बाळंतविडा

Submitted by मानुषी on 24 June, 2012 - 08:45

एके ठिकाणी बारश्याला जाताना हे दोन फ्रॉक आणि एक छोटे ब्लॅन्केट टाईप दुपटं असं शिवून घेऊन गेले.
पूर्वी शिवलेल्या बेबी फ्रॉकातलं कापड उरलं होतं, त्यालाच चिकनच्या कापडाचा योक/बॉडी लावली. आणि वर रुंद सॅटिन पट्टीचा बो लावून टाकला. हे दोन्ही फ्रॉक साधारणपणे १ वर्षापर्यंतच्या मुलीला येतील.
फ्लॅनेलच्या कापडाचं छोटं ब्लॅन्केट टाइप दुपटं शिवलं आणि त्याला लाल सॅटिन पट्टीचे काठ लावले.

Photo0041.jpg

या फ्रॉकला फिक्कट गुलाबी कापडाच्या बॉडीवर एक फुलाचं रेडिमेड अ‍ॅप्लिक लावलं. फक्त वर ठेवायचं आणि पाठीमागून पातळ पंचा ठेवून गरम इस्त्री फिरवायची.

Photo0042.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: