मेन्सा बद्दल माहिती हवी आहे

Submitted by मी नताशा on 21 June, 2012 - 08:14

ह्या शनिवारी ज्ञानप्रबोधिनीमध्ये १० ते १५ वर्षे वयोगटासाठी मेन्साची निवड चाचणी परि़क्षा होणार आहे. मुलीला बसवायचा विचार आहे.

जर कोणाला मेन्सा बद्दल काही महिती असेल तर क्रुपया सांगावी. मेन्साची चेबसाईट पाहिली आहे. मला मुख्य हे जाणून घ्यायचे आहे की

  1. त्यांची membership घेतल्याचा फायदा काय?
  2. काही खास उपक्रम असतात का?
  3. माझ्या मुलीला साहित्याची आवड आहे. त्यासाठी काही उपयोग होईल का?
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या मुलाला २००४ मध्ये मेन्सा मेंबर शीप मिळाली होती. टॉपच्या २ पी.सी. पॉप्युलेशन मध्ये तो आहे Happy
१. मेन्साचा टेक्निकली फायदा हा की आपल्या मुलाची बौद्धिक क्षमता आपल्याला समजते.
२. मेन्सा काही वर्क शॉप्स घेते, त्याचा फायदा होऊ शकतो.
माझ्या मते त्यांचे उपक्रम जास्तीकरून गणित, शास्त्र यावर जास्ती होतात. निदान माझ्या लेकाच्या वेळेस तरी गणित, वैदिक गणित, शास्त्र- पदार्थ विज्ञान यांची वर्कशॉप्स झाली होती. ठिक होती. एक एक्सपोजर म्हणून नक्की उपयोग झाला. पण तेव्हा इंटरनेट फारसे नव्हते.
३. साहित्याबाबत काही असेल असे वाटत नाही, पण त्यांनाच विचारून पाहणे जास्ती चांगले.
४. कधी कधी जरा जास्ती हुषार मुलांना मित्र मिळत नाहीत, ती जरा जास्तच एकल्कोंडी होतात्.अशा वेळेस त्यांच्याबरोबरीची मुलं मिळतात, अन परिस्थिती जरा निवळते Happy
२००४ - २००७ पर्यंत साहित्य/ भाषा यावर काही झाले नाही. नंतर त्याच्या दहावी अन आता कॉलेज्मुळे संपर्क सुटला.

ललिता, Happy हो गं. स्पेसोफिकली ही मुलं अभ्यास फार करत नाहीत शाळेत, त्यांना तो फार फार कंटाळवाणा वाटतो, त्यातून आपल्याकडची परीक्षापद्धती अगदी वाईट आहे. त्यामुळे ही मुलं आधीच ढेपाळतात, त्यात मित्र बरोबरीचे नसतील तर अधिकच कंटाळतात. अशा वर्कशॉप्स्नी माझं टिनएज पोरगं जरा निवळलं होतं Happy

पुण्यात पूर्वी चित्रपटांचे खेळ, शास्त्रीय व्याख्यानं असे उपक्रम असायचे. फक्त साहित्याला वाहिलेले असे उपक्रम नव्हते. गेले चारपाच वर्षं संपर्क तुटल्यानं माहीत नाही. 'आम्ही / आमचा मुलगा हुशार' एवढं सांगण्याइतपतच खरं म्हणजे मेन्साचा उपयोग आहे. निदान पुण्यात तरी.

निवडचाचणी बुद्धीचा कस लागेल, अशी नसते, असं माझं मत. चाचणीत मुख्यत्वे analytical skills तपासले जातात, आणि त्यासाठी काही प्रमाणात सराव आवश्यक असतो.

चिनूक्स +१.

त्यातून तुमच्या मुलीला साहित्याची आवड असेल तर फायद्यापेक्षा तोटाच होण्याची शक्यता जास्त आहे असे माझे प्रामाणिक मत आहे. मेन्सा सारख्या परिक्षा creativity मोजत नाहीत तर Analytical Skills मोजतात.

चिनुक्स, त्यांची वर्कशाॅप्स बरी होती. निदान तेव्हा काही नवे खाद्य तरी मिळाले होते Happy आता इंटरनेट मुळे हे सहज साध्य झालेय. त्यामुळे आता किती फायदेशीर असेल माहिती नाही. पण मुद्दा क्र. ४ नक्की उपयोगी असेल अजुनही.

मला मेन्साचे सदस्यत्व देऊ करण्याचे पत्र आले होते. मी दहावीनंतर काय करावे या साठी आईबाबांनी बर्‍याच चाचण्या करून बघितल्या होत्या, त्यात एकातले अ‍ॅनलिटिकल स्किल पाहून हे पत्र. तेव्हा मी राजकारणात जायचे म्हणून अडून होते. दहावीनंतर पुढे आर्टस घेते वगैरे. पण एकूण या चाचण्यांमधून लॉजिक आणि गणित हेच बरे जमेल असा निष्कर्ष आला. त्यावर विसंबून सायन्स आणि पुढे इंजिनियरिंग केले. आणि गेली अनेक वर्षे कामात भरपूर मजा येते आहे. Happy

त्या पत्रामुळे आपण हुशार आहोत असे वाटून बरे वाटले. एव्हढाच खरा उपयोग.

तेव्हा मी राजकारणात जायचे म्हणून अडून होते. दहावीनंतर पुढे आर्टस घेते वगैरे. पण एकूण या चाचण्यांमधून लॉजिक आणि गणित हेच बरे जमेल असा निष्कर्ष आला. त्यावर विसंबून सायन्स आणि पुढे इंजिनियरिंग केले. >>> शेम टु शेम (फक्त आर्ट्स सोडून):फिदी:

अवल, ललिता-प्रीति, चिनूक्स, vijaykulkarni, वैद्यबुवा, मास्तुरे, मृदुला आणि मी नसलेली Happy नताशा घन्यवाद.

मास्तुरे मेन्साची वेबसाईट www.mensa.org/ ही आहे.

उपयोगाचे पाहू नंतर, बसवून तर बघते.

हो हो बसवच Happy मज्जा येते त्यांना अशा परीक्षा द्यायला. माझा लेक तर म्हणाला होता, शाळांमध्ये का नसतात असे पेपर्स Happy

मी नताशा,

माहितीबद्दल धन्यवाद! माझी मुलगी ११ वर्षांची आहे. तिच्यासाठी काही फायदा होईल का हे या वेबसाईटवर जाऊन बघतो.

result लागला. मेंबरशीप मिळाली नाही. टॉपच्या ७ पी.सी. पॉप्युलेशन मध्ये ती आहे.

ठीक आहे. आम्ही त्यावरही खूष आहोत. Happy