कोंबडी भुंकाया लागली......

Submitted by satish_choudhari on 21 April, 2009 - 02:27

कोंबडी भुंकाया लागली पहाटे
अन् कुत्रं करते कुकूच कु....
कसा हो जमाना आला बघा
नवराबायकोचं भांडण असं
चालतयं घरी खुपच खु.....

असली नुसती कटकट सारी
बायकौ करते वटवट भारी
ती पण कामी मी पण कामी
ना तीही कमी ना मीही कमी
म्हणे मलाच कसा भेटला तुच तु....

सकाळी सकाळी भांडणाशिवाय
आमचा दिवस बरा जातच नाही
वेगवेगळ्या ऑफीसात दोघेही कामाला
लंचही भांडल्याशिवाय धकतचं नाही
जेवताना लागे ऊचकी तिची ऊचुक ऊ....

सायंकाळी पुन्हा घरी परतल्यावर
तोंड एकमेकांचं पहावं लागतं
संध्येच्या शितलतेनं भांडणही थंडावू लागतं
हळुच तिच्या हास्यावरती प्रेम भरुन येतं
प्रेमात विलीन होते मग दिवसभराची ढिश्श्युम ढु.....

कवि - सतिश चौधरी

कविवर्य, एकदा प्रत्यक्ष भेटा. आपला सत्कार करायचा आहे Happy

मिलिंदा तू पण एक कविता टाक अशाच प्रकारची मग तेच व्हिएन्नाला येतील.
पण प्रो. मी मानलं तुमच्या चिकाटीला Happy
************
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||

आशु Lol Lol

प्रो Happy

०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा

मिलींदा अवश्य भेटु पण माझा सत्कार वगैरे नका करु...! धन्यवाद अश्विनी , केदार..!

*********************************************
प्रा.सतिश चौधरी
काव्यातुन ...हे जिवन फुले....
----------------------------------->>>>>>

भन्नाट ! मला आलं हसूच सू

    ***
    दिसेल दुसरे ते डोळ्यांविण. सरेल मणक्यामधला ताठा.
    पिशी मावशी वदेल सारे... जपून जा, पण जरूर गाठा ! (विंदा)

    स्लार्टी, तुला कळ्ळीच नाय कविता. हसूच सू नाय, हसूच हू
    ************
    धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||

    कवितेला एकच अर्थ असतो का ? मी माझाच अर्थ लावतो बुवा. त्यामुळे मला सर्वच कविता कळतातच.

      ***
      दिसेल दुसरे ते डोळ्यांविण. सरेल मणक्यामधला ताठा.
      पिशी मावशी वदेल सारे... जपून जा, पण जरूर गाठा ! (विंदा)

      प्रो............. हे फक्त तुम्हीच तू करू शकता ! Lol

      कोंबडी भुंकायला लागली.....!!! Lol Lol च्यायला...चिकन खाताना नक्की आठवेल हे !

      वा स्लार्टी मित्रा, तोडलंस, फोडलंस Lol म्हणूनच तुला ती डार्लिंग कविता झाली होती. तरीपण हसूच हू.. हेच योग्य वाटतंय या पाचोळ्यात (पाचोळा म्हणजे सुकलेली पानं नाहीत हं, पाच ओळी !)
      ************
      धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||

      अश्विनी, तुला कळ्ळाच नाय विनोद Proud

        ***
        दिसेल दुसरे ते डोळ्यांविण. सरेल मणक्यामधला ताठा.
        पिशी मावशी वदेल सारे... जपून जा, पण जरूर गाठा ! (विंदा)

        अय्या स्लार्टी, असं आहे होय ! मी पण हसते मग. माझं काय जातंय हसायला Proud (ते सू वरुन कीकॉय असा मला संशय येतोय)

        ************
        धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||

        LOL मिलिन्दा
        मला ते "ढिश्श्युम ढु....." अन "सत्कार" यात जवळचा सम्बन्ध का जाणवतो आहे???
        विस्कटुन सान्गेल काय कूणिच कू? Proud

        लिंबूच लू, तुम्हीच विस्कटा, शकत शू असाल तर Proud
        ************
        धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||

        वा व्वा.... ल्लै झ्याक वेंटर्टेन्मेन्ट झाली की..
        चकट फू
        rather, "फुकट फू" म्हणू, चालेल?

        इथे कविचा कवि पेक्षा एकमेकाना प्रतिसाद देने सुरु आहे अस वाट्त. असो ...... तुम्हि सुरु ठेवा......

        लोकेश .. कवी कोणाला म्हणतांय.. असा अपमान आम्ही कधी सहन करणार नाही !! Proud
        मिलिंदा, तू भेटच आता.. Happy

        क्ष Lol

        कविता अत्यंत फालतू... (काहीच्या काहीच्या काहीच असा विभाग चालू करावा का?)
        --------------
        नंदिनी
        --------------

        .

        म्रुदुल,मायबोलीवर स्वागत. Happy

        एवढ्यातच फ्रस्ट्रेट झालीस का ! जरा दमाने (धिराने/संयमाने/चिकाटीने) घे !

        इकडेतिकडे चक्कर टाक ! मराठी सुधारायला तुला हेच पान पहिले सापडले का ? Proud

        मस्त मनोरंजन प्रोफेसर Happy

        क्षमस्व Sad

        ------------------------
        देवा तुझे किती सुंदर आकाश
        सुंदर प्रकाश सूर्य देतो

        केदार Rofl
        ----------------------------------------
        फिर वोही रात है.. फिर वोही.. रात है ख्वाब की....

        .

        काय बोलू...? खरं तर बोलु की नको..? :विचारमग्न बाहुली :
        ................................
        आज फिर जीनेकी तमन्ना है .....

        प्रकाश,
        इकडेतिकडे चक्कर टाक ! मराठी सुधारायला तुला हेच पान पहिले सापडले का ? >>> Rofl

        प्रो. नॉन स्टॉप करमणुक.
        तूम्ही एक आता नॉन स्टॉप नॉनसेन्स असे चॅनेल उघडु शकता. Proud

        धन्यवाद आपल्या सगळ्यांचे.... ! कारण अशा कविता पचवायला फारच
        धाडस धु... लागतं.....! Lol Lol Lol
        *******************************
        प्रा.सतिश चौधरी
        काव्यातुन ...हे जिवन फुले....
        ----------------------------------->>

        धाडस धु Lol Lol
        ************
        धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||

        धन्यवाद आपल्या सगळ्यांचे.... ! कारण अशा कविता पचवायला फारच
        धाडस धु... लागतं.....!
        -------------------------------
        छे छे... त्या पेक्षा जास्त धाडस धु अशी कविता लिहून ती सार्वजनिक ठीकाणी पोस्टायला लागतं!

        ========================
        कुछ पढके सो ...कुछ लिखके सो
        आज जागा जहां, उससे कुछ बढके सो

        akshree ……धन्यवाद..!
        *******************************
        प्रा.सतिश चौधरी
        काव्यातुन ...हे जिवन फुले....
        ----------------------------------->>

        Pages