सांधेदुखी

Submitted by amitad on 28 May, 2008 - 03:51

नमस्कार, माज्या बहिणीला गेल्या २ वर्शापासून सान्ध्यान्च्या सोरायसिस चा त्रास आहे. आयुर्वेदिक उपचार चालु आहेत पण म्हणावा तसा फरक नाहिये. कोणी काही पथ्य, माहीती ओषध सान्गितलीत तर बर होइल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमित, ह्या दुखण्यांना बरे व्हायला वेळ लागतोच. पण अजिबात बरे वाटत नसेल तर वैद्य बदलून पाहा.
पुण्यात असाल तर वैद्य दिलीप गाडगिळ, नरेन्द्र पेंडसे, त्रिलोक धोपेश्वरकर इ. अतिशय चांगले वैद्य आहेत.

हे उपचार पण करून पाहा.

पायात गोळा आला तर

सहन होईल इतक्या गरम तेलाने पायाला मसाज करणे.
त्याच्या जोडीला एखादा गुग्गूळ e.g. त्रिफळा, योगराज इ. घेतल्यास आणखी फायदा होईल.
तेलाने (तिळाचे उत्तम) मसाज केल्यावर थोडावेळ कापडाने शेकले तर जास्त फायदा होईल.

आश्विनी, खूपच चान्गली माहिती दिलीत. धन्यवाद.. मी आणि माजी बहीण दोघी मुम्बईला राहतो त्यामुळे वैद्य बदलणे शक्य नाहिये. अजिबात बरे वाटत नाहि असे नाहि पण सुधारणा स्लो आहे. असो, तुम्ही दिलेली लिन्क कळली नाही.

त्या लिन्कवर अस आहे:
//पायात गोळा आला तर
सहन होईल इतक्या गरम तेलाने पायाला मसाज करणे.
त्याच्या जोडीला एखादा गुग्गूळ e.g. त्रिफळा, योगराज इ. घेतल्यास आणखी फायदा होईल.
तेलाने (तिळाचे उत्तम) मसाज केल्यावर थोडावेळ कापडाने शेकले तर जास्त फायदा होईल. //

हा उपाय सोरायसिस ला पण चालू शकतो का ते कळल नाही . प्लीज खुलासा करावा.
-अमिता

अमिता, लिंकमध्ये जे उपचार आहेत ते सोरायसिस मधल्या सांध्याची सूज कमी होण्याच्या दृष्टीने उपयोगी आहेत.

त्याच्या जोडीला रक्तमोक्षणाचाही फायदा होईल. म्हणजे जळवा लावून रक्त काढणे.

शिळे, थंड अन्न, विरूद्ध आहार, खारट, तिखट, टोमेटो, दही याचा वापर टाळावा.

औषधात त्वकदुष्टीवर आणि रक्तदुष्टीवर काम करणारी औषधे घ्यावीत. तुमच्या वैद्याला ती माहित असतीलच. मुंबईत चांगले वैद्य सुचवू शकेन गरज पडल्यास.

अमिता ...
माझा मामा मुंबईत अंधेरी - प. इथे प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर आहे. -- डॉ. सुभाष बेंद्रे.
तुम्हाला पत्ता हवा असल्यास जरूर सांगा.

अश्विनी खूप धन्यवाद. तुमचे उपाय लक्षात ठेवीन. सध्या तिला वैद्य बाइन्नि वमन करायला सान्गितले आहे त्यान्च्याच देखरेखीखाली. फरक पडेल का हो त्याने? लोक म्हणतात सोरायसिस कधीच पूर्ण बरा होत नाही. आयुष्यभर याचि औषधे घ्यावीच लागतात. ;( खरय काहो हे?
तसेच अश्विनी व सन्दीप खूप धन्यवाद. सध्या तरी वैद्य बदलणार नाही. तरी वाटल्यास अवश्य सान्गीन.

हो, वमनाचा नक्कीच उपयोग होईल. अवश्य करावे.

अश्विनी , वमन झले २ आठवड्यांपूर्वी. बराच फरक पडलाय. पूर्ण नाही पण ६०%. तरी अजून पावलाला सोरायसिस आहे जास्त प्रमाणात तिथे खाज सुटते.. काही उपाय ऐकायला आवडेल.
संदीप, तुमच्या मामांच पुस्तक प्रकाशित झालय का? नाव सांगा ना.

अश्विनी
मला १० वर्षापासून Acne चा त्रास होतो आहे. Antibiotics ने तात्पुरता फरक पडतो. काही उपाय सूचवशील का?

वमन कशावरही गुणकारी योगप्रकार आहे. पित्त असेल तर लगेच बाहेर येतं. मी नियमित करतो वमन.

हा प्रश्ण कुठे टाकावा कळेना,
माझ्या आईला गेले ६-८ महिने सायटिकाचा खूप त्रास होतोय्,उजव्या पायाला.कुणाला खात्रिचा उपाय माहितेय का?किंवा पुण्यात कुणि वैद्य ?
उजवा पाय खुब्यापासून पावलापर्यन्त खूप दुखतोय सद्ध्या.
प्लिज्,कुणाला काहि उपाय महितिइ असेल तर जरूर सुचवा.
धन्यवाद

योगराज गुग्गुळ कोणी घ्यावे,त्याने काय फायदा होतो? आणि महायोगराज गुग्गुळ कोणी घ्यावे?

माज्या उज्व्या हाताचे कोपरा पासुन डिसलोकेट जाले होते दिड महिना हात प्लास्टर मदे होता आता प्लास्टर काडुन दोन महिने झले तरि हाताला सुज येते व टणकत आहे काय कराव अजुन हात सरळ होत नाहि प्लिज म्द्त करा

हाड नीट जुळले नसेल.
माझ्या मनगटांशी अंगठा जोडणार्‍या हाडाचे फ्रॅक्चर असेच काही आठवड्याच्या प्लास्टरनंतरही बरे झाले नव्हते. दुसर्‍या डॉक्टरकडे जाऊन परत एक्सरे काढला आणि आणखी काही आठवडे प्लास्टर घातले तेव्हा बरे झाले.
तेव्हा ऑर्थोपेडिककडे जाऊन परत एक्सरे काढून घ्या.(तोच सांगेल काढायला)

उपरोक्त पोस्ट वाचल्यावर आयुर्वेदिक डॉ. या नात्याने सुचवावेसे वाटते की ,
कृपया आपल्या वैद्य / डॉ. ला , न विचारता कुठलाही जादूचा प्रयोग स्वत:च्या शरीरावर करू नका .
प्रत्येक रुग्णाची प्रकृती ,व्याधी , रुग्णबल ,व्याधीबल ,ऋतू, देश , व्याधी-अवस्था ई. वेगवेगळे असतात .
या सर्व घटकांचा सारासार विचार करूनच चिकित्सा करावी लागते .
एक रुग्ण म्हणून आपण आपल्या व्याधीविषयी जरूर जाणून घ्या , पथ्य-अपथ्याविषयी जाणून त्याचे काटेकोरपणाने पालन करा ,
मात्र स्वत:हून कोणतेही औषध ( आयुर्वेदिक असले तरी) घेऊ नका , कारण अशाने फायदा होण्याऐवजी नुकसानच होण्याची शक्यता आधीक असते .
अमित -आपण विचारलेल्या सोरीयासीस या आजारावर -१-शोधन ( पंचकर्म )
-२-शमन ( औषधी चिकित्सा)
असे दोघी घटक व्याधी तीव्रतेनुरूप आवश्यक असतात .
हा एक कष्टसाध्य त्वचाविकार आहे.
यात चिकित्सेच्या सोबतीला पथ्याची जोड असणेही तितकेच महत्वाचे आहे .