंदर कोरीव काम पण गुहा आतून काहिशी ओबड्धोबडच आहे. साधरण १० लोक आरामात राहू शकतील अशी आहे पण वटवाघूळाच्या विष्ठेचा वास येत होता म्हणजे सध्या त्यांचेच वास्तव्य दिसते / जाणवत होते, त्यामुळे आपण शक्यतो आक्रमण न करणे योग्य Happy

तेथूनच साधारण छोट्या धबधब्यातून वाट वर चढते, चढ तसा खडाच म्हणावा लागेल पण सुरवातीला झिमझिम आणि नंतर नखशिखांत चिंब भिजवणार्‍या पावसाने छानच सुरवात झाली.

चिंब पावसाने रान झाले आबादनी, अंग झिम्माड झाल हिरव्या बहरात ----- अक्षरश: नभ उतरू आल होत.
सकाळचे लवकर ऊठून इगतपुरी साठी निघणे, पाऊस असु दे आणि न चुकता हे ट्रेक होऊ दे ---- इ. इ.

सर्व मागण्या गळून पड्ल्या होत्या, एवढा प्रभाव त्या पर्जन्यराजाचा Happy

हा हा म्हणता त्या धबधब्याच्या वाटेवर छोटा प्रवाह वाहायला लागला आणि क्वचितच ट्रेक मधे घडणारी गोष्ट घडली ---- काय सांगू तुम्हाला न चुकता किल्ल्याचा पडक्या वाड्यांपाशी पोहोचलो Happy Happy Happy
Photo0100.jpg

बरसणार्‍या पावसात रस्ता न चुकणे म्हणजे काय --- हा केवळ शब्दातीत अनुभव आहे Happy

जवळजवळ १७ वर्षांपुर्वी इगतपुरीच्या बाजुने हा किल्ला सर करताना छोट्या खिंडीतून वर बरोबर चढलो आणि रस्ता चुकलो .... दिवस भर उन्हाचे, आणि रस्ता चुकलो आहे हेच मुळी किल्ला / डोंगर चढून डोंगरसोंडेवरुन चालत जाऊन एका छोट्याश्या देवळातील हनुमानाचे दर्शन घेऊन परत खाली उतरलो ते सुध्दा धरणाच्या पाण्याच्या अशा बाजूला की जेथे चक्क हातभट्टि लावली होती.

ह्या सर्व विचित्र मानसिक अवस्थेतून आम्हाला तेथील एका गावातील मावशीने वाट दाखवून बाहेर काढले होते. त्या मावशीचा चेहरा आठवत नाही पण आठवतात ते तिच्या डोक्यावरचे रचलेले पाण्याचे हंडे आणि पायातील चांदीचे चमचमणारे शिंदेशाही तोडे Happy ह्या वेळेस परत शोधत होते, ती मावशी दिसते का? पण रस्ता चुकले नाही ना !!! Sad

काही वर्षांपुर्वी न मिळालेले पडक्या वाड्याचे अवशेष, पाण्याची बांधीव टाकी, अजुन एक कोरीव खांब असणारी गुहा सर्व बघितले आणि मग वळलो ते किल्ल्याच्या विरुध्द दिशेला असणार्‍या आणि गेल्या त्रिंगलवाडी भेटीत राहिलेल्या हनुमानाच्या भेटी साठी. Happy

गडाच्या डावीकडील बाजूस चालायला सुरवात केली, अचानक पुढे वाट संपतेय असे वाटले म्हणून थोडे पुढे वाकून बघितले तर मोठे दगड पडून काही पायर्‍या झाकल्या गेल्या होत्या, तेथेच एकादरवाज्याची कमान मागच्या बाजूने दिसत होती. मोठमोठ्या दगडातून वाट काढ्ली आणि दरवाजा गाठला. दरवाज्याच्या बाजूला असलेल्या देवड्या पार केल्या आणि समोर मारुतराय उभे ठाकले.
Photo0116.jpg

एकूण भिंत असेल जवळजवळ ४० फुटाची आणि हनुमान जवळजवळ विसएक फुटीतरी असेल.

एकहात कमरेवर आणि एक हात आशिर्वादासाठी उंचावलेला. शेपुट डोक्यावर छ्त्र असावे अशी. आणि पायाखाली तुडवलेला राक्षस ..... अहाहा ..... धडकी भरवणरे तरीही स्फुर्तीदायक असे हे हनुमानजी.
Photo0120.jpg
आमच्या सोबत असलेला डॅनिश सहकारी आश्चर्यचकीत होऊन बघत होता --- म्हणाला, are they crazy? who must have done this? and look at the steps, no one will even dream about the door in the mid of these rocks --- simply horrible

खाली उतरणार्‍या ५२ पायर्‍या म्हणजे तोल गेला तर फक्त हाडे कुठे जाऊन गोळा करता येतील हाच विचार पहिला मनात आणणार्‍या...
Photo0122.jpg

पाऊस सुरु झाला अगदी धुवाधार , काळ्या फत्तराच्या खिंडी मुळे पावसाचा जोर जाणवत नव्हता पण अचानक पायर्‍यांवर पाण्याचे लोट यायला सुरवात झाली आणि खरतर तंतरलीच पण सांभाळून उतरत पायर्‍या पार केल्या आणि थोडीश्या मोकळ्या जागेवर आलो, पण आता पर्यंत न जाणवणार्‍या पावसाच्या जोरदार मार्‍याने झोडपून काढ्ले

परत पायवाट सांभाळत उतरलो आणि थोड्या खाली येऊन मुळ वाटेला लागलो.

काही क्षणापुर्वी शब्द्शः थरार अनुभवला होता आणि आता परत कोणत्याही क्षणी पाऊस दगा करणार हे जाणवायला लागले.

कोणतेही भलते साहस न करता मुळ वाटेनेच परत गावात सुखरुप पोहोचलो.

गाडी गावातच ठेवली होती, कपडे बदलून आम्ही परत कसारा घाटाकडे निघलो.

केवळ अप्रतीम असतो कसारा घाट पावसाळ्यात, fog city - kasara असे म्हणतात ते काही खोटे नाही.

परतीच्या वाटेत शिवसागर मधे खादडी केली आणि संध्याकाळी ७ च्या आत घरात Happy

गुलमोहर: 

?

http://www.maayboli.com/node/1556

ह्या लिन्क वर जा. तिथे पिकासा वरुन लिन्क देवुन फोटो कसा देता येइल ह्याची माहिती आहे.
नक्की जमेल तुम्हाला. Happy

खुप वर्ष झाली इथे जाउन. माझा पोलिस गॉगल इथे एके ठिकाणी पडला होता दरीत वाकुन बघताना.. Proud

फोटो बघुन जुन्या आठवणी ताज्या झाल्या. पायथ्याच्या गुहा पाहिल्यात की नाही?

अरे वा! फोटो अपलोड झाले फक्त साइजची गडबड आहे.
एम्बेडेड इमेज देताना त्याच्या खालीच इमेजचा टॅग आहे त्यात ४००X६०० असा पर्याय आहे का?
मेडियमपेक्षा मोठा साइज सिलेक्ट करुन द्या. म्हणजे मोठे होतील. Happy

सेनापती, त्यांनाच पांडवलेणी म्हणत असतील तर बघितली आहेत.
रोहित परत प्रयत्न करेन फोटो मोठे टाकण्याचा Happy

धन्यवाद सर्वांना Happy

पहिल्यांदाच या किल्ल्याचे नाव ऐकले.
वर्णन सुरेख, पण प्र चि मोठ्या पाहिजेत - पण जमेल हळुहळू ते - योग्य साईजमधे प्र चि टाकणे वगैरे.......
धन्स..