बुद्धिप्रामाण्यवाद आणि परामानसशास्त्र -विज्ञान आणि बुद्धिवाद - प्रकरण 3

Submitted by शशिकांत ओक on 19 June, 2012 - 09:54

विज्ञान आणि बुद्धिवाद - प्रकरण 3
बुद्धिप्रामाण्यवाद आणि परामानसशास्त्र

प्रस्तावना
विश्वाचे ज्ञान केवळ पाच ज्ञानेंद्रियांमार्फतच ( किंवा त्यांची शक्ती वाढवणाऱ्या वैज्ञानिक उपकरणांमार्फतच होऊ शकते असे बुद्धिवाद मानतो. विश्वाचे ज्ञान तर्काने होऊ शकते - विश्व बुद्धिगम्य आहे - या बुद्धिवाद्यांच्या श्रद्धेला आधुनिक भौतविज्ञानातील शोधांनीच त़डा गेला असून ही श्रद्धा भौतिक विज्ञानाच्या दृष्टीने तरी निराधार असल्याचे दिसून आले आहे. हे मागील दोन प्रकरणात आपण पाहिले. प्रस्तूत तिसऱ्या प्रकरणात मानवाच्या पंचेंद्रियांमार्फतच विश्वाचे ज्ञान होऊ शकते ही बुद्धिवाद्यांची जी दुसरी श्रद्धा आहे , ती कितपत बरोबर आहे हे पाहावयाचे आहे.
-------
.....ऐतिहसिक दृष्ट्या अतींद्रियशक्ती हा विषय भुताटकी, अंगात येणे, जादू टोणा, चेटूक आदी गोष्टींशी निगडीत असल्यामुळे या विषयाकडे पहाण्याचा माणसांचा दृष्टिकोण कधीच निःपक्ष किंवा शास्त्रीय राहू शकलेला नाही. नेहमीच तो भावनात्मक राहिला आहे. त्यामुळे याविषयाच्या बाबतीत नेहमीच अगदी टोकाचे दृष्टिकोण आढळून येतात.
एकः याविषयी आंधळी श्रद्धा बाळगणे म्हणजे याविषयी पुराव्यांचा विचार न करता सर्व काही खरे असते असे मानणे.
दुसरेः याविषयी आंधळी अश्रद्धा बाळगणे म्हणजे याविषयी पुराव्याचा विचार न करता सर्व काही खोटे असते, असे मानणे. याविषयी खरे खोटे निवडणारा शास्त्रीय दृष्टिकोण असू शकतो हे कळायला मनुष्याला नेहमी जड गेल्याचे दिसून येते.
याबाबतीत पुरुषाच्या स्त्रीकडे पाहण्याच्या ऐतिहासिक दृष्टिकोणाची तुलना करण्यासारखी आहे. इतिहासावरून दिसून येते की, पुरुषाचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोण कधीच निःपक्ष किंवा शास्त्रीय राहिलेला नाही नेहमीच तो भावनात्मक राहिलेला आहे. या ऐतिहासिक - पौराणिक दृष्टीतून पाहता असे दिसून येते की, पुरुषाने स्त्रीला एक तर देवता (किंव जगन्माता) मानलेली आहे, नाहीतर चेटकीण (भोगदासी) मानलेली आहे. तिला बरोबरीचा माणूस म्हणून मानणे त्याला नेहमीच जड गेल्याचे दिसून येते. समाजशास्त्राने स्त्रीचा शास्त्रीय दृष्टीकोणातून विचार करून तिला जसे पुरुषाबरोबरीचे समाजात स्थान दिले आहे तसे परामानसशास्त्राने अतींद्रिय विषयाकडे शास्त्रीय दृष्टीने पाहून त्याला विज्ञानात इतर वैज्ञानिक विषयाबरोबरीचे मानाचे स्थान दिले आहे. त्यामुळे स्त्रीला भोगदासी (किंवा चेटकीण) मानणाऱ्या जुन्या पुरुषप्रधान समाजातील पुरुषांप्रमाणे किंवा तिला देवता मानणाऱ्या धर्ममार्तंडांप्रमाणे अतींद्रिय हे थोतांड मानणारे प्रस्थापित विज्ञानवादी व बुद्धिवादी आणि अतींद्रियातील सर्वच चमत्कार खरे मानणारे अंधश्रद्धाळू हे दोघेही अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे!

बुद्धिवाद विज्ञानाच्या प्रगतीतील एक अडथळा

मॅकडुगल या मानसशास्त्रज्ञाने एक तर्क केला आहे की मध्ययुगातील अंधश्रद्धा व जादूटोणा याविरुद्ध विज्ञानाने मिळवलेला विजय अतींद्रिय शक्तिचे अस्तित्व मान्य केले तर वाया जाईल अशी शास्त्रज्ञांना भिती वाटते. व पुन्हा अंधश्रद्धेचा सुळसुळाट होईल हा तर्क कितपत योग्य आहे हे सांगता येत नाही. खरे कारण माझ्यामते भावनिक आहे. काही लोकांना आपल्या आवडत्या सिद्धांताविरुद्ध एखादी घटना घडते, हेच मान्य होत नाही. ती घडावी ही गोष्टच त्यांना आवडत नाही, आणि जी गोष्ट आवडत नाही ती घडतच नाही असे ते मानतात. मग तिच्याकडे दुर्लक्ष करणे किंवा ती खोटी आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे हे दोनच पर्याय त्यांच्या पुढे उरतात. ती खोटी आहे हे सिद्ध करणे कठीण असल्यामुळे याविषयी प्रयोग करणाऱ्यांच्या हेतू विषयीच मग शंका घेण्यात येते. अतींद्रिय शक्तींवरील प्रयोगाबाबत लबाडी(Fraud) चा आरोप वरचेवर का करण्यात येतो याचा यावरून उलगडा होईल.
काही शास्त्रज्ञ मात्र अतींद्रिय शक्तीचे अस्तित्व अज्ञानातून किंवा निव्वळ आडमुठेपणातून नाकारतात, ही वस्तुस्थिती आहे. याविषयी आयसेंक हा मानसशास्त्रज्ञ म्हणतो, ‘एखाद्या क्षेत्रात नैपुण्य(Specialization) संपादन केलेल्या शास्त्रज्ञाचे मत इतर त्याने नैपुण्य न संपादलेल्या विषयात प्रमाण म्हणून स्वीकारणे धोक्याचे असते. कारण त्यात त्याचे ज्ञान शून्य असल्यामुळे आपल्या नैपुण्यक्षेत्रातील पुर्वग्रह त्यात घुसडून तो त्या विषयी आडमुठेपणा (pigheadedness) स्वीकारतो."
बऱ्याच तज्ज्ञ शास्त्रज्ञांचे अतींद्रिय विषयक धोरण असे आडमुठेच आहे आणि त्याचे हेच कारण आहे. आता कोणी म्हणेल की, अतींद्रिय शक्तिंचे अस्तित्व वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध केल्यानंतर सुद्धा ते आडमुठेपणाने नाकारणारे शास्त्रज्ञ खरोखरीच कोणी आहेत काय? ही पहा उदाहरणे –
वॅरन वीव्हर हा कम्युनिकेशन (दळणवळण) सिद्धांताचा संस्थापक शास्त्रज्ञ म्हणतो, ‘अतींद्रिय शक्ती मला बौद्धिकदृष्ट्या अस्वस्थ करणारी आणि मनाला यातना देणारी वाटते आणि म्हणून जे. बी. ऱ्हाईन यांनी सादर केलेले तिच्या अस्तित्वाविषयाचे पुरावे मला नाकारता येत नसले तरी ते मी स्वीकारत नाही’.
हेब हा मानसशास्त्रज्ञ खुलेपणाने म्हणतो, ‘अतींद्रिय शक्तींचे अस्तित्व सिद्ध करणाऱ्या आणखी (further)पुराव्याची आपल्याला आता गरज नाही, कारण त्या शक्तीच्या अस्तित्वाला काही अर्थ नाही. ती तर्काविरुद्ध व बुद्धिला न पटणारी आहे, आणि म्हणून ती आपल्याला मुळीच मान्य नाही’.
विल्यम जेम्स या प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञापुढे एका आघाडीच्या जीवशास्त्रज्ञाने पुढील उद्गार काढल्याचे जेम्स याने आपल्या, ‘The Will to Believe’ या ग्रंथात म्हटले आहे. की हा जीवशास्त्रज्ञ म्हणतो, ‘अतींद्रिय शक्ती खरी असली तरी शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन ती दडपून टाकली पाहिजे. किंवा सर्वापासून ती लपवून ठेवला पाहिजे. कारण निसर्गाच्या एकवाक्यतेला (Uniformity of Nature) त्यामुळे बाधा येते व विज्ञानाचे कार्य चालणे अशक्य होते.'
बुद्धिला पटत नाही म्हणून किंवा मनाला यातना होतात म्हणून एखादे सत्य झाकून ठेवून विज्ञानाचे कार्य करणाऱ्या या शास्त्रज्ञांच्या वैज्ञानिक दृष्टिकोणाविषयी काय बोलावे! नको असलेले वैज्ञानिक सत्य दडपून टाकू इच्छिणारे हे शास्त्रज्ञ मूल रडू लागले तर त्याला स्तनपान देण्याऐवजी त्याच्या तोंडात बोळा कोंबायला सांगतील अशा पद्धतीने विज्ञानाचे कार्य करणे बुद्धिवाद्यांना आवडत असले तरी शास्त्रज्ञांनी तसे करणे ही विज्ञानवृत्तीशी प्रतारणा ठरेल. कारण बुद्धिला न पटणाऱ्या गोष्टी स्वीकारणे, हे विज्ञानाचे पहिले आद्यकर्तव्य असल्याचे विज्ञानाच्या जन्माचा इतिहासच सांगतो.
याशिवाय इथे वाचा
· विश्वाकडे पहायच्या वैज्ञानिक दृष्टीत क्रांती
· भौतिक वादाला कायमची मूठमाती
· अतींद्रिया बद्दल अपप्रचार
· अतींद्रिय संशोधकांविषयी काही गैरसमज

गुलमोहर: 

तुम्ही इथे जे खरडत असता त्याचे श्रेय विज्ञानाला द्या.मनुष्याने अध्यात्म अतिंद्रीय वगैरे भोंदुगिरी चालू ठेवली असती, तर तुमच्या या पोष्टीचे असंख्य खलिते बनवायला लागले असते आणि जगभरात वाटायला लागले असते तरच ती सर्वांना वाचता आली असती. आज विज्ञान आणि बुद्धीवादामुळे तुमची पोस्ट जगभरात कुठेही दिसु शकते.

मित्रा
विज्ञान आणि बुद्धीवादामुळे तुमची पोस्ट जगभरात कुठेही दिसु शकते.
विज्ञानामुळे - अगदी बरोबर.
बुद्धिवादामुळे - नक्कीच नाही.

बुद्धिवादाने विज्ञानाची प्रतारण कशी ठरते यावर प्रा. गळतगे यांचे काय विधान मान्य नाही ते लिहा.

कारण विश्वाकडे पहायच्या वैज्ञानिक दृष्टीत क्रांतीकारी बदल झाल्याने...

भौतिक शास्त्रज्ञांना १९६० सालापासून आजवर हुलकावणी देणारा 'हिग्ज बोसॉन' हा अनुमानित मूळकण (प्रायमरी पार्टीकल) सापडला असावा असा कयास व्यक्त केला गेलेला आहे.

'अनुमानित' फक्त मनातील संकल्पनेत असलेले आता प्रत्यक्षात असेल अशी प्रयोगशाळेतील प्रयत्नाने न दिसता ही असल्याची मान्यता मिळत असेल तर, तो परामानस संकल्पनेचाच प्रकार आहे.

अनुमानित म्हणजेच परामानसशास्त्राच्या कसोट्यांवर उतरलेले सत्य असेल तर प्रयोगांची गरज काय ?

मित्रांनो,
ज्या लोकांची मनोवृत्ती प्रा. गळतगे म्हणतात त्या प्रमाणे आडमुठेपणामुळे परामानसशास्त्राला नाकारण्याची आहे. याचे खरे कारण भावनिक आहे.
ते कसे... ते त्यांच्या लेखातील अतिंद्रिय संशोधनाविषयी काही गैर समज यामधे वाचावेत

ते असो...
मन अवयव आहे कि नाही यावरील आपला निर्णय सांगितला तर वाचायला आवडेल.
तोवर ...
बुद्धिवादाने विज्ञानाची प्रतारण कशी ठरते यावर प्रा. गळतगे यांचे काय विधान मान्य नाही ते लिहा.

मन हा आवयव किंवा जे काही आहे ते शरीरात नेमके कुठे असते या प्रश्नाचे उत्तर आपल्याला द्यायचे नसल्यास
अ) ते तुम्हाला ठाऊक नाही किंवा
ब) माहीत असूनही अडचणीचे असल्याने द्यायची इच्छा नाही असे अर्थ निघतात.

पैकी अडचणींच्या प्रश्नांना बगल मारणे या प्रकारात आपण निपुण असल्याचे वारंवार सिद्ध झालेले आहे. तसंच मिसळपाव वर विचारलेल्या प्रश्नांना संदर्भ सोडून कोट करणे आणि त्याची कै चा कै उत्तरे माबो वर देणे आणि माबो वर विचारलेल्या प्रश्नांना मिसळपाव वर संदर्भ सोडून उत्तरे देणे या कलेतही आपला हात कुणीच धरू शकणार नाही हे आपण पाहीलेच आहे.

या परिस्थितीत गळतगेंच्या विधानाबद्दलच्या प्रश्नाला खालीलप्रमाणे उत्तर देता येईल.

"परामानसशास्त्र - एक थोतांड" या ग्रंथातील पान क्रं ४७ मधील बुद्धीप्रामाण्यवाद म्हणजे काय हे प्रकरण वाचा. हा ग्रंथ मी स्वतःच लिहीलेला आहे. तो ग्रंथ मी का लिहीला याबद्दल माझे शिष्य आंतरजालावर लिहीतीलच.

( टीप : ज्याप्रमाणे आयझॅक न्यूटन चे सिद्धांत हे विश्वविख्यात आहेत आणि ते वाचण्याची गरज नाही, ते प्रत्येकाला माहीतच आहेत हे गृहीत धरले जाते, ज्याप्रमाणे ज्ञात. गळतगे यांचेही सिद्धांत न्यूटनप्रमाणे आहेत आणि ते पुस्तक प्रत्येकाच्या घरी आहे हे गृहीत धरले जातेय तसंच माझ्या या ग्रंथाचेही आहे )

अनुमान आणि परामानसशास्त्र यांचा संबंध गळतगे जोडत असतील तर ते बुवाबाजी करत आहे असं खेदाने म्हणावंसं वाटतं. त्यांचा परामानसशास्त्र या शाखेतला अधिकार काय हे सिद्ध झालेलं नाही. त्यांचं कुठलंही संशोधन अद्याप सिद्ध झालेलं नाही. शंकर सारडा या साहीत्यिकाचे दाखले देऊन वैज्ञानिक पुस्तक सिद्ध झालं असं दावा करणा-या गळतगे आणि त्यांच्या शिष्यांनी हिग्ज बोसॉन चे दाखले द्यावेत का हा प्रश्न आहे.

"परामानसशास्त्र - एक थोतांड" या ग्रंथातील पान क्रं ४७ मधील बुद्धीप्रामाण्यवाद म्हणजे काय हे प्रकरण वाचा. हा ग्रंथ मी स्वतःच लिहीलेला आहे. तो ग्रंथ मी का लिहीला याबद्दल माझे शिष्य आंतरजालावर लिहीतीलच. >>> Lol

काही शास्त्रज्ञ मात्र अतींद्रिय शक्तीचे अस्तित्व अज्ञानातून किंवा निव्वळ आडमुठेपणातून नाकारतात, ही वस्तुस्थिती आहे.
----- अतींद्रिय शक्तीचे अस्तित्व दाखवल्यास ते त्याचा स्विकार करतील. जे अस्तित्वातच नाही आहे त्यावर शास्त्रज्ञांनी केवळ एक स्वयंघोषित ज्ञान तपस्वी म्हणतो आहे म्हणुन विश्वास ठेवावा हा अट्टाहास अयोग्य वाटतो.

याविषयी आयसेंक हा मानसशास्त्रज्ञ म्हणतो, ‘एखाद्या क्षेत्रात नैपुण्य(Specialization) संपादन केलेल्या शास्त्रज्ञाचे मत इतर त्याने नैपुण्य न संपादलेल्या विषयात प्रमाण म्हणून स्वीकारणे धोक्याचे असते.
----- एखाद्या विषयांत तज्ञ असला तरी त्याला इतर क्षेत्रात अक्कल असतेच असे नाही. आणि हे त्याला तसेच सभोवतालच्या लोकांना मान्य असते. कुणी एक व्यक्ती सर्वच विषयांत तज्ञ नसतात.

कारण त्यात त्याचे ज्ञान शून्य असल्यामुळे आपल्या नैपुण्यक्षेत्रातील पुर्वग्रह त्यात घुसडून तो त्या विषयी आडमुठेपणा (pigheadedness) स्वीकारतो.
----- आपला लेख नेहेमीप्रमाणेच वाचकांची कमालीची दिशाभुल करणारा आहे...

ऐतिहसिक दृष्ट्या अतींद्रियशक्ती हा विषय भुताटकी, अंगात येणे, जादू टोणा, चेटूक आदी गोष्टींशी निगडीत असल्यामुळे या विषयाकडे पहाण्याचा माणसांचा दृष्टिकोण कधीच निःपक्ष किंवा शास्त्रीय राहू शकलेला नाही.
------ माणसांचे सोडा तुमचा काय दृष्टिकोण आहे ते मोजक्या शब्दात लिहा...
कधी मुलींच्या डोळ्यातुन खडे दगडे बाहेर येणे असल्या भंपक गोष्टींचे समर्थन करायचे. अंगात येणे, जादू टोणा, चेटूक यामधे तुम्हाला काय शास्त्र दिसते आहे ते लिहा. समाजात अंधश्रद्धा पसरवुन तुम्हाला मिळते काय याचे मला कोडे पडते.

उदय

शशिकांत ओक यांना उत्तरं वाचण्याची सवय नसावी किंवा ती समजत नसावीत.

त्यांना मागेच उत्तर दिलेलं आहे कि परामानसशास्त्राला ज्या मानसशास्त्रज्ञाने मान्यता मिळवून दिली आहे त्याचीही खंत हीच आहे कि केवळ ४% इतक्याच मानसशास्त्रज्ञांनी या शाखेला मान्यता दिलेली आहे. वैज्ञानिक जगतात त्यांच्या शाखेला आव्हान दिले गेलेले आहे ज्याची समाधानकारक उत्तरे अद्याप मिळायची आहेत.

ओक यांनी हे सर्व मुद्दे नजरेआड केलेले आहेत. राजा विक्रमादित्य ज्याप्रमाणे पुन्हापुन्हा खांद्यावर प्रेत घेऊन पुढे निघालेला होता त्याचप्रमाणे अनेक प्रश्नांना बगल मारून ते गळतगेंना खांद्यावर घेऊन निघाले आहेत. पहिल्या प्रकरणाचा सारांश देऊन शेवटच्या प्रश्नावर चर्चा करा असा त्यांचा आग्रह असतो. त्यावरही मिपा वर एका वाचकाने आमच्यापुढे गळतगे यांचे पुस्तक नसून ओक यांचा संक्षिप्त लेख आहे असं सुचवलेलं होतं.

कडेगावचं जे प्रकरण गळतगेंनी दिलंय आणि ज्याआधारे त्यांच्या सिद्धांताचा डोलार उभा केला आहे त्या पहिल्या प्रकरणाचा जो काही सारांश मिपा आणि माबोवर दिला गेला त्याची यथेच्छ धुलाई दोन्ही ठिकाणी झाली आहे. त्या वेळचं ओक यांचं अचानक मौनात जाणं आणि धुरळा खाली बसल्यावर पुन्हा नवीन प्रकरण घेऊन समोर येणं हे बरंच काही सांगून जातं.

गळतगेंच्या पुस्तकात विज्ञानवाद्यांचा अवैज्ञानिक दृष्टीकोण असा जो अभूतपूर्व वाकप्रचार आहे त्याचं प्रयोजन त्यांनाच माहीत ! त्यांचा रोष महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर आहे. या समितीने अंधश्रद्धेच्या विरोधात काम करताना विज्ञानवादाचा प्रसार केला आहे. वैज्ञानिक दृष्टीकोण म्हणजे काय आणि बुद्धीप्रामाण्यवाद म्हणजे काय याचा प्रसार केला. याचा अर्थ अंनिस म्हणजे वैज्ञानिकांचा अड्डा नव्हे हे गळतगेंना समजत नाही का ? ख-या वैज्ञानिकाला अंधश्रद्धावाद्यांना उत्तर द्यायला वेळ नसतो हे त्यांना ठाऊक नाही का ? वैज्ञानिक हिग्ज बोसॉन शोधतील, बिग बँगचा प्रयोग करतील , बिग् बँग् खेरीज अन्य थिअरीवर काम करतील कि अंधश्रद्धावाल्यांना उत्तरे देत वेळ वाया घालवतील ?

म्हणूनच वैज्ञानिक जे काम करत नाहीत ते अंनिस करत असल्याने त्यांच्या मर्यांदासहीत त्यांचं कौतुक करण्याची गरज आहे. अंनिसचा पराभव झाला असं गळतगे म्हणतात ते ही सिद्ध झालेलं नाही. समजा अंनिसचा पराभव जरी झाला तरी तो विज्ञानाचा पराभव नव्हे हे गळतगे आणि अंधश्रद्धावाल्यांना चांगलेच ठाऊक असते. मात्र असा पराभव देखील कुठे आढळून आलेला नाही. अंनिसचा अजेंडा पाहता त्यात मानवजातीचं नुकसान आहे असं दिसत नाही, अंधश्रद्धेपोटी उपचाराला नकार देणे , बुवाबाजीच्या नादाने जीव गमावणे, संपत्ती, शील गमावणे अशा प्रकारातच नुकसान आहे ज्याच्या विरोधात ही समिती काम करते.

पूर्वी अंधश्रद्धावाले ज्या मुद्यांच्या आधारे विरोध करत तेच मुद्दे गळतगेंनी उचलले आहेत. फक्त आता जोडीला परामानसशास्त्राचं तुणतुणं आहे. परामानसशास्त्राची गंमत म्हणजे ते फक्त ईएसपी शी संबंधित आहे. त्यात वैज्ञानिक प्रयोग म्हणता येईल असा फक्त झेनर कार्डांचा आधार आहे. जे बी -हायेन वगळता या शाखेमधे कुणीही भरीव काम केलेलं नाही. ज्या आधारे या शाखेला ईसपी म्हणून वेगळी मान्यता मिळाली आहे तिचं नामकरणही परामानसशास्त्र हे -हायेन यांनीच केलेलं आहे.

केवळ या मान्यतेचा आधार घेऊन आता पॅरासायकॉलॉजी फाऊंडेशन नावाची संस्था स्थापन झाली आहे. या संस्थेत आता भूतबाधा, झपाटणे, चेटूक, काळी विद्या इ. सर्व विषय घेऊन जणू काही या सर्व विषयांना मान्यता असल्याचं भासवलं जात आहे. या फाऊंडेशनच्या शाखा हळूहळू सर्वत्र होत आहेत. जे बी -हायेन यांचे परामानसशास्त्र आणि या फाऊंडेशनचा काहीही संबंध नाही हे लक्षात घ्यायला हवं.

गळतगे कुठल्या कॅटॅगरीत येतात ?

हे सर्व अचाट असल्याने सर्वसाधारण मानवाशी आपली गाठ पडलेली नाही याची खूणगाठ बांधणे अत्यंत आवश्यक आहे.

मित्रा
ज्ञात. गळतगे यांचेही सिद्धांत न्यूटनप्रमाणे आहेत आणि ते पुस्तक प्रत्येकाच्या घरी आहे हे गृहीत धरले जातेय तसंच माझ्या या ग्रंथाचेही आहे
प्रा. गळतगे यांचे पुस्तक प्रत्येकाच्या घरी आहे किंवा असते त्यात तुम्हीही आलात असे असते तर माबो वर त्यांच्या पुस्तकातील प्रकरणे सादर करायला लागली नसती. तीच गत आपल्या पुस्तकाची आता आपल्या पुस्तकातील प्रकरणे आपण सादर केलीत तर आमच्या माहितीत भर पडेल.. आपले याविषयावरील लेखन वाचायला माबो करांकरांना आवडेल.असे वाटते.
अन्य मुद्दे पुढे विचारात घेता येतील

मित्रा,
मन हा अवयव आहे? असा प्रश्न उदय यांनी आपल्याला उद्धेशून केला आहे त्याचे उत्तर आपण मला विचारता आहात. तरीही मला विचारलेत म्हणून - मन हा अवयव नाही असे मानतात .

चला इतक्या प्रदीर्घ चर्चेनंतर गळतगे यांचे पुस्तक कुणालाही ठाऊक नाही याबद्दल आपली सहमती झाली. तसंच माझं पुस्तक न वाचल्याने त्याबद्दल चर्चा करता येत नाही हे आपण मान्य केलंत हे ही नसे थोडके. आता तरी गळतगे काय म्हणतात याबद्दल लिहा असा आग्रह होणार नाही असा अंदाज आहे.

मन कुठे असतं हा प्रश्न तुम्हाला होता... उदयन यांच्या प्रश्नाकडे दुलक्ष करा. त्याचं उत्तर मी त्यांन विपुत देऊ शकतो.

मित्रा,
मन हा अवयव आहे? असा प्रश्न उदय यांनी आपल्याला उद्धेशून केला आहे त्याचे उत्तर आपण मला विचारता आहात. तरीही मला विचारलेत म्हणून - मन हा अवयव नाही असे मानतात .

१. उदयन यांनी मला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला विचारलंय ? Biggrin वरच्या सगळ्या पोस्टस आपण वाचाव्यात पुन्हा. ओकसर आपल्याला प्रश्न काय विचारलाय हे जसं तुम्हाला नीट ठाऊक आहे तसंच या पोस्टी सर्वांना पुन्हा वाचण्याची सोय इथेच आहे. इथल्या इथे आपण ही अशा प्रकारे बगल दिली आहे.

२. जे. बी. -हायेन या मानसशास्त्रज्ञाविषयी आपण काहीच म्हटलेलं नाही. माझ्या त्यासंबंधी असलेल्या पोस्टबद्दलही अवाक्षर नाही.

परामानसशास्त्राद्वारे हेग्ज बोसॉन चा शोध कसा लावतात ?

Submitted by Kiran.. on 6 July, 2012 - 17:13 >>

Lol हाच प्रश्न मला थोड्या वेगळ्या शब्दांत विचारायचा आहे. वैद्यकशास्त्राद्वारे हिग्ज बोसॉनचा शोध कसा लावता येईल बरे ?

सर्व शास्त्रांचे उद्दिष्ट समान असते की काय?