किंमत कधी कळ्णार

Submitted by gajanan moreshw... on 27 July, 2012 - 06:14

अरे कुंदा किती दिवसांनी भेटलास रे, काय करतोस, आता धंदा कसा चाललाय? मी मुकुंदाला पटापट विचारत होतो तो म्हणाला चल खूप वर्षांनी भेटतोय आपण चहा घेऊ या असे म्हणून तो व मी एका उपहार ग्रहात बसलो. घरगुती गप्पा झाल्या गावाकड्च्या लोकांची खुशाली कळली फार बर वाटलं. तेथुन आम्ही बागेत बाकावर जाऊन बसलो. तो म्हणाला माझा दूधाचा धंदा ठीक चालू आहे . एक दुकानही चालवतो त्यामुळे मला आता वेळ्च होत नाही नाहीतर मी एका वृधाश्रमात जेष्ट नागरीकांना दूध देत असे नेऊन. आता दूध आहे पण वेळ नाही. तुझ्या माहितीत कोणी आपुलकीने करणारा असेल तर सांग आठवड्यातून एक दिवस जायचे, वृधाश्रमात सर्व कामे त्यालाच करावी लागतील. मी कुंदाला म्हणालो अरे त्यात काय मला सोमवारी सुट्टी असते मी जाईन नेहमी त्यांना दूध द्यायला. नंतर मी दर सोमवारी दूध द्यायला जाऊ लागलो. जाताना थोडी साखर घेऊन जात असे. ज्यांना साखर चालते त्यांना साखर घालून व इतरांना नुसते गरम करुन दूध दयायचे. त्याच वेळी गंमत म्हणुन त्यांची विचारपूस करायची. मुला नातवंडांबध्ध्ल बोलायला लावायचे. गावाकडील माहितीही विचारीत असे. ज्यांना गरम दूध पिताना हात थरथरायचे त्यांना बशीत ओतून पाजतही असे. त्यातून बोलता बोलता असे आढळ्ले की, काही लोकांना गोष्टी आवडतात मग काय मी ख-या घटना, वाचलेल्या गोष्टी सांगु लागलो त्यामुळे त्यांचाही वेळ चांगला जाई. सोमवार आला की काही लोक माझी आतुरतेने वाट पाहात असत. पहील्यांदी मीच कपबशा धुवुन ठेवीत असे. पंण नंतर मला पर्यवेक्षकाने तुम्ही त्यांना गोष्टी सांगा कपबशा राहू दे, असे सांगीतले. हा माझा कार्यक्रम बरेच वर्ष चालू होता. त्यांत एक वृध स्त्री ( ७५ चे आसपास) आश्रमात आली. ती माझ्या गोष्टी एकायाला नेहमी बसे. माझ्या आजीच्या वयाच्या पण मी गोष्टी सांगताना माझ्याकडे कौतुकाने पाहायच्या. एकदा त्यांना दूध दिले व त्यांचे पिऊन होईपर्यंत त्यांच्या जवळ बसलो. त्यांना म्हणालो मी आता १५-२० दिवस येणार नाही त्यांनी विचारले का रे बाबा काही अडचण. मी सांगितले नाही गावाला म्हणजे सासुरवाडीला जातो. २ मुलगे आहेत सासरे -सासुबाईंना दाखवून आणतो. त्यांना घरी यायचे असेल तर त्यांना घरी घेऊन येतो. असे म्हणुन मी उठ्लो. तोच आजींनी माझा हात धरला व बसवीले मला वाट्ले त्यांना काही हवे आहे. मी म्हंट्ल काही हव आहे का खुशाल सांगा मला परवड्ण्यासारखे असेल तर नक्कीच आणीन. आजींनी मला जवळ घेतले व डोक्यावरुन हात फीरवला एक आवंढा गीळुन आजी बोलु लागल्या बँग उघड्ली माझ्या पुढे ठेवली त्यात १००००/- रु. होते. मला पैसा कमी नाही. मुलगा अमेरिकेत सून अमेरिकेत. मुलगा येतो पैसे देऊन जातो. २ नातवंड आहेत नात ५ वर्षाची तर नातू असेल २ वर्षाचा. मुलाला म्हट्ल अरे त्या २ बछ्ड्यांना घेऊन ये रे एकदा डोळे भरुन पाहीन नंतर डोळे मिटायला मोकळी ... आईच्या डोळ्यातून आसवांचा पूर वाहात होता माझ्या डोक्यावरुन हात फीरत होता, आणि माझ्याही नेत्रांतून आसवे वाहात होती. मी मनात म्हणत होतो, अरे मी आई बाप लवकर लहानपणी गेले म्हणुन रडतो पण ज्यांचे आहेत त्यांना अक्कल कधी येणार व किंमत कधी कळणार........

गुलमोहर: 

बहुतेक वृद्धांच्या कथांमध्ये मुलगा सुन अमेरीकेत गेले की त्यांचे आईवडिल देशात एकटे राहतात किंवा वृद्धाश्रमात राहतात व स्वतःच्या नातवंडाना बघायला तरसलेले असतात असेच चित्र असते. "सत्यमेव जयते" या कार्यक्रमात देखील ३-४ मुलगे असणारया वृद्धांनादेखील त्यांच्या म्हातारपणी सांभाळायला कोणी नाही असेच चित्र दिसले (ज्यांनी मुलगाच हवा म्हणुन स्वतःच्या मुलींना मारले असेल त्यांच्या डोळ्यात चांगलेच अंजन आहे, मुलगा म्हातारपणीची काठी बनतो अशी अंधश्रद्धा बाळगल्याबद्दल)

छान लिहिलय.
३-४ मुलगे असणारया वृद्धांनादेखील त्यांच्या म्हातारपणी सांभाळायला कोणी नाही असेच चित्र दिसले (ज्यांनी मुलगाच हवा म्हणुन स्वतःच्या मुलींना मारले असेल त्यांच्या डोळ्यात चांगलेच अंजन आहे, मुलगा म्हातारपणीची काठी बनतो अशी अंधश्रद्धा बाळगल्याबद्दल)>>> +१

बरेचदा असे दिसते की घरातल्यांना किंमत दिली जात नाही. पण बाहेरच्यांना मानले जाते.
छान लिहीले आहे.

Chhaan!