एखाद्या सदस्याची विचारपूस कशी करावी ?

Submitted by मदत_समिती on 3 June, 2008 - 18:38

विचारपूस करण्यासाठी त्या त्या सदस्याच्या व्यक्तिरेखेतून (Profile) लिंक आहे.

सदस्याच्या नावावर टिचकी मारुन व्यक्तिरेखा दिसु शकेल. तिथे विचारपूसचा दुवा सापडेल.

जर एखादे सदस्य नाव (user ID) शोधायचे असेल तर मदतपुस्तिका या दुव्यावर टिचकी मारल्यावर पानाच्या वरच्या बाजुला "मायबोलीकरांची सूची" हा दुवा आहे. ह्या दुव्यावर जाउन सदस्य नाव शोधता येईल.

मला नवीन लेखन करण्यासाठी गुलमोहर - ललित या ग्रूपमध्ये समील व्गायचं आहे. मी काय करावे?
प्रभाकर [बापू] करंदिकर

पुस्तक-परिचयः
माझं प्रिस्क्रिप्शन : लेखक डॉ.सदानंद नाडकर्णी : प्रकाशकः समकालीन प्रकाशन, पुणे.
हे पुस्तक अत्यंत वाचनीय आणि मननीय आहे. आरोग्यसेवा आणि वैद्यकीय व्यवसाय + शिक्षण व्यवस्था या विषयात रूची असणार्‍या वाचकांना तर ते विशेष आवडेल. एरव्हीसुद्धा, एक सुंदर आत्मचरित्र वाचल्याचं समाधान हे पुस्तक नक्की देइल. मी लेखकाला लिहिलेलें पत्र उद्धृत करतो आहे. हेच परीक्षण मानावं.
--------------------------------------------------------------------------
प्रिय डॉ. नाडकर्णी,
'माझं प्रिस्क्रिप्शन' हे तुमचंआत्मचरित्र वाचून थक्क झालो! एक म्हणजे तुम्ही इतकं सुंदर मराठी लिहू शकत असाल याची कल्पना मला नव्हती. अत्यंत ओघवती आणि कमावलेली भाषा हा त्या पुस्तकाचा एक प्रमुख गुण. मला जर कोणी या पुस्तकाचं एडिटींग करायला सांगीतलं तर मला नाही वाटत की मला कुठे लाल पेन्सिल वापरावी लागेल! तुमची मातृभाषा कोकणी असं तुम्ही म्हणता. तुमचं शालेय शिक्षण पुण्यात, मराठी माध्यमात झालं असलं तरी कॉलेज शिक्षण, नंतरचा व्यवसाय आणि व्यवस्थापन इथे सर्वत्र इंग्रजी वापरावं लागलं असणार आणि असं झालं की हळूहळू मराठीचा - विशेषतः लिहिण्याचा - सराव रहात नाही. वयाच्या ऐंशीव्या वर्षी तुम्ही मराठी लेखनाकडे वळावं आणि तेही इतक्या सहजपणे सौष्ठवपूर्ण भाषेत लिहावं याचं राहून राहून आश्चर्य वाटतं.

आपण काही काळ बीएमसींत एकत्र काम केलं. तुमच्या अंगातील अनेक गुणांचा परिचय मला त्यावेळी झाला होता आणि तुमच्याविषयी आदरयुक्त मैत्री वाटू लागली होती. तुमचं आत्मचरित्र वाचताना 'त्या' दिवसांच्या बर्‍याच आठवणी जाग्या झाल्या. विशेष्तः जॅकी, डॉ. देशमुख, डॉ. लाड, डॉ. थत्ते यासर्वांशी या ना त्या कारणाने काही अप्रिय प्रसंगांना सामोरं जावं लागलं होतं, ते आठवलं आणि प्रत्येक वेळी, तुम्ही न कचरता किती ठाम भूमिका घेत होता तेही जाणवलं. तुमच्या बरोबर काम करताना मला खूप बरं वाटलं होतं. सरकारात आणि बीएमसीत, तुमच्यासारखे अधिकारी तेंव्हाही विरळा होते आणि आता तर काय, सगळा आनंदीआंनदच आहे!
'त्या' काळात तुमच्या व्यवस्थापन कौशल्याची आणि उपक्रमशीलतेची चांगलीच ओळख झाली असली तरी एक व्यक्ती म्हणून, विशेषतः तुमच्या पूर्वायुष्याविषयी, मला फारशी माहिती झाली नव्हती. सौ. नाडकर्णींशीही काही औपचारीक गाठी-भेटी झाल्या असतील तेवढ्याच. तुमचं आत्मचरित्र वाचून तुम्हा उभयतांविषयी खूप नवी माहिती मिळाली आणि एक चुटपूट लागून राहिली की या माणसांबरोबर आपण अधिक निकटचे, वैयक्तिक पातळीवरचे संबंध जोडायला आणि टिकवायला हवे होते!

माझी बीएम्सीतून बदली झाल्यानंतर आपण क्वचितच केंव्हा, कधीमधी भेटलो असू. तुम्ही पिकळे नर्सिंग होमचे काम बघत होता आणि रायगड जिल्ह्यात कोणत्यातरी स्वयंसेवी संस्थेच्या प्रकल्पात सहभागी झाला होता असं तुम्ही मला सांगीतल्याचं आठवतं परंतु भाटिया आणि जसलोक इथेही तुम्ही काळ काम केल्याचं मला माहित नव्हतं. तिथेही तुमच्या स्वभावानुसार एक ठसा तुम्ही उमटववा याचं मात्र मला आश्चर्य वाटलं नाही ! कारण व्यवस्थापनात आवश्यक तिथे कर्तव्य-कठोर भूमिका घेणं आणि प्रसंगी कटूपणा आला तरी तो पत्करून तत्वांशी एकनिष्ठ राहणं हे तुमचे स्वभावगुण मला परिचित होते.

तुमच्या या आत्मचरित्राचं महात्म्य याहून किती तरी अधिक आहे! वैद्यकिय व्यवसाय आणि शिक्षण व्यवस्थेसंबंधी तुम्ही केलेलं प्रकट चिंतन, मांडलेले नवे विचार आणि प्रामाणिकपणे केलेल्या मौल्यवान सूचना हे सर्व फार मूलगामी आणि महत्वाचं आहे. कार्यरत असतानाही तुम्ही हे विचार मंडत होता आणि विविध उपक्रमातून ते प्रत्यक्षात उतरवण्याचा कसोशीने प्रयत्न करत होता हे खरं परंतु दुर्दैवानं त्याकाळी ते अरण्यरुदन ठरत होतं. असं असलं तरी हार न मानता, तुम्ही तुमचे अनुभव आणि चिंतन यातून परिपक्व झालेल्या विचारांची पुन्हा एकदा सुसूत्रपणे मांडणी आत्मचरित्राच्या निमित्ताने केली आहे. तुम्ही एस.एम. जोशींचं समाजवादी समाजरचनेविषयीचं जे विधान उद्धृत केलं आहे ते तुमच्या विचारांच्याबाबतीतही तंतोतंत लागू पडतं! तुमच्या पुस्तकानं मला खूप काही दिलं. त्याचे आभार कसे मानू?

जाता जाता एकच सूचना करावीशी वाटते. तुमचे विचार राष्ट्रीय पातळीवरच्या wider audience पर्यंत पोचणं आवश्यक आहे. त्यासाठी या पुस्तकाचा इंग्रजी अनुवादही प्रसिद्ध केला तर तुमच्या प्रतिभेचं आणि प्रयत्नांचं अधिक चांगलं चीज होईल असं मला वाटतं. असो.
कळावे.
तुमचा
प्रभाकर [बापू] करंदिकर.

नमस्कार बापू :

>> गुलमोहर - ललित या ग्रूपमध्ये समील व्गायचं आहे. मी काय करावे?

'सामील व्हा' हा पर्याय त्या ग्रुपच्या पानावर उजव्या बाजूला दिसेल, त्यावर क्लिक केले असता नवीन पानावर जो प्रश्न येतो त्याला होकारार्थी उत्तर क्लिक करून, तुम्ही त्या ग्रुपमध्ये सामील होऊ शकाल.

मायबोलीवरचा वावर वाढल्याने काही कार्यालयात मायबोलीचा अ‍ॅक्सेस काढून टाकलेला असतो. अशावेळी त्या सदस्याची विचारपूस केली तर तिला / त्याला फक्त तेवढेच शब्द मेलमधे दिसतात. मायबोलीवरच येता न आल्याने त्या सदस्याचे नाव दिसत नाही, त्यामूळे त्या विचारपूशीला उत्तरही देता येत नाही. त्यामूळे जर शक्य असेल तर त्या मेलमधे, विचारपूस करणार्‍या सदस्याचे नाव दिसेल असे काही करता येईल का ?

Pages